.

जनातलं, मनातलं

राजे १०७'s picture
राजे १०७ in जनातलं, मनातलं
18 Sep 2019 - 23:03

FLAME

वीस बावीस वर्षे वयाचे आम्ही एका कॉलेजात शिकायला होतो. मी, सात्या, पव्या, आस्क्या, राजू आणि गुडघ्या एका रुमवर रहात होतो. आमच्या घरमालकाची मुलगी मला लयी लाईन देत होती पण राजाला ते देखवलं नाही. राजानं तिला बहीण मानावं असं फर्मान सोडले. आमच्यात राजा सभ्य नि निर्व्यसनी असल्यानं, हुशार मुलगा रुम पार्टनर आहे म्हटल्यावर आमच्या खोडींकडे बाकीचे कानाडोळा करत. त्यामुळे त्याचं ऐकणं भाग होतं.

राजे १०७'s picture
राजे १०७ in जनातलं, मनातलं
18 Sep 2019 - 21:53

दिवाळी ओवाळी

दिवाळी जवळ आली की आमच्या मुलांच्या टोळ्या तयार व्हायच्या. वसू बारसे पासून देवांना आणि तुळशीला, गायींना ओवाळण्यासाठी अंधार पडला की घरोघरी जाऊन गाणी म्हणत पाच दिवस ओवाळायची पध्दत होती आमच्या गावाला. शेवटच्या दिवशी ज्यांच्या घरी ओवाळलं त्यांच्या कडून सकाळी सकाळी पैसे घेत असू. नंतर सारखे वाटे करून आपापसात वाटून घेत असू.

राजे १०७'s picture
राजे १०७ in जनातलं, मनातलं
18 Sep 2019 - 15:09

आणि मी कुडमुड्या ज्योतिषी बनलो.

नव्वद ब्याण्णव असं काही तरी साल असेल. मला पुण्याला भेट द्यायला फार आवडायचं. लक्ष्मी रोड वर नामांकित ज्योतिषांकडे भविष्य पाहणे, तुळशीबागेत नुसतं भटकणं, सारसबाग, पर्वती, संभाजी उद्यान वेळ मिळेल तिकडे भटकणं आणि खादाडी करणं हा सोलो प्रोग्राम असायचा. पिएमटीने कमी पण पायी खूप फिरायचो.

अनिंद्य's picture
अनिंद्य in जनातलं, मनातलं
18 Sep 2019 - 13:11

आमार कोलकाता - भाग १

प्रास्ताविक आणि मनोगत :-

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
18 Sep 2019 - 07:54

क्लीक- १

लेमन यलो ,अबोली किंचीत पोपटी असे फिरते रंग दाखवणारी मैसूर सिल्क ची साडी. निळसर पोपटी फिरते रंगवाले फूल स्लीव्ज वालं ब्लाऊज , केस मागे नेत घट्ट बांधलेली सागर वेणी, , कानाच्या मागे केसात माळलेला मोगर्‍याचा गजरा कपाळावर छान अबोली रंगाची मॅचिंग टिकली त्याच लाईट कलरची लिपस्टीक…
डावा हात जमीनीला समांतर धरून नव्वद अंशात काटकोनात कोपर वाकवत पदर फडकावत स्वतःला आरशात न्याहाळतेय.

मृणमय's picture
मृणमय in जनातलं, मनातलं
18 Sep 2019 - 06:19

आई बाबा आणि स्मार्ट फोन

लोकं स्मार्ट फोन का घेतात त्याला वेगवेगळी करणे आहेत. तरुण पिढीला स्मार्ट फोन हातात असला कि जास्त स्मार्ट झाल्यासारखे वाटते तर जुन्या पिढीला परवडतो हेच एकमेव कारण. तो कसा वापरायचा ...त्यांच्याच भाषेत सांगायचं तर चालवायचा हे माहित नसते. माझ्या आई बाबांना व्हाट्स अँप छान चालवता येते, यु ट्यूब, व्हिडिओ कॉल छान जमतो. हि आयुधे काही तलवारबाजी आणि नेमबाजी पेक्षा कमी नाही आहेत बरंका.

मृणमय's picture
मृणमय in जनातलं, मनातलं
16 Sep 2019 - 11:21

माझा कुकिंग एक्सपिरिमेंट

नमस्कार, मी आरती, आता कुणाची विचारू नका :)

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture
डॉ. सुधीर राजार... in जनातलं, मनातलं
15 Sep 2019 - 15:57

भिकार्‍याची संपत्ती

- डॉ. सुधीर रा. देवरे

आजी's picture
आजी in जनातलं, मनातलं
15 Sep 2019 - 14:35

आटा, तांदूळ, तूरडाळ आणि 'इत्यादि'..

मला बोरिंग वाटणारी अनेक कामेआहेत. त्या सगळ्यांची नावे सांगत बसायला मला बोअर होतंय. पण काही नमुन्यादाखल सांगते. गूळ चिरणे, भाजी निवडणे, उरलेले अन्न काढणे, दरमहा लागणार्‍या वाणसामानाची यादी करणे.

गौरीबाई गोवेकर नवीन's picture
गौरीबाई गोवेकर नवीन in जनातलं, मनातलं
14 Sep 2019 - 20:17

तंबोरा' एक जीवलग - ५

न केलेल्या अभिनयाची गोष्टः

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
14 Sep 2019 - 19:40

Ig- नोबेल पुरस्कार : विनोदातून विचाराकडे !

पुढच्या महिन्यापासून २०१९चे नोबेल पुरस्कार जाहीर होऊ लागतील. संपूर्ण संशोधक जगताचे त्याकडे लक्ष असते. ते पुरस्कार सन्मानाचे असतात. पण त्यापूर्वीच या महिन्यात एक विचित्र प्रकारचे पुरस्कार आपले लक्ष वेधून घेतात. त्यांचे नाव शीर्षकात दिलेच आहे.

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जनातलं, मनातलं
14 Sep 2019 - 19:38

अनामिक ( Unknown)

तुझा नंबर unknown म्हणून सेव्ह केलाय.
तू स्त्री की पुरुष काहीच माहीत नाही मला. वय माहित नाही, कुठे मुक्काम माहित नाही. काम काय करतोस/ करतेस ते माहीत नाही. तू म्हणावं की तुम्ही? माहीत नाही. आणि एकदम extreme बोलायचं झालं तर तू जिवंत आहेस नाहीस, हेही माहीत नाही.

दिनेश५७'s picture
दिनेश५७ in जनातलं, मनातलं
14 Sep 2019 - 11:41

धन वर्षा...

एका मऊशार दुपट्यात लपेटलेला तो एवढासा जीव निगुतीने सांभाळत ती गाडीतून उतरली आणि थेट डॉक्टरसमोर जाऊन तिने दुपटं अलगद उघडलं. आतला जीव मलूल पडला होता. तळव्यावर जेमतेम मावेल एवढं लहानसं, तपकिरी रंगाचं कोणतीच हालचाल न करणारं आणि जिवंतपणाचं कोणतच लक्षण दिसत नसलेलं कासव टेबलावर डॉक्टरांच्या समोर पडलं होतं, आणि चिंतातुर नजरेनं ती डॉक्टरांकडे पाहात उभीच होती.

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
13 Sep 2019 - 22:13

श्री. नरेंद्र दामोदरदास मोदी आणि मंत्रमुग्ध मी!

श्री. नरेंद्र दामोदरदास मोदी आणि मंत्रमुग्ध मी!

vaibhav deshmukh's picture
vaibhav deshmukh in जनातलं, मनातलं
13 Sep 2019 - 13:09

भीतीच्या आरपार (कथा)

पुन्हा एकदा आलेली खोकल्याची उबळ त्याने महत्प्रयासाने दाबली. त्या खोकल्याचा आवाज रात्रीच्या त्या भयानक वातावरणात घुमला की, अघोरी शक्ति पाहून एखादे घुबड चित्कारले आहे का? असा भास होत होता. तोंडावरचा हात त्याने बाजूला केला. बिड्या ओढून ओढून छातीचा पिंजरा झालेला होता. जुना पंखा सुरू केला की जशी घरघर होते, तशी घरघर त्या छातीच्या पिंजर्‍यातून सारखी बाहेर यायची.

दिनेश५७'s picture
दिनेश५७ in जनातलं, मनातलं
12 Sep 2019 - 18:33

भविष्य

वर्तमानपत्रातले रोजचे राशिभविष्य सकाळी पहिला चहा घेण्याआधी वाचून घ्यावे असे माझे ठाम मत झाले आहे. तसे केल्याने त्या दिवसाच्या भविष्यानुसार वागण्याची आखणी करता येते. त्याचे दोन फायदे असतात.

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
12 Sep 2019 - 14:29

भाग ३ - जब वी मेट - समा, समा है ये प्यार का...

भाग ३ - जब वी मेट - समा, समा है ये प्यार का...

 

1 भोळा शशी...

आमच्या आवडीचे गाणे आम्ही ऐकत होतो... कहीं दिल ना चुराले मौसम बहार का...