बैलपोळ्या निमित्ताने
आंतरजालावर bull आणि bull with hump शोधा.दोन्ही चित्रे मिळतील .मग समजते कि बैलांच्या उत्क्रांतीमध्ये वातावरणाचा खूप मोठा भाग आहे.
आंतरजालावर bull आणि bull with hump शोधा.दोन्ही चित्रे मिळतील .मग समजते कि बैलांच्या उत्क्रांतीमध्ये वातावरणाचा खूप मोठा भाग आहे.
गीतारहस्य -प्रकरण८
( पान क्र. १०२-११८)
**विश्वाची उभारणी व संहारणी
सांख्याप्रमाणे प्रकृति व पुरुष या स्वतंत्र मूलतत्वांचे स्वरूप म्हणजे प्रकृति पुरुषासमोर आपल्या गुणाचा जो बाजार मांडते त्यास मराठी कवींनी 'संसृतीचा पिंगा' तर ज्ञानेश्वर महाराज यांनी 'प्रकृतीची टांकसाळ 'असे म्हटले आहे.
गीतारहस्य-७
कपिलसंख्याशास्त्र किंवा क्षराक्षरविचार
वेदांतींनी कणाद यांच्या परमाणु' सिद्धांताऐवजी कपिलाचार्यांचा सांख्य सिद्धांताला अद्वैत सिद्धांत न सोडिता बऱ्याच अंशी ग्राह्य धरले आहे.
सांख्य शब्दाचा अर्थ-
१.सांख्य हा शब्द सं-ख्या धातूपासून निघाला असल्यामुळे त्याचा पहिला अर्थ मोजणारा असा होतो. कपिलशास्त्रांतील मूलतत्वे 'पंचवीस' असल्यामुळे त्यांस 'मोजणारे' या अर्थी सांख्य विशिष्ट नाव मिळाले.
२.नंतर सांख्य म्हणजे सामान्यतः तत्त्वज्ञान (सर्व प्रकारचे)
असा व्यापक अर्थ बनला.
साधारणतः सर्वांकडे जी समस्या सुरू होते तिच समस्या आमच्याकडे सुरू झाली आहे.
"१०-१२ वर्षांतील मुलांचा चिडचिडेपणा"
मुलांच्या बाबतीत आपण खुप गोष्टी ठरवल्या असतात.पण मुलांचे किंचित बंड चिडचिड वाढलेली दिसते.त्यात नोकरी करणारी आई म्हणजे मुलांच्या वाढीमध्ये तारेवरची कसरत ,अनेक अपराधी भावनेने ग्रस्त व्हायला होते.वरती समाजाकडून उठणारे बोटं तो तर वेगळाच विषय..
आधिदैवतपक्ष व #क्षेत्रक्षेत्रज्ञविचार
मनोदेवता
प्रेम, करुणा, धैर्य, परोपकार दया इ. मनोवृत्ति आपणांस कोणी दिल्या नसुन त्या निसर्गसिद्ध आहेत. पण मनोवृत्तित कोणती श्रेष्ठ हे न समजल्यास मनोदेवतेचे साहय होते. या मनोदेवतेची शक्ती सद्सद्विवेकबुद्धी आहे- -आधिदैवतपक्ष.
या सदविवेकबुद्धीसच इंग्रजीत conscience म्हणतात, आधिदैवत पक्ष म्हणजे Intituitionist school होय."
-वेदांतात या मनाचे वेद, स्मृति, शिष्टाचार, धृति, क्षमा हे धर्म मानले आहेत, मनाला शुद्ध वाटेल लेच करावे.
माझा साक्षात्कारी हृदयरोग
डॉ. अभय बंग
शोधग्राम, गडचिरोली येथील प्रसिद्ध सामाजिक नेते डॉ अभय बंग यांनी त्यांच्या हृदयरोगावर कशाप्रकारे काम करत यशस्वीपणे हा आजार दूर केला याबाबतचे 'माझा साक्षात्कारी हृदयरोग' हे पुस्तक आहे, जे अनेकांना प्रेरणा देणारे आहे.
तत्वज्ञान अनुत्तर भिषक्को भगवान बुद्ध आणि अन्य प्रज्ञावंत हे संशोधक डॉ .बी. आर जोशी अगदीच छोटेखानी पुस्तक वाचले. भारतीय तत्त्वज्ञान परंपरांपैकी एकाही तत्त्वज्ञानाचा परिपूर्ण अभ्यास करण्यासाठी जन्म पुरेसा नाही, हे पुन्हा पटले.
सुखदुःखविवेक -भाग-१
#सुखाचीव्याख्या/सुखाची संज्ञा अनेक प्रकारे सांगता येत असली तरी सुख हे दुःखाशीच निगडीत अधिक सुखकारक ठरते.
व्याख्या १.
नैयायिक - "अनुकूलवेदनीयं सुख' - जी वेदना आपल्याला अनुकूल असते ते सुख आणि "प्रतिकूलवेदनीयं दुःखं 'जी वेदना आपल्याला प्रतिकूल ते दुःख, या वेदना जन्मतःच सिद्ध आणि केवळ अनुभवगम्य आहेत.
व्याख्या-२
मागील प्रकरणांतील कर्माप्रमाणे सुखही वेदांतांत "आधिदैविक, आधिभौतिक आणि आध्यात्मिक' तीन प्रकारचे असे म्हणता येईल.
-आधिभौतिक हे बाहय किंवा शरीराचे / इंद्रियाचे सुखदुःख
टिळकांच्या या खटल्यापूर्वीच भारतीय लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक दमनाची प्रशासकीय आणि कायदेशीर चौकट ब्रिटिशांनी उभारून ठेवली होती. जी कुठली घडामोड ब्रिटिशांच्या मते त्यांचे भारतावरील नियंत्रण नाकारू पाहणारी ठरू शकेल, त्यामागील व्यक्तींवर 'राजद्रोहा'चे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार वाढत होते. ब्रिटिश सरकारविषयी तिरस्कार वाढविणारे, त्या सरकारचा अवमान करू पाहणारे किंवा त्या सरकारविषयी अप्रीती निर्माण करू पाहणारे कोणतेही वर्तन 'राजद्रोह' ठरविले जाऊ शकत असे.
टिळकांवर हा राजद्रोहाचा आरोप एकंदर तीनदा ठेवला गेला. पहिल्यांदा १८९७ मध्ये, नंतर १९०८ आणि लगेच १९१६ मध्ये.