Adrian Levy व Catherine Scott-Clark लिखित "अण्वस्त्रांबाबतची फसवणूक"

सुधीर काळे's picture
सुधीर काळे in जनातलं, मनातलं
26 Jan 2010 - 2:38 pm

माझ्या 'मिपा'वरील सहसभासदांनो,

कांहीं दिवसापूर्वी मी Nuclear Deception हे Adrian Levy व Catherine Scott-Clark या लेखकद्वयीने लिहिलेले पुस्तक वाचले. हे पुस्तक एका बाजूने अमेरिकेच्या ओळीने पाच राष्ट्राध्यक्षांनी (कार्टर, रेगन, बुश-४१, क्लिंटन व बुश-४३) कसेही करून अमेरिकन रक्ताचा एकही थेंब न सांडता मुजाहिदीन लढवय्यांनी व लांचखोर पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी परस्पर रशियन सेनेशी लढून त्या सैन्याला स्वगृही परत पाठविण्यासाठी आपल्याच प्रतिनिधीगृहाच्या सदस्यांची (सिनेटर्स व हाऊस रेप्रेझेंटेटिव्स) कशी मुद्दाम दिशाभूल केली, हे सगळे करतांना पाकिस्तानला अणूबॉम्ब बनविण्यात कशी प्रत्य्क्ष-अप्रत्य्क्ष मदत केली, एक दिवस हा भस्मासुर आपल्यावरच ही अण्वस्त्रे डागेल ही दूरदृष्टी कशी ठेवली नाहीं याची कहाणी आहे, दुसर्‍या बाजूने पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी "दहशतवादाविरुद्धच्या लढाई"बद्दल अमेरिकेला तोडदेखली आश्वासने देऊन पाठीमागून त्याच दहशतवाद्यांना छुपी मदत कशी चालू ठेवली, अमेरिकेला तिची लष्करी व आर्थिक मदत भारताविरुद्ध वापरणार नाहीं अशी आश्वासने देऊन प्रत्यक्षात त्याच पैशांनी व त्यांच्या सेनाधिकार्‍यांच्या सक्रीय सहभागाने दहशतवाद्यांसाठी प्रशिक्षण केंद्रे कशी उभी केली (त्यांना ’स्वातंत्र्यसैनिक’ म्हणणारा मुशर्रफ सगळ्यात मोठा चोर!) याची कहाणी, तर तिसर्‍या बाजूला ही एक तर्‍हेने डॉ. अब्दुल कादिर खान या "पाकिस्तानच्य अणूबॉम्बचा पिताश्री"ची कहाणीही आहे!

हे पुस्तक वाचल्यावर माझी खात्री पटली कीं हे पुस्तक प्रत्येक भारतीय नागरिकाने वाचलेच पाहिजे. मग डोक्यात आले कीं हे ५०० पानी पुस्तक कुणी वाचेल कां? मग वाटले कीं मी ते निम्मे संक्षिप्त करावे व त्याचा मराठीत अनुवाद करावा. पण पुस्तक कॉपीराईटच्या कायद्याने संरक्षित होते. मग मी लेव्ही व स्कॉट-क्लार्क यांचा ई-मेल शोधून काढला. पहिल्या निरोपाला प्रतिसाद आला नाहीं, पण दुसर्‍यांदा लिहिल्यावर लेव्हीसाहेबांनी मला एक भारतीय प्रकाशकांचा पत्ता दिला. त्यांना लिहिल्यावर कळले कीं त्यांच्याकडे फक्त इंगजी पुस्तकापुरतेच कॉपीराईटचे हक्क आहेत. पुन्हा लिहिल्यावर शेवटी व्हॅलरी डफ्फ या मॅडमकडून मला मालिका विनामूल्य लिहिण्याची रीतसर परवानगी मिळाली. पण जर वाचकांचा प्रतिसाद चांगला आल्याने पुस्तकरूपात प्रसिद्ध करण्याची वेळ आल्यास मात्र मराठी प्रकाशकाला त्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे.

"सकाळ"च्या वेब एडिशनवर प्रथम प्रकाशित करायचे घाटते आहे.

त्याआधी "घरचा अभिप्राय" मिळावा म्हणून मी ही मालिका 'सकाळ'ला पाठवायच्या आधी मिपाकरांना वाचायला देणार आहे. आपल्या फोरमवर वाचनाचा खूप व्यासंग असलेले व अनेक क्षेत्रांत प्राविण्य असलेले अनेक सभासद आहेत. त्यांच्या प्रतिसादांमुळे माझे लिखाण नक्कीच सुधारेल व ती सुधारित आवृत्ती मी सकाळला पाठविणार आहे.

प्रत्येक लेख जरा लांब असणार आहे व असे २५-२६ लेख होतील. तरी हा प्रकार मला व वाचकांना जरासा "लंबी रेसका घोडा" ठरणार आहे! तरी माफ लरावे!

एक गोष्ट लक्षात ठेवावी. मी होता होईल तितके हे भाषांतर मूळ लेखनाशी प्रामाणिक ठेवले आहे. थोडक्यात इथे प्रदर्शित केलेली मतें माझी नसून Adrian Levy व Catherine Scott-Clark या लेखकद्वयींची आहेत.

वाचा तर खाली या मालिकेचे पहिले पुष्प. या प्रस्तावनापर प्रकरणात लेखकांचे मनोगत आहे ज्यात त्यांनी या पुस्तकात काय आहे याची थोडक्यात चर्चा केली आहे.

हा प्रकल्प आपल्याला वाचनीय वाटेल अशी आशा आहे.

धन्यवाद.

सुधीर काळे
[टीपः बुश-४१=अमेरिकेचे ४१वे अध्यक्ष जॉर्ज H. W. बुश व बुश-४३=अमेरिकेचे ४१वे अध्यक्ष जॉर्ज W. (डुब्या) बुश]

फसवणूक-लेखकांचे मनोगत
गाभा
© एड्रियन लेव्ही आणि कॅथरीन स्कॉट-क्लार्क (मूळ लेखक)
मराठी रूपांतर आणि मराठी रूपांतरासाठी © (मूळ लेखकांच्या वतीने): सुधीर काळे, जकार्ता
(या लेखातील सर्व मते मूळ लेखकद्वयींची आहेत)

ही कहाणी आहे एक घोर फसवणूकीची. ही कहाणी आहे अमेरिकेच्या सरकारने त्यांच्याच निर्वाचित (अमेरिकन) लोकप्रतिनिधींची (व सार्‍या जगाचीच) कशी घोर फसवणूक केली त्याची, ज्या कृत्यांचे गंभीर परिणाम कदाचित कांहीं पिढ्यांनतर आपल्याला कळू लागतील. ही कहाणी आहे अमेरिकन नेत्यांच्या नैतिक अध:पाताची, त्यांच्या कवडीमोलाच्या तारतम्यबुद्धीची, अपुर्‍या पर्यवेक्षणाची, त्यांच्याभोवतीच्या सतत बदलणार्‍या जागतिक स्थितीबद्दलच्या माहितीची निष्काळजीपणाने व आळशीपणाने केलेल्या विश्लेषणांची/पृथक्करणांची! या चुकांचा गंभीर परिणाम होणार आहे आपल्या भोवतालचे जग आणखी अस्थिर होण्यात! या चुका करून अमेरिकन व पश्चिम युरोपियन नेतृत्वाने जागतिक धर्मयुद्ध पुकारणार्‍या शक्तींच्या हातात जणू एक नवे कोलीतच दिले आहे.

याची सर्वप्रथम प्रचीती आली ४ फेब्रूवारी २००४ रोजी! या दिवशी पाकिस्तानचे सर्वात आदरणीय व गौरवप्राप्त शास्त्रज्ञ डॉ. अब्दुल कादीर खान पाकिस्तान चित्रवाणीच्या पडद्यावर सार्‍या पाकिस्तानी जनतेला दिसले. डॉ. खान हे नेहमीच रहस्याच्या पडद्याआड असत कारण ते तीस वर्षाहून जास्त काळ पाकिस्तानच्या अण्वस्त्रनिर्मितीच्या "गुपचुप" कार्यक्रमात गुंतलेले होते. उर्दू भाषेतली त्यांची भाषणे सर्वसाधारणपणे सार्‍या पाकिस्तानी जनतेला समजत व ती सारे लोक त्यांच्या प्रत्येक शब्दाकडे लक्ष देऊन ऐकतही. पण आज पाकिस्तानी सरकारने जाहीर केले होते कीं ते त्यांच्या चुकांची कबूली देणार आहेत. कदाचित त्यामुळे असेल. पण आज त्यांचे भाषण त्यांच्या देशबांधवांना सहज समजणार्‍या उर्दू भाषेत न होता सार्‍या जगाला समजणार्‍या इंग्रजी भाषेत झाले.
"माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो" अशी सुरुवात करून त्यांनी स्वत:च्या अनधिकृत अण्वस्त्रप्रसाराबद्दलच्या हालचालींची माहिती दिल्यावर समारोप करतांना ते म्हणाले "अल्ला पाकिस्तानला सुरक्षित ठेवो, पाकिस्तान अमर असो"!

त्यांचे भाषण संपताक्षणी पाकिस्तानी लष्कराने डॉ खान यांनी प्रे. बुश ज्यांना "अनिष्ट राष्ट्रांचा अक्ष" म्हणत (Axis of Evil) त्या उत्तर कोरिया, इराण व लिबिया या अशा गिर्‍हाइकांसाठी एकट्याने हा अण्वस्त्रप्रसाराचा काळा बाजार कसा चालवला होता याची माहिती दिली. या घटनेनंतर पाकिस्तानला अण्वस्त्रें बनवायला सहाय्य करून अमेरिकेने सार्‍या जगाची कशी फसवणूक केली हे पहिल्यांदाच जगाच्या निदर्शनाला आले.

अण्वस्त्रप्रसाराबद्दल कुप्रसिद्ध असलेल्या व "टायफॉइड मेरी" या (अपमानास्पद) टोपणनावाने ओळखल्या जाणार्‍या डॉ खाननी अशी कबूली का दिली याबाबत सार्‍या जगात तावातावाने तर्क-कुतर्क सुरू झाले. कुणाला वाटले की त्यांच्या राजकीय किंवा धार्मिक श्रद्धांमुळे दिली, कुणाला वाटले की स्वत:ची इभ्रत वाढविण्यासाठी व स्थान बळकट करण्यासाठी? कुणा बदमाष राजवटीसाठी? अफगाणिस्तानमधील जिहाद्यांसाठी? ओसामा बिन लादेनसाठी? कीं युरोप-अमेरिकेत अणूबॉम्ब उडवू पहाणार्‍या अतिरेक्यांच्या टोळ्यांसाठी?

अनेक वृत्तपत्रांत आलेल्या अग्रलेखांत कुणाच्या फायद्यासाठी त्यांनी हा कबूलीजबाब दिला असावा याबाबतही तर्‍हेतर्‍हेच्या अटकळी प्रसिद्ध झाल्या. प्रेसिडेंट जॉर्ज बुश यांनीही या फसवणुकीला जणू संमतीच दिली. कांहीं दिवसांनंतर ते म्हणाले, "खान यांनी त्यांचे सारे गुन्हे मान्य केले आहेत आणि त्यांचे या गुन्ह्यातील सहकारी आता या धंद्यातून बाहेर फेकले गेले आहेत. खान व त्यांचे छोटे टोळके अतीशय धक्कादायक गुन्ह्यांबद्दल दोषी आहेत. पण त्यांच्यावर खटला घालायची गरज दिसत नाहीं. बुश पुढे म्हणाले, "प्रेसिडेंट मुशर्रफ यांनी मला आश्वासन दिले आहे कीं ते खान यांच्या जालाबद्दलची (network) सर्व माहिती अमेरिकन सरकारला देतील व तो देश (पाकिस्तान) अशा अण्वस्त्रप्रसाराच्या मुळाशी असू दिला जाणार नाहीं." पाकिस्तान सरकारचे या घटनेवर इतके पूर्ण नियंत्रण आहे कीं खान व त्यांच्या सहकारी शास्त्रज्ञांना अमेरिकेत खटला घालण्यासाठी अमेरिकेच्या किंवा इतर पाश्चात्य राष्ट्रांच्या स्वाधीन करण्याची गरज नाहीं.

सत्य परिस्थिती तर अशी होती कीं खान यांची कबूली एक दिशाभूल करण्यासाठी दिलेली कॢप्तीच होती. अण्वस्त्रांची काळी बाजारपेठ खान यांच्या नियंत्रणाखाली चालली तर होतीच, पण जाहीर व खासगी वक्तव्यात फरक असा होता कीं अशा तर्‍हेचा काळा बाजार एका व्यक्तीचे काम नव्हते तर हे काम एका राष्ट्राच्या (पाकिस्तानच्या) परराष्ट्रनीतीचा भाग होता व त्याचे पर्यवेक्षण पाकिस्तानी लष्करी अधिकार्‍यांची टोळी करत होती. वर हे राष्ट्र अमेरिकेच्या अतिरेक्यांविरुद्धच्या लढाईतील एक महत्वाचे दोस्त राष्ट्र म्हणून दुटप्पीपणे मिरवत होते. तीसेक वर्षें लागोपाठ सत्तेवर आलेल्या अमेरिकन सरकारांनी, मग ती रिपब्लिकन पक्षाची असोत किंवा डेमोक्रॅटिक पक्षाची असोत, तसेच इंग्लंड व इतर पाश्चात्य युरोपियन राष्ट्रांनी पाकिस्तानला अतीशय मर्यादित प्रसारण असलेले व निषिद्ध असे अण्वस्त्रांबद्दलचे तंत्रज्ञान मिळवू दिले होते. एका अनर्थपूर्ण युगात पाकिस्तानने हे निषिद्ध तंत्रज्ञान कसे अनिष्ट राष्ट्रांना विकण्यात पुढाकार घेतला ही माहिती महत्वाची सरकारी साधने चुकीच्या दिशेने वापरून व आधीचे नियम रद्दबातल करून सर्वांपासून लपवून ठेवली. गुप्त माहिती मिळवण्याच्या क्रियेचीही धार बोथट करण्यात आली आणि परराष्ट्रखाते व संरक्षणखाते यासारख्या सरकारी खात्यांना जणू वेढून राष्ट्राध्यक्षांच्या तत्वांना पाठिंबा देण्यास, प्रतिनिधीसभेला डावलण्यास व देशाचे कायदे मोडण्यास भाग पाडण्यात आले होते. अमेरिकेच्या परराष्ट्रखात्याचा प्रवक्ता रिचर्ड बाऊचर याने डॉ खान प्रकरण म्हणजे पाकिस्तानी हुकूमशहा/राष्ट्राध्यक्ष मुशर्रफ यांच्या कसोटीचा क्षण असे वर्णन केले आहे. खान हे सर्व देशाचा मानबिंदू होते व त्यांचे नाव काढताच पाकिस्तानी नागरिकांची छाती गर्वाने फुगायची. पाकिस्तानला शिवणाच्या धारदार सुयासुद्धा बनवता येत नाहींत अशी मल्लीनाथी करणार्‍या डॉ खान यांनी अतीशय आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भारताच्या कुठल्याही शहरावर हल्ला करू शकणारी अण्वस्त्रे मोठ्या प्रमाणावर बनविण्याची एक "असेंब्ली लाईन" उभी केली व त्यांना पाकिस्तानी जनतेनेच "अणूबॉम्बचे पिताश्री" हा जणू एक किताबच दिला.

फारच थोड्या लोकांना हे माहीत आहे की डॉ खान हे या अण्वस्त्र-उत्पादनाच्या प्रकल्पात अपघातानेच शिरले. पाकिस्तानात योग्यशी नोकरी न मिळाल्यामुळे ते चिडून उच्च शिक्षणासाठी युरोपला गेले व एका विश्वविद्यालयात प्रवेश मिळविण्याच्या रांगेत उभे असताना ’हेनी’ नावाच्या एका डच मुलीच्या प्रेमात पडले व तिच्याशी विवाहबद्ध झाले. एका गोर्‍या बाईचे पति म्हणून त्यांना एरवी मिळाली नसती अशी अतीशय संवेदनशील अशा गोपनीय क्षेत्रात भाषांतरकाराची नोकरी मिळाली व अण्वस्त्रांबद्दलची अतीशय गुप्त अशी माहिती त्यांच्या नजरेखालून जाऊ लागली. त्याचे महत्व समजल्यामुळे त्यांनी ती सर्व कागदपत्रे व ड्रॉइंग्ज चोरली व त्या कागदपत्रांनी भरलेले तीन पेटारे घेऊन ते पाकिस्तानात परत आले. जुल्फिकार अली भुत्तो यांच्या प्रोत्साहनाने ते अणूबॉम्ब बनवायच्या प्रोजेक्टचे प्रमुख झाले व मग त्या क्षेत्रात त्यांची व पाकिस्तानची प्रगती सुरू झाली.

त्यानंतर पुढच्या वर्षापासून पाकिस्तानी अधिकारी व पाकिस्तानी दलाल/एजंट यांनी युरोप व उत्तर अमेरिकेत त्यांना हव्या असलेल्या यंत्रसामुग्री व इतर वस्तूंची जोरदार खरेदी सुरू केली. डॉ. खान हे सूत्रधाराचे व वेगवेगळ्या गटांमधील समन्वय ठेवण्याचे काम पहात होते व पश्चिम युरोपीमधील गुपचुपपणे अणूबॉम्ब बनविण्याचा कार्यक्रम राबवणार्‍या कंपन्यांतील वैज्ञानिक, कारखानदार, इंजिनियर व धातुशास्त्रज्ञ यांच्याबरोबरील मैत्री आणखी जवळची करून व त्यांच्याशी वागताना अतीशय गोडीगुलाबीचा वापर करून व त्यांच्यावर आपल्या गोड बोलण्याने एक तर्‍हेची छाप किंवा मोहिनी टाकून अशी सामग्री मिळवण्याच्या वाटेतील अडचणी दूर करत होते.
जेंव्हा १९७७ साली भुत्तोंची पंतप्रधानपदावरून उचलबांगडी झाली, तेंव्हा हा अणूप्रकल्प नवे हुकूमशहा ज. झिया उल हक यांच्या अखत्यारीतील सैनिकी विभागाकडे जावा अशी अमेरिकन गुप्तचर संघटना सी.आय.ए.ची इच्छा होती. त्यामुळे खान यांचे जगभरच्या खरेदीमध्ये गुंतलेले गट पाकिस्तानी लष्करशहा व पाकिस्तानी गुप्तचर संघटना आय. एस. आय. यांच्या हुकुमाखाली आले. (म्हणजेच अमेरिकन गुप्तचर संघटना सी.आय.ए.ला या अणूबॉम्ब प्रकल्पाची कल्पना १९७७ पासून होती)

पण तसे असले तरी पाकिस्तानच्या अणूबॉम्ब प्रकल्पाबद्दल जास्त माहिती असणे हे तोट्याचे ठरू लागले. जिमी कार्टर हे १९७७ सालची राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकून अधिकारावर आले तेंव्हा जगातली अण्वस्त्रें कमी करायची हे ध्येय समोर ठेवूनच ते अधिकारावर आले होते. पण त्यांचे राष्ट्रीय सुऱक्षा सल्लागार बिन्यू ब्रेझिंस्की (Zbigniew Brzezinski) यांनी त्यांना त्यांची दिशा बदलायचा सल्ला दिला. पाकिस्तान हे राष्ट्र साम्यवादाविरुद्धच्या लढाईतील एक धक्काप्रतिबंधक (buffer) म्हणून उपयुक्त राष्ट्र असल्याचा कार्टर यांना सल्ला देण्यात आला व पाकिस्तानला या कामात राजी-खुषी सामील करून घेण्यासाठी त्या राष्ट्राचे मन वळविण्याचाही त्यांना सल्ला दिला. झियाच्या मनसुब्याला छुपा पाठिंबा देऊन मग त्याच्या मोबदल्यात अण्वस्त्रे बनवायची ही योजना होती! पाकिस्तानने जर रशियाचा प्रतिकार केला तर त्यांच्या अण्वस्त्रें बनविण्याच्या प्रकल्पाकडे अमेरिका दुर्ल़क्ष करेल असेही ज. झियांना सांगण्यात आले.

१९८० साली कार्टर यांच्या जागी रेगन आले व त्यांनी कार्टर यांच्या अण्वस्त्रप्रसारबंदीच्या कार्यक्रमाला केरात काढले. राष्ट्रीय सुरक्षा समिती व सल्लागार यांचेही अवमूल्यन करण्यात आले व विल्यम केसी यांच्या नेतृत्वाखाली सी.आय.ए. ही संघटना सर्वेसर्वा झाली आणि गुप्तहेरखाते एक माहितीचे साधनच न रहाता ते एक प्रे. रेगन यांच्या धोरणाच्या समर्थनार्थ वापरायचे एक हत्यार बनले.

त्यापाठोपाठ अमेरिकन अधिकारी पैसे घेऊन इस्लामाबादला पोचले व बरोबर हाही निरोप घेऊन आले कीं अमेरिका पाकिस्तानच्या वाढत्या अण्वस्त्रें बनविण्याच्या प्रकल्पाकडे काणाडोळा करेल. पण पुढे जसजसे पाकिस्तानच्या अण्वस्त्रनिर्मितीच्या प्रकल्पाचे रोपटे भराभर वाढू लागले तसतसे तो प्रकल्प गुप्त ठेवणे अवघड जाऊ लागले.

प्रे. रेगन यांनी आशावादावर आधारित आक्रमकपणे तह/करार करण्याचा पायंडा मरगळलेल्या वॉशिंग्टनला आणला, पण उपयुक्ततेच्या व सोयीच्या तत्वावर जे परराष्ट्र धोरण सुरू केले गेले त्याचे रूपांतर झपाट्याने एका षड्यंत्रात झाले ज्यात अमेरिकेचे परराष्ट्रखातेही सामील झाले व पाकिस्तानच्या अण्वस्त्र-प्रकल्पाबद्दलच्या गुप्त बातम्यावर जे विरोध करतील त्यांच्या कामात अडथळेही आणू लागले. या सावळ्या गोंधळात पाकिस्तानने १९८३ साली स्फोटकें न वापरता केलेली अण्वस्त्रांची चांचणी (cold-testing), एवढेच नव्हे तर स्फोटकांसह चीनच्या मदतीने १९८४ साली केलेली चांचणीही (hot-testing) गुप्त ठेवण्यात अमेरिकेला यश मिळाले. पाकिस्तान व चीन या देशांमधील अण्वस्त्र-संबंधांना खोल गाडून टाकण्यातही रेगनच्या अधिकार्‍यांना यश मिळाले. यात चीनकडून मिळालेली बॉम्बची ड्रॉइंग्स, रेडियो आयसोटोप्स व इतर "हवी ती व हवी तितकी" तांत्रिक मदत यांचाही समावेश होता. याच्या मोबदल्यात चिनी आण्विक ऊर्जा कंत्राटदारांकडून अमेरिकन कंपन्यांनी कोट्यानुकोटी डॉलर्सची कंत्राटे मिळविली.

जेंव्हा प्रे. रेगन यांची कारकीर्द १९८९ साली संपली तेंव्हा पाकिस्तानकडे चांचणी केलेली व वापरता येण्याजोगी अण्वस्त्रे होती. व या अस्त्रांच्या निर्मितीचा बहुतांश खर्च अमेरिकेकडून ’मदत’ म्हणून मिळालेल्या पैशातूनच झाला होता कारण ’मदत’ म्हणून मिळालेल्या पुंजीतले अब्जावधी डॉलर्स पाकिस्तानच्या लष्करशहांनी या कामाकडे वळविले होते. अमेरिकेच्या पेंटॅगॉनमधील अधिकारी पाकिस्तानचे रक्षक/वॉचमन ठरले. त्यांनी गुप्तहेरखात्यांचे अहवाल आपल्याला हवे तसे पुन्हा लिहिवले ज्यात पाकिस्तानच्या या अण्वस्त्रक्षमतेबद्दल जाणून-बुजून आहे त्यापेक्षा कमी आहे असे दाखविले गेले. तेही अशा वेळी कीं इस्लामाबाद व दिल्ली यांच्यातला संघर्ष अगदी निकरावर आला होता. असे असूनही जेंव्हा अफगाणिस्तानातील युद्ध संपले तेंव्हा बुश-४१ यांनी पाकिस्तानला वार्‍यावर सोडून दिले व १९९० मध्ये त्या देशाला दिली जाणारी मदतही बंद केली. ही मदत म्हणजे अमेरिका व अण्वस्त्रसज्ज पाकिस्तान या दोन देशांमधला शेवटचा संपर्क होता. त्यानंतरचा संपर्क घडून आला जेंव्हा अमेरिकेची ’क्रूज’ क्षेपणास्त्रे १९९८ साली ओसामा बिन लादेन यांच्या अफगाणिस्तानमधील प्रशिक्षणकेद्रांवर डागली गेली तेंव्हा. भारत व इस्रायल या देशांच्या गुप्तहेर संघटनांनी पाकिस्तानने अमेरिकेच्या कट्टर शत्रूंबरोबर अण्वस्त्रांचा काळाबाजार मांडला आहे असे जगाच्या व अमेरिकेच्या निदर्शनास आणून दिलेच होते. या अहवालांना युरोपीय गुप्तहेर संघटनांकडूनही दुजोरा मिळू लागला होता. तरीही पाकिस्तानकडे कुणाचेच लक्ष नव्हते. त्याच्या पुढच्याच वर्षी पाकिस्तानातल्या लुटपुटीच्या लोकशाहीचा अंत झाला व पुनश्च लष्करशहा परवेज मुशर्रफ लष्करी राज्यक्रांतीद्वारा देशाचे सर्वेसर्वा बनले.

२००१ साली बुश-४३ यांनी अध्यक्षपदाची निवडणूक जिंकून शपथ घेतली तोपर्यंत गुप्तहेरखात्याकडून अचूक गुप्त अहवालाची रिमेच्या रिमे साचली होती ज्यात पकिस्तानचे वर्णन "जागतिक अस्थिरतेचा केंद्रबिंदू" असे करण्यात आले होते: लष्करी अधिपत्याखालील सनातन मुस्लिम दहशतवादाचा समर्थक व आश्रयदाता या भूमिकेत उभे असलेले पाकिस्तान हे राष्ट्र भांडवल व राजकीय प्रभाव मिळविण्यासाठी आज सामूहिक नरसंहार करू शकणार्‍या शस्त्रास्त्रांचा सर्रास व्यापार करण्यात गुंतले होते व अमेरिका ज्यांना शत्रू समजते अशा राष्ट्रांशी हा व्यापार चालला होता. ११ सप्टेंबर २००१ च्या कांहीं दिवस आधी ’सीआयए’चे संचालक जॉर्ज टेनेट यांनी ज्येष्ठ अधिकार्‍यांचा एक छोटा संघ प्रस्थापित केला (ज्यात परराष्ट्रमंत्री कॉलिन पॉवेल, त्यांचे कनिष्ठ मंत्री रिचर्ड आर्मिटाज, राष्ट्रीय सुरक्षा समितीचे उपसल्लागार स्टीफन हेडली, ’सीआयए’चे उपसंचालक जॉन मॅकलाफलिन व राष्ट्रीय सुरक्षा मडळाच्या अण्वस्त्र प्रसारबंदीचे संचालक रॉबर्ट जोसेफ यांचा समावेश होता) व त्यांच्याबरोबर एक ’आणीबाणीची शिखर परिषद’ही घेतली.

आता तर जहाल गटाचे लोकही पाकिस्तानबरोबरच्या संबंधांचे स्वरूप बदलायला तयार असलेले दिसले. वुल्फोवित्स यांनीही वरवर थोडेसे पडते घेऊन "आपण आपली परराष्ट्रनीती पत्त्यांच्या बंगल्यावर उभी करू असे लोकांना वाटत होते. पाकिस्तानी सरकार काय करत आहे हे अमेरिकन प्रतिनिधीगृहाला समजणार नाहीं असेही या लोकांना वाटत होते. माझी तर नेहमीच खात्री होती कीं प्रतिनिधीगृहापासून माहिती लपवून ठेवण्याचे धोरण शेवटी नक्कीच अयशस्वी होईल व प्रतिनिधीगृहाला अशा तर्‍हेची माहिती पूर्णपणे देणे हे कायद्याने आपल्यावर बंधनकारक आहे" असे मान्य केले.

पण ११ सप्टंबरच्या भीषण घटनेनंतर परिस्थिती अचानक बदलली व ते एक नवा पत्त्यांचा बंगला बांधण्यात गढून गेले.

पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष मुशर्रफ यांनी ’अल-कायदा’ या संघटनेला नष्ट करण्याचे, त्यांच्या नेत्यांना अमेरिकेकडे सुपूर्द करण्याचे व अफगाणिस्तान-पाकिस्तानच्या सीमेवरील दुर्गम व अवघड भागातील लपण्याच्या जागा उखडून टाकण्याचे टाकण्याचे वचन अमेरिकेला दिले होते. बुश-४३च्या सरकारने एक संभाव्य मित्रराष्ट्र असल्याचा फायदा एका बाजूला तर अण्वस्त्रांच्या निर्मितीच्या कार्यक्रमापासून उद्भवणारा धोका दुसर्‍या बाजूला अशा तर्‍हेने पाकिस्तानच्या (व मुशर्रफच्या) उपयुक्ततेचे मूल्यमापन केले. असेच मूल्यमापन कार्टर व रेगन यांनीही केले होते. पाकिस्तानच्या विरुद्ध एका बाजूने अतिरेक्यांना लपवून ठेवून अमेरिकेपासून वाचवणारे व दुसर्‍या बाजूला याच अतिरेक्यांना अण्वस्त्रनिर्मितीची माहिती गुप्तपणे देणारे असे दुटप्पी धोरण राबविणारे राष्ट्र असल्याचा भरपूर पुरावा असूनही अमेरिकेने याबाबत कांहींच केले नाहीं. कारण अमेरिकेच्या विमानांना मुक्त संचार देऊन, अतिरेक्यांबद्दलच्या गुप्त बातम्या अमेरिकेला पुरवून व जिथे पाश्चात्य सैन्य जाऊही शकणार नाहीं अशा दुर्गम डोंगराळ विभागात स्वत:चे सैन्य पाठवून मुशर्रफ (व पाकिस्तान) अमेरिकेच्या सुरक्षानीतीतील एक अव्वल मोहराच बनला होता. दरम्यान वुल्फोवित्स, चेनी व रम्सफेल्ड या (चांडाळ?) त्रिकुटाने इराक, इराण व उत्तर कोरिया ही राष्ट्रे जास्त धोकादायक आहेत असे पडघम वाजवायला सुरुवात केली. सद्दामकडे सामूहिक नरसंहार करणारी शस्त्रे (WMD) आहेत व त्याला उडवायचे कामही अर्धवट राहिल्याबद्दल अपप्रचार सुरू केला. अशा तर्‍हेने सर्व जगाचे लक्ष पाकिस्तानकडून या दुसर्‍या राष्ट्रांकडे वळविण्यात हे त्रिकुट यशस्वी झाले कारण या सांप्रदायिक प्रवृत्तीच्या नेत्यांना पाकिस्तानच्या या समस्येमुळे इराक व सद्दामविरुद्ध करायच्या कारवाईच्या कार्यक्रमावर परिणाम व्हायला नको होता.

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतही अमेरिकेचे त्यावेळचे परराष्ट्रमंत्री कोलिन पॉवेल यांनीही या त्रिकुटाचीच री ओढली. अमेरिकेच्या सर्व गुप्तहेर संघटना पाकिस्तानला अण्वस्त्र तंत्रज्ञानाचा स्वैर प्रसार करणारे व अत्यंत विघातक राष्ट्र समजत असताना पॉवेल यांनी इराककडे नरसंहार करणारी रासायनिक शस्त्रे आहेत असा सूर लावला. सनातनी नेत्यांच्या एकंदर ’लीलां’मुळे पॉवेल जरा नाराज होते व ते बुश-४३ने निवडणूक परत जिंकल्यास त्याच्या सरकारात ते भाग घेणार नव्हते. पण तोपर्यंत बुश-४३ सरकारला कसेही करून पॉवेलला आपल्या बाजूला ठेवायचे होते. मग एक नाटक करण्यात आले. प्रे. मुशर्रफ यांनी वचन दिले कीं जर अमेरिकेने त्यांच्या लष्करी क्रांतीद्वारा राज्यावर आलेल्या सरकारला मान्यता दिली तर ते (मुशर्रफ) पाकिस्तान करत असलेला अण्वस्त्रप्रसाराचा काळा बाजार पूर्णपणे बंद करेल!

२००३ च्या मे मध्ये बुश-४३ यांनी "फत्ते झाली"ची (Mission accomplished) दवंडी पिटली. डेविड के यांच्या नेतृत्वाखाली एक पथक महासंहारक अस्त्रांच्या शोधार्थ इराकला रवाना झाले. पण आंतरराष्ट्रीय अणु ऊर्जा संस्थेने (IAEA) जमा केलेल्या पुराव्यानुसार पाकिस्तान अद्यापही हा काळाबाजार करतच होता. मग बुश-४३ य़ांनी व त्यांच्या सहकार्‍यांनी पाकिस्तान सरकारला दोष न देता कांहीं विश्वासघातकी शास्त्रज्ञांनी आरंभलेला बेकायदेशीर व्यवहार असे नवे तुणतुणे वाजवायला सुरुवात केली. जेंव्हा इराकमध्ये महासंहारक अस्त्रे सापडली नाहींत तेंव्हा के यांनी २००४च्या जानेवारीत राजीनामा दिला व अमेरिकन प्रतिनिधीगृहाला तसे सांगितले. एका आठवड्यानंतर डॉ. खान यांना पाकिस्तानी दूरचित्रवाणीवर स्वार्थी कारणासाठी अण्वस्त्र तंत्रज्ञाचा काळाबाजार करणारा खलनायक या रूपात दाखविण्यात आले व पाकिस्तानी सरकार ’गुणी बाळ’ ठरविण्यात आले, दहशतवादाविरुद्धची मित्रराष्ट्रांची एकजूट अभेद्य राहिली व ही सनातनी मंडळी इराकनंतर इराणकडे डोळे वटारून पाहू लागली. पण दक्षिण आशियातले तज्ञ अमेरिकेला इशारा देतच राहिले कीं पाकिस्तानच सगळ्यात मोठी समस्या असून त्याविरुद्ध कांहीं तरी पावले उचललीच पाहिजेत. कारण पाकिस्तानला आज भेडसावणारे प्रश्न अजूनही गंभीर होतील, पाकिस्तानी सरकार या अतिरेक्याबाबतचे आपले परस्परविरोधी धोरण चालूच ठेवेल, पाकिस्तानी लष्कर या अतिरेकी व जहालमतवादी टोळ्यांबरोबरचे आपले संबध दृढ करेल व शेवटी अण्वस्त्रे नको त्या (व बेजबाबदार) लोकांच्या हाती पडण्याची शक्यता वाढेल! तरी अमेरिकेने याबाबत योग्य कारवाई करावी.

शेवटी झाले तसेच. २००६ साली इराणचे सरकार बदलण्याविषयीचा कल्लोळ खूप वाढला, मुशर्रफने गुपचुप गुप्तहेरसंघटनांकडून चाललेली डॉ. खान यांच्याविरुद्धची चौकशी थांबवली, पाकिस्तानच्या वायव्य सरहद्दीवरील वन्यजमातींच्या सीमांवरच्या भागात (नवा) ’पाकिस्तानी’ तालीबान पुन्हा जोर धरून उभा राहिला व तिथून अफगाणिस्तानातील अफगाणी, अमेरिकी व ब्रिटिश सैन्यावर जीवघेणे हल्ले करू लागला, ’अल-कायदा’चे लोक पाकिस्तानी स्थानीय अतिरेक्यांबरोबर एक होऊ लागले व नवी प्रशिक्षणकेंद्रे, नवी रिक्रूटभरती, व नवी ध्येये आकार घेऊ लागली. २००७ साली पाकिस्तानी अण्वस्त्र तंत्रज्ञाचा काळाबाजार पुन्हा तेजीत चालू झाला व जसजसा अतिरेक्यांचा प्रभाव वाढून त्यांची पावले पाकिस्तानी भूमीवर ठामपणे उभी राहू लागली तसतशी पाकिस्तानची अमेरिकेच्या मदतीने व पैशाने बनलेली अण्वस्त्रे नियंत्रणाबाहेर जाऊ लागली.

पाकिस्तानातील वाढता दहशतवाद व वेगात उभरू लागलेली अण्वस्त्रांची बेकायदेशीर निर्यात यांची एकी होऊन प्रलयंकारी घटनांकडे जगाला न्यायला किती वेळ लागेल? आज सारे जग नव्या जागतिक दहशतवादाशी दोन हात करत असताना इराकमध्ये चिखलात अडकलेला पाय, इराणबरोबर दोन हात करायची तयारी व उत्तर कोरियाबरोबर वटारलेल्या डोळ्यांचे युद्ध अशा परिस्थितीत हे पुस्तक या सर्व समस्यांना कारणीभूत पाकिस्तानबरोबरचे अमेरिकेचे व पाश्चात्य सरकारांचे निष्काळजी व निकृष्ट धोरणच कसे आहे हे उघडकीसा आणते!

आणि या सर्व प्रकाराची सुरुवात कशी झाली? तर अब्दुल कादीर खान या एका महत्वाकांक्षी तरुणाला पाकिस्तानात नोकरी मिळू शकली नाहीं!
-------------------------------
सर्व प्रकरणांचे दुवे:
Foreword-Core: http://www.misalpav.com/node/10857
Chapter 1-Angry Young Man: http://www.misalpav.com/node/10935
Chapter 2-Operation Butter Factory: http://www.misalpav.com/node/11039
Chapter 3-In the valley of death: http://www.misalpav.com/node/11139
Chapter 4-Peanuts: http://www.misalpav.com/node/11266
Chapter 5-The Ties That Bind: http://www.misalpav.com/node/11433
Chapter 6-The figment of Zionist Mind: http://www.misalpav.com/node/11738
Chapter 7-A Bomb for the Ummah: http://www.misalpav.com/node/11798
Chapter 8-Pineapple Upside-Down Cake: http://www.misalpav.com/node/11936
Chapter 9-The Winking General: http://www.misalpav.com/node/12145
Chapter 10-Gangsters in Bangles: http://www.misalpav.com/node/12224
Chapter 11-Guest of the Revolutionary Guard: http://www.misalpav.com/node/12301
Chapter 12-Project A/B: http://www.misalpav.com/node/12421
-------------------------------

राजकारणप्रकटनविरंगुळा

प्रतिक्रिया

रामदास's picture

26 Jan 2010 - 3:00 pm | रामदास

पुढचे भाग वाचायला उत्सुक आहे.

धन्यवाद.
पुढचे भाग जसजसे लिहून होतील तसतसे मी येथे अपलोड करेन.
------------------------
सुधीर काळे
एकही वक्तमें उसके आनेसे था चाँदनीका समाँ रोशनीका धुआँ,
कोई कहने लगा माहताब आ गया, कोई कहने लगा आफताब आ गया!

बंडू बावळट's picture

26 Jan 2010 - 3:15 pm | बंडू बावळट

अतिशय सुंदर उपक्रम.

रामदासांप्रमाणेच मीही वाचायला उत्सुक!

बंड्या.

सुनील's picture

26 Jan 2010 - 3:28 pm | सुनील

पुढे वाचण्यास उत्सुक.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

चिरोटा's picture

26 Jan 2010 - 3:46 pm | चिरोटा

पुढील भाग वाचण्यास उत्सुक. छोटीशी सुधारणा-

जेंव्हा प्रे. रेगन यांची कारकीर्द १९७९ साली संपली

असे न राहता-
जेंव्हा प्रे. रेगन यांची कारकीर्द १९८९ साली संपली असे पाहिजे.
भेंडी
P = NP

'भेंडि'साहेब,
टंकनातली चूक ध्यानात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. अशा एकाग्रतेने लेख वाचल्याचे कौतुक करावे तितके थोडेच! मलाही बरे वाटले.
चूक दुरुस्त केली आहे.
पुनश्च धन्यवाद देतो.
------------------------
सुधीर काळे
एकही वक्तमें उसके आनेसे था चाँदनीका समाँ रोशनीका धुआँ,
कोई कहने लगा माहताब आ गया, कोई कहने लगा आफताब आ गया!

प्रमोद देव's picture

26 Jan 2010 - 4:20 pm | प्रमोद देव

काळेसाहेब,आपला उपक्रम खूपच चांगला आहे.
जे काही वाचतोय ते खरंच धक्कादायक आहे. पडद्याच्या पुढे आणि मागे चालणारे राजकारण किती परस्परविरोधी असते हे आता सर्वांना ठाऊक झालेले आहे. तरीही हे जे काही वाचतोय ते खरोखरच अकल्पित असे आहे आणि तितकेच सुरस देखिल आहे.

असेच लिहिते राहा. आम्ही वाचायला उत्सुक आहोत.

**********
भले तर देऊ कासेची लंगोटी ।
नाठाळाचे माथी हाणू काठी ॥

अजय भागवत's picture

26 Jan 2010 - 5:00 pm | अजय भागवत

तुम्ही घेत असलेल्या भाषांतराच्या कष्टाची जाणीव आहे. मुळ पुस्तक कसे असावे त्याचीही सहजपणे जाणीव होते. तुम्हाला ह्या कामासाठी शुभेच्छा.

लोगो-नोलोगो, डॉक्टर विच अशा पुस्तकांतून अमेरीकन कार्पोरेट क्षेत्राची वैचारीक दिवाळखोरी माहीत झालीच होती. एन्रॉन हा तर टीप ऑफ आइसबर्ग असेल असे किस्से त्या पुस्तकात आहेत. एक अमेरीकन ज्यु असलेल्या ओळखीच्या माणसाने मला अमेरीकन कार्पोरेटमधे होणार्‍या महीलांच्या शोषणाच्या ज्या कथा ऐकवल्या होत्या त्यानंतर एक प्रकारची घ्रुणा त्याबद्दल वाटली होती व आहे.

व ९/११ नंतर आणि रशिया-अफगाणिस्तान-अमेरीका अशा समीकरणातून बाहेर पडलेला भस्मासूर ह्याबाबत अनेक छोटे-मोठे लेख वाचल्यानंतर अमेरीका सरकारचा सहभाग कॉज की इफेक्ट हे समजले होतेच.

तरीही सगळ्या देशात असतात तसे जागरुक नागरीक अमेरीकेतही आहेत आणी त्यांच्यापैकीच एका द्वयीने जीवाला उदार होऊन हे लिखाण केले आहे असे वाटले.

jaypal's picture

26 Jan 2010 - 6:33 pm | jaypal

हा भाग आवडला अणि पुढील भागांची ओढ लागली आहे, तेव्हा लवकर येऊद्यात.
पुढील लिखाणास शुभेच्छा
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

आनंदयात्री's picture

26 Jan 2010 - 8:30 pm | आनंदयात्री

अभिनंदन .. पुढचे भाग वाचण्यास उत्सुक !

निमीत्त मात्र's picture

26 Jan 2010 - 9:26 pm | निमीत्त मात्र

वा!

काळेकाका लेखमालेचे स्वागत आहे. पहिला भाग वाचून मिपाकरांसाठी ही मेजवानीच आहे असे दिसत आहे.

श्रावण मोडक's picture

26 Jan 2010 - 9:41 pm | श्रावण मोडक

वाचतो आहे.
एक सूचना - पुस्तकातील मजकूर आणि तुमची मते (जर अशा लेखांमध्ये मांडलेली असतील तर) यात काही अंतर राखता येईल का याचा विचार करा. म्हणजे मतप्रदर्शन करताना कशाविषयी लिहितो आहे हे वाचकाच्या ध्यानी येईल!

नाहीं. मी आधी प्रत्येक प्रकरणाचे संक्षिप्तीकरण करतोय् व नंतर त्या संक्षिप्त आवृत्तीचे "निव्वळ" भाषांतर करतोय्. माझी मते कुठेच मी लिहिणार नाहींय्.
चुकून माकून सटकलं तर गोष्ट वेगळी. पण नाहींच होणार. लेव्ही व स्कॉट-क्लार्क यांच्या 'ताजमहाला'ला माझी 'वीट' लावायला कसंसंच वाटेल!
------------------------
सुधीर काळे
एकही वक्तमें उसके आनेसे था चाँदनीका समाँ रोशनीका धुआँ,
कोई कहने लगा माहताब आ गया, कोई कहने लगा आफताब आ गया!

श्रावण मोडक's picture

26 Jan 2010 - 10:18 pm | श्रावण मोडक

हे ठीक आहे. पण तुम्हाला तुमचेही मत मांडण्याचा अधिकार आहे. मांडावेसे वाटले तर जरूर मांडा. कारण इथं तुम्ही काही नुसता (व्यापारी-व्यावसायीक) अनुवाद करत नाहीये. जे करता आहात ते आऊट ऑफ युवर ओन इंटरेस्ट आणि बहुतांशी सार्वजनिक हितार्थ म्हणता येईल अशा हेतूंतून करीत आहात. फक्त मते मांडलीत तर ती वेगळी ठेवा इतकेच मला सुचवायचे आहे.

सल्ल्याबद्दल धन्यवाद. विचार करेन.
------------------------
सुधीर काळे
एकही वक्तमें उसके आनेसे था चाँदनीका समाँ रोशनीका धुआँ,
कोई कहने लगा माहताब आ गया, कोई कहने लगा आफताब आ गया!

मदनबाण's picture

27 Jan 2010 - 5:17 am | मदनबाण

काका,ही लेखमाला वाचावयास उत्सुक आहे... :)
आपला हा उपक्रम फार आवडला.
पुढील भागाची आतुरतेने वाट पाहत आहे...

जाता जाता :--- अमेरिकन सेनेची इराक मधे होणारी हानी यू-ट्यूब वरील अनेक व्हिडीयोत दिसुन येते...
ied attacks on us in iraq किंवा sniper attack in iraq असा शोध घेतल्यास पाहावयास मिळणारे व्हिडीयो धक्कादायक आहेत !!!

मदनबाण.....

At the touch of love everyone becomes a poet.
Plato

अक्षय पुर्णपात्रे's picture

27 Jan 2010 - 7:35 am | अक्षय पुर्णपात्रे

सुधीरकाका, उपक्रम आवडला. पुढील भाग वाचण्यास उत्सुक. धन्यवाद.

...................................................
I was working on the proof of one of my poems all the morning, and took out a comma. In the afternoon I put it back again. --- Oscar Wilde.

सहज's picture

27 Jan 2010 - 7:46 am | सहज

चांगला उपक्रम.

वाचतो आहे.

विजुभाऊ's picture

27 Jan 2010 - 2:02 pm | विजुभाऊ

उत्तम लेखमाला. उत्तम इन्फोटेन्मेन्ट.

पारंबीचा भापू's picture

27 Jan 2010 - 3:06 pm | पारंबीचा भापू

सुधीरभाऊ,
चांगला जमलाय लेख. अशा वाचनाने आम्हाला बरीच नवीन माहिती मिळत आहे.
असेच माहितीपूर्ण लेख येत राहू देत.
धन्यवाद.
भापू

चतुरंग's picture

2 Feb 2010 - 8:43 am | चतुरंग

अमेरिकी सरकारांचे हे काळे कारनामे खरोखर जगासमोर यायलाच हवेत. मराठीतून पुस्तक अनुवादण्याचा तुमचा निश्चय वाखाणण्याजोगा आहे. त्याच्या पूर्वतयारीसाठी तुम्ही घेतलेली मेहनत कौतुकास्पद आहे.
पुढील भाग वाचायला उत्सुक!

चतुरंग

संदीप चित्रे's picture

3 Feb 2010 - 1:36 am | संदीप चित्रे

घेऊन लेखमाला लिहायला घेतल्याबद्दल धन्यवाद काळेकाका !
पुढचे भागही नक्की वाचणार.

सुधीर काळे's picture

4 Feb 2010 - 12:44 pm | सुधीर काळे

चतुरंग यांनी इथे तसेच खासगीत मला खूप प्रोत्साहन दिले याबद्दल खास आभार.
पुढचे प्रकरण (प्रकरण-१: संतप्त तरुण) उद्या-परवापर्यंत चढवू शकेन असे वाटते.
------------------------
सुधीर काळे
Parkinson's Laws
1. Work expands to occupy time available.
2. Bureaucrats add subordinates, not rivals.
3. In meetings, time spent on a point is inversely proportional to its importance!

गणपा's picture

4 Feb 2010 - 1:22 pm | गणपा

स्तुत्य उपक्रम.
आवर्जुन वाचतो आहे.
पु.अ.शु.

अनेक वृत्तपत्रांत आलेल्या अग्रलेखांत कुणाच्या फायद्यासाठी त्यांनी हा कबूलीजबाब दिला असावा याबाबतही तर्‍हेतर्‍हेच्या अटकळी प्रसिद्ध झाल्या. प्रेसिडेंट जॉर्ज बुश यांनीही या फसवणुकीला जणू संमतीच दिली. कांहीं दिवसांनंतर ते म्हणाले, "खान यांनी त्यांचे सारे गुन्हे मान्य केले आहेत आणि त्यांचे या गुन्ह्यातील सहकारी आता या धंद्यातून बाहेर फेकले गेले आहेत. खान व त्यांचे छोटे टोळके अतीशय धक्कादायक गुन्ह्यांबद्दल दोषी आहेत. पण त्यांच्यावर खटला घालायची गरज दिसत नाहीं. बुश पुढे म्हणाले, "प्रेसिडेंट मुशर्रफ यांनी मला आश्वासन दिले आहे कीं ते खान यांच्या जालाबद्दलची (network) सर्व माहिती अमेरिकन सरकारला देतील व तो देश (पाकिस्तान) अशा अण्वस्त्रप्रसाराच्या मुळाशी असू दिला जाणार नाहीं." पाकिस्तान सरकारचे या घटनेवर इतके पूर्ण नियंत्रण आहे कीं खान व त्यांच्या सहकारी शास्त्रज्ञांना अमेरिकेत खटला घालण्यासाठी अमेरिकेच्या किंवा इतर पाश्चात्य राष्ट्रांच्या स्वाधीन करण्याची गरज नाहीं.

माझे -
अनेक वृत्तपत्रातल्या त्या काळातील अग्रलेखात त्यांनी हा कबूलीजबाब कोणाच्या फायद्यासाठी दिला असावा या विषयी अनेक तर्कवितर्कांना उधाण आले होतो. प्रेसिडेंट बूश यांच्या संमतीशिवाय हे होणे शक्यच नव्हते असेही म्हट्ले जात होते, कारण काहीच दिवसांनी बूश महाशयांनी आपले तोंड उघडले " खान यांनी त्यांचे सर्व गुन्हे मान्य केले आहेत आणि त्यांच्या या गुन्ह्यातील सहकार्‍यांचे उद्योग आता बंद पड्ले आहेत. खान व त्यांचे सहकारी अत्यंत घृणास्पद अशा गुन्ह्यांचे दोषी आहेत पण त्यांच्यावर आरोप ठेउन खटला चालवण्याची आता आवश्यकता वाट्त नाही. पाकिस्तानचे अध्यक्ष श्री. मुशर्रफ यांची खात्री देत, ते पुढे असेही म्हणाले" प्रेसिडेंट मुशर्रफ यांनी मला असे आश्वासन दिले आहे की डॉ. खान व त्यांच्या टोळीच्या जाळ्यासंबधी सर्व माहीती ते अमेरीकेला देतील आणि अणवस्त्रप्रसाराचे मुळ पाकिस्तान असणार नाही याची काळजी घेतील. पाकिस्तानच्या सरकारचे या प्रकरणावर संपूर्ण नियंत्रण असून डॉ. खान व त्यांच्या सहकार्‍यांवर आरोप शाबित करुन त्यांच्या वर खटला चालवण्यासाठी त्यांना अमेरीकेच्या किंवा इतर पाश्चात्य देशांच्या ताब्यात देण्याची मुळीच गरज नाही'

अर्थात तुमचे चांगलेच आहे.

जयंत कुलकर्णी.

शशिकांत ओक's picture

10 Apr 2010 - 7:17 pm | शशिकांत ओक

सुधीरजी,
आपण इतके कष्ट घेऊन मराठीकरण करून लिहिता आहात. तेच आम्हाला अत्यंत आदरणीय व प्रिय आहे.
पहिल्या किंवा दुसऱ्या महायुद्धातील रम्य(?) कथांप्रमाणे या गोष्टी वाचून सोडून द्याव्यात अशा नाहीत. येथे वर्णित घटनांतील- कथनांतील मूळपात्रे व त्यांच्या कारवाया या इतक्या ताज्या आहेत की त्यांच्या परिणामाची झळ आजच्या वाचकांना बसणारी आहे.
हे जगातील राज्यकर्त्यांनी ओळखून निदान आतातरी कणखरपणे हिरव्या अणुराक्षसाला कसे रोखावे याची आखणी करून प्रत्यक्षात आणावे असे अपेक्षित असले तरी जगाच्या एकंदरीत चालींचा प्रवाह आत्मविनाशाकडे आहे, हे स्पष्ट दिसत असताना कोणी त्याची फिकीर करताना दिसत नाही. उलट घटना त्यात तेल घालण्याचे काम करताना दिसतात.
जयंतरावांचे रुपांतर जास्त सुबक आहे. तथापि पुढील काही भागातील काही उताऱ्यातील शब्दांचे जसेच्यातसे भाषांतर करावे लागेल.

शशिकांत

जयंत कुलकर्णी's picture

10 Apr 2010 - 7:45 pm | जयंत कुलकर्णी

:-)
आहो ओकसाहेब, ही माझी टिका नव्हती. वाचन रंगतदार आणि मराठी वाटायला पाहिजे म्हणून लिहायचा उद्योग केला.
तुम्ही The Yearling चे मराठीतले भाषांतर वाचले आहे का ? प्रत्येक भाषांतरकाराने तसे भाषांतर करायचे ध्येय ठेवले पाहिजे. काळ्यांना सहज शक्य आहे. फक्त तसा दृष्टीकोन ठेवला पाहिजे.
असो चूक झाली असेल तर...............

जयंत कुलकर्णी

शशिकांत ओक's picture

10 Apr 2010 - 10:10 pm | शशिकांत ओक

जयंत,
मी कुठे म्हणतोय ती तुमची टीका आहे म्हणून. उलट आपले रुपांतर सरस आहे.
काळ्यांना तसे सरावाने व इतरांच्या प्रोत्साहनाने येईल.
माझे म्हणणे धाग्यातील विचारांवर जास्त भर देणारे आहे. त्यावर आपला अभिप्राय काय आहे ते कळले असते तर आवडले असते.

शशिकांत

सुधीर काळे's picture

12 Apr 2010 - 12:18 pm | सुधीर काळे

खरं सांगायचं तर मलाही हे जाणवलं होतं. नंतरची प्रकरणे पाहिल्यास माझे भाषांतरप्रविण्य सुधारले आहे असेच मला वाटते.
सकाळला पाठवायच्या आधी इथे माझे लेख चढविण्याचा हाच उद्देश होताकीं इथे झालेल्या टीकेचा व सूचनांचा मी उपयोग करून घेऊन मगच ते 'wider audience' पुढे मांडायचे!
त्यानुसार 'सकाळ'ला पाठवायच्या आधी हे प्रकरण मी पुन्हा सुधारून लिहिले आहे!
सुधीर काळे, जकार्ता
------------------------
दोन अत्यंत वाचनीय दुवे: http://www.dnaindia.com/opinion/main-article_dynasty-vs-government_1368625 (DNA) व http://indiatoday.intoday.in/site/Story/89840/Inhuman+rights.html?comple... (India Today)

ss_sameer's picture

21 Jan 2018 - 12:44 pm | ss_sameer

लगे रहो

आनन्दा's picture

18 Jul 2018 - 11:16 am | आनन्दा

ही लेखमाला गायब झाली.
लिंका उघडत नाहीत.

जयन्त बा शिम्पि's picture

14 Aug 2020 - 6:06 pm | जयन्त बा शिम्पि

आन्तर जालावर मूळ पुस्तक उपलब्ध आहे काय ? असल्यास लिन्क देवू शकता काय ? एका दमात वाचून काढण्याचा विचार आहे.

जयन्त बा शिम्पि's picture

14 Aug 2020 - 6:06 pm | जयन्त बा शिम्पि

आन्तर जालावर मूळ पुस्तक उपलब्ध आहे काय ? असल्यास लिन्क देवू शकता काय ? एका दमात वाचून काढण्याचा विचार आहे.

जयन्त बा शिम्पि's picture

14 Aug 2020 - 6:17 pm | जयन्त बा शिम्पि

ज्यांना अधिक माहिती हवी असेल त्यांनी https://nsarchive2.gwu.edu/nukevault/ebb333/index.htm या साइटवर पहावे. पुराव्यानीशी लेख आहे.

माझ्याकडे मूळ छापील पुस्तक आहे - अमेरिकेत कुठे असाल तर पाठवून देऊ शकतो ....

पुस्तक अलीकडचे असल्याने PDF देणे बेकायदेशीर आहे. भारतात किंडल एडिशन रु. ४४९ इथे आहे
https://www.amazon.in/Deception-Pakistan-United-Nuclear-Weapons-ebook/dp...

या लेखकांची इतरही पुस्तके वाचनीय आहेत. मला सर्वात आवडलेले amber room. काश्मीरवरचे पुस्तक विचार करण्याजोगे आहे. आणि अर्थातच The Siege.