नमस्कार, मिसळपाव वर नव्याने दाखल झालेल्या लोकांना काही गोष्टी
करण्यासाठी जरा अडचण जाणवते तसेच नवीन सुविधा देऊ केल्यास त्याची ओळख
सुद्धा करून देता यावी या हेतूने हे सदर सुरू करीत आहोत. संकेतस्थळावर
कुठलीही गोष्ट कशी करावी या विषयी चर्चा सुरू करण्या आधी कृपया येथे बघूनघ्यावे की तो प्रश्न आधीच कुणी विचारलेला तर नाहीये ना ?
काही प्रश्नांचे दुवे.
१) सदस्य होण्यापूर्वी वाचलेच पाहिजे असे काही.
२) टंकलेखन साहाय्य
३) मिसळपाव वर फोटो कसा चढवावा?
४) मिपावर मोबाईलवरून फोटो कसा चढवावा
५) आपले संकेताक्षर (पासवर्ड) कसे बदलावे?
६) काही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे
७) वाचनखुणा कशा साठवाव्या?
८) दुवा (लिंक) कसा द्यावा.
प्रतिक्रिया
10 Apr 2008 - 6:28 am | एकलव्य
अंगठाबहाद्दर
10 Apr 2008 - 8:06 am | विसोबा खेचर
एकलव्या,
लिखाण आणि चित्रे बाजूबाजूला असे येथे लिहिता येईल काय?
काय कल्पना नाय बा! नीलकांतशी बोलून घेतो एकदा. तूही लिही त्याला...
तात्या.
11 Apr 2008 - 8:27 am | एकलव्य
तात्या - बहुतेक उत्तर मिळाले आहे असे वाटते@@... त्यातूनही अडचण आलीच तर नीलकांतशी बोलेनच.
(विद्यार्थी) एकलव्य
11 Apr 2008 - 8:59 am | विसोबा खेचर
त्यातूनही अडचण आलीच तर नीलकांतशी बोलेनच.
हेच म्हणतो! अरे मेल्या तुझंच संस्थळ आहे हे! कंप्लेन्टी कसल्या रे करतोस? काय हवं नको ते नीलशी बोलत जा बिनधास्त! :)
तो जेवढं जमेल तेवढं करतोच आहे रे! बाकी अडचणी या यायच्याच! तेव्हा जरा सांभाळून घ्या लेको! :)
आपला,
(मास्तर) तात्या.
:)
24 Aug 2015 - 11:08 am | harshad shah
15 Apr 2008 - 4:11 pm | अभिषेक पटवर्धन
तात्या / नीलाकान्त,
मिपा वर लेखन करताना जे दुवे दिले जातात त्यावर टीचकी मारल्यास वेब ब्राउझर समबन्धित सन्केतस्थळावर पोहोचतो. वेब ब्राउझर नव्या सन्केतस्थळावर गेल्याने मिपाशी असलेला सम्पर्क तुटतो. हाच दुवा जर नवीन ब्राउझर मधे पॉप अप झाला तर मिपाशी असलेला सम्पर्क तुटणार नाही अणि मिपा चा विरह सहन करावा लाग्नार नाही. उदाहरणा दाखल महाराष्ट्र टाईम्स चे स्थळ पहावे. ईथे एखाद्या बातमि वर टीचकी मारल्यास ब्राउझर त्या बातमी मध्ये जातो आणि मूळ पानाशी आपला सम्पर्क रहात नाही. हेच जर सकाळ च्या स्थळा वर पाहीले तर कोणत्याही बातमी साठी एक नवीन ब्राउझर पॉप अप होतो.
15 Apr 2008 - 5:50 pm | नीलकांत
टिचकी देताना शिफ्ट दाबल्यास तो दुवा नव्या पानावर उघडतो.
अप्रकाशित ठेवलेले लेखन तुम्हाला दिसेल आणि संपादकांना दिसेल अशी सोय आहे.
माझी अशी शंका आहे की लोक त्या अप्रकाशीत ठेवा वर क्लिक करतात व नंतर प्रकाशित करायचे विसरतात. म्हणजेच लेखन साठवल्या जात नाही तर ते नाहिसे होते. अप्रकाशित करावर टिचकी दिल्यानंतर ते पान डेटाबेसमधे साठवल्या जाण्यासाठी प्रकाशित करने गरजेचे आहे. ते पान फक्त तुम्हाला व सरपंचांना दिसेन.
जेव्हा लेखन पुर्ण झालं असं वाटतं तेव्हा त्या अप्रकाशित कराच्या चौकटीत पुन्हा टिचकी देऊन तो पर्याय काढून टाका, व पुन्हा प्रकाशित करा, म्हणजे ते लेखन आता सर्वांना दिसेल.
आपलं लेखन अप्रकाशित आहे हे ओळखण्याची एक युक्ती आहे. ती म्हणजे अप्रकाशित लेखनाच्या पानावर खाली एक पिवळया रंगाची चावी दिसते.
12 Jun 2008 - 7:19 am | शुभानन गांगल
नमस्कार,
मिसळपाव मधे फाईल पाठवता येते का? फाईल मधील लेख प्रसिद्ध करणे शक्य आहे का?
शुभानन गांगल
12 Jun 2008 - 11:04 am | नीलकांत
गांगल साहेब मिसळपाव वर फाईल चढवायला सध्या परवाणगी नाही. मात्र ती फाईल इतर कुठल्या सर्व्हरवर चढवून त्याचा दूवा येथे देता येईल. यासाठी तुम्ही याहूची जीओसाईट किंवा गुगलची गुगलपेज ही सुविधा वापरू शकता. साधारणत: तुमचे लेखन पीडीएफ मधे असते किंवा तुमच्या गांगल फॉन्ट मधे असेल तर मग त्याचा फोटो करून येते चिकटवू शकता.
नीलकांत
14 Jun 2008 - 1:28 pm | प्रगती
मुली / स्त्रिया असण्याचे फायदे हयावर प्रतीसाद देण्याकरीता मि.पा. करांना दोन पाना पर्यत जावं लागतं तरी त्यासाठी आपण
दुसरा धागा सुरु करु शकतो का?
14 Jun 2008 - 2:45 pm | नीलकांत
एखादा विषय खुप रंगला की त्याच्या वाढत्या प्रतिसादांमुळे त्या विषयाचा दूसरा भाग सुरू करू शकता. खरंतर सदस्यांची सोयच होते.
एक मात्र करा की नव्या लेखाच्या सुरूवातीला पहील्या लेखाचा दूवा द्यायला विसरू नका.
27 Jun 2008 - 1:53 pm | भडकमकर मास्तर
एखाद्या सभासदाने स्वतः सुरू केलेले विषय पहायचे असतील तर काय करावे?
ज्याप्रमाणे स्वतःच्या खात्यामधले माझे लेखन पाहिले की स्वतः सुरू केलेले विषय दिसतात , तसे...
ती वाटचाल पाहिली की प्रतिक्रियांसकट सगळेच दिसते, त्यामुळे काही महत्त्वाच्या व्यक्तींनी स्वतः सुरू केलेले विषय पाहण्याची इच्छा आहे...पण ते शोधणे अवघड जात आहे...
त्याबद्दल माहिती दिल्यास बरे होईल... ( की मी कुठेतरी चुकीच्या ठिकाणी पाहत आहे?)
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
27 Jun 2008 - 4:54 pm | विसोबा खेचर
मास्तर,
ती वाटचाल पाहिली की प्रतिक्रियांसकट सगळेच दिसते, त्यामुळे काही महत्त्वाच्या व्यक्तींनी स्वतः सुरू केलेले विषय पाहण्याची इच्छा आहे...पण ते शोधणे अवघड जात आहे...
एखाद्याचे फक्त लेखनच पाहायचे असेल तर त्याकरता त्या व्यक्तिच्या वाटचालीवर टिचकी मारून ते काम होणार नाही. तसे केल्यास आपण म्हणता त्याप्रमाणे प्रतिक्रियांसकट सगळेच दिसेल व त्या व्यक्तिने सुरू केलेले लेखन बघायला त्रासदायक होईल.
पण आपल्याला जर एखाद्या व्यक्तिचे फक्त लेखनच पाहायचे असेल तर खालीलप्रमाणे करावे -
१) समजा आपल्याला विसोबा खेचर या व्यक्तिरेखेचे सर्व लेखन एकत्रित पाहायचे आहे तर प्रथम त्याकरता आपल्याला विसोबा खेचर या व्यक्तिरेखेचा सभासद क्रमांक माहीत असायला हवा. ते काम अगदीच सोपे आहे. आपण उंदराला विसोबा खेचर य नावावर नेताच आपल्याला संगणकाच्या खालच्या पट्टीत http://www.misalpav.com/user/6 अशी अक्षरे दिसतील. यात शेवटी ६ हा आकडा आहे याचा अर्थ विसोबा खेचर याचा सभासद क्रमांक ६ आहे हे आपल्याला सहज शोधून काढता येईल.
२) एकदा विसोबा खेचरांचा सभासद क्रमांक आपल्याला कळला की पुढचे काम सोपे आहे. एखादे नवीन पान उघडून तेथील about:blank च्या जागी आपण,
http://www.misalpav.com/tracker/6/6
असे लिहायचे आहे व एंटरची कळ दाबायची आहे. त्यानंतर फक्त विसोबा खेचरांचे लेखन दाखवणारे पान आपल्यासमोर उघडेल! :)
उदा -
समजा मला आपले, म्हणजे भडकमकर मास्तरांचे लेखन पाहायचे आहे. तर प्रथम मी उंदराला आपल्या नावापाशी नेईन. थांबा हां, नेतो. हां, आता आपला सभासद क्रमांक ४१८ आहे हे मला समजले आहे.
आता वर म्हटल्याप्रमाणे मी पत्त्याच्या जागेत (ऍड्रेस बार) मध्ये
http://www.misalpav.com/tracker/418/418
असे लिहीन व एंटरची कळ दाबीन. मला आपले सर्व लेखन एकत्रित पाहायला मिळेल!
पाहा बरे आपणही हे करून आणि सांगा मला जमते आहे का ते! :)
आपला,
विसोबा खेचर,
बिल्ला क्रमांक ६
23 May 2013 - 7:10 am | स्रुजा
नमस्कार
मी इथे नवीन अहे. मी तुम्हि दिलेला उपाय करुन पाहिला. पन मी जेन्व एखाद्या लेखकाच बिल्ला क्रमान्क देऊन लिन्क्क देते तेन्वा माला Access Denied यीते. Can you help me here please? For example:
http://www.misalpav.com/tracker/12865/12865 - When I access this link, I get access denied message.
Sorry for all the typos. I am still catching up on typing in Marathi. My next response or my article will be in 100 % Marathi :)
23 May 2013 - 8:36 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
http://www.misalpav.com/user/707/authored
मी दिलेली लिंक आणि लेखकाचा बिल्ला क्रमांक हा मिपाकर बल्लवाचार्य गणपा यांचा आहे.
-दिलीप बिरुटे
22 May 2014 - 7:59 pm | पियू परी
मला दोन्ही पद्धतीने शोधता येत नाहीये.
म्हणजे नंबर/नंबर किंवा नंबर/ऑथर्ड हे काहीही वापरले तरी अॅक्सेस डिनाईड येतंय :(
22 May 2014 - 8:20 pm | शिद
भडकमकर मास्तर यांचे लेखन: http://www.misalpav.com/user/418/authored
विसोबा खेचर यांचे लेखन: http://www.misalpav.com/user/6/authored
वरील प्रतिसांदामध्ये दिलेल्या लिंक्समध्ये 'tracker' न लिहीता 'user' हे लिहावयाचं आहे.
30 Sep 2013 - 12:28 pm | प्रमोद देर्देकर
पण बाकी सगळ्यांचा कमांक कसा काय शोधून काढावा आ? म्हणजे सगळे त्या साठी हॉटेलात हजार असावे लागत असतील काय? त्या शिवाय उंदीर कसा काय त्या नावावर न्यायचा?
2 Jun 2015 - 2:48 pm | जिज्ञासु आनन्द
http://www.misalpav.com/tracker/6/6 नुसार अक्सेस दिनाईड असे लिहुन येते..ऊपाय सुचवा..
28 Jul 2008 - 11:07 am | निसर्ग
तात्या ,
प्रवेश करण्यासाठी जशी जागा आहे तसे आपल्या खात्यातुन बाहेर (logout)जाण्यासाठि काय करावे ?
आपला-- नवीन झालेला सभासद्-निसर्ग
" DON'T AIM THE TARGET...
....JUST ACHIVE IT "
28 Jul 2008 - 11:09 am | सखाराम_गटणे™
'गमन' वर टिचकी द्या
सखाराम गटणे
आम्ही भुकेल्या माणसांना खोटे अन्न दाखवुन उपाशी ठेवत नाही.
5 Aug 2008 - 7:49 am | श्रीकृष्ण सामंत
"माझे लेखन" ह्या पानावर प्रत्येक "पोस्टची वाचने " हा जर कॉलम घातला तर बरं होईल
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
8 Sep 2008 - 7:32 pm | ब्रिटिश
१. ह्ये सगल्या लेखांचा मालक कोन ? लीवनारा क मिपा ?
२. वाचनखुन म्हन्जे क हाय?
३. लासला पंचलाइन टाकन्यासाटी येगली सोय हाय क दर येलला टाइप कराची ?
मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)
8 Sep 2008 - 8:15 pm | देवदत्त
ह्ये सगल्या लेखांचा मालक कोन ? लीवनारा क मिपा ?
ह्याचे स्पष्टीकरण इथे मिळेल.
वाचनखुन म्हन्जे क हाय?
वाचनखूण म्हणजे जसे Internet Explorer मधील Favourites
आणि
FireFox मधील Bookmarks.
एखाद्या आवडत्या लेखाचा दुवा पुन्हा लवकर मिळण्याकरीता ह्याचा वापर करावा.
लासला पंचलाइन टाकन्यासाटी येगली सोय हाय क दर येलला टाइप कराची ?
इथे वाचा.
9 Nov 2008 - 7:45 pm | मीचनूतन
खरडफळा आणि खरडवही - या दोन्हींत फरक काय?
13 Mar 2009 - 7:58 pm | निशिगंध
मला सांगा Sign out कसे करायचे
13 Mar 2009 - 8:05 pm | विद्याधर३१
डाव्या कोपर्यातील गमनवर टिचकी मारा.
विद्याधर
6 Apr 2009 - 2:38 pm | सातारकर
अक्षर रंग चालत नाहीत, काय करावे लागेल?
अक्षरं तिरकी (इटॅलिक), जाड होतात. खाली रेषदेखील ओढता येते, परंतू रंग मात्र दिसत नाहीत. आत्तादेखील खालील सहीमधे ट्रेवेल्यान चे नाव रंगवायचा प्रयत्न केला आहे, पण ते तसं दिसत नाहीये.
मी I.E. 6 वापरतो आहे.
-----
Education... has produced a vast population able to read but unable to distinguish what is worth reading.
G. M. Trevelyan
6 Apr 2009 - 3:07 pm | ढ
इथे सांगितले आहे.
तसं करा.
30 Apr 2009 - 11:21 am | नानबा
तात्या,
गेले काही दिवस नवीन प्रवेश घेताना ब-याच अडचणी येत आहेत. त्याचे काही कारण आहे का??? प्रत्येक वेळेला प्रवेश घेतल्यावर ई मेल आयडी वर येणा-या मेल मध्ये "pending for approval" चा मेसेज येतो......
22 Sep 2009 - 10:11 pm | सुनिल पाटकर
इतर जालावरिल स्वत:चे लेखन मिपावर प्रसिद्ध करता येते का ? मार्गदर्शन करावे
16 Jul 2010 - 11:57 am | काजुकतली
सदस्याचे सगळे लेखन एकत्र पाहण्याची काही सोय आहे का?
4 Aug 2010 - 8:17 am | अरुण मनोहर
लेखनात एखादी दुसर्या साईटची लिंक टाकता येते. पण ही लींक त्या पत्यासह म्हणजे, उदा. http://72.78.249.107/esakal/index.htm
अशी दिसते.
टायटल टेक्स्ट मधे "इथे" असे टंकले, पण ते दिसतच नाही. असे आल्टर्नेटीव्ह टेक्स्ट कसे द्यायचे ते कृपया सांगा.
13 Aug 2010 - 3:06 pm | नितिन थत्ते
१ इथे असा शब्द टंकावा.
२. तो इथे हा शब्द सिलेक्ट करावा (जेवढे शब्द सिलेक्ट केले असतील तेवढे हायपरलिंकमध्ये पूर्वी रंगीत दिसायचे. नव्या व्हर्जनमध्ये दिसत नाहीत. म्हणून दुवा आहे असे दर्शवण्यासाठी मी [इथे] असा कंस टाकतो).
३. वरच्या टूलबारमधील इन्सर्ट्/एडिट लिंक या आयकॉनवर क्लिकवावे
४. येणार्या पॉपअप खिडकीत यूआरएल भरावी
५. ओके वर क्लिकवावे.
16 Sep 2010 - 12:31 pm | जान्ह्ववी मेहेत्रे
darshan कसे लिहीतात ?
17 Sep 2010 - 6:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सर्वप्रथम कळफलकावरी 'डीए' टंका. त्या नंतर 'आरएसएच' टंका आणि शेवटी 'एन' टंका 'दर्शन' हे ही अक्षरे उमटतील. अधिक माहितीसाठी या टंकन साह्याचा उपयोग करा.
-दिलीप बिरुटे
2 Jul 2011 - 11:03 am | sukhada singh
मला माझे सद्स्य नाम बदलायचे आहे?म्ह्ण्णजे ते मराथि मध्ये लिहायचे आहे,किन्वा बद्लायचे आहे,मदत करा.
5 Jul 2011 - 11:29 am | ढ
सदस्यनाव माझ्या माहिती प्रमाणे स्वतः बदलता येत नाही.
नीलकांत यांना व्यनि करावा. ते त्याबद्दल माहिती देऊ शकतील.
3 Jul 2011 - 6:30 pm | तुझ्याच शोधात....
krupa शब्द कसा लिहु?
4 Jul 2011 - 12:36 pm | माझीही शॅम्पेन
kRupaa
16 Sep 2019 - 11:40 am | मृणमय
कृपा
17 Aug 2011 - 3:42 pm | उदयन
नाव बदलण्यासाठी काय करावे.....युसरनेम जे आहे ते बदलायचे आहे ?
20 Aug 2011 - 1:17 am | रेवती
नीलकांतला व्य. नि. करावा लागेल.
ड्युप्लिकेट आय डी असल्याचे पकडले गेल्यास सगळे आय डी रद्द होतात.
नुकतेच काही केले आहेत म्हणून ही सुचना.
19 Aug 2011 - 12:13 pm | pramanik
RSS फीड मध्ये कमेन्ट्स दीसतील असे काहीतरी प्लीझ करा,आम्ही बरेचसे RSS feed नेच मिपा वाचत असतो.
असे झाल्यास खुप बरे होईल्,आज ईथे प्रश्न विचारतात हे समजले म्हणुन विचारले.
18 Nov 2011 - 8:01 pm | अविनाश खेडकर
मला जर माझे लेखण प्रतिक्रिया देनारांव्य्तिरीक्त कुनी कुनी वाचले हे पहायचे असेल तर कसे पहावे. कृपा करुन कळवा.
मी ऑनलाईन असतांना माझ्या लिखानातील गेस्टबुक उघडुन पाहीले तर मला यु आर नॉट ऑथराइजड असे आढ्ळ्ले. मला व्ययक्तिक संदेश पाठवून कळ्वा. प्लीज.
18 Nov 2011 - 8:09 pm | गणपा
प्रतिसाद देणार्यांशिवाय अजुन कुणी कुणी आपले लेखन वाचले ते सांगता येणं शक्य नाही. एकंदर किती वाचनं झाली ते मात्र तुम्हाला तुमच्या लेखाच्या खालीच दिसेल.
जर तुम्ही लॉग ईन केल असेल तर तुम्हाला (तुमच्या स्वत:च्या व इतरांच्या) खरडवहीत प्रवेश मिळवता येईल. पण एकादया सदस्याने त्याची खरड्वही बंद केली असेल वा तो सदस्य निलंबीत झाला असेल तर ते शक्य नाही.
22 Aug 2016 - 12:52 pm | कमवू
तुम्ही ती ओळ कॉपी करून तिला highlight कशी केली प्लीज सांगा.
22 Aug 2016 - 5:32 pm | तुषार काळभोर
तुम्हाला जे हायलाईट करायचंय, ते आधी "टाईप करायच्या जागेत" टाईप करा किंवा पेस्टवा.
मग ते सिलेक्ट करा.
मग टाईप करायच्या बॉक्सच्या वर जे छोटे छोटे आयकॉन आहेत, त्यातलं अकरावा क्लिक करा. (
अशा दुहेरी अवतरण चिन्हांसारखा असणारा)
एकदा पूर्वपरीक्षण करून बघा..
20 Dec 2011 - 9:31 am | दिशा
मी ऑफिस मधून मिसळ पाव.कॉम पाहू शकत नाही. I am getting IP address is banned message. आपण माझी काही मदत करू शकाल का ?
14 Aug 2014 - 3:02 am | सुमित_सौन्देकर
तुम्हाला याबाबत Google वर सुर्च केल असता माहिति मिलेल, टाइप करा How to use ban sides in office. खुप लिन्क्स आहेत.