कलादालन
ठिपक्यांची मनोली (मुनिया)
गेल्या १० वर्षां पासुन आमच्या घरी मुनिया येतात. ऊन्हाळा संपुन पावसाळ्याची चाहुल लागली की लगेच हजर होतात. पावसाळ्याच्या सुरुवातीला त्यांची घरटी बांधण्याची लगबग सुरू होते. शरिराच्या आकारापेक्षा ६ ७ पट मोठ्या आकाराचे गवताचे पाते आणुन घरटी करतात. त्यांच्यासाठी आम्ही बाल्कनीत बाजरी ठेवतो. एका वेळेस ७०-८० च्या थव्याने येतात. मुनिया ४ महिने तरी रोज येतात. मुनियांना आठवड्याला ४ ते ५ किलो बाजरी लागते.
मी केलेला एक प्रयत्न !!
संजय क्षीरसागर आणि प्रशांत आवले यांनी प्रोत्साहन दिल्यामुळे मी काढलेल्या चित्रावर स्वतंत्र धागा काढत आहे. -
---------------------------------------------------------------------------------
माझा पहिला मिपा कट्टा
दि. २२ जून २०१४ रोजी झालेल्या मि.पा. कट्ट्याचा वॄतांत
मी तसा मिपाचा दोन वर्षे जुना सदस्य आहे. परंतू मिपाकरांना भेटण्याची माझी ही पहिलीच वेळ. खुप दिवसांपासून मि. पा. करांना भेटायची इच्छा होती ती श्रीरंग जोशी, वल्ली, सूड, धन्या, आणि अत्रुप्त आत्मा यांच्यामुळे पूर्ण झाली त्याबद्दल त्यांचे आभार.
वारली चित्रकला
वारली चित्रकलेची मी तुम्हाला वेगळी काय ओळख करुन देणार? ठाणे जिल्ह्यातील आदीवासींनी जपलेली आणि वाढवलेली ही कला श्री.जिव्या सोमा मशे यांच्यासारख्या कलाकारांनी सातासमुद्रापार पोचवली आहे.
ही नुसतीच चित्रशैली नसुन ती भाषासुद्धा आहे असे काहीजण मानतात. म्हणजे एखाद्या घरात लग्नकार्य असेल तर घरावर काढलेल्या चित्रांमधुन ते गावाला समजते. तसेच पूजा, सणवार, रोजचे जीवन असेही विषय चित्रात असतात.
सिंहगड व्हॅलीमधील फोटो - भाग २
मागील धाग्यात सिंहगड व्हॅलीमधील "दुसर्या" ट्रिपचे फोटो आपण पाहिलेत. या धाग्यात पहिल्या ट्रिपमधील फोटो देत आहे. सिंहगड व्हॅलीमधील बरीचसी माहिती मागील धाग्यात दिली असल्याने या धाग्यात फक्त फोटो अपलोड करीत आहे.
ठिकाण - सिंहगड व्हॅली
१० एप्रिल २०१४
काही लँडस्केप्स...............
सध्या अमेरिकेत असल्यामुळे तेथील काही लॅंडस्केप्स टाकत आहे......
कलादालनात टाकण्यास जमत नाही त्यामुळे येथे टाकले आहे. तिकडे हलविण्यास काहीच हरकत नाही....
सिंहगड व्हॅलीमधील पक्ष्यांचे फोटो - भाग १
सिंहगड व्हॅलीमध्ये मी खुप वेळा गेलोय. पण ते फक्त सिंहगडवर जाण्यासाठी. परंतू व्हॅलीमध्ये पक्षी पहाण्यासाठी म्हणून गेलो ते माझ्या एका मित्रासोबत. तेव्हा ठरवले की पुन्हा वेळ काढून नक्की जायचे. ’चॊकटराजे’ ना विचारले, ते तयार झाले.
शक्यतो फक्त फोटोग्राफीसाठी एवढा खटाटोप कशाला असे बरेच जणांचे म्हणणे असते. परंतू राजेसाहेब याला अपवाद आहेत.
शेवटी ०९ मे ला जायचे ठरले.
|| श्रीस्वामी समर्थ ||
आज श्रीस्वामी समर्थ महाराज {अक्कलकोट स्वामी} यांची पुण्यतिथी आहे. लहानपणी दादरच्या त्यांच्या मठात अनेकदा जाणे होत असे,आता गिरगावात कधी जाणे झाले तर काळाराम मंदीर आणि कांदेवाडीच्या मठात जातो... तिथलेच काढलेले हे फोटो आहेत.
काहीही...
कशाचे फोटो काढुया आता ? असा विचार टाळक्यात आला... मग विचार केला की काहीही टिपायचे कसेही टिपायचे... बघुया हा सुद्धा प्रयोग करुन. वेववेगळे विषय कसेही टिपुन नक्की दिसतील कसे याची उत्सुकता होती...
चिऊताई..
गेल्या काही दिवसांपूर्वी पावसाच्या तुरळक सरी मुंबईत झाल्या. कामाची वेळ रात्रीची असल्याकारणाने, दिवसा घरीच होतो अन् एकदम पावसाची सर आली. मग घेतला कॅमेरा आणि राहिलो उभा खिडकीत या आशेने. फोटो तसे काही मिळाले नाहीत पण, ही भिजून चिंब झालेली चिमणी तेवढ्यात खिडकीजवळ आली आणि कॅमेर्याचा क्लिक - क्लिकाट झाला...
काही फोटोग्राफी प्रयत्न
मिसळपाव संकेतस्थळावर प्रथमच काही फोटो शेअर करत आहे. स्वॅप्स आणि इतर जाणकार या चित्रांतील गुणदोष दाखवतील अशी अपेक्षा.
खालील चित्रांमध्ये कोणतेही पोस्ट प्रोसेसिंग केलेले नाही
श्री. अजित कडकडे
श्री.वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या समाधीच्या शताब्दीचे हे वर्ष आहे. या निमित्त्याने विविध ठिकाणी कार्यक्रम होत आहेत.त्यांच्या ठाण्यात झालेल्या कार्यक्रमात मला श्री.अजित कडकडे यांचे गायन ऐकण्याची संधी मिळाली.तसेच त्यांना भेटुन २ शब्द बोलण्याची संधी मिळाली.
चित्रकला
लहानपणी चित्र काढायला खुप आवडायचे वहिची बहुतेक पाने चित्रांनीच भरलेली असायची. काही वेळा छड्या मिळायच्या तर काहीवेळा शाब्बासकी पुढे बाकीच्या व्यापामुळे चित्र काढणे थांबले सरावही बन्द झाला पण मधेच केव्हातरी लहर येते आणि अशी चित्र साकारतात
- 1 of 62
- next ›