आता फक्त काढ दिवस
त्या दिवशी प्रो.देसाईंचा वाढदिवस होता.मला संध्याकाळी तळ्यावर जेव्हां भेटले तेव्हां म्हणाले “सामंत,दगडाला शेंदूर फासून लोक त्याला देव मानतात.देव मानायला श्रध्दा असावी लागते.ती कमी झाली की मग देवाचे देवपण कमी होतं नाही काय?वयोमान वाढल्यावर परावलंबन वाढतं.छोटे छोटे प्रसंग पण मनाला लागतात.मग अशा वाढदिवसा सारख्या दिवशी पण असं वाटतं,कसले वाढदिवस? आता फक्त राहीले काढ दिवस.
या विषयावर एखादी कविता लिहाल कां?”
त्यासाठी ही कविता सुचली.
काढ दिवस
वय झाले आता सत्तर
कसे म्हणू आता
झाले तरी बेहत्तर
आता कसले वाढदिवस
राहीले ते फक्त काढदिवस