काथ्याकूट
लिखाणाचे काॅपीराईट कसे घ्यावे?
मी आणि माझ्यासारख्या अनेक नवोदित लेखकांसाठी उपयोग होईल या हेतूने हा धागा काढत आहे. बरेच जण कथा, कविता , कादंबरी किंवा एखादे ललित असे काहीबाही लिहून सोशल मिडियावर प्रकाशित करतात. पण काही मोजके किंवा चांगले लिखाण जर कधी पुस्तकरूपाने प्रकाशित करावे वाटले, तर तोपर्यंत ते चोरीला जाऊन त्याची 'दुसरी' आवृत्ती कोठेतरी भलतीकडेच प्रकाशित होऊ नये यासाठी काय करावे किंवा खबरदारी घ्यावी?
आघाडी सरकार आणि सामान्य जनता
भरपूर राजकारण करून, आघाडी सरकार स्थापन केले, पण हे सरकार, सामान्य जनतेसाठी नाही, हे माझे वैयक्तिक मत आहे.
1. सामान्य माणसाला, घरी बोलावून मारहाण.
2. एका माणसाला,जीवे मारण्याची धमकी देणारा आमदार.
3. साधु हत्याकांड
4. तांदूळ घोटाळा
5. अर्भक मृत्यू
6. शेतकरी वर्गाला दिलेली अपुरी मदत
7. वाढीव पेट्रोल दर.
8. ड्रगचा वाढता वापर...
प्रायव्हसी – भाग २
सर्वात आधी विचार करुया की आपल्या माहितीची कुणाला गरज आहे? गंमत अशी आहे की जवळपास सगळ्याच कंपन्यांना ग्राहकांची माहिती हवी असते. मग ती एखादी बँक असो वा इंशुरन्स कंपनी, कपडे विकणारी कंपनी असो वा अॅमेझॉन. कुठलीही कंपनी असो, गूगल, अमॅझॉन, फेसबुक, अॅपल, मायक्रोसॉफ्ट हे सगळे यात गुंतलेले आहेत.
प्रायव्हसी
कंपन्यांना त्यांचा माल तुम्हाला विकायचा असतो आणि त्यासाठी ते मार्केटिंग करतात, ही गोष्ट सगळ्यांना माहीत आहे. आता मार्केटिंग करायचे तर त्याला खर्च येतो. अनावश्यक खर्च झाला तर फायदा कमी होतो. त्यामुळे मार्केटिंग हे कमीत कमी खर्चात, जास्तीत जास्त, यशस्वी कसे होईल, जाहिराती योग्य त्या लोकांना किंवा कंपन्याना कश्या पोचतील हे बघणे, हे कंपन्यांचे उद्दिष्ट असते. (किंवा असायला हवे).
विनामूल्य कोर्स : हाव वर्ल्ड वर्क्स
डॉक्टर अतनू डे (phd Econ UC Berkley) ह्यांचा हा संपूर्ण ऑनलाईन कोर्स असून विनामूल्य आहे आणि भारतीयांसाठी सोयीच्या वेळी ठेवला आहे.
WhatsApp च वापरणार की सिग्नल,टेलिग्रामवर जाणार?
WhatsApp ची नवीन पॉलिसी देत बसत नाही.कारण आतापर्यंत ती पाठ झाली असेल.काहीजणांना वाटतंय हे नवीन धोरण धोक्याचं आहे; काहीजण म्हणतायत आधीच नागवे झालो आहोत अजून काय नागवे करणार? वगैरे. याच अनुषंगाने आलेल्या दोन फेसबुक पोस्ट पहा.
------------------------------------------------
*#व्हॉट्सअपची_नवीन_पॉलिसी*
चालू घडामोडी - जानेवारी २०२१
अमेरिकेने तैवानवरील नियंत्रणे हटविल्याने चीनला संताप अनावर झालाय. मागील १-२ वर्षांपासून चीनला शह देण्यासाठी अमेरिका तैवानला पाठबळ देतेय. अमेरिका व तैवानचे राजनैतिक अधिकारी एकमेकांच्या देशात अधिकृत भेट द्यायला लागल्याने चीन अत्यंत नाराज आहे. आता यापुढील पाऊल म्हणजे अमेरिकेने तैवानला स्वतंत्र सार्वभौम देश म्हणून अधिकृत मान्यता देणे.
लोकप्रतिनीधींची निवृत्ती आणि नवे नियम
भारतीय समाजात लोकप्रतिनीधी हा आता समाज कारणापेक्षा व्यवसाय या गटात मोडायला लागला आहे.
यात चुकीचे आहे असे नाही. मात्र आपले लोप्रतिनीधी हे नोकरी असावी तद्वत पेन्शन घेतात. यातही गैर वाटू नये.
मात्र एका गोष्टीचे आश्चर्य वाटते. या लोकप्रतिनीधी सेवाशर्तीचे काहीच नियम अटी लागू नाहीत. उदा : निवृत्तीचे वय किमान शिक्षण आर्थीक निकष , उत्पन्न गट वगैरे.
कविता शोधायला मदत
आम्ही सध्या एक जुनी कविता शोधत आहोत..
"मी बाई कोकिळ वनांची राणी
गाईन सुंदर गोड गाणी"
याचे कवी माहीत नाहीत, कवितासंग्रह पण माहीत नाही.. जुन्या पुस्तकांमध्ये कुठेतरी होती..
आम्हाला माहीत असलेले version इतके आहे -
गूगलमध्ये नोकरी करणारे आता युनियन करणार
आज बातमी वाचली की गूगल कंपनीमधील एम्प्लॉई आणि काँट्रॅक्टर आता युनियन स्थापन करणार आहेत.
ई-बुक रिडर घ्यावे कि नाही?
मला पुस्तके वाचणे परत सुरु करायचे आहे. सध्या पुस्तके बाजारात जाउन आणण्यापेक्षा लॅपटॉपवरच PDF डालो करुन वाचणे सुरु केले आहे. पण खाली लिहिलेल्या कारणांमुळे लॅपटॉपवर पुस्तके वाचणे सुसह्य नाही.
शेती : काही विचार
शेती ह्या विषयावर बरेच लेखन केले आहे. मी स्वतः एक छोटीशी बागायत बाळगून आहे. आठ आण्याची कोंबडी आणि सव्वा रुपयाचा मसाला अश्या प्रकारचा धंदा असला तरी भविष्यांत त्या जागेवर काहीतरी मोठा इंडस्ट्रियल प्रकल्प निर्माण करू शकेन अशी आशा आहे. मी स्वतः थोडेफार शेतीत काम केले आहे आणि गायीचे दूध स्वतःच्या हाताने काढले आहे. बकऱ्या पोसल्या आहेत आणि माकडांवर गोळ्या सुद्धा झाडल्या आहेत.
शेती विषयक सुधारणांची मिरची फक्त पंजाबीच लोकांना का झोम्बली आहे ?
पंजाब मधील तथाकथित शेतकरी आंदोलन हे आता एक महिन्याहून जास्त चालले आहे. अजून पर्यंत तरी आंदोलन नक्की कश्यासाठी आहे आणि फक्त पंजाब मधीलच शेतकरी ह्याला इतका कडाडून विरोध का करत आहेत असा एक प्रश्न विचारला जातोय.
कोरोनाचा नवा प्रकार
कोरोनाची लस इंग्लंडमध्ये उपलब्ध झाली आहे. गेले वर्षभर सुरू असलेले निर्बंध हळूहळू शिथिल होत असतानाच एक बातमी आली की इंग्लडमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळला आहे. सोबतच इतरही त्रोटक माहिती आली आणि स्वाभाविकच जगभरात परत एकदा भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. अनेक प्रश्न पुन्हा एकदा सगळ्या जगासमोर आ वासून उभे आहेत. हा नवा प्रकार किती भयानक आहे? कुठून आला? ह्याचा संसर्ग किती धोकादायक आहे?
शेतकरी आंदोलन कि हिंदू शीख वाद उकरणे ?
"बघा या आंदोलनामाचेगे कोण आहे आणि किती त्यामागे आयोजन आहे वैगरे" सांगणारी व्हॉट आप विद्यालयावरील एक अजून भिंतीला तुंबड्या लावणारी "पोस्ट"\म्हणून आलेल्या पोस्ट कडे सुरवातीला दुर्लक्ष केले... भाजपचं "आय टी सेल" मधून आलेली म्हणून अशी पोस्ट वाटली असे धरू .. परंतु खालील अनुभववरुन यात खरंच काही तरी "काळे बेरे" आहे असे मात्र आता वाटत आहे.
मोरपिसे
प्रोफेसर जमदग्नी विद्यार्थी / विद्यार्थीनीं बरोबर तळजाई टेकडीवर morning walkसाठी आले होते.
प्रोफेसर म्हणाले,
" हे हे हे हे जे मोरपिसारे तुम्ही पहाताहात व appreciate करत आहात हे तुमच्या साठी नाहीच मुळी..."
" मग कुणासाठी आहे?"
विद्यार्थीनी ने घाबरत विचारले.
कारण विचारशृंखला तुटली तर पुन्हा प्रो.जमदग्नींच्या संतापाचा स्फोट व्हायचा,
- 1 of 338
- next ›