टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
छायाचित्रण
कनकालेश्वर - ऐतिहासिक मानबिंदू
प्रेषक भास्कर केन्डे ( मंगळ, 11/18/2008 - 09:12) .औरंग्याने महाराष्ट्रातल्या वास्तव्यात हजारो मंदिरे उध्वस्त केली. त्यातली बरीच मशिदींमध्ये बदलवली गेली, काही नामशेष झाली, काही आजही डगडुगीच्या/जिर्नोद्धाराच्या प्रतिक्षेत आहेत तर थोडी पुन्हा नव्याने उभारी घेऊन उभी राहिली. त्यापैकी एक प्रसिद्ध मंदिर म्हणजे हे कनकालेश्वर...
बीड शहराच्या पूर्वेला बिंदूसरेच्या तिरावर असलेले हे महादेवाचे हजारो वर्षांपूर्वीचे मंदिर पुराणांमध्ये तसेच रामायणातही उल्लेखलेले आहे. काही पुराणांमध्ये परशुरामाने येथे महादेवाची स्थापना केली असा उल्लेख आहे. तर इतिहासकारांच्या मते हे किमान १००० ते १४०० वर्षे जुने असावे. याचे बांघकाम हेमाडपंथी स्वरुपातले आहे... केवळ दगडांवर दगड गुंफून हजारो वर्षे उभे असलेल्या या देवळाने केवळ ऊन, पाऊस, वारा यांचाच नव्हे तर मुसलमानी आक्रमकांच्या पहारी, हातोडे, तोफा, यांचाही सामना केला आहे.
या दुष्काळी/कोरड्या भागातही कोरडे न पडणार्या या तळ्याच्या मध्यभागी असलेल्या या देवळात जायला एक छोटा दगडी पूल आहे जो पावसाळ्यात पाण्याखाली असतो. त्यावरुन आत गेलो की हे प्रवेशद्वार दिसते.
अल्लाउद्दीन खिलजीचा मूळचा गुजराथ/राजस्थान या भागातला सेनापती महादेव कपूर ज्याचे धर्मांतर केल्यानंतर मलिक कपूर असे नामकरण करण्यात आले त्याने पहिल्यांदा या देवळावर आक्रमण केले.
पुढे औरंग्याच्या कर्दनकाळी सैन्याने या मंदिरावर कमीत कमी २७ वेळा हल्ले केले. त्यात एकून एक सर्व मुर्ती भग्न केल्या गेल्या. हे मंदीर त्या नंतर बहुतेक वेळा हिंदूंसाठी बंदच होते. ते परत हिंदूंच्या हाती यायला १९४८ साल उजडावे लागले.
या देवळाच्या आत सर्व भिंतीवर देवदेवतांच्या सुबक व कोरीव भग्न मूर्ती त्या आक्रमकांच्या क्रौर्याची साक्ष आजही देतात.
गाभ्यार्याच्या छताचे मूळ कोरिवकाम सुदैवाने आजही सुरक्षित आहे. ते पाहताना मंत्रमुग्ध व्हायला होते. या देवळाला त्याच्या या श्रीमंतीमुळे/वैभवामुळे कनकालेश्वर हे नाव पडले. (कनक = सोने, सूवर्ण).
या मंदिराचे पुजारी कल्याण महाराज हे प्रसिद्ध समाजसेवक आहेत. त्यांच्या मते हे देऊळ स्वातंत्र्य मिळण्याच्या काळात जर हिंदूंनी मिळवले नसते तर याचेही बाबरी झाले असते. त्यांचे हे म्हणने किती वास्तववादी आहे याची प्रचिती याच शहरातील आणखी एक मंदीर (पद्मावती मंदीर) जे की आज एका विशाल मशिदीमध्ये रुपांतरीत झालेले आहे त्याकडे पाहून येते. तेथे मदरशे म्हणजे आतंकवादी तयार करण्याचे कारखाने मोठ्या प्रमाणात सुरू आहेत तर या कनकालेश्वर मंदिरात अनेक समाजोपयोगी उपक्रम हाती घेण्यात आलेले आहेत. जसे की या मागास भागातल्या ग्रामीण व गरीब कुटुंबातल्या लग्न कार्यांसाठी हे देऊळ अगदी वाजवी दराने दिले जाते, वगैरे.
येथे कर माझे दोन्ही जुळती.
जाता-जाता - दहावीच्या परिक्षेच्या काळात देवळाचा हा भाग माझी दिवसभराची अभ्यासाची खोली होता.
बहेर रणरणते ऊन असू देत पण येथे मात्र कसे थंड-थंड वाटे. बरेचदा अभ्यास सोडून मी या तळ्यातल्या रंगिबेरंगी माशांना पहात तर कधी कधी ते सुंदर कोरीव नक्षिकाम तासन तास न्यहाळत बसे.
कनकालेश्वराच्या या तळ्यात एक ते दोन फूट लांबीचे वेगवेगळ्या रंगाचे चमकदार मासे हे बच्चे कंपनीचे विषेश आकर्षण होते. पण या काही वर्षात ते मासे नष्ट झाल्याचे कळते. तसेच या तळ्यात गाळही खूप साचला आहे. लोक या तळ्यात गणपती विसर्जन करतात. तसेच निर्माल्यही फेकतात. ते थांबायला हवे नाहीतर हे तळेच नष्ट व्हायचे.
असे हे आमचे कनकालेश्वर मंदिर... आम्हा बीडकरांचे श्रद्धास्थान, आमच्या पूर्वजांच्या वैभवाचे, लढवय्येपणाचे प्रतिक... सध्या त्या वैभवशाली वारशाच्या वारसदारांकडून योग्य त्या काळजी अभावी एकटेच परिस्थितीशी झुंज देत उभे आहे.
चला मंडळी "पॅरीस" पाहुयात ... पॅरीस : एक प्रेमनगरी - भाग २
प्रेषक छोटा डॉन ( सोम, 11/17/2008 - 03:52) .आधीच्या भागाचा दुवा ... चला मंडळी "पॅरीस" पाहुयात ... पॅरीस : एक प्रेमनगरी - भाग १
बाहेर आल्यावर वाटत होते की कोणत्या तरी वेगळ्याच दुनयेत आलो, आत जे काही होते ते दैवी, अलौकीक, अप्रतिम, अमानवी, उच्च असे काही आणि बाहेर तुमच्याआमच्यासारखे सामान्य, छे शब्दच नाहीत आतले सौंदर्य शब्दातुन उतरवायला, फोटो तरी किती काढणार ???
तर बाहेर आल्यावर आम्ही थोडी पेटपुजा करुन पुन्हा बसमध्ये चढलो. च्यायला ह्या ठिकाणी जेवणाने चांगलाच शॉट लावला डोक्याला. आम्ही पुण्याच्या "जोशी वडेवाल्यागत" फेमस असणार्या पॅरीसच्या एका दुकानातुन "बर्गर कम सँडवीच कम काहीतरी" घेतले, चावता चावता चक्क हालत खराब झाली, एवढा कडक ब्रेड जो सामान्य दाताने तोडणे अशक्य आहे तो हे लोक कसा काय खातात ते "लिओनार्डो दा विंची" जाणो, आम्ही आपलं जहागिरदारागत आमचे खाणे तिथे मोकाट उडणार्या कबुतरांवर मेहरबान करुन पुढे निघालो ...
त्यानंतर जाताना गाडी एका अतिशय जुन्या ( अंदाजे ५०० वर्षे) पुलावरुन गेली, त्याच्या आसपास एकदम सुंदर जुन्या धाटणीच्या युपोरिअन इमारती होत्या, मस्त वाटले पाहुन.

मंडळी ह्या ठिकाणी आपल्याला भाडेतत्वावर ( च्यायला, काय एकदम टिपीकल देशी शब्द आहे ) "बोट्स उर्फ नावा" मिळु शकतात ...
अफाट रेंज आहे, साध्या नावेपासुन ते अलिशान सर्व "सोई" उपलब्ध असणार्या क्रुज पर्यंत, आम्ही आपलं सुमडीत पुढे निघालो...

त्यानंतर पुढे गेल्यावर दिसले ते ख्रिश्चनिटी संस्कॄतीचा शिरपेच .... दी कॅथेड्रल ऑफ नॉत्र डॅम ...
हे अतिभव्य चर्च पाहुन अक्षरशः डोळे पांढरे होण्याची वेळ येते. आता जरा ह्याचा इतिहास सांगतो.
जेव्हा इसवी सन ११६० च्या सुमारास "चर्च ऑफ पॅरीस" ला अधिकृतरित्या "युरोपचे प्रमुख चर्च" म्हणुन मान्यता मिळाली तेव्हा त्या काळचा बिशप " मॉरीस दी स्युली" ने जुनी वास्तु पाडुन नवे एक नेत्रदिपक चर्च बांधण्याचा घाट घातला, त्याला त्या काळचा राजा "सातवा लुई" कडुन सर्व मदत मिळुन इसवी सन ११६३ साली चर्चच्या बांधकामास सुरवात झाली व टप्याटप्याने इ.स. १३४५ साली आज जसे दिसते तसे चर्च बांधुन झाले, त्या काळच्या बिशप्सनी आपली सर्व ताकद व पैसा ह्या कामी ओतला.
हे चर्च प्रामुख्याने त्याच्या "शैली, ५ अतिप्रचंड ऑर्गन्स, अतिप्रचंड व सुमधुर घंटा, मनमोहक काचेची तावदाने, पेंटिंग्स व काही पुतळे" ह्यासाठी प्रसिद्ध आहे.
आतले फोटो काढता आले नाहीत पण बाहेरच्या फोटोवरुन त्याच्या वैभवाची कल्पना येऊ शकते ...
जाता जाता : अशी एक आख्यायिका सांगतात की " जो माणुस ह्या त्या चर्चच्या चौकात उतरुन त्या भुमीवर पाय ठेवतो तो पुन्हा फिरुन नक्की पॅरीसला येतो, म्हणजे संत नॉत्र डॅम त्याला पुन्हा बोलवतो." अच्छा, मग आपले ठरले तर, पुन्हा आपण नक्की फिरुन पॅरीसला जाणार, जर तसे झाले नाही तर मात्र आपले आणि नॉत्र डॅम बाबाचे भांडण नक्की.
उगीच नाय सांगत, पुरावा आहे आपल्याकडे तेथे पाय ठेवल्याचा,आता बघतोच कसे बोलवत नाही ते ...
( ही माहिती स्वातीताई "दिनेश" यांच्याकडुन ...
)
त्यानंतर गाडी गेली ती "प्लेस डी कॉनकॉर्ड" वरुन, हा पॅरीसचा सगळ्यात मोठ्ठा व प्रमुख चौक.
ही जागा प्रामुख्याने पुतळे ( वेगवेगळ्या राजे, राण्या, योद्धे ) व मनमोहक कारंजे ह्यानी अगदी गच्च भरले आहे, पहायला खुप सुंदर आहे.
ह्याचे इतिहासात अजुन एक महत्व म्हणजे "फ्रेंच राज्यक्रांतीच्या " काळातले प्रसिद्ध "गिलोटीन्स" येथेच उभारण्यात आले होते, त्या काळात प्रामुख्याने प्रजेने त्यांना त्रास देणार्या अनेक लोकांचे मुंडके ह्याच ठिकाणी उडवले होते. त्यात सांगायचे तर "राजा लुई पंधरावा, राणी अँटोनेट्टी, राणी इलिझाबेथ, मॅडम ड्यु बरी, डँटन, सेंट लुईस " ह्यासारख्या अनेक राजे उमरावांचा समावेश आहे, असे म्हणतात की इथे एवढा रक्तपात झाला की नंतर जेव्हा "पोप" पॅरीसला आले तेव्हा त्यांनी ह्या अपवित्र भुमीवरुन जायला नकार दिला ...
जेवढे सुंदरता अनुपम तेवढेच क्रौर्यही भयानक, ह्याचे उत्तम उदाहरण इथे आहे ...

त्यानंतर पुढचे स्थान येते ते म्हणजे "आर्क दी ट्रिम्फो " ...
पण तिकडे जाण्याआधी एका गोष्टीचा उल्लेख करणे गरजेचे आहे तो म्हणजे ह्या २ स्थानांना जोडणारा रस्ता. ह्याचे नाव आहे "अवेन्यु दी चॅम्प्स शांजेलिझे" उर्फ "जगाचा फॅशन स्ट्रीट", होय मंडळी जगाच्या सर्व फॅशन्सचे हे उमग स्थान, अतिशय मोठ्ठा व सरळसोट रस्ता हा, जगातले फॅशनशी संबंधीत यावच्चवत बँड्स इथे उपलब्ध आहेत.
शिवाय ह्या रस्त्यावर असणार्या अलिशान हॉटेलातुन अखंड चालु असतात ते "फॅशन शोज" , होय तेच की आपल्यातले बरेच जणे घरच्यांपासुन चोरुन लपुन व रात्री जागुन एकेकाळी "एफ टीव्ही" वर मोठ्ठ्या चवीने पहायचे. खरे सांगायचे तर हा अख्खा रस्ताच एक "फॅशन शो चा रॅम्प" आहे ....
( इथले फोटो इथे देत नाही, उगाच "नसते साहित्य" प्रसिद्ध केल्याच्या आरोपाखाली माझा "आयडी व आयपी ब्लॉक" व्हायचा ...
)
तर आपण आता आलो आहोत ते "आर्क दी ट्रिम्फो" जवळ.
हे स्थळ फ्रेंच लोकांचे "शुरा मी वंदिले" चा वारसा जपणारे.
वेळोवेळी ज्यांनी देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देउन ह्या देशाच्या सुरक्षेवर एक नख उमटु दिले नाही व देशाचा मानसन्मान अबाधित ठेवला त्यांना फ्रेंच जनतेची ही मानवंदना. इथे सर्व प्रमुख "जनरल्स" ची नावे आढळतात व काही जणांची थडगीही आहेत ...
प्रामुख्याने "नेपोलियन दी ग्रेट" च्या सेनान्यांची नावे इथे दिसतात ...
अजुन एक जाताजाता : हे स्थळ दिसायला आपल्या "गेट वे ऑफ इंडिया" सारखे आहे , आपल्याला हटकुन त्याचीच आठवण होते.
अजुन एक सांगायचे म्हणजे हे एका चौकाच्या अगदी मध्यभागी असुन त्याच्या चहुबाजुंनी वाहनांनी भरभरुन वाहणारा रोड आहे, तिथे मध्यावर जायला ठिकठिकाणी "भुयारी मार्ग" आहेत. आम्हाला याची कल्पना नसल्याने आम्ही देशी स्टायलीत "ओ रुको बाबा, रस्ता ओलांडना है हमकु, थांबो थांबो " करत पळापळ करत रस्ता ओलांडला.
पण हे करताना आम्ही त्या शिस्तीतल्या वाहतुकीची अवस्था २ मिनीटातच "पुण्यात चतुर्थीला दगडुशेठ गणपती " समोरच्या वाहतुकीसारखी करुन टाकली ...
पण इथे "माणसाच्या जीवाला" जास्त किंमत असल्याने आम्ही सुखरुन रस्ता पार करु शकलो, छे आमची चुकच झाली खरी.
असो, तुम्हाला म्हणुन सांगितले ....
आता थांबायची वेळ झाली, सलग लिहले तर लेख अति मोठ्ठा व एकसुरी होण्याची शक्यता असते.
बाकीचे सगळे अगदी आयफेल टॉवरसगट पुढच्या भागात नक्की , कृपया समजुन घ्यावे ...
क्रमश ::::
( पुढील भाग ३-४ दिवसात नक्की ....)
माझीही फोटोग्राफी - अजंठा - वेरुळ
प्रेषक श्रीमंत दामोदरपंत ( मंगळ, 11/11/2008 - 17:27) .काही दिवसांपुर्वी अजंठा वेरुळला गेलो होतो....तिथले काही फोटो तुमच्या सोबत शेयर करतो..तुम्हाला आवडतील अशी आशा आहे...
कैलास मंदिर - वेरुळ






अजंठा -


एका चतुराची छायाचित्रे
प्रेषक पांथस्थ ( मंगळ, 11/11/2008 - 13:21) .खंडाळ्या मधे हा चतुर मला एक मुंगी खातांना आढळला.
(हे डिटेल्स तुम्हाला ह्या मध्यम आकाराच्या छायाचित्रांमधे दिसणार नाहित, त्यासाठी माझ्या फ्लिकर् अल्बम ला भेट द्या आणि फोटो मुळ आकारात बघा)





---
माझी लोणावळा-खंडाळा भेट - काहि फोटो
प्रेषक पांथस्थ ( सोम, 11/10/2008 - 10:38) .दिवाळीच्या सुट्टित पुण्याला गेलो असता लोणावळा-खंडाळ्याला भेट दिली. त्याची काहि छायाचित्रे -
खंडाळ्याच्या शुटिंग पॉईंट वरुन काढलेली छायाचित्रे -



खंडाळा ते सनसेट पॉईंट मार्गावरिल एक घर -

पुणे-मुंबई लोहमार्गावरिल एक पॉवर हाउस (?)

खंडाळा लेक आणि मागे शनी मंदिर -

माझीही फोटोग्राफी
प्रेषक लंबूटांग ( रवी, 11/09/2008 - 22:48) .मला फोटोग्राफीमधील जास्ती काही कळत नाही. मॅन्युअल सेटिंग्ज वापरून काढलेले काही फोटो. Trial and Error करून ही छायाचित्रे काढली आहेत.



Blur effect यावा म्हणून हे शटर स्पीड कमी करून काढलेले काही फोटो.
पहिल्या फोटोमधे गाडीच्या वायब्रेशन मुळे प्लॅट्फॉर्म ही हलत होता म्हणून वरील Indicator पण blur झाला आहे.

ह्यात दिसत असलेले Light trails पण शटर स्पीडचीच करामत.

ह्यात त्या माशीचे पंख टिपण्यासाठी शटर स्पीड maximum (१/१०००) आहे. Auto focus न वापरता manual focus केला आहे.

क्लिक करेपर्यंत माशीने कलटी मारली

Auto focus न वापरता manual focus करून काढलेला अजून एक फोटु.

गुड मॉर्निंग म्योदेन
प्रेषक गणा मास्तर ( शुक्र, 11/07/2008 - 21:59) .मिपाकरांसाठी एक छायाचित्र

म्योदेन हे त्या रेल्वे स्टेशनचे नाव आहे.
धुकं.. फोटोज!
प्रेषक मुमुक्षु ( रवी, 11/02/2008 - 16:36) .केरळच्या छोटेखानी ट्रीपवर गेलेलो असताना केरळ बॉर्डर वर नाक्यावर एक-दीड तास थांबवे लागले होते. तेव्हा काढलेले हे धुक्याचे ३ फोटोज -
![]() |
| From Kerala Trip |
![]() |
| From Kerala Trip |
![]() |
| From Kerala Trip |
प्रकाशचित्रे : सुख वाटे जीवा...
प्रेषक विसुनाना ( गुरू, 10/30/2008 - 12:11) ."जाता पंढरीशी सुख वाटे जीवा..." हे तर खरंच!
पण माझं पंढरपूर मात्र निसर्ग आहे.
डांबरी सडका, काँक्रीटी इमारती, वाहनांचा गदारोळ,मोबाईलचा पाश, पोटापाण्याची चिंता, समाजातील पांढरपेशे उच्चभ्रू वर्तन यांपासून अधूनमधून दूर जातो.
कोणी आपल्याला ओळखत नाही आणि आपणही कोणाला ओळखत नाही अशा ठिकाणी वृक्षवल्लींसोबत वारी करतो.
निसर्गाशी गळाभेट होते. चार क्षण विसावा मिळतो.
विसाव्याचे हे क्षण चिरंतन स्मरणात रहावेत म्हणून टिपले आहेत मी.
ते पाहून तुम्हालाही क्षणभर सुख वाटलं तर सार्थक झालं असं म्हणेन.
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |

















