गीतारहस्य चिंतन-प्रकरण ७ कपिलसंख्याशास्त्र किंवा क्षराक्षरविचार

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
17 Jun 2025 - 4:49 pm

गीतारहस्य-७

कपिलसंख्याशास्त्र किंवा क्षराक्षरविचार

वेदांतींनी कणाद यांच्या परमाणु' सिद्‌धांताऐवजी कपिलाचार्यांचा सांख्य सिद्‌धांताला अद्वैत सिद्‌धांत न सोडिता बऱ्याच अंशी ग्राह्य धरले आहे.

सांख्य शब्दाचा अर्थ-

१.सांख्य हा शब्द सं-ख्या धातूपासून निघाला असल्यामुळे त्याचा पहिला अर्थ मोजणारा असा होतो. कपिलशास्त्रांतील मूलतत्वे 'पंचवीस' असल्यामुळे त्यांस 'मोजणारे' या अर्थी सांख्य विशिष्ट नाव मिळाले.

२.नंतर सांख्य म्हणजे सामान्यतः तत्त्वज्ञान (सर्व प्रकारचे)
असा व्यापक अर्थ बनला.

३.ईश्वरकृष्णाचा (इ.स. २४०] सांख्यकारिका ग्रंथच
सांख्य सिद्‌धांतासाठी अतिप्राचीन दस्तावेज आहे. शुद्ध कपिलसांख्यमत कोणते ठरविण्यासाठी ग्रंथच उपलब्ध नाही. पण गीतेत सि‌द्धानां कपिलो मुनिः [गी-१०.२६] - सिद्‌धांपैकी कपिलमुनि मी आहे हे भगवंतांनी गीतेत म्हटले, यावरून कपिल यांची योग्यता उघड होते.

पहिला सिद्‌धांत

-जगात नवें असे काहींच उत्पन्न होत नाही, कारण शून्य म्हणजे पूर्वी जे नव्हतेच त्यापासून शून्याखेरीज दुसरे काहींच निष्पन्न होणे शक्य नाही, म्हणून उत्पन्न झालेल्या वस्तूत म्हणजे कार्यात जे गुण दृष्टीस पडलात, ते ज्यापासून सुंदर वस्तु उत्पन्न झाली त्यांत म्हणजे सूक्ष्म रुपाने तरी असलेच पाहिजेत, असे समजले जाते. उदा-दह्यापासून दही तयार होते, तर केवळ पाण्यापासून का नाही?
२.#सत्कार्यवाद - पदार्थातील जड द्रव्ये व कर्मशक्ति यांनेहमी कायम असतात व कोणत्याहि पदार्थाची कितीही रुपांतरे झाली, तरी अखेरीस सृष्टीतील एकंदर द्रव्यांशाची व कर्मशक्तीची बेरीज नेहमी एकसारखीच असते, मूळ प्रकार त्या पदार्थात असतेच.

दिवा जळला की तेल नाश न पावता काजळी, धूर किंवा इतर सूक्ष्म द्रव्ये यांच्या रुपाने ते अस्तित्वात असतात.

वेदांतानुसार हा सिद्‌धांत निर्गुणापासून सगुण कमे निर्माण झाले हे सांगू शकत नाही.

#दुसरा सि‌द्धांत - प्रकृति-पुरुष (द्वैतावाद)
जगातील या निरनिराळ्या पदार्थाचे जे मूलभूत द्रव्य
त्यास सांख्यशास्त्रोत 'प्रकृति' म्हणतात. प्रकृति याचा अर्थ मूळचे असून या प्रकृतीपासून पुढे होणाऱ्या पदार्थास विकृति किंवा मूलभूल द्रव्याचे विकार असे
नाव आहे

प्रकृतिचे गुण वर्ग

पदार्थमात्रांच्या गुणांचे प्रथम निरीक्षण करून त्या गुणांचेच सांख्यांनी सत्त्व, रज व तम असे तीन वर्ग केले' जे प्रकृतित प्रारंभीपासून आहेत.

पूर्वी या तिन्ही गुणांच्यापैकी प्रत्येकाचा जोर आरंभी सारखाच असल्यामुळे प्रथमतः प्रकृति साम्यावस्थेत असते.
-या तीन गुणांच्यापैकी प्रत्येकाचा जोर आरंभी सारखाच असल्यामुळे प्रथमतः प्रकृति साम्यावस्थेत असते. ही साम्यावस्था जगाच्या आरंभीं होती, व जगाचा लय झाला म्हणजे पुनः होईल. साम्यावस्थेत काहीं हालचाल नाही, सर्व स्तब्ध असते. पण पुढे हे तीन गुण कमीजास्त होऊ लागले म्हणजे प्रवृत्त्यात्मक रजोगुणामुळे मूळ असतां त्यांत कमीजास्तपणा कसा उत्पन्न होतो, अशी येथे एक शंका येते. पण त्यास सांख्यांचे उत्तर एवढेच आहे की, हा प्रकृतीच्या तीन गुणांपैकी ज्ञान किंवा जाणीवपणा हे सत्त्वाचे लक्षण आहे. अज्ञान किंवा नेणीवपणा हा तमाचा धर्म काहीतर जारी हा प्रवर्तक म्हणजे बच्या किंवा बाईट कार्याला प्रवृत करणारा आहे| हे तिन्ही गुण कधीहि निरनिराळे असू शकत नाहीत. सर्व पदार्थात सत्त्व, रज आणि तम या तिहींचेहि मिश्रण आहे, आणि हे मिश्रण नेहमी तिहींच्या बन्योन्य कमीजास्त प्रमाणाने होत असल्यामुळे मूळ द्रव्य एक असले तरी गुणभेदानें एका मूळ द्रव्याचेच सोनें, लोखंड, माती, पाणी, आकाश, मनुष्याचे शरीर इत्यादि निरनिराळे विकार होत असतात. ज्याला आपण सात्त्विक गुणाचा पदार्थ म्हणतों, त्यांत रज आणि तम या दोन गुणांपेक्षां सत्त्वाचा जोर किंवा प्रमाण अधिक असल्यामुळे त्यांत नेहमी असणारे रज आणि तम हे गुण दबले जाऊन आपल्या दृष्टीस पडत नाहींत इतकेच. बाकी वस्तुतः पहातां, सत्त्व, रज आणि तम हे तिन्ही गुण इतर पदार्थांप्रमाणेंच सात्त्विक पदार्थातहि आहेत असें समजलें पाहिजे. निव्वळ सत्त्वगुणी, निव्वळ रजोगुणी किंवा निव्वळ तमोगुणी असा पदार्थच नाहीं. प्रत्येक पदार्थात तिन्ही गुणांची झटपट चाललेली असते, आणि या झटापटींत जो गुण प्रबल होतो त्याप्रमाणें प्रत्येक पदार्थ सात्विक, राजस आणि तामस आहे, असे आपण म्हणतों (सां. का. १२. मभा. अश्व. अनुगीता ३६ व शां. ३०५ पहा). उदाहरणार्थ, आपल्या शरीरामध्यें रज आणि तम या दोहोंबरोबर सत्त्वाचा पगडा बसला म्हणजे आपल्या देहांत ज्ञान उत्पन्न होऊन खरें काय आहे तें दिसूं लागतें, आणि चित्तवृत्ति शांत होते. या वेळी शरीरांत रज व तम हे गुण बिलकुल नसतात असें नाहीं, तर ते दबून गेले असल्यामुळे त्यांचा जोर चालत नाहीं (गी. १४. १०). सत्त्वाऐवजीं रजोगुण जर प्रबल झाला तर मनुष्याच्या शरीरांत लोभ जागृत होऊन त्याला हांव उत्पन्न होते व तो अनेक कृत्यें करण्यास प्रवृत्त होतो. तसेंच सत्त्व व रज या दोहोंवर तमाचा पगडा बसला म्हणजे निद्रा, आळस, स्मृतिभ्रंश वगैरे दोष शरीरांत उत्पन्न होतात. तात्पर्य, जगांतील पदार्थात सोनें, लोखंड, पारा इत्यादि जें नानात्व आहे तें प्रकृतीच्या सत्त्व, रज आणि तम या तीन गुणांच्या अन्योन्य लटपटींचे किंवा कमीजास्त प्रमाणाचें फळ आहे. मूळ प्रकृति एक असतांहि हैं नानात्व कसें उत्पन्न होतें, याचा जो विचार त्यास विज्ञान म्हणतात; व यांतच सर्व आधिभौतिक शास्त्रांचा समावेश होतो.

व्यक्त - प्रकृतिपासून निर्माण होणारे जे पदार्थ इंद्रियांना ज्ञात होतात, त्यांच्या आकृतीमुळे, रुपामुळे, वासामुळे वा अगर इतर
गुणांनी व्यक्त होतात.
त्यातील काही स्थूल - झाडे, दगड इ.
सूक्ष्म- मन, बु‌द्धी, आकाश इ.
काही पदार्थ सूक्ष्म असूनही अव्यक्तही आहे उदा-हवा.

"प्रकृतीमध्ये परमाणू वा अवयवभेद नसून ती सदैव एकाला एक लागून किंवा एकसारखी, खंड नसणारी अव्यक्त (इंद्रियांना न समजणारी) सर्वत्र निरंतर भरली आहे.

'त्रिगुणात्मक, अव्यक्त, स्वयंभू, एकजिनसी

सगुण वेदांतात चैतन्य रूप मात्र निर्गुण आहे, प्रकृतिप्रमाणे जड ‌नाही. याच प्रकृतीस वेदांतात '#माया' - मायिक देखावा म्हटले आहे.

अव्यक्तप्रकृतीपासूनस -बुद्‌धी, अहंकार वगैरे गुण उत्पन्न होतात.

पुरुष-
हा ज्ञाता प्रकृतीहून भिन्न असल्यामुळे निसर्गतः चलो सत्त्व, रज, तम या प्रकृतीच्या तीन गुणांपलीकडचा निर्गुण विकार व पावणारा आणि जाणणे व पहाणे याखेरीज काही न करणारा.

"प्रकृति अचेतन, पुरुष सचेतन
प्रकृति खटाटोप करणारी पुरुष उदासीन व अकर्ता प्रकृति त्रिगुणात्मक तर पुरुष निर्गुण
प्रकृति आंधळी तर पुरुष साक्षी"

प्रकृति पुरुषं चैव विद्धयनादी उभावपि मिी १३.१९
प्रकृति व पुरुष अनादि आहेत.

• कार्यकारणकतृत्त्वे हेतुः प्रकृतिरुच्यते पुरुषः सुखदुःखाना भोकृतृत्वे हेतुरुच्यते'

देह व इंद्रिये यांचे व्यापार प्रकृति करले, तर पुरुष सुख हा सुखदुःखांचा उपभोग घडण्यास कारण आहे.

प्रकृतिच्या ना ना रुपांना भुलून मोहाने वा वृथाभिमाने प्रकृतिचे हे कर्तृत्व पुरुष आपल्या अंगावर फुकट ओढून घेऊन 'या पाशांत गुंतून राहतो, तोवर न्याला मोक्ष मिळणार नाही

प्रकृति आणि मी पुरुष निराळा असे ज्ञान ज्या दिवशी होईल तेव्हा तो मुक्त होईल. तेव्हा प्रकृनिही त्याला भुलवू शकणार नाही. असापुरुष '#कैवल्यपद्' प्राप्त करेल

मोक्ष ही पुरुषाला बाहेरून प्राप्त होणारी निराळी अवस्था नाही किंवा पुरुषाच्या मूळच्या स्वाभात्विक स्थितीहून भिन्न अशी दुसरी स्थिती नाही.

पण सांख्यानुसार देह व इंद्रिये प्रकृतिचे विकार त्यास मरेपर्यंत सुटत नाही तसेच एकाच प्रकृतिला पाह‌णारे स्वतंत्र पुरुष मुळातच असंख्य आहेत त्यामुळे जीव वेगवेगळे भासतात.

तरी कैवल्यप्रद पुरुषाने ज्ञान घेतल्यामुळे त्या ज्ञानाने प्रकृतिमुळे सुख दुःख, अडचण होत नाही. तो उदासीन असतो. गी-१३ व्या अध्यायात प्रकृति-पुरुष हे सारे भेद सांगितले आहेत.
-संदर्भ - गीतारहस्य अथवा कर्मयोगशास्त्र
-बाळ गंगाधर टिळक

वाङ्मयआस्वादमाहितीसंदर्भ

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

19 Jun 2025 - 7:31 pm | प्रचेतस

उत्तम लिहिलंय.
सांख्यमताचा मूळ ग्रंथ अस्तित्वात नाही मात्र ते इतरत्र विखुरलेले आढळते. महाभारतात ते विस्ताराने येते. गीतेतील सांख्ययोगापेक्षाही सांख्यमताचे विस्तारपूर्वक वर्णन शांतिपर्वात येते. कपिलांना ऋषी न मानता सिद्ध मानले गेले आहे, म्हणजे सिद्धीने देवत्वाला पोहोचलेला. सांख्यमत वेदविरोधी असूनही वेदांनी किंवा उपनिषदांनी त्याचा धिक्कार केलेला दिसत नाही.

महाभारतात ते विस्ताराने येते. गीतेतील सांख्ययोगापेक्षाही सांख्यमताचे विस्तारपूर्वक वर्णन शांतिपर्वात येते.

गीतारहस्यातात तर पानोपानी महाभारतातील श्लोकांचे संदर्भ आहे.वाचायची इच्छा तर आहे,पण बापरे केवढे ते मोठमोठाले खंड!पण ज्याप्रमाणे गीता आणि ज्ञानेश्वरी अशक्यप्राय वाटणारे वाचन सततच्या प्रयत्नांनी सोपे वाटत आहे.त्याप्रमाणे मी महाभारतही नक्की वाचणार.इच्छा तिथे मार्ग _/\_

प्रचेतस's picture

20 Jun 2025 - 6:00 pm | प्रचेतस

नक्की वाचा, पण प्रचंड संयम लागतो. सोपे काम नक्कीच नव्हे, महाभारत जणू पाचवा वेदच आहे.

पण प्रचंड संयम लागतो
मोलाचा सल्ला,कायम ध्यानात ठेवेन _/\_