हरवलेला संयम चिंताजनक
==============
- राजीव उपाध्ये
सध्याच्या काळात वैद्यकीय व्यवसाय कमालीचा जिकीरीचा बनला आहे. त्याची कारणे असंख्य आहेत-अत्यंत खर्चिक आणि दीर्घकाळ चालणारे, जीवघेण्या स्पर्धेने गढुळलेले उतरंडप्रधान वैद्यकीय शिक्षण, व्यवसाय चालू करण्यासाठी आणि स्थिर होण्यासाठी लागणारा वेळ नियामक आणि कायदे यांच्या कटकटी सांभाळताना होणारी कसरत, रुग्णांच्या अवाजवी अपेक्षा इ०
या पार्श्वभूमीवर युटूयुबवर बघण्यात आलेले पुढी्ल व्हीडिओ हिमनगाचे बाहेर आलेले एक टोक असावेत असे वाटते-
https://www.youtube.com/shorts/5a0s3th19-Y
https://www.youtube.com/shorts/eh5mQVPggmc
https://www.youtube.com/shorts/y7b9wge-Qwo
https://www.youtube.com/shorts/1HJHjTxepZY
https://www.youtube.com/shorts/QyIPfaukP_g
https://www.youtube.com/watch?v=-kV2fGUB-oU
वरील यादीत आणखी बरीच भर टाकता येईल.
खरं तर मानसिक स्वास्थ्य हरवलेल्या वैद्यकीय व्यवसायिकांना सन्मानाने क्वारंटाईन का केले जात नाही?
मानसिक संतूलन हरवलेले वैद्यकीय व्यावसायिक जर अशा रितीने रूग्णाशी वर्तन करणार असतील, हे सर्व बघितल्यावर प्रश्न पडतो "मानसिक दृष्ट्या स्थिर" वैद्यकीय व्यावसायिक ओळखायचा कसा? तसेच अशा अस्थिर व्यावसायिकांकडून रूग्णाना योग्य उपचार मिळतील याची खात्री काय?
भारतीय आरोग्य व्यवस्थेचे भवितव्य मला तरी चिंताजनक वाटते...
प्रतिक्रिया
12 Nov 2025 - 1:27 pm | धर्मराजमुटके
पुर्वी एल आय सी एजंट बद्दल मी एक विनोद करायचो की रस्त्याने चालताना एल आय सी एजंट कोण आहे असे ओरडले तरी १० जण आवाज देतील. किंवा रस्तावरच्या गर्दीत एखादा दगड जरी भिरकावला तर तो एल आय सी एजंट ला लागण्याची शक्यता आहे.
दंतवैद्याबद्दल देखील हाच विनोद वापरण्याची वेळ आली आहे असे आता वाटायला लागले आहे. दात हा शरीरातील एवढा महत्त्वाचा अवयव आहे हे मला गेल्या चार पाच वर्षातच समजले. आता कोणत्याही रस्त्याने चालले की एकाच गल्लीत दोन चार तरी दंतवैद्याची दुकाने दिसतात. डेंटीस्ट आणी फिजीयोथेरपीस्टचा धंधा सुरु करायला बहुधा तुलनेने कमी पैसे आणी मेहनत लागत असावी.
12 Nov 2025 - 1:37 pm | आग्या१९९०
माणसाला डोळे दोन आणि दात बत्तीस, व्यवसाय संधी जास्त असल्यामुळे डेंटिसची संख्या अधिक.
12 Nov 2025 - 11:59 pm | सौन्दर्य
ह्याच न्यायाने अस्थिरोग तज्ञ देखील जागोजागी दिसायला हवेत, २०६ हाडे असतात शरीरात.
13 Nov 2025 - 10:45 am | सुबोध खरे
मानसिक संतूलन हरवलेले वैद्यकीय व्यावसायिक
हा निर्णय आपणच घेतलात?
चिडलेला किंवा रागावलेलाकिंवा वैफल्यग्रस्त माणूस आणि मानसिक संतुलन बिघडलेला माणूस यातील मूलभूत फरक आपल्याला समजत नाही असे दिसून येते.
हि स्थिती रस्त्यात ट्रॅफिक जॅम मध्ये अडकलेल्या माणसाची रोजच असते म्हणजे ट्राफिक जॅम मधील माणसं मानसिक संतुलन बिघडलेली असतात का?
पोलीस, रेल्वेचे मोटरमन इ लोकांची स्थिती पण बऱ्याच वेळेस अशीच असते
सरकारी रुग्णालयात एक डॉक्टर ला १०० ते २०० रुग्ण पाहायला लागतात. याशिवाय त्यांना रात्री तातडीची सेवा द्यायला लागते. अशा स्थितीत झोप पूर्ण झालेली नाही, कामाचा अतिरिक्त भार, सरकारची अनास्था, वरिष्ठांचे विचित्र वर्तन. अशा अनेक बाबींमुळे डॉक्टर त्रस्त असतात. म्हणून लगेच त्यांना मानसिक संतलन बिघडलेले हे लेबल लावून मोकळे झालात?
चार बुकं वाचून डॉक्टर होता येत नाही. मानसोपचार तज्ज्ञ तर नाहीच नाही.
बाकी चालू द्या
13 Nov 2025 - 12:07 pm | युयुत्सु
वैद्यकीय व्यावसायिकांचे मानसिक आरोग्य
या विषयावर भरपूर संशोधन उपलब्ध सतत चालू असते. खालील जंत्रीमध्ये मला ८ वा संशोधन अहवाल महत्वाचा वाटतो कारण नैराश्य आणि त्यामुळे होणार्या चुका यांचा एकमेकांशी द्विदिशात्मक संबंध आहे.
आपण ज्या डॉ० कडून उपचार घेतो तो नैराश्याने (किंवा इतर समस्येने) ग्रस्त नाही, याची रुग्णांना काहीही शाश्वती नसते. जगभर जर ही समस्या इतकी गंभीर असेल तर भारतातील परिस्थिती काय असेल कल्पना करवत नाही.
1. Prevalence and correlates of depression, anxiety, and burnout among physicians and postgraduate medical trainees: a scoping review of recent literature - Frontiers, https://www.frontiersin.org/journals/public-health/articles/10.3389/fpub...
2. Mental Health Challenges Among Physicians in the United States - Ballard Brief - BYU, https://ballardbrief.byu.edu/issue-briefs/mental-health-challenges-among...
3. Self-reported medication use validated through record linkage to national prescribing data - PMC - NIH, https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC5808931/
4. Prevalence and Impact of Antidepressant and Anti-Anxiety Use Among Saudi Medical Students: A National Cross-Sectional Study - MDPI, https://www.mdpi.com/2227-9032/13/15/1854
5. Prevalence, trends, and individual patterns of long-term antidepressant medication use in the adult Swiss general population - PMC - PubMed Central, https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC10618304/
6. Physician Mental Health: An Evidence-Based Approach to Change - Allen Press, https://meridian.allenpress.com/jmr/article/104/2/7/177857/Physician-Men...
7. Physician, heal thyself: a cross-sectional survey of doctors' personal prescribing habits., https://www.drugsandalcohol.ie/31392/
8. Association Between Physician Depressive Symptoms and Medical Errors: A Systematic Review and Meta-analysis - PMC - NIH, https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC6902829/
9. Healing the Healers: System-Level Solutions to Physician Burnout - The Ontario Medical Association, https://www.oma.org/siteassets/oma/media/pagetree/advocacy/issues/burnou...
10. Amplifying Physician, Resident and Student Voices to Drive Wellbeing and Care Delivery Solutions, https://physiciansfoundation.org/research/amplifying-physician-resident-...
11. Prevalence and correlates of depression, anxiety, and burnout among physicians and postgraduate medical trainees: a scoping review of recent literature - NIH, https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC12279716/
12. Risk Factors for Anxiety and Depressive Symptoms in Doctors During the Coronavirus Disease 2019 Pandemic - PMC, https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC8249942/
13. Mental health among otolaryngology resident and attending physicians during the COVID‐19 pandemic: National study - PubMed Central, https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC7300862/
14. Top 10 physician specialties with the highest rates of depression, https://www.ama-assn.org/practice-management/physician-health/top-10-phy...
15. Long working hours and burnout in health care workers: Non‐linear dose‐response relationship and the effect mediated by sleeping hours—A cross‐sectional study - PubMed Central, https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC8101694/
16. Exposure to Stress and Burnout Syndrome in Healthcare Workers, Expert Workers, Professional Associates, and Associates in Social Service Institutions - NIH, https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC10971948/
17. Physician Burnout and the Electronic Health Record Leading Up to and During the First Year of COVID-19: Systematic Review - NIH, https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC9015762/
18. Burnout Related to Electronic Health Record Use in Primary Care - PMC - NIH, https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC10134123/
19. Protect Physicians from Workplace Violence - ACOFP, https://www.acofp.org/practice-advocacy/advocacy/protect-physicians-from...
20. Mental health problems among healthcare professionals following the workplace violence issue-mediating effect of risk perception - Frontiers, https://www.frontiersin.org/journals/psychology/articles/10.3389/fpsyg.2...
21. The Promise of Well-Being Interventions to Mitigate Physician Burnout During the COVID-19 Pandemic and Beyond | JCO Oncology Practice - ASCO Publications, https://ascopubs.org/doi/10.1200/OP.22.00108
22. Characteristics of Adults Age 18 and Older Who Took Prescription Medication for Depression: United States, 2023 - CDC, https://www.cdc.gov/nchs/products/databriefs/db528.htm
23. Prescription pattern of antidepressants in five tertiary care psychiatric centres of India - PMC, https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC4928559/
24. Age-Dependent Sex Differences in the Prevalence of Selective Serotonin Reuptake Inhibitor Treatment: A Retrospective Cohort Analysis - NIH, https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC10621660/
25. Antidepressant Use and Lifetime History of Mental Disorders in a Community Sample: Results from the Baltimore Epidemiologic Catchment Area Study - NIH, https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC4504011/
26. Antidepressant Prescription Behavior Among Primary Care Clinician Providers After an Interprofessional Primary Care Psychiatric Training Program - NIH, https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC10543424/
27. exploring psychiatrists' and psychiatry residents' knowledge and attitudes about self-medication in Türkiye - PMC, https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC11874384/
28. Substance use among Indian Physicians: A narrative review - PMC - NIH, https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC12250245/
29. Mental Health Stigma - CDC, https://www.cdc.gov/mental-health/stigma/index.html
30. Mental Illness Stigma, Help Seeking, and Public Health Programs - PMC - NIH, https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC3698814/
31. Mental Health Treatment Seeking Among Older Adults with Depression: The Impact of Stigma and Race - NIH, https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC2875324/
32. Am I allowed to practice medicine if I have been treated for a mental health diagnosis or substance use disorder? Am I required, https://hsc.unm.edu/school-of-medicine/education/assets/doc/wellness/faq...
33. Influence of Psychiatric Symptoms on Decisional Capacity in Treatment Refusal, https://journalofethics.ama-assn.org/article/influence-psychiatric-sympt...
34. The multifaceted effects of fluoxetine treatment on cognitive functions - Frontiers, https://www.frontiersin.org/journals/pharmacology/articles/10.3389/fphar...
35. Antidepressant's long-term effect on cognitive performance and cardiovascular system التأثير طويل المدى لمضادات الاكتئاب على الأداء الإدراكي والجهاز القلبي الوعائي - ResearchGate, https://www.researchgate.net/publication/390001436_Antidepressant's_long-term_effect_on_cognitive_performance_and_cardiovascular_system_altathyr_twyl_almdy_lmdadat_alaktyab_ly_alada_aladraky_waljhaz_alqlby_alwayy
36. Factors Affecting Physicians' Responses to Patients' Requests for Antidepressants: Focus Group Study - PMC - NIH, https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC2173928/
37. The physician's ethical role in mental illness | American Medical Association, https://www.ama-assn.org/about/ethics/physicians-ethical-role-mental-ill...
38. Resource Document on Risk Management and Liability Issues in Integrated Care Models - American Psychiatric Association, https://www.psychiatry.org/File%20Library/Psychiatrists/Practice/Practic...
39. Mental Health Professionals' Duty to Warn - National Conference of State Legislatures, https://www.ncsl.org/health/mental-health-professionals-duty-to-warn
40. How these health systems are prioritizing physician well-being, https://www.ama-assn.org/practice-management/physician-health/how-these-...
41. Professional Stigma of Mental Health Issues: Physicians Are Both the Cause and Solution, https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC8078109/
42. A Brief Survey of Public Knowledge and Stigma Towards Depression - PMC - NIH, https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC5798266/
43. Intervention for Physician Burnout: A Systematic Review - PMC - NIH, https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC6034099/
44. Addressing Health Care Workers' Mental Health: A Systematic Review of Evidence-Based Interventions and Current Resources - PubMed Central, https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC10916736/
45. Develop programs and policies that support employee mental health, https://www.apa.org/topics/healthy-workplaces/mental-health/develop-prog...
46. Policy on Physician Illness and Impairment: Towards a Model that Optimizes Patient Safety and Physician Health - Federation of State Medical Boards, https://www.fsmb.org/siteassets/advocacy/policies/policy-on-physician-im...
Help-seeking for mental health concerns: review of Indian research and emergent insights, https://www.emerald.com/jhr/article/36/3/428/213104/Help-seeking-for-men...
13 Nov 2025 - 12:26 pm | युयुत्सु
Although physically healthy, there is evidence that physicians disproportionately suffer from
substance use disorder (SUD) and mental health problems. Ten to 15 percent of physicians will
misuse alcohol or prescription drugs during their career (Baldisseri 2007; Vayr et al. 2019); more
than 20 percent of physicians are depressed or exhibit the symptoms of depression (Mata et al. 2015;
Rotenstein et al. 2018, eTable 24); and at least one third of physicians describe themselves as
suffering from “job burnout” (Drummond 2015), a syndrome closely linked to SUD and depression
(Bianchi et al. 2015; Schonfeld and Bianchi 2016; Wurm et al. 2016; Stageberg et al. 2020).
Compounding these problems, physicians are often reluctant to seek psychologic help, perhaps out
of shame or fear of losing their license (Shanafelt et al. 2011; Dyrbye et al. 2017; Tay et al. 2018;
Weiner 2020).
https://www.nber.org/system/files/working_papers/w29536/revisions/w29536...
13 Nov 2025 - 12:42 pm | सुबोध खरे
मेगाबायटी प्रतिसाद देण्यापेक्षा मूळ मुद्द्यावर या
हे डॉक्टर मानसिक संतुलन बिघडलेले आहेत किंवा मानसिक स्वास्थ्य बिघडलेले आहेत हा शोध आपण कसा लावला तेवढे सांगा.
मनोविकार तज्ज्ञ नेहमी पंधरा दिवसाच्या निरीक्षणाने आणि बऱ्याच वेळेस रुग्णाला भेटून बोलून असे निदान करतात
शॉर्ट यु ट्यूब विडिओ वरून आपण हे डॉक्टर "मानसिक संतुलन बिघडलेले आहेत किंवा मानसिक स्वास्थ्य बिघडलेले" आहेत हा शोध लावला असाल तर आपण अर्ध्या नव्हे तर एक दशांश हळकुंडाने पिवळे होताय असेच दुर्दैवाने म्हणावे लागेल.
13 Nov 2025 - 2:46 pm | युयुत्सु
आपण माझ्या मूळ पोस्टची रचना काळजीपूर्वक बघितली नाही, असे खेदाने म्हणावे लागते.
१ला परिच्छेद आणि दुसरा एकोळी परिच्छेद पुढच्या युट्युब लिकांशी जोडलेले आहेत. त्यामुळे युट्युब उदाहरणे "हिमनगाचे टोक" आहेत हे सिद्ध करतात.
’भावनिक संयम संपणे’ वारंवार घडायला लागले, त्याचा रोजच्या आयुष्यावर आजुबाजुच्या संबंधित लोकांना त्रास व्हायला लागला किंवा अव्यावसायिक वर्तन वारंवार घडायला लागले तर मानसिक संतुलन बिघडले असायची शक्यता जास्त! मग तज्ज्ञाने मुलाखत घेऊन निदान करणे हा फक्त औपचारिक भाग ठरतो.
वर एका अहवालात म्हटल्याप्रमाणे - "physicians are often reluctant to seek psychologic help, perhaps out of shame or fear of losing their license (Shanafelt et al. 2011; Dyrbye et al. 2017; Tay et al. 2018; Weiner 2020", तसेच असे वैद्यकीय व्यावसायिक सहसा स्वत:च स्वत:वर उपचार करत असल्यामुळे त्यांच्या "मानसिक असंतुलनाचे औपचारिक निदान" होणे कदापिही शक्य नाही.
टोक दिसल्यामुळे, हिमनगाचा अधिक शोध घेतल्यावर समस्या अधिक गंभीर असल्याचे लक्षात येते. मेगाबायटी प्रतिसाद प्रत्यक्ष हिमनगाच्या अक्राळविक्राळ रुपाचे दर्शन घडवतो. म्हणूनच आधुनिक वैद्यकीय उपचार रशियन रौलेटच ठरायची भीति, वैद्यकीय व्यावसायिकांबद्दल संशय, अनादर निर्माण करतात. त्यात आजकाल अनेक डॉ० आजकाल अतिशय कमी बोलतात.
माझा मूळ मुद्दा - "मानसिक दृष्ट्या स्थिर" वैद्यकीय व्यावसायिक ओळखायचा कसा?" हा आहे.
14 Nov 2025 - 4:13 pm | स्वधर्म
दुसरा एक मार्ग गुगलच्या कृपेने आपल्याला उपलब्ध झालेला आहे. तो म्हणजे डॉक्टरचे गुगल रिव्ह्यूज आणि रेटींग्ज तपासणे. हे अगदी १००% निष्पक्ष नसतील पण डॉक्टरच्या व्यावसायिक वर्तन व कौशल्याबद्दल एक अंदाज तरी नक्की देऊ शकतील.
13 Nov 2025 - 5:10 pm | स्वधर्म
"मानसिक दृष्ट्या स्थिर" वैद्यकीय व्यावसायिक ओळखायचा कसा?"
यावर अनुभव घेऊन एवढे एकच उत्तर सुचते. शिवाय हा प्रश्न कोणत्याही व्यावसायिका बाबतही विचारता येईल. परंतु डॉ चांगला मिळणे महत्वाचे असते कारण गाठ जिवाशी असते.
बाकी अनुभव घेऊन नापास केलेले डॉ. अनेक आहेत आणि त्यात वेळ, पैसा खर्च होतो व मनःस्तापही होऊ शकतो.
14 Nov 2025 - 7:59 am | युयुत्सु
श्री० स्वधर्म
असते कारण गाठ जिवाशी असते.
अगदी बरोब्बर! पण तुम्ही सुचवलेला उपाय वाटतो तितका सरळ नाही. रूग्णाने जर डॉ० बदलायचा ठरवला तर ते ही डॉ० आवडत नाही. मग ते रुग्णाचा पिच्छा सोडत. खोटी माहिती पसरवणे, वैयक्तिक माहिती सार्वजनिक करणे असे प्रकार करून रुग्णाने दुसरीकडे जाऊ नये म्हणून दबाव टाकला जातो.
माझ्या माहितीमधल्या एका व्यक्तीला डॉ० नी साध्या आजारपणाबद्दल (जास्त तपशील देता येणार नाही) जे उपचार लिहून दिले त्याबद्दल त्याला शंका आली. त्याने ए०आय० कडून शहानिशा केली तेव्हा ए०आय० ने धोक्याची घंटा वाजवली. मग त्याने इतर डॉ० ना विचारले तेव्हा त्यांनी ए०आय० चे उत्तर बरोबर असल्याचे आणि सदर औषधामुळे जिवाला धोका निर्माण होऊ शकतो असे सांगितले. त्या व्यक्तीने डॉ० बदलायचा निर्णय घेतला पण डॉ० पिच्छा सोडत नाहियेत. वेगवेगळी दबावतंत्रे टाकून सदर व्यक्तीचा मानसिक छळ चालू आहे.
14 Nov 2025 - 8:04 am | युयुत्सु
मग ते रुग्णाचा पिच्छा सोडत नाहीत असे वाचावे.
13 Nov 2025 - 7:51 pm | सुबोध खरे
मानसिक दृष्ट्या स्थिर वकिल, कर सल्लागार, गुंतवणूक सल्लागार विमा एजंट कसा ओळखायचा ?
इतकंच काय मानसिक दृष्ट्या स्थिर जीवनाचा जोडीदार कसा ओळखायचा?
केवळ डॉक्टरच कशाला?
याचा ठोकताळा असेल तर लिहा
उगाच इतका भारंभार मेगाबायटी काथ्याकूट कशाला?
14 Nov 2025 - 9:14 am | युयुत्सु
म्युच्युअल अन्कंडीशनल पॉझिटीव्ह रिगार्ड आणि पारदर्शकता या दोन निकषांवर आपण दिलेल्या यादीतील ( वकिल, कर सल्लागार, गुंतवणूक सल्लागार विमा एजंट, जीवनाचा जोडीदार ) व्यक्तींबरोबर सुदृढ नातेसंबंध निर्माण होण्यासाठी पुरेसे असतात.
डॉ० ना मात्र म्युच्युअल अन्कंडीशनल पॉझिटीव्ह रिगार्ड आणि पारदर्शकता या दोन्ही गोष्टीची कमालीची अॅलर्जी असते. मग आपली तब्येत आपल्या हातात घेण्याशिवाय पर्याय उरत नाही आणि मग ते चांगले जमायला लागले की डॉक्टरांचा चडफडाट होतो...
14 Nov 2025 - 11:41 am | सुबोध खरे
काहीही हां श्री
13 Nov 2025 - 7:56 pm | सुबोध खरे
"physicians are often reluctant to seek psychologic help, perhaps out of shame or fear of losing their license
कशाला उगाच मल्लिनाथी करताय?
किती इंजिनियर, कर सल्लागार, सी ए , कॉर्पोरेट एक्सईक्यूटिव्ह मी मानसोपचार तज्ज्ञाची मदत घेतो आहे असे उघडपणे कबूल करतात?
मी स्वतः मानसोपचार विभागात काम करत असताना जितक्या अधिकारी रुग्णांना सल्ला देत होतो ते सर्व लष्करी पार्टीत ओळख दाखवत नसत आणि नंतर भेटल्यावर क्षमाही मागत असत.
15 Nov 2025 - 1:59 am | गामा पैलवान
युयुत्सु,
तुम्ही दिलेले दुवे मी पाहिले नाहीत. माझी शंका जरा वेगळी आहे. लेखात तुम्ही म्हणलंत की :
परंतु शीर्षकात हरवलेला संयम असं म्हंटलंय. मानसिक स्वास्थ्य हे माझ्या मते संयमापेक्षा बरंच अधिक काहीतरी आहे. तेव्हा कृपया शीर्षक दुरुस्त करावे.
आ.न.,
-गा.पै.
15 Nov 2025 - 8:07 am | युयुत्सु
तुमचा मुद्दा मान्य आहे! मानसिक स्वास्थ्याचे घटक बरेच आहेत. संयम आणि निर्णयक्षमता हे त्यातले महत्त्वाचे घटक आहेत. संयम संपणे हे मानसिक स्वास्थ्य या हिमनगाचे टोक आहे.
डॉ० आणी वकीलांचे इगो अत्यंत फ्रॅजाईल असतात. खुनशीपणा ठासून भरलेला असतो. एकदम मानसिक स्वास्थ्यावर भाष्य केलं तर गुडघ्याला झटका (नी-जर्क) प्रतिक्रिया उमटली असती.
15 Nov 2025 - 8:08 am | युयुत्सु
मानसिक स्वास्थ्य या हिमनगाचे टोक आहे.
मानसिक अस्वास्थ्य या हिमनगाचे टोक आहे. असे वाचावे.
15 Nov 2025 - 9:51 am | सुबोध खरे
हे डॉक्टर मानसिक संतुलन बिघडलेले आहेत किंवा मानसिक स्वास्थ्य बिघडलेले आहेत हा शोध आपण कसा लावला तेवढे सांगा.
15 Nov 2025 - 10:20 am | युयुत्सु
यत्र यत्र धूमः तत्र तत्र वन्हि:|
15 Nov 2025 - 11:04 am | युयुत्सु
त्या पेक्षा तुम्ही अत्यंत पारदर्शक अशी एक निदान-पद्धत तयार करा आणि या डॉ० चे मानसिक स्वास्थ्य बिघडलेले नाही हे सिद्ध करून दाखवा. मानसिक स्वास्थ्याचे निदान हा बराच वादग्रस्त विषय असतो. दोन मनोविकार तज्ज्ञ एकच, पूर्वग्रह विरहित निदान करतील याची शाश्वती नसते. हे डॉ० असल्याने तुमचा त्यांच्यावर पांघरूण घालण्याकडेच कल असणार हे निश्चित आहे.
15 Nov 2025 - 11:21 am | युयुत्सु
समजा (केवळ युक्तीवादाकरता) हे डॉ० मानसिक दृष्ट्या स्वस्थ आहेत असं स्वीकारलं तर मेगाबायटी प्रतिसादातून आ वासून उभे असलेलं चित्र भ्रम आहे, संपूर्ण वैद्यकीय जगत धुतल्या तांदळा सारखं स्वच्छ आहे असं तुम्हाला म्हणायचे आहे का?
प्रश्न नेमका असल्याने नेमके उत्तर अपेक्षित आहे. उत्तरे टाळून फक्त प्रश्न विचारायचे असल्यास यापुढे आपल्या प्रतिसादांची दखल घेतली जाणार नाही.
15 Nov 2025 - 12:46 pm | सुबोध खरे
"आता मी आपल्यालाच प्रश्न विचारतो आपले मानसिक संतुलन बिघडलेले नाही हे सिद्ध करा. "
साधी गोष्ट आहे आपण मानसिक दृष्ट्या समतोल आहात हे मूलभूत गृहीतक आहे.
दर महा १० % चक्रवाढ व्याजाने मला पैसे २३२% परत द्या असे आपल्याच गणिताने मी आपल्याला सांगितले तर आपण इतक्या वेळेस चिडचीड केलीत पण मी एकदा तरी आपण मानसिक दृष्ट्या संतुलन बिघडलेले आहात असे म्हटले का?
मानसिक रुग्ण हा सिद्ध करावा लागतो तो मनोरुग्ण आहे हे गृहीत धरून नव्हे तर तो मानसिक रुग्ण नाही हे गृहीत धरूनच.
"संपूर्ण वैद्यकीय जगत धुतल्या तांदळा सारखं स्वच्छ आहे असं तुम्हाला म्हणायचे आहे का?"
वैद्यकीयच कशाला वकील कर सल्लागार, राजकारणी, इंज्जीनीयर, सरकारी नोकर पोलीस सर्वच जग धुतल्या तांदळासारखे नाही.
म्हणून समोर आलेला प्रत्येक इंजिनियर डॉक्टर वकील डोकं फिरलेलाच आहे असे गृहीत धरणे हेच मुळी मानसिक आजाराचे लक्षण दाखवेल.
बाकी तुमचं चालू द्या.
हे डॉक्टर मानसिक संतुलन बिघडलेले आहेत किंवा मानसिक स्वास्थ्य बिघडलेले आहेत हा शोध आपण कसा लावला तेवढे मात्र सांगा.
ते चिडलेले रागावलेले आणि फ्रस्टरेटेड आहेत हे मान्य करता येईल
पण केवळ तेवढ्यावर मानसिक संतुलन बिघडलेले आहेत किंवा मानसिक स्वास्थ्य बिघडलेले आहेत असे समजणे म्हणजे एखाद्या रुग्णाला जळजळ होते म्हणजेच त्याला जठराचा कर्करोगच आहे असे समजण्यासारखे आहे.
15 Nov 2025 - 2:34 pm | युयुत्सु
ते चिडलेले रागावलेले आणि फ्रस्टरेटेड आहेत हे मान्य करता येईल
हे तुमचे मत आहे! एका मताने काहीही सिद्ध होत नाही. म्हणून मी आपल्याला सर्वसमावेशक, पारदर्शक चाचणी तयार करायचे आवाहन करत आहे. मग ती चाचणी हे डॉ०, तुम्ही, मी आणि जो जो आपले स्वास्थ्य तपासण्यास उत्सूक असेल त्याला आपण करायला लावू. आहे काय आणि नाही काय? हा सूर्य हा जयद्रथ ...होऊन जाऊ द्या. मला खात्री आहे या डॉक्टरांना वाचवायला गोलपोस्ट हलवले जाईल, आकाशपाताळ एक केलं जाईल.
समोर आलेला प्रत्येक इंजिनियर डॉक्टर वकील डोकं फिरलेलाच आहे असे गृहीत धरणे हेच मुळी मानसिक आजाराचे लक्षण दाखवेल.
ज्याच्याकडे पारदर्शकता नाही, जो माझ्याबद्दल बेसिक आदर बाळगत नाही, जो माझ्याशी योग्य भाषेत संवाद साधू शकत नाही किंवा माझ्याबद्दल तुच्छता बाळगतो किंवा माझी भूमिका समजाऊन घ्यायचा प्रयत्न देखिल करत नाही, जो माझ्या निर्णय-स्वातंत्र्यावर प्रभाव टाकायचा प्रयत्न करतो किंवा माझ्यावर नियंत्रण मिळवू पाहतो, जो माझ्या आनंदात सहभागी होऊ शकत नाही, जो माझ्याशी व्यवहार करताना सतत खोडसाळपणा, दिशाभूल, मी न बोललेले/लिहीलेले माझ्या तोंडी घालायचा प्रयत्न करतो त्याच्या हेतूबद्दल, कृतीबद्दल किंवा वर्तनाबद्दल माझ्या मनात संदेह/संशय/शंका निर्माण झाली असेल तर त्यामुळे मी त्या व्यक्तीला शक्य तो टाळतो आणि अशा व्यक्ती परत-परत स्पष्ट सूचना देऊनही आयुष्यात शिरकाव करायचा प्रयत्न करणार असतील त्यांचे डोके फिरलेले असायची शक्यता जवळपास १००% याची मला खात्री आहे!
दूग्धेन दग्धजीव्हः तक्रं फुत्कृत्य पिबति पामरः हे आपल्याला माहित असेल अशी अपेक्षा आहे.
आपल्या सर्व शंकांचे समाधान झाले असेल अशी आशा आहे.
15 Nov 2025 - 7:01 pm | सुबोध खरे
तुमच्या आयुष्यात परत परत शिरकाव करण्याची मला मुळी सुद्धा हौस नाही.
मुळात आपण माझ्यासाठी नगण्य आहात.
पण सार्वजनिक स्थळावर बिनबुडाची आणि दिशाभूल करणारी वैद्यकीय माहिती टाकली तर त्याचा प्रतिवाद होणारच.
खिडकीत पावडर लिपस्टिक लावून बसलात तर खालून जाणाऱ्या माणसाने शुकशुक केली तर जळफळाट आणि चिडचिड करू नये हे तारतम्य आपल्याला असायला हवे.
३० सेकंदाचा युट्युबचा शॉर्ट व्हिडीओ पाहुन तुम्ही एखाद्याला मानसिक दृष्ट्या असंतुलित ठरवणार असाल तर तुमच्या मूलभूत ज्ञानावर शंका घ्यावी अशीच स्थिती आहे.
मला खात्री आहे या डॉक्टरांना वाचवायला गोलपोस्ट हलवले जाईल, आकाशपाताळ एक केलं जाईल. हा प्रतिसाद तर सरळसरळ पूर्वग्रह दाखवतो.
मुळात मीच बरोबर असा माझा अट्टाहास नाहीच कारण मला जालावर मी हुशार हे सिद्ध करायची मुळीच आवश्यकता नाही.
मला मेगा बाईटी प्रतिसाद द्यायची आवश्यकता का पडत नाही याचा हि विचार करून पहा. (पण आपली अहंमन्य वृत्ती पाहता तसे होण्याची शक्यता फारशी नाही ).
तेंव्हा तुमचं चालू द्या.
15 Nov 2025 - 7:47 pm | युयुत्सु
मुळात आपण माझ्यासाठी नगण्य आहात.
हरकत नाही! खरं तर हे वाचून आनंदच झाला. आता तरी 'ब्याद' जाईल अशी अपेक्षा करतो.
पण मला एक प्रश्न पडला आहे - एखाद्याला आपण नगण्य/क्षुद्र व्यक्ती ठरवले की त्या व्यक्तीच्या वाट्याला आपण परत-परत जात नाही. माझ्या लेखी तुम्ही अत्यंत टॉक्सिक आहात, त्यामुळे मी तुमच्या पोस्ट्वर कधीच पिंका टाकायला येत नाही, तुम्ही समोरून आलात तर मी रस्ता क्रॉस करून दुसर्या फुटपाथने जाईन. त्यामुळे मी पण तुम्हाला गंभीरपणे घेत नाही आणि घेणार नाही.
फक्त मी इथे टाकलेले संदर्भ टाकाऊ निरर्थक असतील तर ते आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर दाखवून तुमच्या मतांची सत्यता, प्रामाणिकपणा अगोदर सिद्ध करा. मग इथे भांडत बसा. ती धमक तुमच्यात आहे का, याची मला शंका आहे.
एकीकडे मला नगण्य म्हणता आणि तुम्हाला माझा पिच्छा सोडता येत नाही, तसंच मी तुम्हाला 'लिपस्टीक लावून खिडकीत बसलेला' दिसतो म्हणून तुम्ही 'शुकशुक' पण करता. ही माझ्या सामान्य ज्ञानाप्रमाणे विचार, कृती आणि पर्सेप्शन या मधली 'भग्नमनस्कते'ची छटा दर्शवते.
इथे अनेक जण तुम्हाला 'लवकर बरे व्हा' असा सल्ला अधूनमधून देतात त्याचा तुम्हाला विसर पडला आहे का?
15 Nov 2025 - 7:51 pm | युयुत्सु
ही माझ्या सामान्यज्ञानाप्रमाणे विचार, कृती आणि पर्सेप्शन या मधली तफावत 'भग्नमनस्कते'ची छटा दर्शवते.
15 Nov 2025 - 7:54 pm | सुबोध खरे
बहुतेक वाममार्गी ( डावे फुरोगामी) मला लवकर बरे व्हा लिहितात . याचाच अर्थ मी बरोबर मार्गावर आहे.
तुम्हीही त्यातलेच.
त्यामुळे मी आपल्याला आवडत नाही याबद्दल मला अजिबात वाईट वाटत नाही. उलट छान वाटलं
बाकी तुमचे संदर्भ मानसिकदृष्ट्या असंतुलित माणसांचे आहेत.
पण त्यामुळे आपला दिलेल्या यूट्यूबच्या शॉर्ट व्हिडीओ मधील डॉक्टर मानसिकदृष्ट्या असंतुलित आहेत असे अजिबात सिद्ध होत नाही. तेंव्हा आपले एकंदर संदर्भच असंबद्ध आहेत. अर्थात कोणत्याही गोष्टीला फाटे फोडून मूळ मुद्द्याला बगल देण्याची तुमची वृत्ती दृगोच्चर होते.
बाकी तुमचं चालू द्या.