बजेट आले आणि लग्न तुटले.
ही कथा आहे. आमच्या नागपुरकर सदाशिवाची. एका बजेटमुळे लग्न तुटते हे ऐकून कानावर विश्वास बसला नसेल. पण सदाच्या बाबतीत असेच झाले. आमचा सदा आई वडिलांच्या आज्ञेत राहणारा साधभोळा, कुठलेही व्यसन नसलेला एकुलता एक मुलगा. तरीही त्याचे लग्न तुटले. सदाचे वडील नागपूरमध्ये एका सरकारी शाळेत शिक्षक होते. दहा वर्षांपूर्वी नागपुरात 2500 चौरस फुटच्या फ्लॅट वर त्यांनी घर बांधले. ग्राऊंड फ्लोर वर एक मोठा हॉल, दोन बेड रूम, मोठे स्वैपाकघर, एक स्टोअर रूम आणि एक देवघर ही. वरच्या माल्यावर पाहुण्यासाठी एक रूम ही. घरात पेरू, लिंबू, आंबा आणि शेवगाच्या शेंगांचे झाडे होती.