माहिती

साहित्य संमेलनाच्या निमित्त प्रतिभेचा ई आविष्कार!

८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने या संमेलनाच्या संकेतस्थळाने 'प्रतिभेचा ई आविष्कार'या अनोख्या स्पर्धेचे आयोजन केले आहे.
काव्यपूर्ती, उखाणे मित्रमैत्रिणींचे, चित्रावर चारोळी आणि इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द अशा या स्पर्धा असणार आहेत.
तेंव्हा आजच http://sahityasammelan2010.org या संकेतस्थळावर जाऊन आपल्या प्रतिभेचा आविष्कार करा आणि साहित्य संमेलनामध्ये आपला ई-सहभाग नोंदवा ही मिपाकरांना आग्रहाची विनंती!

[तात्या नमस्कार!, ही बातमी वजा आवाहन मिपावर कुठे टाकावं हे कळलं नाही म्हणून येथे देतो आहे... मिपाकरांच्या संमेलनातल्या ई-सहभागासाठी या बातमीला योग्य ती जागा द्यावी ही विनंती!]
प्रसाद

कवी भुषण कविता क्र. २

2. अलि नवरंगजेब चंपा सिवराज है......

कूरम कमल कमधुज है कदम फूल । गौर है गुलाब, राना केतकी विराज है ।
पांडुरी पँवार जूही सोहत है चन्दावत । सरस बुन्देला सो चमेली साजबाज है ।
भूषन भनत मुचकुन्द बडगूजर है । बघेले बसंत सब कुसुम समाज है ।
लेइ रस एतेन को बैठिन सकत अहै । अलि नवरंगजेब चंपा सिवराज है ॥

अर्थ :-

येथे भुषणाने औरंगजेबाच्या मांडलिक राजांना एकेका फुलाची उपमा दिली आहे.
जयपूरचे राजे कछवाह हे कमळाप्रमाणे , जोधपुरचे राजे कबंधज हे कदंबाप्रमाणे, गौड़ गुलाबाप्रमाणे तर उदयपूरचे राणे केतकी पुष्पाप्रमाणे आहेत.
पवार पांढरीच्या फूलासारखे तर चंदावताचे राजे जुईच्या फूलाप्रमाणे, बुंदेले चमेलीसारखे,
बडगुजर मुचकुंद फुलाप्रमाणे तर बघेले वसंतकाली फुलणार्‍या सर्व पुष्प समुहाप्रमाणे आहेत.
औरंगजेब हा भूंगा आहे. भूंगा जसा फूलाफूलातून मध गोळा करतो तसा औरंगजेब या सगळया राजांकडून कर गोळा करतो.
पण शिवराय चंपकपुष्पाप्रमाणे आहेत की ज्याच्या वाटेला भुंगा(औरंगजेब) कधीही जात नाही.

श्रेष्ठ मराठी कादंबर्‍या

मराठीतील काही श्रेष्ठ कादंबर्‍याची माहिती कुणी देउ शकेल काय?
जसे--
पडघवली-गोनीदा
तुंबाडचे खोत- श्री. ना. पेंडसे
मुखवटा-अरुण साधू
ययाती- वि. स. खांडेकर

----
(वाचनप्रेमी) वल्ली

ठाकरे आणि पवार नाकर्ते राजकारणी - पुष्पा भावे यांचे मत

आयबीएन लोकमतवर निखील वागळेंनी घेतलेल्या मुलाखतीत पुष्पा भावेंचे बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार या महाराष्ट्रातील दोन बुजुर्ग राजकारण्यांविषयीचे सडेतोड विचार ऐकले / पाहिले. त्यांच्या मते:
१. बाळासाहेब ठाकर्‍यांनी गेली चाळीस वर्षे मराठी मनाचे ब्लॅकमेलिंग यापलीकडे काहीही केले नाही. मराठी माणसाला 'तू पीडीत आहेस, तुझ्यावर अन्याय होतो आहे' असे ब्रेनवॉशिंग शिवसेनेने केले, पण प्रत्यक्षात मराठी माणसाला पुढे आणण्यासाठी ठोस असे काहीही शिवसेनेने, आणि विशेषतः बाळासाहेब ठाकर्‍यांनी केले नाही. ज्या दादर बांद्र्यात शिवसेनेनेने मराठी माणसाला उचलून धरल्याचा दावा केला, त्या भागात अमराठी दुकानांची आजची संख्या चाळीस वर्षांपूर्वीच्या संख्येपेक्षा अधिक आहे.
२. गेल्या चाळीस वर्षात महाराष्ट्रातील सांस्कृतिक र्‍हासाचे प्रमुख कारण म्हणजे शिवसेना. शिवसेनेनेने अर्वाच्च, गलिच्छ आणि शिवराळ भाषेचे उदात्तीकरण केले. कायदा धाब्यावर बसवण्याचा राजरोसपणा शिवसेनेने महाराष्टाच्या राजकारणात आणला. 'सामना' मधील कित्येक उतार्‍यांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते, पण बाळासाहेब ठाकर्‍यांना अटक करणारा माईका लाल अजून जन्माला यायचा आहे, ही मस्तवाल भाषा आणि गुर्मी शिवसेनेने महाराष्ट्रात प्रथम सुरु केली.
३. शिवसेनेचे मराठी कैवाराचे धोरण स्वतःला सोयीस्कर आणि धरसोडीचे आहे. मुंबईत मराठी माध्यमातून सुरु झालेल्या काही महाविद्यालयीन अभ्यासक्रमांना पहिला विरोध शिवसेनेचा होता.
४. शरद पवार शिवसेनेची ताकद ओळखण्यात अपयशी ठरले. शिवसेनेला ताब्यात ठेवणे त्यांना शक्य असूनही त्यांनी (कदाचित काही वेगळी राजकीय समीकरणे डोक्यात असल्याने) ते केले नाही. त्यांच्या जेंव्हा ते ध्यानात आले, तेंव्हा फार उशीर झाला होता.
५. 'एक सुसंस्कृत राजकारणी' ही शरद पवारांची ओळख फारशी खरी नाही. इतर काँग्रेस नेत्यांच्या मानाने त्यातल्या त्यात मवाळ भाषा व काही साहित्यीक वर्तुळांत उठबस एवढा फरक सोडला तर शरद पवार आणि इतर काँग्रेसचे नेते यांच्यात काही फरक नाही. 'यशवंतराव चव्हाणांनंतरचा महाराष्ट्रातला द्रष्टा नेता' हे शरद पवारांचे वर्णन निरर्थक आहे.
६. राज ठाकरेंना मिळणारा प्रतिसाद ही चाळीस वर्षे शिवसेनेत राहून भ्रमनिरास झालेल्यांची प्रतिक्रिया आहे. राज ठाकरेही बाळासाहेब ठाकर्‍यांप्रमाणेच उथळ आणि सवंग वक्तृत्व या एकाच अस्त्रावर लोकप्रिय होताहेत. फरक इतकाच वाटतो, की त्यांच्या मागे जाणारे आता चाळीस वर्षे थांबणारा नाहीत. ते लवकर हिशेब मागतील.
शिवसेनेने ज्यांची ज्यांची कल्हई केली त्यांना सोन्याचे दिवस आले, असे इतिहास सांगतो. भुजबळ राणेंपासून सचिन तेंडुलकरांपर्यंतची उदाहरणे आहेत. पुष्पा भावे या तर फार पूर्वीपासून शिवसेनेच्या हिटलिस्टवर असणार्‍या. त्यांना बाळासाहेब ठाकर्‍यांनी ज्याला 'खास ठाकरी भाषा' असे कौतुकाने म्हटले जाते त्या भाषेत 'हडळ' वगैरे म्हणून घेतले आहे. पुष्पा भावेंच्या या मुलाखतीत ठाकरेंबद्दलचा राग (मला तरी) दिसला नाही. दिसली ती फक्त दया. मरणासन्न अवस्थेतल्या, दात आणि नखे झडून गेलेल्या आणि तरीही सोन्याचा पिंजरा सोडू न शकणार्‍या वाघाकडे बघताना वाटावी अशी दया.

कवि भुषण यान्ची शिवाजी महाराजान्वरील कविता

इंद्र जिमी जृंभ पर
बाडव सअंभ पर
रावण सदंभ पर
रघुकुलराज है।

पवन बारिबाह पर
संभु रतिनाह पर
ज्यो सहसबाह पर
राम द्विजराज है।

दावा द्रुमदंड पर
चीता मृगझुंड पर
भूषण वितुंड पर
जैसे मृगराज है।

तेज तमअंस पर
कन्ह जिमि कंस पर
त्यो म्लेंछ बंस पर
शेर शिवराज है

अर्थ :

जंभासुर नावाच्या राक्षसाचा ज्याप्रमाणे इंद्राने वध केला, समुद्रावर जसा वडवाग्नी कोसळतो, गर्विष्ठ रावणाचा जसा रघुकुलराज रामचंद्राने नाश केला,
वादळ ज्याप्रमाणे मेघांचा नाश करते, मदनाचा ज्याप्रमाणे शंकराने, सहस्त्रार्जुनाचा ज्याप्रमाणे परशुरामाने संहार केला
दावाग्नी ज्याप्रमाणे वृक्षांचा नाश करतो, हरिणांच्या कळपावर चित्ता ज्याप्रमाणे तुटून पडतो, सिंह ज्याप्रमाणे हत्ती च्या सोंडे वर तुटून पडतो.
प्रकाश जसा अंधाराचा नाश करतो, कृष्णाने जसा कंसाचा वध केला त्याचप्रमाणे शिवराजा म्लेंच्छांचा नाश करतो

भारतीय महिलांविषयीचे विनोद

आमच्या परिचयातील एक समाजशास्त्रज्ञ विदुषी भारतीय महिलांविषयीच्या विनोदांचे संकलन करीत आहेत. आपल्या ऐकिवात आलेल्या अथवा आपल्या प्रतिभेतून स्रवलेल्या अशा विनोदांस कॄपया या धाग्यावर प्रसिध्दी द्यावी. ते करताना खालील मुद्दे लक्षात घ्यावेत.

  • आपल्या मते विनोद चांगला असावा.
  • विनोदातील विनोदनिर्मितीचे मूळ भारतीय महिलांचे 'भारतीय' असणे आणि 'महिला' असणे याच्याशी संबंधित असावे.
  • विशुध्द ज्ञानार्जनात श्लील/अश्लील असे काही नसते. त्यामुळे उपरोल्लेखित विदुषी स्वतः एक स्त्री असूनही त्यांना कोणत्याही प्रकारच्या विनोदाचे वावडे नाही. त्यातील काही या संस्थळाच्या धोरणात न बसणारे असू शकतील. आपला विनोद तसा असू शकेल, असे वाटल्यास तो या धाग्यावर न देता आम्हांस व्यक्तिगत निरोपाद्वारे पाठवावा, ही विनंती.
  • विशुध्द ज्ञानार्जनात भावना भडकणे अभिप्रेत नसते. त्यामुळे उपरोल्लेखित विदुषी स्वतः एक संवेदनशील व सुजाण स्त्री असूनही त्यांना सर्व प्रकारच्या जातीय, प्रांतिक, लैंगिक, धार्मिक आणि इतरही अस्मितांचे दर्शन घडवणार्‍या विनोदांचेही वावडे नाही. त्यातील काही या संस्थळाच्या धोरणात न बसणारे असू शकतील. आपला विनोद तसा असू शकेल, असे वाटल्यास तो या धाग्यावर न देता आम्हांस व्यक्तिगत निरोपाद्वारे पाठवावा, ही विनंती.

एखाद्या समाजात एखाद्या समाजघटकाविषयी उत्पन्न होणारे विनोद हा समाजशास्त्रीय संशोधनाचा एक भाग असतो, याविषयी काही शंका असल्यास विनोदांवरील हा निबंध वाचावा. त्याउप्पर काही शंका असल्यास त्या आम्हांस विचाराव्या.

धन्यवाद,
चिंतातुर जंतू

कवितेची पाककृती २: सदाबहार प्रेमगीते

कवितेची पाककृती २: सदाबहार प्रेमगीते

कवितेची पाककृती १: जीवनदर्शी आशासूक्ते

कथा कशा असतात? महाभारतासारख्या सगळंच भरताड असलेल्या, भरकटलेल्या कथा सोडल्या तर मुळात त्या अगदी सोप्या असतात. (कवितक प्रमाणे कथक लिहिण्याची सुद्धा आमची मनीषा आहे...) एक तरुण एका तरुणीच्या प्रेमात पडतो. मग पागल होऊन प्यार मुहब्बतची गाणी म्हणतो. ती सुरूवातीला त्याला प्रतिसाद देत नाही, किंवा नकार देते. (मुलं लाईन मारतात व मुली लाईन देतात - फार क्वचित... अशी कोणीतरी 'टाकलेली लाईन' एका 'प्रतिसादात' वाचली होती.) मग तो पुन्हा पागल होऊन प्रेमभंगाची दर्दभरी गाणी म्हणतो. मग अचानक काहीतरी शौर्याचं काम करून तिचं आर.पी (हृदय परिवर्तन - ते एच.पी. असलं तरी तसं म्हणण्याची परंपरा आहे) करतो. मग ते दोघं मिळून मुहब्बतीची गाणी म्हणतात. पुन्हा काहीतरी मध्येच त्या मुहब्बतवर संकटं येतात. त्यांचं निवारण करून ते सुखाने शेवटपर्यंत जगतात. गोष्ट संपल्यासारखे.

पण खर्‍या गोष्टी इथे संपत नाहीत हे आपल्या सर्वांना माहीत असतं. राजाराणीच्या जीवनात ते एकत्र आले की त्या दोघांपेक्षाही मोठं काहीतरी तयार होतं - ते म्हणजे नातं. खरं तर आधीचे सर्व प्रसंग हे देखील त्या एकाच नात्याचे वेगवेगळ्या वेळचे वयाचे आविष्कारच आहेत असं म्हणायला हरकत नाही. अल्लड वयातली नाती ही लहानग्या - नवजात बालकाच्या कुल्ल्याप्रमाणे मऊ, कोमल, निरागस... तारुण्यात, ऐन बहरात आकर्षक भरीव नितंब होतात तर नंतर फार वाढून थोराड झालेल्या ढुंगणांसारखे. अशा या विविध रूपांवर केव्हा ना केव्हा आपल्याला एखाद्या कवितेचं सुंदर वस्त्र चढवावंसं वाटतंच. ते वस्त्र म्हणजे कधी गोंडस गुबगुबीत प्राण्यांची चित्रं असलेला, डायपर कधी असतो. किंवा कधी लेसची नक्षी घट्ट रुतवून अंग अंग शृंगारीत करणारी व्हिक्टोरिया सीक्रेटमधली पॅंटीसारखी सटीनदार कविता चढवावीशी (आणि मग हलकेच उतरवावीशी) वाटत असेल. अगदीच काही नाहीतर सगळं झाकून दिसेनासं करणारी, नात्याच्या गहन चर्चेची - जुन्यापुराण्या वादांच्या नाड्यांच्या गाठी असलेली - चट्टेरीपट्टेरी लांब कुलकर्णी बर्मुडा कविता घालायची सर्वांवरच पाळी येते. प्रेमभंगाची लाथ बसून त्याचं शेकलेलं स्वरूप पुन्हा पूर्ववत करण्यासाठी मलमासारखी किंवा जळफळाटाची आग बाहेर टाकणारी (फारच ताणली बुवा प्रतिमा, आता लवकर आवरा) कवितासुद्धा खूप डीमांडमध्ये आहे. इतकं असलं तरी मागच्या लेखात मांडलेल्या गृहिणी-गृहस्थांच्या अल्पोपाहाराच्या प्रश्नांइतकेच नव्या तरुणाईचे आणि मध्यमवयीनाईचे हे नात्याचे प्रश्न तितकेच गहन आणि तितकेच अनुत्तरीत आहेत.

पहिल्या भागात दिलेल्या मेदूवड्याच्या, झटपट डोशाच्या कृती या सार्वजनिक वाटपासाठी होत्या. कोणालाही सहज भिडावेत, आणि डोळ्यात पाणी टचकन आणून चटकन दोन मीटिंग्जच्या मधल्या पाच मिनिटात वाचतावाचता फाड फाड फेकाटे स्टाईल जीवनाविषयी अर्थबोध देऊन जावेत अशा. आज काय केलं, तर प्लास्टीक सर्जरी दाखवून बॉसला मनात शिव्या घातल्या (दुर्दैवाने त्याच्याकडे दुर्लक्ष नाही करता आलं नाहीतर अकरा अक्षरी शिवी हाणता आली असती...) आणि काय केलं - सहकाऱ्यांची अगम्य भाषा ऐकून कानाचा खडखडाट करून घेतला व त्यांच्यातला कोण मॅनेजर होण्यासाठी दादागिरी करतोय, बॉसपुढे पुढेपुढे करतोय याचं विश्लेषण केलं. आणि हो, जाता जाता जीवनविषयक मूल्यं सुद्धा शिकले(लो) असं कोणालाही म्हणता यावं अशा. नात्याच्या कविता थोड्या वेगळ्या असतात. त्यांची मूळं वेगळी असतात. त्यांचा लक्ष्य दर्शक (टार्गेट आडयन्स) वेगळा असतो. त्यांचे उपयोग वेगळे असतात. एका अर्थाने तो जीवन वगैरेचा पोटभाग आहे, त्यामुळे त्यावर नातं म्हणजे काय असतं टाईप कविता करता येतात हे आपण गेल्या भागात बघितलंच. नात्याची व्याप्ती अजून जास्त असते. त्यांच्यासाठी हृदयाचा एक वेगळाच कोपरा ठेवलेला असतो. काही चतुर व्यक्ती दोन तीन वेगळे कप्पे करतात व त्यात वेगवेगळ्या व्यक्तींना ठेवतात. (कोलटकरांच्या 'तक्ता' या कवितेचा अर्थ या अंगानेही घेता येईल का? 'जोपर्यंत त्या कप्प्यांच्या चौकटी तुटत नाहीत तोपर्यंत मांजरीला लांडोरीवर झेप घेऊन तिला बोचकारायची व नंतर दोघींनी मिळून क्षत्रियाला उखळीत घालून कांडण्याची काहीच गरज नाही.' अधिक माहितीसाठी पाहा मूळ कविता, व तीखालील प्रतिसादात लावलेला कोता अर्थ). पण मुख्य फरक म्हणजे तो दोन व्यक्तींमधला संवाद असतो.

जग आता अधिकाधिक क्लिष्ट होत चाललेलं आहे. नव्या जाणीवा, नवी स्वातंत्र्यं, नवे आयडीज यामुळे नात्यांच्या प्रतिमा बदललेल्या आहेत. अपेक्षा बदललेल्या आहेत. पुरुषप्रधान संस्कृतीच्या नाकावर टिच्चून मनू वगैरेला न जुमानता स्त्रियांनी स्वातंत्र्य मिळवलं. 'न स्त्री स्वातंत्र्यं अर्हति' - ला 'अनलेस शी पगारं अर्नति' ची पळवाट लावून प्रधान-पुरुषांनीही आपल्या नाकांवर टिच्चून घेतलं. त्यात मुतालिक वगैरेंच्या नाकावर टिच्चून संत व्हॅलेटाईनचा दिवस पाळणं सुद्धा आल. त्यामुळे कलाक्षेत्रात इतका आमूलाग्र बदल झाला की विचारता सोय नाही. एके काळी ही सगळी काव्यं म्हणजे स्त्रियांचं, पुरुषांनी, पुरुषांसाठी केलेलं वर्णन या स्वरूपाची असायची. उत्तम शरीरयष्टी असलेल्या पुरुषांचं वर्णन बायकांना ऐकायला मिळायचं ते हनुमान वगैरेंचंच. (म्हणूनच बहुधा त्याला वानर केला, आणि तितकं पुरेनासं झालं म्हणून की काय ब्रह्मचारीही केला. मग मगरीच्या पोटात घामाचे थेंब वगैरे त्यातूनच आलं.) पुढे जसजसा स्वातंत्र्याचा परीघ विस्तारला तसतसे ह्या तीन भूमिकांमध्ये सरमिसळ व्हायला लागली - पण बराच काळ पहिली आणि तिसरी ही विरुद्धच राहिली. मग गेल्या दशकांत खूपच विस्तारला तेव्हा शेवटी आठही पर्म्युटेशनं शक्य झाली. ही चावट, वात्रट वर्णनं लोकं मोठ्या चवीने एकांतात वगैरे वाचायचे. 'यमुनाजळी खेळू खेळ कन्हैया का, लाजता?' हे गाणं आता लहान मुलांनासुद्धा पोरकट वाटेल. असो, खूप बदल झालाय वगैरे वगैरे. आम्ही आमच्या लेखनिक प्रणालीने सांगितलेला सगळा मसाला लेखात टाकून झाला. आता कवितक प्रणालीमध्ये वापरात असलेल्या प्रेमगीतांच्या प्रत्यक्ष कृतीकडे वळूया.

प्रेमकाव्य १: मी तुझ्या प्रेमात आहे मला लाईन दे.
प्रेमकाव्य २: मी पण तुझ्या प्रेमात आहे, ही घे लाईन. (जवळपास नाहीच...)
प्रेमकाव्य ३: मी/आपण दोघं प्रेमात आहोत, कित्ती कित्ती छान.
विरही/प्रेमभंगी काव्य : (मालक चुकीचा शब्द तर वापरला नाही ना?) तू नाहीस/ माझ्या भावनांचा चुराडा झाला/तू केलास, आता जीवन व्यर्थ आहे.

याचा फार्म्युला असा येतो : मी/आपण - तू/आपण - प्रेम आहे/नाही. त्यामुळे/तेव्हापासून जग/आयुष्य सुंदर/असह्य आहे.

बस्. इतका सोपा आहे. गेल्यावेळी आपण क्ष हे य असतं, त्यामुळे ते व सारखं क करायचं असतं असं सूत्र बघितलं. या कवितेचं सूत्रदेखील तसंच आहे, थोडंसं वेगळं.

क्ष१ जेव्हा व१ क१ झालं तेव्हा क्ष२ व२ क२ झालं. [झालंच्या ऐवजी होतं, असतं; जेव्हा-तेव्हाच्या जागा बदलणं, वेगवेगळी पादपूरकं वापरणे हे एव्हाना तुम्हाला माहीतच असेल]

क्ष१ बहुतेक वेळा तू, मी, आपण, हृदय घ्यावे लागतात. ते दोघांमधल्या संवादाचे, संबंधांचे शब्दही (स्पर्श, प्रेमाची नजर, भावना) असू शकतात. क१ हे वाट पहाणं, दिसणं, भेटणं, हसणं, प्रेमात पडणं, एकत्र असणं, अव्हेरणं, नाकारणं, झिडकारणं अशा नात्यांमध्ये करण्याच्या गोष्टी असतात. क्ष आणि क मध्ये कधीकधी सरमिसळ होऊ शकते, कारण क्रियापद हे नाम म्हणून येऊ शकतं. व१ हे अर्थातच या दोनशी मिळतंजुळतं विशेषण, किंवा जोडणारा शब्द.
क्ष२ साधारणपणे निसर्गातल्या (चंद्र पाऊस, सकाळ, पानं), कलेतल्या (स्वर, नाद, गीत, संगीत, शब्द, अर्थ वगैरे) सुंदर गोष्टी किंवा मन, अंग, मी. क२ हे खूप महत्त्वाचं असतं. त्यात सगळ्या काव्याचा अर्क आहे. हे नादचित्रमय क्रियापद असलं पाहिजे. झंकारणे, मोहरणे, लाजणे, रोमांचणे, उजळणे हे नेहेमीचेच यशस्वी शब्द आहेत. व२ हे अर्थातच तसंच महत्त्वाचं होतं. खूप वेळा धुंद, गोजिरे, भावूक, गहिरे, असे शब्द वापरून निभतं. जर विरहिणी, प्रेमभंगी कविता करायची असतील तर झाकोळणे, विझणे, अंधारणे वगैरे क्रियापदं आणि उजाड, वैराण, कोमजलेले वगैरे शुष्क शब्द घ्यावे.

आता तुम्ही म्हणाल की याच्यात यमकी शब्द कुठे आहेत? एव्हाना तुमच्यापैकी बऱ्याच जणांना लक्षात आलं असेल की क्ष, व, क हेच य च्या जागी येऊ शकतात. क्रियापदं विशेषत: यमक साधायला खूपच उपयुक्त पडतात. किंवा एकच पादपूरक जेव्हा, तेव्हा हेही यच्या जागी वापरता येतात. या सर्व गोष्टींचा सराव करा. मी दोन कडवी लिहून दाखवतो...

क्ष१, व१, क१ = तू, मनात, येणे, क्ष२, व२, क२ = स्वप्न, गोजिरे, खुलणे
क्ष१, व१, क१ = तू, समोर, दिसणे, क्ष२, व२, क२ = फूल, धुंद, बहरणे

शिरतेस मन्मनी तू जेव्हा
जणु स्वप्न गोजिरे खुलते

दिसतेस समोरी तू जेव्हा
मनि फूल धुंद बहरते

क्ष१, व१, क१ = स्पर्श, तन, भिरभिरणे, क्ष२, व२, क२ = घन, शरीरी, ओथंबणे
क्ष१, व१, क१ = आलिंगन, वेड, लावणे, क्ष२, व२, क२ = पाऊस, जमिनीवर, पडणे

यापासून

स्पर्श तुझा तनि भिरभिरतो
घन ओथंबुन ये मज शरिरी

आलिंगन तव वेड भरी
जणु पाउस पडतो उष्ण धरी

काही पादपूरकं बदलली आहेत हे लक्षात आलं असेलच. यातसुद्धा दोन गोष्टी नोंदण्यासारख्या आहेत. एक म्हणजे यमक फक्त प्रत्येक कडव्याच्या दुसऱ्या ओळीशी साधलं आहे.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिल्या कडव्यात स्पर्श आहे, दुसऱ्या कडव्यात मिठी आहे. जर आधीच्या कडव्यांमध्ये आठवण, दृष्टी, हास्य असे क्ष वापरत गेलेले असले तर कवितेला एक खोली येते. घन ओथंबणं व सर पडणं हे एकामागोमाग आल्यानेही एक सहजता, अनिवार्यता येते. ते नुसतं तांत्रिक काव्य राहात नाही. हे दुर्दैवाने अजून तरी कवितक मध्ये घेता आलेलं नाही. प्रयत्न चालू आहेत. कविता आणखी चांगली करण्यासाठी चौथी ओळ - 'जणु सर वळवाची तप्त धरी' अशी केली तर जास्त खुलते.

कविता जास्त गहन अर्थाची करायची असेल तर हे काव्य प्रियाला उद्देशून म्हटलंय की देवाला यात थोडीशी संदिग्धता ठेवावी. त्यासाठी मी तुझ्या मीलनाची वाट बघते. तू कधी बरं येशील? आपल्या आत्म्याचं मीलन कधी होईल? तू मला केव्हा जवळ घेशील? असे प्रश्न टाकावे. मीरेने हेच केलेलं होतं.

आता जरा एक कठीण तंत्र दाखवतो. (तंत्र दाखवण्यासाठी मी आत्ता यमकाकडे दुर्लक्ष करतो आहे)

आपण एकत्र असताना
चंद्र आकाशी उजळतो
रात्र काळी झळकते
स्वप्न डोळ्यात उगवते
जगण्यात धुंदी भरते

एकच पहिलं वाक्य घेऊन दुसरी चार वाक्यं घेतली आहेत. याच्यातून विरहिणी करायची तर सरळसरळ विरुद्ध करावं.

तू जेव्हा नसतेस
चंद्रही उजाड दिसतो
रात्र अंधारी एकाकी
स्वप्न मावळून जाते
जगण्यातली धुंदी संपते

खऱ्या कवीची प्रतिभा अशी की विरह नसताना, बाकी सर्व असताना नातं मेलेलं असू शकतं हे जाणणं. या मरण्यात जी शोकांतिका आहे ती शमा-परवाना स्टाईल विरहात नाही. हे तंत्राच्या पलिकडचं आहे. त्यामुळे कवितक मधून त्याची अपेक्षा करू नका. हा विचार एकदा सुचला की व्यक्त करण्यासाठी तंत्र वापरता येतं.

चंद्र आकाशी उजळतो आहे
रात्र काळी झळकते आहे
तू माझ्याबरोबर आहेस
पण ते स्वप्न कुठे गेलं?
ती धुंदी कुठे गेली?

ओळखीचं वाटतंय?

असो. एकदम कठीण तंत्रांची ओळख करून देऊन तुम्हाला दडपून टाकायचं हा हेतू नाही. हा लेख आधीच खूप मोठा झाला त्यामुळे नात्यांच्या घनगंभीर कवितांसाठी बिनतरुणाईला व मध्यमवयीनाईला पुढच्या लेखाची वाट पहायला लागेल. पण तोपर्यंत कविता लिहायची वाट बघू नका. प्रेमकाव्य म्हणजे काय फक्त व्हॅलेंटाईनच्या दिवशीच करायचं का? तुमचे क्ष, य, व, क निवडा आणि एक सुंदर प्रेमगीत बनवा. डकवा. तुमच्या प्रियकर/प्रेयसीला दाखवा... तंत्राची चर्चा करण्याची गरज पडणारच नाही असं वाटतं.

आभार/उल्लेख : प्लास्टीक सर्जरी - टारझन; सहकारी - शुचि; अकरा अक्षरी शिवी - बिपिन कार्यकर्ते; कुलकर्णी बर्मुडा, लाईन टाकणे - कोणीतरी माहीत/लक्षात नसलेला मिपाकर

जीवनाश्यक गोष्टी..

राम राम मंडळी,

येथे आपापल्या जीवनावश्यक गोष्टींची यादी प्रत्येकाने देणे अपेक्षित आहे..

माझ्यापासून सुरवात करतो. आपणही अवश्य सांगा -

मधुबाला, लता, किशोरदा, यमन, भीमण्णा, बाबूजी, पुलं, कुसुमाग्रज, सचिनदा, पंचमदा, शोले, हृषिदा, गुलजार, मदनमोहन, मिसळ, मासळीचं जेवण, श्रीखंड, पान-चुना-तंबाखू...

या माझ्याकरता जीवनावश्यक गोष्टी आहेत..

आपल्याही अवश्य सांगा.. Smile

सर्वांना होलिकोत्सवाच्या शुभेच्छा!

तात्या.

'मराठी भाषा दिनाच्या' शुभेच्छा!

आज २७ फेब्रुवारी. वि.वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिन म्हणजेच आपला मराठी भाषा दिन.

तमाम मराठी बांधवांना 'मिसळपाव' परिवाराकडून 'मराठी भाषा दिनाच्या' शुभेच्छा!