गेल्या १० वर्षां पासुन आमच्या घरी मुनिया येतात. ऊन्हाळा संपुन पावसाळ्याची चाहुल लागली की लगेच हजर होतात. पावसाळ्याच्या सुरुवातीला त्यांची घरटी बांधण्याची लगबग सुरू होते. शरिराच्या आकारापेक्षा ६ ७ पट मोठ्या आकाराचे गवताचे पाते आणुन घरटी करतात. त्यांच्यासाठी आम्ही बाल्कनीत बाजरी ठेवतो. एका वेळेस ७०-८० च्या थव्याने येतात. मुनिया ४ महिने तरी रोज येतात. मुनियांना आठवड्याला ४ ते ५ किलो बाजरी लागते. दिवसतुन तिनदा खायला घालावं लागतं. (बाजरी खाताना त्या सांडवतातही भरपुर आणि खाल्लेल्या बाजरीचे फोलपटं खाली पडतात. जरा कुठे खुट्ट झालं कि लगेच उडुन जातात तेव्हा, त्यांच्या पंखांनिही बाजरी खाली सांडते. त्यामुळे दिवसातुन दोनदा बाल्कनी झाडावी लागते.)
फोटो क्र. ४ : बाजरी संपली कि सगळे वाट बघत बसतात.
फोटो क्र. ५. मुनियाचं पिल्लू असं दिसतं. पुर्वी मुनिया आमच्या खिडकित घरटं देखील करायच्या.
फोटो क्र. ६. आमच्या घरी मांजर आहे म्हणुन खिडकीला अशी कायमस्वरूपी जाळी लावून घेतली. या काळात आम्ही बाल्कनिचा वापर करत नाही. फक्त सकाळी एकदा झाडांना पाणी घालायला जातो. बाल्कनिचं दारही सतत बंदच ठेवतो.
अवांतरः
फोटो क्र. ७ : मुनिया आल्या कि शिक्रा देखील हजेरी लावुन जातो.
फोटो क्र. ८ : मागच्या वर्षी सनबर्डने बाल्कनित घरटं केलं होतं. ती कायम घरट्यात बसुन असायची. आमचा वावरही होताच पण तिने बिंधास्त घरटं बांधलं. अगदी हाताला लागेल अश्या अंतरावर.
फोटो क्र. ९ : दोन वर्षांपुर्वी हा सनबर्ड बाल्कनित रोज झोपायला यायचा. साधारण ६-७ महिने येत होता.
या मुनियाच्या नावाविषयी थोडसं : जरी आमच्याकडे मुनिया १० वर्षांपासुन येत असल्या तरिही या जातीचं नेमकं नाव काय हे पुस्तक उघडुन वाचलं नाही. (निव्वळ आळशीपणा) कारण त्यांचा विणिचा हंगाम, घरटी कोणत्या गवताची आणि कशी बांधतात हे स्वतः रोजच बघत होते. काल हा लेख टाकल्यावर ही चुक लक्षात आली. फेसबुकवर स्केली ब्रेस्टेड मुनिया हा उल्लेख वाचला आणि मिही काहीही अभ्यास न करता हे नाव इथे टाकलं. पक्ष्यांबद्दल ४ पुस्तकांमधे मुनियां विषयी वाचत असता कळंलं की या ठिपक्यांच्या मुनिया आहेत. इंडियन स्पॉटेड मुनिया. स्केली ब्रेस्टेड मुनिया हा शब्दच या पुस्तकांमधे नाही. काही लोक स्केली ब्रेस्टेड मुनियाच म्हणत असतील तर त्यांच्यासाठी ही दुरुस्ती. आणि मी सुद्धा चुकीच नाव पसरवलं म्हणुन सॉरी. मारुती चितमपल्ली यांनी लिहिलेल्या पक्षिकोश मधे यांच्यासाठी मराठी शब्द मनोली आहे. ठिपक्यांची मनोली, काळ्या डोक्याची मनोली इ.
फोटो क्र. १ :
फोटो क्रं २:
फोटो क्रं ३:
फोटो क्रं ४:
फोटो क्रं ५:
फोटो क्रं ६:
फोटो क्रं ७:
फोटो क्रं ८:
फोटो क्रं ९
प्रतिक्रिया
10 Aug 2016 - 5:09 pm | अभ्या..
जोडी मस्त.
कमानीवरचे पण भारी.
10 Aug 2016 - 5:12 pm | सानझरी
धन्यू :)
7 Jun 2017 - 8:53 am | शान्तिप्रिय
मस्त फोटो
10 Aug 2016 - 5:12 pm | स्पा
खल्लास
10 Aug 2016 - 5:23 pm | पिशी अबोली
सुंदर!
किती नशीबवान आहात. अर्थात, फोटोत दिसतंय त्याप्रमाणे तेवढं करतापण तुम्ही त्यासाठी.
10 Aug 2016 - 5:39 pm | अंतरा आनंद
असंच म्हणते
10 Aug 2016 - 5:37 pm | संजय पाटिल
मस्तच फोटो.. खासकरून जोडीचा..
10 Aug 2016 - 5:52 pm | सिरुसेरि
छान लेख आणी फोटो
10 Aug 2016 - 6:20 pm | डॉ सुहास म्हात्रे
मस्तं फोटो.
पक्षी आपल्या बाल्कनीत वावरतात, घर करतात हा अनुभव फारच सुखद असतो !... अर्थातच, कबुतरे सोडून ;)
11 Aug 2016 - 2:33 am | डॉ सुहास म्हात्रे
"आमच्या घरी आलेले अनाहूत पाहुणे" इथे पाहता येतील.
10 Aug 2016 - 7:09 pm | पगला गजोधर
नशिबात योग हवा, घरबसल्या असे सुंदर पक्षीदर्शन होण्याचा.
10 Aug 2016 - 7:11 pm | सुमीत भातखंडे
मस्त
10 Aug 2016 - 7:18 pm | अजया
अरे वा.खूप छान.
माझंही घर असं घरट्यांच्या बाबतीत भाग्यवान आहे! चिमणी राॅबिन बुलबुल सुगरण भारद्वाज आमचे शेजारी असतात!
10 Aug 2016 - 7:20 pm | सानझरी
मला हा लेख एडिट (संपादन) करता येत नाहिये. admin@misalpav.com वर मेल टाकलाय. कृपया चेक करा.
10 Aug 2016 - 8:40 pm | डॉ सुहास म्हात्रे
'साहित्य संपादक' या आयडीला तुमचे म्हणणे कळवा. ते मदत करतील.
10 Aug 2016 - 9:21 pm | सानझरी
साहित्य संपादक हा आयडी सापडेना. ईमेल आयडी आहे का?
10 Aug 2016 - 11:00 pm | डॉ सुहास म्हात्रे
मिपाच्या पानाच्या खालपर्यंत स्क्रोल करा. उजव्या बाजूच्या कॉलममध्ये साहित्य संपादकांशी संपर्क करण्याचा दुवा सापडेल.
10 Aug 2016 - 7:22 pm | मुक्त विहारि
नशीबवान आहात.
फोटो पण उत्तम आले आहेत.
10 Aug 2016 - 8:03 pm | कंजूस
अतिशय सुंदर फोटो.वाशी,उरण भागात,तसेच पनवेल - तळोजा, हिजीमलंग ,कल्याण,ठाणे बेलापूर रोड या परिसरात खूप होत्या या मुनिया.आता सर्व वसाहती झाल्या,गवत मोकळी जागा गायब झाली.तुम्ही खूप मदत करताहात.
11 Aug 2016 - 2:25 pm | सानझरी
धन्यवाद. निसर्गासाठी काहितरी करतोय हेच समाधान वाटतं.
10 Aug 2016 - 8:26 pm | संत घोडेकर
अप्रतिम फोटो.
10 Aug 2016 - 8:30 pm | स्वामी संकेतानंद
सुन्दर फोटो. एवढा मोठा थवा कुणाच्या घरी पहिल्यांदा पाहतोय. एरवी वखार मंडळाचे गोडाउन किंवा राइस मिलच्या अंगणात पाहिले आहे. आमच्याघरीही एकदा घरटे केले होते. पण मांजरीने पिल्लांना खाल्ले. लालबुड्या बुलबुल दरवर्षी घरटे करायचा. एके वर्षी मांजरीने पिल्ले खाल्ली. एका वर्षी भारद्वाजने घरटे मोडले. तिसर्या वर्षी परत मांजरीने पिल्ले खाल्ली. नंतर बुलबुलने आमच्या घरचा नाद सोडला. शिंपीची पिल्ले मात्र जगली,वाचली आणि उडाली.
11 Aug 2016 - 2:33 pm | सानझरी
धन्यवाद. मांजर आमच्या घरीही आहे, पक्षी आणि तिला जपताना तारेवरची कसरत होते आणि गैरसोय देखिल.(पण त्यांच्यासाठी काय पण) मुनिया आमच्या घरी खिडकीत घरटं करायच्या तेव्हा आम्ही खिडकी कायम लावून ठेवायचो. आणि माऊलाही एकदा नाही म्हटलं कि ती जात नाही. शिंजीरनेही घरटं केलं होतं. माऊ घरट्याच्या खालून फिरुन यायची पण शिंजीरने अंडी दिलीच. :)
10 Aug 2016 - 10:43 pm | सानझरी
साहित्य संपादकांचा ईमेल आयडी सांगा रे कोणीतरी.. आपलाच लेख एडिट करता येत नाही हा काय फालतू प्रकार आणि..
10 Aug 2016 - 10:49 pm | विप्लव
खुपच सुंदर
10 Aug 2016 - 11:04 pm | मयुरा गुप्ते
छान पोजेस वगैरे देउन बसले आहेत असं वाटतं.
आमच्या कडे हमिंगबर्ड्स येतात. त्यांच्या साठी खास 'हनीसकल' नावाची फुलझाडं लावाली आहेत. पण त्यांना कॅमेरात कसं बंदिस्त करायचं हे पेच सुटलेला नाहिये कारण अतिशय वेगवान हालचाली, आणि कुठल्याही चाहुलीने बिचकतात.
--मयुरा
11 Aug 2016 - 2:36 pm | सानझरी
कॅमेरात बंदिस्त करावं असं नेहमिच वाटतं, पण त्यापेक्शा तो क्षण जगा. कॅमेर्यापायी मी अनेक सुंदर क्षण गमावलेत. पक्ष्यांच आपल्या अवती भोवती असणंच महत्वाचं आहे.
14 Aug 2016 - 2:01 am | मिसळपाव
मयुरा,
हमिंगबर्ड फीडर वापर. एखाद्या फुलावर हमिंगबर्ड परत परत येणार, तू नेमकी तेव्हा त्याचा फोटो टिपणार हे अवघड आहे. हमिंगबर्ड फीडर लाउन दोन-तीन तास त्यावर व्हिडीओ कॅमेरा लाउन ठेव. नाही तीन तासांचा व्हिडीओ नाही ठेवायचा! त्यातले हवे ते शॉट्स सेव्ह करायचे. उदा. खाली दिलेले फोटो; पहिला आजचा आणि पुढचे तीन आधी कधी काढलेले.
पण फीडर लावलास तर ही पथ्यं न चुकता पाळायची;
- नियमित लावायचा. दोन दिवस लावला, वीकए़डला राहून गेलं होणार असेल तर लावूच नये. विशेषतः त्यांच्या मायग्रेशनच्या वेळी.
- नेक्टर तीन दिवसांपेक्षा जास्त दिवस ठेवायचा नाही. फार उन्हाळा असेल तर दोन दिवसानीच बदलायचा.
16 Aug 2016 - 3:05 am | मयुरा गुप्ते
क्या बात है! फारच परिश्रम्पूर्ण फोटोज काढले आहेत तुम्ही.
सध्या इथे कडक उन्हाळा असल्यामुळे आजुबाजुला अनेक प्रकारचे साप आणि त्यांची पिलावळ दिसते. एकदा कॉयोटीनेही (छोट्या कोल्ह्यासारखा दिसणारा प्राणी) दर्शन दिले. आणि आज आमच्या पाठीमागच्या अंगणात 'स्कंक-Skunk'( मराठी नाव?) येऊन गेला. एकदा बॉब कॅट (मोठी रानटी मांजर) ही दर्शन देउन गेलीये... पण हे सगळे प्राणीमात्र अगदी क्वचितच दिसतात. बरेच वेळा त्यांचे नैसर्गिकपणे अन्न शोधायचे मार्ग बंद झाले की मग अशी एखादी च्क्कर मारुन जातात.
तुमची हमिंगबर्ड फीडर ही आयडीया मस्त आहे. कुठेतरी सुरक्षित ठीकाणी लावावी लागेल मला.
धन्यवाद.
--मयुरा
16 Aug 2016 - 8:02 pm | मिसळपाव
नाही हो, नुसता कॅमेरा फोकस करून ठेवला होता घरातनं - श्रेय या हमिंगबर्डस् चं कारण या 'दोनच' फुलांसाठी ते दिवसातनं सत्रांदा चक्कर मारून जातात! हमिंगबर्ड फीडर ठेवायला लागलात तर कदाचित दोन-तीन आठवडेसुद्धा जातील त्याना शोध लागेपर्यंत. पण एकदा त्याना पत्ता लागला आणि तुम्ही नियमित ठेवत असला तर पुढच्या वर्षी नेमके येतील तुमच्या 'फुलांकडे' :-)
बॉब कॅट दिसलंय - वॉव! एक करून बघा यात अजून ईंटरेस्ट असला तर. अॅमेझोनवर 'trail camera' शोधलंत तर बरेच ऑप्शन्स दिसतील. असा ट्रेल कॅमेरा आठवडाभर रात्री लावून ठेवा. तो मोशन अॅक्टिव्हेटेड असतो आणि ट्रिगर झाल्यावर फोटो/व्हिडीओ घेतो - संपूर्ण अंधारातसुद्धा. I bet you will discover many such / other such interesting friends who pay a visit to your yard!
16 Aug 2016 - 5:57 pm | सानझरी
सुंदर फोटो.
19 Aug 2016 - 12:02 pm | सानझरी
काल हमिंगबर्ड बद्दल या ओळी वाचल्या..
Have you ever observed a humming-bird moving about in an aerial dance among the flowers - a living prismatic gem that changes with every change of position - how in turning it catches the sunshine on its burnished neck and gorget plumes... the beams changing to visible flakes as they fall, dissolving into nothing, to be suceeded by others and yet others? In its exquisite form... it is a creature of such fairy-like loveliness as to mock all description.
-- W.H. Hudson (1841 - 1922)
11 Aug 2016 - 12:49 am | एस
फार सुंदर. आमच्याकडेही असे चिमण्या, बुलबुल, इ. पाहुणे मुक्तपणे वावरत असतात. आजमितीस कृत्रिम घरट्यात चिमण्यांच्या कितव्यातरी पिढीचा संसार सुरू आहे. आणि लेटेस्ट भाडेकरू (त्यांचं त्यांनीच घरटं बांधलंय!) आहेत श्री. आणि सौ. शिंजिर.
11 Aug 2016 - 2:40 pm | सानझरी
अभिनंदन. वाचून आनंद वाटला. आम्हीही घरटी लावलीत पक्ष्यांसाठी. मागे ब्राम्हणी मैना घरटं बघुन गेली, पण आमच्या मांजरीकडे बघुन नांदायला आली नाही.
11 Aug 2016 - 8:23 am | पिशी अबोली
आत्ता सकाळी सकाळी दिसले लांब गवताची पाती घेऊन झाडात बसलेले मुनिया, आणि हा धागा आठवला.
19 Aug 2016 - 12:03 pm | सानझरी
गवताच्या पातीचा धागा चोचीत घेऊन उडून जाणारी मुनिया बघितली कि मला स्वर्गिय नर्तकाची आठवण येते. :)
11 Aug 2016 - 9:39 am | सपे-पुणे-३०
फोटो रुसलेत बहुतेक.
मुनियांना बाजरी आवडते हे माहित नव्हतं. आमच्या बाल्कनीत भिंत व एसीच्या बेचकीत ह्या घरटं करायच्या. दुसऱ्या वर्षी त्याच घरट्यावर अजून दोन मजले चढवले. नंतर नंतर त्या धिटुकल्या झाल्या होत्या. आम्ही बाल्कनीत गेलो तरीही उडून न जाता एका टोकाला लक्ष ठेऊन बसायच्या.
अंडी आणि पिल्लांच्या रक्षणाबाबत सर्वांत बेदरकार म्हणजे कबूतर आणि त्यांच्यानंतर बुलबुल.
11 Aug 2016 - 2:41 pm | सानझरी
मुनियांना बाजरी आवडते. वाट्यात ठेवत रहा. त्यांना पत्ता लागला कि आणखी येतील.
11 Aug 2016 - 9:40 am | रातराणी
फोटो दिसत नाहीत. :(
11 Aug 2016 - 2:00 pm | गंम्बा
फोटो दिसत नाहीत. मुनिया उडुन गेल्या काय?
11 Aug 2016 - 2:06 pm | नाखु
माझ्यासारखे फोटो न दिसणारे कुणी तरी आहे तर.
11 Aug 2016 - 2:48 pm | प्रमोद देर्देकर
हमको भी तुम्हारे साथ ले लो चचा. फट्टु दिखताईच नै.
11 Aug 2016 - 6:17 pm | सानझरी
आता दिसताहेत फोटो. :)
11 Aug 2016 - 2:23 pm | सानझरी
या मुनियाच्या नावाविषयी थोडसं : जरी आमच्याकडे मुनिया १० वर्षांपासुन येत असल्या तरिही या जातीचं नेमकं नाव काय हे पुस्तक उघडुन वाचलं नाही. (निव्वळ आळशीपणा) कारण त्यांचा विणिचा हंगाम, घरटी कोणत्या गवताची आणि कशी बांधतात हे स्वतः रोजच बघत होते. काल हा लेख टाकल्यावर ही चुक लक्षात आली. फेसबुकवर स्केली ब्रेस्टेड मुनिया हा उल्लेख वाचला आणि मिही काहीही अभ्यास न करता हे नाव इथे टाकलं. पक्ष्यांबद्दल ४ पुस्तकांमधे मुनियां विषयी वाचत असता कळंलं की या ठिपक्यांच्या मुनिया आहेत. इंडियन स्पॉटेड मुनिया. स्केली ब्रेस्टेड मुनिया हा शब्दच या पुस्तकांमधे नाही. काही लोक स्केली ब्रेस्टेड मुनियाच म्हणत असतील तर त्यांच्यासाठी ही दुरुस्ती. आणि मी सुद्धा चुकीच नाव पसरवलं म्हणुन सॉरी. मारुती चितमपल्ली यांनी लिहिलेल्या पक्षिकोश मधे यांच्यासाठी मराठी शब्द मनोली आहे. ठिपक्यांची मनोली, काळ्या डोक्याची मनोली इ.
फोटों साठी संपादकांना निरोप पाठवलाय. त्यांनी एडिट केले कि दिसतील. (मला माझाच लेख एडिट करता येत नाही हे एक वेगळंच प्रकरण.
11 Aug 2016 - 4:28 pm | पिशी अबोली
मनोली खूप गोड नाव आहे.
असंच शिंपी पक्ष्याला 'लिचकूर' असं नाव दुर्गाबाईंनी नमूद केलंय ते आठवलं.
11 Aug 2016 - 7:18 pm | स्वाती दिनेश
मनोली नाव खूप आवडलं, फोटो तर मस्तच..
स्वाती
12 Aug 2016 - 10:28 am | सानझरी
धन्यवाद अबोली आणि स्वाती. :)
12 Aug 2016 - 10:41 am | रातराणी
सुंदर आहेत फोटो! जोड़ीचा फारच गोड आहे.
11 Aug 2016 - 2:50 pm | श्रीगुरुजी
अप्रतिम फोटो!
हे पक्षी 'ठिपक्यांचा मुनिया' या प्रकारातले आहेत. हा पक्षी साधारणपणे चिमणीएवढा असतो.
शिक्रांपासून या पक्षांना जपा. शिक्रा दिसले की लगेच हाकलून लावा. शिक्रा असल्या लहान पक्ष्यांना पकडून खातात.
11 Aug 2016 - 6:21 pm | सानझरी
लेख अपडेट केलाय. शिक्रा वर्षातुन एकदाच दिसतो. मुनियांची शिकार करायला येतोच एखादेवेळेला. निसर्ग तो. चालायचंच.
11 Aug 2016 - 3:38 pm | मराठी_माणूस
छान
अवांतरः तिसरी कसम मधील "चलत मुसफिर ......पिंजडेवाली मुनिया" ह्या गाण्यातील हीच ति मुनिया काय ?
12 Aug 2016 - 10:24 am | सानझरी
असेल कदाचित. नक्की माहित नाही. मुनियांना त्यांच्या आवाजासाठी पाळतात. वेगवेगळ्या रंगाच्या जातिच्या मुनिया आजही विकत मिळतात. त्यांच्या मंजुळ आवाजाला तो भाळला असा त्या गाण्याचा अर्थ असू शकतो.(अर्थात वहिदा वर राज भाळला असं). हे माझं पर्सेप्शन. मी अजुन यात माहिती काढायचा प्रयत्न करते. मुनियाचा हा संदर्भ लक्षात आणुन दिल्याबद्दल धन्यवाद.
11 Aug 2016 - 7:16 pm | सूड
भारी.
11 Aug 2016 - 8:27 pm | जव्हेरगंज
हे भारी आहे!
फार आवडले!!
12 Aug 2016 - 3:12 pm | सानझरी
सूड आणि जव्हेरगंज.. खूपखूप धन्यवाद. :)
12 Aug 2016 - 1:58 pm | सपे-पुणे-३०
फोटो दिसले. सुंदर आले आहेत. बाल्कनीही छान सजवली आहे. ते खिडक्यांवर काय लावलंय, मॅग्निफाईड सुक्या शेंगेसारखं?
12 Aug 2016 - 3:12 pm | सानझरी
धन्यवाद. त्या गार्वीच्या शेंगा आहेत.
12 Aug 2016 - 4:29 pm | ५० फक्त
एकच सांगतो -- खुप भाग्यवान आहात..
13 Aug 2016 - 1:30 pm | सानझरी
खरंच..touch wood..
12 Aug 2016 - 4:50 pm | माम्लेदारचा पन्खा
तिला पिंजर्यात का ठेवतात ते कळलं आता....अतिसौंदर्य सुध्दा शाप आहे !
13 Aug 2016 - 1:35 pm | सानझरी
आणि नाजूक घुंगरां सारखा मंजुळ आवाज देखील! दुपारच्या वेळेला सगळं शांत असताना ऐकावा.. स्वग॔!!!
12 Aug 2016 - 4:51 pm | जागु
आहाहा किती क्युट. आमच्याकडे मुनिया येतात पण अगदी ऑगस्ट सप्टेंबर मध्ये. सोबत वेडे राघू पण असतात.
13 Aug 2016 - 1:55 pm | सानझरी
बाजरी रख्खो!!
13 Aug 2016 - 2:07 pm | बाबा योगिराज
फोटो आणि लेख दोन्ही जब्रा.
खरच नशीबवान आहात.
पुलेशु. पुभाप्र.
बाबा योगीराज.
13 Aug 2016 - 6:36 pm | यशोधरा
खूपच गोड :)
13 Aug 2016 - 8:11 pm | चैतू
सिमेंटच्या जंगलात तुम्हाला निसर्गाची साथ लाभते आहे हे बघून आनंद झाला.
13 Aug 2016 - 10:51 pm | पैसा
सुरेख लेखन आणि फोटो!
17 Aug 2016 - 12:31 am | खटपट्या
खूपच गोडूल्या आहेत या मनुल्या !!
18 Aug 2016 - 12:56 pm | सानझरी
सगळ्यांना मनापासून धन्यवाद..
18 Aug 2016 - 1:10 pm | सविता००१
फार भारी फोटो. नशीबवान आहात
3 Nov 2016 - 9:28 am | सानझरी
या वर्षी देखील मुनिया ने आमच्या खिडकीत घरटं केलं. आता पिल्लं उडून गेलेत म्हणून घरटं बाहेर काढून त्याचे फोटो काढले.
पहीला फोटो : फर्नच्या पानांमधे गुंफलेलं घरटं
दुसरा फोटो : घरट्याचं तोंड
तिसरा फोटो : घरटं बाहेर काढल्यावर असं दिसतं
17 Apr 2017 - 5:48 pm | ऋतु हिरवा
खूप छान. असेच घरटे आमच्या किचनच्या बाल्कनीत मुनियांनी केले होते. जोडी नेहमी येत असे. पिल्ले उडून गेलेली पण आम्ही पाहिली. आता त्याच घरट्यात चिमण्यांनी अंडी घातली होती. व त्यातून पिल्ले बाहेर आली आहेत. चिव चिव आवाज येत असतो. चिमण्यांची जोडी चोचीत पिल्लांना काहीतरी खायला घेउन येत असते. बर्याच वेळा अळ्या किडे असतात. त्यांना खाण्यासाठी मी तांदूळाचे दाणे घालून ठेवते. त्यांना न्याहाळणे हा एक छंद होउन बसला आहे.
तुमचे फोटो खूप सुरेख आहेत. मनोली नावही खूप गोड !
2 Jan 2017 - 11:30 pm | ज्योति अळवणी
खूप छान लिहिलं आहात. फोटो तर अप्रतिम
3 Jan 2017 - 8:13 pm | सानझरी
धन्यवाद.
3 Jan 2017 - 12:36 pm | पुंबा
तुमच्या भाग्याचा हेवा वाटतो.. प्रकाशचित्रे उत्तम..
3 Jan 2017 - 8:13 pm | सानझरी
धन्यवाद.
12 Jan 2017 - 7:28 am | उल्का
सानझरी सुरेख बोलके फोटो आणि तू दिलेल्या माहितीमुळे अधिकच बोलके झाले आहेत.
28 Jan 2017 - 2:43 pm | सानझरी
लई धन्यवाद :)
28 Jan 2017 - 8:48 pm | प्रीत-मोहर
Lovely!!
14 Feb 2017 - 12:12 pm | अनिंद्य
I envy you for this :-)
सध्या आमच्या बागेतील काही भाग हे कबुतरांचे मॅटर्निटी वॉर्ड्स झाले आहेत :-)
15 Feb 2017 - 6:32 pm | सप्तरंगी
काय सुन्दर फोटो आहेत !!
20 Feb 2017 - 6:33 pm | चष्मेबद्दूर
अप्रतिम छायाचित्रे
5 Mar 2017 - 3:11 am | अमिता राउत
Khup chhan vatal evdhe pakshi bghun.. Kharch inspiring ahe he. Pakshyansathi aapn thod faar tri krayla hav.. Me sudhha prayatn kren.
5 Mar 2017 - 3:14 am | अमिता राउत
Khup chhan vatal evdhe pakshi bghun.. Kharch inspiring ahe he. Pakshyansathi aapn thod faar tri krayla hav.. Me sudhha prayatn kren.
5 Jun 2017 - 9:20 am | इडली डोसा
यावर्षी आलेल्या मुनीयांचा व्हिडीओ टाका ना सानझरीताई :D
5 Jun 2017 - 11:58 am | सानझरी
ओ आज्जी.. नै टाकणार video ज्जा..
13 Jun 2017 - 3:40 am | इडली डोसा
आज्जिचं ड्वाळं मिटायच्या आत त्येवडा व्हिड्यो टाक कि ,किती आटवन करायची म्हातार्या मान्सानं. आस काय करतीयास, आं?
30 Jun 2017 - 10:13 am | वन्दना सपकाल
खुपच अप्रतिम
21 Mar 2018 - 10:56 am | साक्षी
या वर्षी देखील मुनिया ने आमच्या खिडकीत घरटं केलं. आता पिल्लं उडून गेलेत म्हणून घरटं बाहेर काढून त्याचे फोटो काढले.
पहीला फोटो : फर्नच्या पानांमधे गुंफलेलं घरटं
दुसरा फोटो : घरट्याचं तोंड
तिसरा फोटो : घरटं बाहेर काढल्यावर असं दिसतं>>
सानझरी, एक सल्ला
पक्षी उडून गेले तरी घरटे काढू नये. जागा पसंत पडली असेल तर ती जोडी दरवर्षी तेच घरटे डागडुजी करून वापरते.
साक्षी.
2 Apr 2018 - 4:26 pm | अनिंद्य
@ साक्षी,
फोटो दिसले नाहीत हो.