भटकंती

भटकीभिंगरी's picture
भटकीभिंगरी in भटकंती
22 Jun 2017 - 21:05

मनालीतली मौज ...

मार्चनंतर उकाड्याचा तडाखा वाढु लागला.. आणी हिमालयाची शिखरे साद घालु लागली ..खरतर हिमालयातुन परततानाच परत कधी कुठे यायच त्याच प्लॅनिंग सुरु होत . पण लवकरच परतण्याच आश्वासन मनाला आणी हिमालयाला देउनच मी जड अंत:करणाने हिमालयाचा निरोप घेते.. यावेळेस काही फार मोठा प्लॅन नव्हता .गावात रहायचे, येथिल जीवनपध्द्ती जाणुन घ्यायची, निसर्गसहवासचे सुख उपभोगायचे, छोटामोठा ट्रेक करायचा .

सतिश पाटील's picture
सतिश पाटील in भटकंती
22 Jun 2017 - 17:33

अंबा घाट- माहिती हवी आहे.

पावसात २- ४ दिवस निवांत भटकायला अंतरजालावर कोल्हापुर - रत्नागिरी मार्गावरील अंबा घाटाविषयी वाचले.
हुल्लाड्बाज दारुड़े अणि गोंधळी पर्यटक यांच्या नजरेत हा भाग अजुन आला नाही असे वाटते.

स्वीट टॉकर's picture
स्वीट टॉकर in भटकंती
21 Jun 2017 - 11:40

झांबिया आणि केनिया - थरारक आणि जंगली!

मी आणि स्वीट टॉकरीणबाई नुकतेच झांबिया आणि केनियाचा दोन आठवड्यांचा फेरफटका मारून आलो.

कड्यावरून खाली उडी मारणे वगैरे अतिशहाणपणाच्या गोष्टी केल्या. तिथल्या प्राण्यांबद्दल तर विचारायलाच नको. व्हीडियो आणि फोटो बरेच घेतले. त्यांना कॉमेंटरी देऊन एक डॉक्युमेंटरी फीत तयार केली आणि तू-नळीवर टाकली आहे.

अर्ध्या तासाची आहे.

एक_वात्रट's picture
एक_वात्रट in भटकंती
20 Jun 2017 - 23:27

ये कश्मीर है - दिवस सातवा - १५ मे

मी आधी म्हटल्याप्रमाणे पेहेलगाममधे पहायची ठिकाणे तशी तीनच - बेताब व्हॅली, अबू व्हॅली नि चंदनवारी. आणि ही ठिकाणे पाहण्यासाठी स्थानिक गाडीच करावी लागते. तेव्हा आम्ही आमच्या गाडीने पेहेलगाम टॅक्सी स्टॅंडवर आलो. स्थानिक स्थलदर्शनासाठी मारूती इकोपासून सुमो, स्कॉर्पिओ ते इनोव्हा अशा अनेक गाड्या उपलब्ध होत्या. आम्ही मारूती इको गाडी ठरवली. एक पोरगेलासा तरूण आमचा चालक होता.

सुनील's picture
सुनील in भटकंती
19 Jun 2017 - 20:07

कलोनियल गोवा

नुकतेच एका कौटुंबिक समारंभाकरीता कारवार येथे जायचे होते . समारंभ सकाळचा. म्हणजे, अगदी पहिले विमान पकडून गोव्यात गेलो असतो तरीही कारवारला पोहोचेपर्यंत प्रचंड दगदग आणि धावपळ होणारच होती. म्हणून मडगावला मुक्काम करून दुसर्‍या दिवशी कारवार गाठावे असा बेत केला. हाताशी तसा वेळ फार नव्हता आणि यंदा समुद्रकिनार्‍यावर जायचे नाही असे ठरवेलेलेच होते. तेव्हा मडगावच्या जवळपासच थोडे फिरावे असा विचार केला.

एक_वात्रट's picture
एक_वात्रट in भटकंती
17 Jun 2017 - 18:22

ये कश्मीर है - दिवस सहावा - १४ मे

काहीही पहायचे नाही, फक्त निरूद्देश भटकायचे, आपण थांबलो आहोत ते शहर अनुभवायचे असा एक तरी दिवस सहलीत असायलाच हवा असं माझं आपलं एक प्रामाणिक मत आहे.(अर्थात हाताशी असलेला वेळ नि पहायच्या ठिकाणांची यादी पाहता हे गणित प्रत्येक सहलीत जमणे अवघडच.) आज दिवसभरात आपल्याला काहीही करायचे नाही ही भावना सुखद असते, सहलीच्या वेळी तर ती आणखीनच सुखद बनते.

दुर्गविहारी's picture
दुर्गविहारी in भटकंती
10 Jun 2017 - 21:47

अनवट किल्ले ११: वळणदार तटबंदीचा भुदरगड (Bhudargad)

कोल्हापूर जिल्ह्याच्या उत्तरेला पन्हाळा, विशाळगड असे महत्त्वाचे किल्ले आहेत. तर दक्षिण बाजूला रांगणा, सामानगड असे किल्ले आहेत. या दरम्यान होणार्‍या वाहतुकीवर आणि लष्करी हालचालीवर नजर ठेवण्यासाठी एका बळकट ठाण्याची नितांत आवश्यकता होती. यासाठीच पन्हाळ्याच्या शिलाहार दुसर्‍या भोज राजाने एका सपाट पठारावर या दुर्गाची निर्मिती केली. शिलाहार राजा भोज (दुसरा) याने बांधला होता.

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture
टर्बोचार्जड फिलॉसॉफर in भटकंती
7 Jun 2017 - 14:02

एकट्याने करण्यायोग्य ट्रेकींग डेस्टीनेशन सूचवा!!!!!

ट्रेकिंग हा माझा एक आवडता प्रकार आहे.मी कॉलेजला असताना बरेच ट्रेक केले आहेत.नागेश्वर,भैरवगड(कोयना),जंगली जयगड बरेच..

जुइ's picture
जुइ in भटकंती
4 Jun 2017 - 04:34

वॉशिंग्टन डीसी मेट्रो एरिया सहल - भाग १

बर्‍याच वर्षांपासून वॉशिंग्टन डिसीला जाऊन तिथल्या चेरी ब्लॉसमचा बहर पाहावा हे मानात होते. त्या निमित्ताने अमेरिकेच्या राजधानीतील इतरही ठिकाणे पाहता येतील हा उद्देश त्यामागे होता. हो नाही करत या वर्षी चेरी ब्लॉसम महोत्सव पाहायला जायचे असे ठरले.

प्रीत-मोहर's picture
प्रीत-मोहर in भटकंती
2 Jun 2017 - 19:59

अंदमान : मोअर दॅन अ होम अवे फ्रोम होम भाग १

अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह!! बंगालच्या उपसागरात असणारी भारताची पाचूची बेटं!! निळाशार समुद्र, गर्द वृक्षराजी , अफाट सागरी संपत्ती आणि निसर्ग हेच डोळ्यांसमोर येतं. याच्या जोडीने सेल्युलर जेल आणि सावरकरांमुळेही आपण या बेटांशी जोडलो गेलो असतो. मलाही सावरकर आणि इतर राजबंदी , त्यांना झालेली काळ्या पाण्याची शिक्षा या सगळ्यामुळे अंदमान ची पहिली ओळख झाली होती.

दुर्गविहारी's picture
दुर्गविहारी in भटकंती
2 Jun 2017 - 14:26

अनवट किल्ले १०: गगनगिरी महाराजांचा गगनगड ( Gagangad)

महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा लाभलेली आहे. तपस्येच्या काळात संसारीक अडचणी नकोत व साधनेत कुणाचा व्यत्यय नको यासाठी बर्‍याच संतानी गिरीशिखरांचा किंवा कुहरांचा आश्रय घेतलेला दिसतो.

दुर्गविहारी's picture
दुर्गविहारी in भटकंती
26 May 2017 - 18:57

अनवट किल्ले ९ : जंगलाने गिळलेला, मुडागड ( Mudagad)

पन्हाळा तालुक्याच्या पश्चिमेला , सह्याद्रीच्या एन कण्यावर एक छोटे गाव वसलेले आहे,"पडसाली". गावाच्या आजुबाजूला घनदाट जंगल आहे आणि पश्चिमेला खोल दरीत रत्नागिरी जिल्ह्यातील राजापुर तालुका येतो. पेशव्यांच्या काळात राजापुर, आचरा, देवगड, विजयदुर्ग या बंदरातून करवीरला येणारा माल निरनिराळ्या घाटाने चढविला जाई. त्यापैकी राजापूर तालुक्यातील काजिर्डा गावातून काजिर्डा घाटाने मालाची ने आण केली जाई.

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in भटकंती
26 May 2017 - 12:22

कोकणात कुठे फिरावे ? काय बघावे? कुठे रहावे ?

मित्रहो, येत्या ऑगस्ट महिन्यात साधारणतः १२ ते १६ तारखेच्या दरम्यान कोकणात फिरायला जावे असा बेत आहे. आम्ही दोघे, मुलगा-सून आणि ६ वर्षांचा नातू असे पाच जण असू. गणपतीपुळे व आसपासचा परिसर पूर्वी बघितलेला आहे. गर्दीच्या जागा किंवा प्रसिद्ध देवस्थाने वगैरे नकोत. शांत, निसर्गरम्य समुद्रकिनारा, धबधबे, किल्ले, लहान खेडी, अप्रसिद्ध पण सुंदर मंदिरे/लेणी असे काही बघायला मिळाले तर बरे.

श्रीरंग_जोशी's picture
श्रीरंग_जोशी in भटकंती
25 May 2017 - 11:15

युएस कॅपिटॉल उत्तरार्ध

~ पूर्वार्ध ~

पहिल्या दिवशी कॅपिटॉल बाहेरून पाहिल्यावर दूसर्‍या दिवशी आम्ही कॅपिटॉल आतून पाहण्यास परतलो. सुरक्षा तपासणी पार पाडून आम्ही व्हिजिटर सेंटर मध्ये पोचलो.