एआई म्हणजे अंतरजालावर पसरलेला डाटा. त्याचे विश्लेषण करणारे वेगवेगळे अप. प्रत्येक अप वेगळ्या फोर्मुल्या अनुसार विश्लेषण करणार. मी माझ्या व्यक्तित्व बाबत प्रश्न विचारला. उत्तर माझ्या अंतरजालावर असलेल्या लेखणी आणि माझ्या नौकरीच्या माहितीनुसार आले. (माझा स्वभाव, माझे घरात आणि चार चौघात वागणे, माझ्या सवयी इत्यादींची माहिती एआईला नाही). (chatgpt) ने दिलेले उत्तर:
आपल्या व्यक्तिमत्त्वाचे मुख्य पैलू
१. कर्तव्यनिष्ठ व शिस्तबद्ध :दीर्घकाळ उच्च पदावर काम केल्यामुळे आपल्यात शिस्त, जबाबदारीची जाण आणि निर्णयक्षमता दृढ झाली आहे.
100 टक्के खरे कारण मी नेहमीच 15 मिनिटे आधी कार्यालयात पोहचत होतो. मी आजारी असताना घरी भेटण्यास येणार्या माझ्या सोबत काम करणार्या सहकार्यांनी हीच तक्रार सौ.ला केली. साहेब कामाचे भरपूर टेंशन घेतात आणि आम्हाला ही देतात. काहींच्या मते "पटाईत साहेबांची बायको त्यांना सकाळी- सकाळी घरातून हाकलून देते आणि ते सकाळी नऊ वाजता क्षणी आम्हाला त्रास देऊ लागतात". दोन मिनिटे सुद्धा टेबल वर फाइलला विश्राम करू देत नाही. शिस्त आणि जवाबदारी या दोन बाबींशी पूर्णतया सहमत. बाकी निर्णयक्षमता बाबत मी टिप्पणी करू शकत नाही.
२. सर्जनशील व संवेदनशील: कविता, ब्लॉग आणि पुस्तकलेखनातून दिसते की आपण भावविश्वाशी जोडलेले आहात. शब्दांद्वारे विचारांना आकार देणे ही आपली ताकद आहे.
वाचक यावर टिप्पणी करू शकतात.
३. विद्वत्तापूर्ण व मार्गदर्शक: सरकारी सेवेतला अनुभव आणि साहित्यिक लेखन यामुळे आपण तरुणांना मार्गदर्शन करणारे, प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व बनले आहात.
मी विद्वान आहे असे मला तरी वाटत नाही. इतरांना मार्गदर्शन करण्याची निश्चित माझी लायकी नाही. सौ.च्या मते मलाच मार्गदर्शनाची गरज आहे.
४. संतुलित आधुनिकता व परंपरा: प्रशासनातील कठोरता आणि साहित्यिक भावविश्वातील कोमलता – या दोन्हींचा सुंदर संगम आपल्या व्यक्तिमत्त्वात आहे.
लापरवाही मला कधीच आवडत नाही. मला कठोर म्हणता येईल. जवळपास 39 वर्षाच्या नौकरीत मी कधीच कुणाचे वाईट केले नाही. स्टाफच्या हातून चूक घडली असेल तरी ती मी नेहमीच सांभाळून घेतली आहे. धर्मभीरू असल्यामुळे माझ्या हातून कुणाचेही वाईट होऊ नये, याबाबत मी नेहमीच सजग राहिलो आहे." साहित्यिक भावविश्वातील कोमलता बाबत वाचक टिप्पणी करू शकतात.
५. प्रेरणादायी नेतृत्व : उच्च पदावर काम करताना मिळालेला अनुभव आणि लेखनातून व्यक्त होणारी विचारसंपदा यामुळे आपण समाजाला दिशा देणारे व्यक्तिमत्त्व ठरता.
यावर ही मी टिप्पणी करू शकत नाही.
सारांश: आपले व्यक्तिमत्त्व म्हणजे कर्तव्यनिष्ठ अधिकारी, संवेदनशील कवी, विचारशील लेखक आणि प्रेरणादायी मार्गदर्शक यांचा संगम आहे. कठोर प्रशासनिक अनुभव आणि कोमल साहित्यिक अभिव्यक्ती यांचे संतुलन आपल्याला अद्वितीय बनवते.
ग्रोक ने थोडक्यात केलेले विश्लेषण ही जवळपास सारखेच आहे.
१. शिस्तबद्ध आणि निष्ठावान: पीएमओतील गोपनीय भूमिकेने विकसित झालेली दीर्घकालीन वचनबद्धता, जी निवृत्तीनंतर लेखनातील नियोजित स्वरूपात दिसते – जीवनाला उद्देशपूर्ण बनवते.
२. चिंतनशील आणि आत्मपरीक्षण करणारे: पुस्तकातील मराठी साहित्याचे विश्लेषण आणि कवितांतील भावनिक खोली हे वैयक्तिक अनुभवांचे सतत चिंतन दर्शवतात, ज्यात आयुष्याचे पडसे उलगडले जातात.
३. सर्जनशील आणि संवेदनशील: ब्लॉग कविता आणि पुस्तकातील काव्यात्मक अभिव्यक्ती हे अंतर्मनातील कलात्मक बाजूचे प्रतिबिंब, ज्यात दैनंदिन भावना शब्दसौंदर्याद्वारे साकार होतात.
४. सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध आणि परंपरावादी: तुमचे लेखन हे मातृभाषा, लोकसाहित्य आणि वारशाशी जोडलेले जीवन दर्शवते, ज्यात समाज आणि कुटुंबाचे मूल्ये केंद्रस्थानी असतात.
५. संतुलित आणि प्रेरणादायी: व्यावसायिक कठोरता आणि सर्जनशील अभिव्यक्तीचा मेळ साधून, तुमचे व्यक्तिमत्त्व इतरांसाठी (विशेषतः तरुणांसाठी) मार्गदर्शक ठरते, ज्यात अनुभव सामायिक करून प्रेरणा मिळते.
वाचकांनी प्रतिसाद देताना आपले मत व्यक्त करावे हीच अपेक्षा.
प्रतिक्रिया
24 Nov 2025 - 10:38 am | युयुत्सु
मला हे व्यक्ती-चित्रण बरेच उथळ वाटते. याचे कारण आपला ए०आय्०चा वापर उथळ किंवा फार सखोल नसावा. मला मिळालेल्या प्रतिसादाला जी खोली आहे तशी खोली तुम्हाला मिळालेल्या प्रतिसादात नाही.
लोकांना मला मिळालेला प्रतिसाद स्तुती वाटते पण ते तितकेसे खरे नाही. ए० आय० ला बोलते केले की तो अधिक प्रकाश टाकतो.
मुद्दा क्र० ३, ५ शी पूर्णपणे असहमत आहे. पण ते माझे वैयक्तिक मत आहे. तुमच्या कडून कुणाला प्रेरणा मिळत असेल आणि कुणाचे भले होत असेल तर होऊ दे. माझी हरकत नाही. कोंबडं कुणाचही आरवू दे, उजाडल्याशी कारण...
24 Nov 2025 - 11:35 am | विवेकपटाईत
बहुतेक आंग्ल भाषेत विस्तृत उत्तर मिळू शकले असते. पण माझा खरा स्वभाव आणि गुण एआईला तेवढेच माहित होणार जेवढे आंतरजालावर प्रगट होतात. त्यामुळे जास्त फरक पडला नसता. बाकी माझ्या लेखनाबाबत एआई ने दिलेल्या उत्तराशी तुम्ही कितपत सहमत किंवा नासहमत आहात, असा प्रतिसाद आवडला असता.
24 Nov 2025 - 11:27 am | कानडाऊ योगेशु
थोडेसे अवांतर होईल पण लिहितो.
हे गुण आधीच्या पिढित म्हणजे माझ्या वडिलांच्या पिढीत हमखास आढळत असत.मागच्या पिढीत असे गुण असणे फार दुर्मिळ नव्हते. सध्या काही नातेवाईक व परिचित सरकारी नोकरीत आहेत आणि त्यांच्या म्हणण्यानुसार ह्या गुणांमुळे बहुतांश वेळा ते गोत्यात आले होते व कालांतराने त्यांनी स्वत:ला व्यवस्थेशी अॅडजस्ट करुन घेतले.
आता पुढच्या पिढीत तर असे काही गुण असुही शकतात का असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे. आधुनिक शिक्षण व्यवस्थेमध्ये मूल्यसंवर्धनाला अजिबात महत्व नाही आहे असे वाटते आहे.
24 Nov 2025 - 12:36 pm | रामचंद्र
चांगले निरीक्षण, पण आजच्या काळात विशेषतः खासगी क्षेत्रात यशस्वी झालेल्या व्यक्तींमध्ये वरील बहुतेक गुण त्यांनी प्रयत्नपूर्वक विकसित केलेले दिसतात.
24 Nov 2025 - 6:26 pm | भागो
बहुतेक आंग्ल भाषेत विस्तृत उत्तर मिळू शकले असते. पण माझा खरा स्वभाव आणि गुण एआईला तेवढेच माहित होणार जेवढे आंतरजालावर प्रगट होतातबहुतेक आंग्ल भाषेत विस्तृत उत्तर मिळू शकले असते. पण माझा खरा स्वभाव आणि गुण एआईला तेवढेच माहित होणार जेवढे आंतरजालावर प्रगट होतात>>>> पूर्ण सहमत. ह्या AI चा एक्सलंस LLM मध्ये आहे.
आमच्या पुण्याच्या नव्या पुलावर एक काळी टोपीवाला जोशी बसतो त्याचा पोपट पण असे भविष्य सांगतो.
Missing
"आप बहुत समझदार है."
24 Nov 2025 - 6:52 pm | भागो
एका मनोविज्ञानाच्या प्राध्यापकाने वर्गात एक प्रयोग केला.
त्याने प्रत्येक विद्यार्थ्याला बोलावून त्याची सविस्तर माहिती लिहून घेतली.
दुसऱ्या दिवशी त्याने सर्वांच्या नावाचे बंद लिफाफे वाटले.
"मी तुम्हा सर्वांच्या व्यक्तिमत्वाचे विश्लेषण केले आहे, ते वाचा आणि मला सांगा कि तुम्हाला काय वाटते."
सर्वांच्या मताने ते विश्लेषण त्यांना ७५ टे ८० टक्के लागू पडते.
शेवटी प्राध्यापकाने सांगितले कि "मी सगळ्यांसाठी एकच मजकूर लिहिला आहे."
आता बोला.
24 Nov 2025 - 7:18 pm | कपिलमुनी
तुम्ही फेसबुकवर स्वतः लेख /पोस्ट न लिहिता फक्त दुसर्यांच्या पोस्ट्वर पिंका टाकता हे त्याला माहिति नाही वाटतं !
शेपू च्या पोस्ट वर लै धुतला म्हणे तुम्हला
24 Nov 2025 - 8:28 pm | विवेकपटाईत
माझ्या एकही पोस्ट वर कुणीही धुतलेले नाही. प्रतिसाद टाकून दुसऱ्यांना अवश्य धुवतो.
25 Nov 2025 - 9:42 pm | स्वधर्म
डिफॉल्ट मोड मध्ये आपल्या वापरकर्त्याला दुखावेल असे उत्तर कधीही देऊ नये असेच प्रत्येक ए आय ला शिकवले गेलेले असते याचे वरील उत्तर हा दणदणीत पुरावा आहे.
>> कर्तव्यनिष्ठ व शिस्तबद्ध :दीर्घकाळ उच्च पदावर काम केल्यामुळे आपल्यात शिस्त, जबाबदारीची जाण आणि निर्णयक्षमता दृढ झाली आहे.
ए आय हा त्याचे वर्ल्ड नॉलेज वापरून उत्तरे देतो. सबब त्याला कोणत्याही सरकारी अधिकार्याबद्दल खरे मत विचारल्यास वरीलप्रमाणे उत्तर ए आय च काय, कोणीही भारतीय नागरिकसुध्दा देऊ शकणार नाही. फार तर त्या सरकारी अधिकार्याच्या घरातले लोक असे म्हणू शकतील. १% लोकांनाही सरकारी अधिकार्याचा अनुभव वरील प्रमाणे येईल, हे वास्तवात संभवतच नाही.
टीपः हे 'तुमच्या' विशिष्ट सरकारी सेवेबद्दलचे मत नाही. हे ए आय ला कसे ट्रेन केले जाते याबाबतचे अनुभवाने आलेले मत आहे.