माझी दिवाळी
नमस्कार मिपाकरहो,
दिपावली अभिष्टचिंतन!
नमस्कार मिपाकरहो,
दिपावली अभिष्टचिंतन!
नुकत्याच पार पडलेल्या ‘हर घर तिरंगा, घर घर तिरंगा’ ह्या उपक्रमाला भारतीय जनतेने दिलेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहिला व मन आनंदाने व अभिमानाने भरून आले. ज्या पिढीने १९४७ ते २०२२, हा पंचाहत्तर वर्षांचा कालावधी प्रत्यक्ष पाहिला, अनुभवाला व उपभोगीला ती पिढी भाग्यवानच म्हणायची, त्याच प्रमाणे स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेली आमची पिढी देखील तितकीच नशीबवान म्हणायची. ज्या तिरंग्याने आम्हाला हा बहुमान दिला त्याचे आभार मानावेत तेव्हढे कमीच आहेत.
सर्वांना नमस्कार. नेताजी सुभाषचंद्र बोस! लहानपणापासून त्यांच्याबद्दल अतिशय आत्मीयता वाटते. "महानायक" आणि "नेताजी" अशी मोठी पुस्तकं व इतर अनेक पुस्तकांमधून त्यांचा परिचय झाला. नव्हे त्यांच्या आयुष्यातला प्रत्येक प्रसंग, प्रत्येक घटना मनावर बिंबली होती. लहानपणापासून त्यांचं वेगळेपण, त्यांचे विचार, त्यांची बंडखोर वृत्ती, शाळा- महाविद्यालयातील पराक्रम, नंतर ब्रिटनमधील शिक्षण, गांधीजींना विरोध, दुस-या महायुद्धामध्ये केलेला अभूतपूर्व प्रवास, परकीय देशांमध्ये जपलेला स्वाभिमान, देश प्रेम, पुन: एकदा रोमांचक पाणबुडी प्रवास, पूर्व आशियातील रोमहर्षक महाभारत आणि...
राजगुरुनगर ते हुसैनीवाला......
"मेरे जज्बातों से इस कदर वाकिफ है मेरी कलम कि, मैं ‘इश्क’ भी लिखना चाहूं तो ‘इंकलाब’ लिखा जाता है..."
- हुतात्मा भगतसिंग
२३ मार्च १९३१ ला भगतसिंग, राजगुरू आणी सुखदेव यांना लाहोरच्या तुरूंगात फाशी दिली.ही बातमी रत्नागिरी येथे स्थानबद्ध आसलेल्या स्वातंत्र्यवीरांना दुसरे दिवशी कळाली.निर्माण झालेल्या मनःक्षोभातून खालील कविता त्यांनी लिहीली आणी देशप्रेमी तरूणांनी गुपचूप कठंस्थ करून रत्नागिरीत प्रभातफेरी काढली आणी सारे नगर देशभक्तीच्या घोषणांनी दणाणून सोडले होते.
सकाळपासून पावसाची रिपरिप चालू आहे. श्रावणातला पाऊस तो हत्ती सारखा थोडाच कोसळणार. दररोजची प्रभातफेरी चुकली. येताना देवपूजेला फूले घेऊन येण्याचा नित्यनेम. लाईट नव्हती, पाच माळे उतरून खाली जावे की न जावे द्विधा मनस्थितीत. नित्यनेम चुकला की दिवसभर रुखरुख लागते. त्यापासून वाचण्यासाठी खाली उतरायचे ठरवले. विचारमग्न अवस्थेतच पाचव्या मजल्यावरून खाली आलो,छत्री विसरल्याचे लक्षात आले.
(विद्यार्थीदशेतील भाचे मंडळींसाठी)
----
विद्यार्थीदशेतील एक टप्पा मागे सरून चढणीचा प्रवास सुरू होईल आता. धुकं असेलही प्रवासात आणि मनातही, पण ते थोडंसं निवळावं म्हणून हे चार शब्द.
----
हाजीर हो ! ...
ऋतुमतीचा अर्थ रजस्वला स्त्री.अस्सल गावठी भाषेत विटाळशी!
स्त्रीच्या वयाच्या बाराव्या, तेराव्या वर्षी सुरू होऊन पार चाळीशी, पन्नाशीत संपणारी मासिक पाळी. दर महिन्याला न चुकता येऊन ठेपणारी! फक्त गर्भ राहिला तरच नऊ महिने बंद होणारे मंथली पिरीएड!
जून महिना चालू झाला की साधारणपणे मध्यमवर्गीयांच्या घरात शालेय वस्तू खरेदी करण्याची लगबग चालू होते. बहूतेक कुटूंबवत्सल पालक पगार झाला की शाळेसाठी लागणार्या वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात निघतात. मान्सूनचा पाऊस जरी चालू असला तरी एखाद्या सुटीच्या दिवशी आपापली मुले, त्यांच्या आया यांची स्कुटरवर निघालेली गर्दी रस्त्यावर पहायला मिळते.
चित्रपट तब्बल सात-आठ वर्षे जुना आहे, हे लिहून ही आता बरीच वर्षे झालीत. मला या चित्रपटात काय दिसलं ते मांडायचा छोटासा प्रयत्न !
गच्च भरून आलेलं आभाळं, त्यातून डोकावणारी माडांची दाटी, वाडीला असणाऱ्या चिऱ्यांच्या दोन कुंपणांमधून जाणारी तांबडी पायवाट, खडकाळ समुद्रकिनारा, त्यापलीकडे घनगंभीर गाजेनं आसमंत भारून टाकीत समोर येणारा सिंधुसागर रत्नाकर.....
अशी नजरबंदी करणारी, प्रेमात पाडणारी सुरवात असणारा २०१५ साली प्रदर्शित झालेला "किल्ला" हा अविनाश अरुण या दिग्दर्शकाचा स्वर्गीय अनुभव देणारा चित्रपट.