जीवनमान
ती गेली तेव्हा...
प्रेषक, फुलवा, Mon, 20/05/2013 - 01:30एका गारुड्याची गोष्ट १ : पुण्याचे पत्ते - माझा छंद !
प्रेषक, जॅक डनियल्स, Fri, 17/05/2013 - 03:54(मी पुण्यात असताना, सर्पोद्यानचे सहा वर्ष काम केले, तेंव्हाचे अनुभव संघटीत करून लिहित आहे. हा लेख पूर्वी (दोन वर्ष) माझ्याच कट्ट्यावर (ब्लॉग) प्रकाशित झाला होता, त्यानेच मी या अनुभवांची सुरुवात करत आहे.)
आत्ता अमेरिकेमध्ये मला कोणी नवीन पुण्याचे भेटले की माझा त्यांना ठरलेला प्रश्न असतो "तुम्ही पुण्यात कुठे राहतात?" तुम्हाला वाटेल काय साधा प्रश्न आहे . पण तसं नाही. ते जेंव्हा उत्तर देतात तेंव्हा मी त्यांच्या शब्दांबरोबर पुण्याच्या रस्यावर फिरत असतो. ती पान टपरी,कोपऱ्यावरचे अमृततुल्य, आतला छोटा बोळ असे सगळे माझ्या डोळ्यासमोर दिसत असते."पुण्यातले पत्ते शोधणे " हा माझा छंद होता .
कसं सुचतं हे सगळं ? अहो, ब्रह्ममुहूर्तावर जाग येण्यातून.
प्रेषक, चित्रगुप्त, Wed, 15/05/2013 - 13:45माझ्या ' मारा डंख मारा डंख मारा बिछुवा' या धाग्याच्या एका प्रतिसादात 'ढालगज भवानी' यांनी " कसं सुचतं हे सगळं ? असा प्रश्न केला होता, त्याचं उत्तर " अहो, ब्रह्म मुहूर्तावर जाग येण्यातून" असं आहे. कसं, ते सांगतो.
'ब्रम्ह मुहूर्त' ज्याला म्हणतात, त्याची नेमकी अशी काही वेळ (पंचांगातील सूर्योदयाच्या नियत वेळेसारखी) असेल, असे वाटत नाही (असल्यास सांगावे).
साधारणत: पहाटे तीनच्या सुमाराची वेळ म्हणजे 'ब्रम्ह मुहूर्त' असे म्हटले जाते. पण मुळात त्या वेळेला 'ब्रम्हमुहूर्त' असे का म्हणायचे ?
मारा डंख मारा डंख मारा बिछुवा, मिपाप्रवेशाकांक्षिण्यांची गोची आणि आमची काशीयात्रा
प्रेषक, चित्रगुप्त, Mon, 13/05/2013 - 16:16"ओ मारा डंख मारा डंख मारा बिछुवा…
तोहरे प्यारके जहर चढे मितवा…"
'अपनीही मस्तीमे झूमते हुए' का काय म्हणतात तसा, आपल्याच धुंदीत, द्रुतगतीनं पायडिलं हाणत, गाणं म्हणत मी घराकडे सायकलत होतो.पोटात भूक खवळली होती आणि केंव्हा घरी पोचून वेगवेगळ्या मस्त रेसिप्या हाणतो, असं झालं होतं.
दारु पुराण
प्रेषक, Bhagwanta Wayal, Sun, 12/05/2013 - 11:10दारुपुराण सांगतो मी,तुम्ही ऐका शांतचित्ता
ऐका एका दारुड्याची कथा ॥धृ॥
रोज येतो दरु पिऊन
बाटली खिशामद्ये घेऊन
सांगे रुबाबात येऊन
चल वाढ मला भोजन
रोज हवी मच्छी मटण
बायको आण्ल सांगा कुठुन
रागाने ऊठतो पेटून
अर्ध्या जेवणावर ऊठुन
होते त्याची चालू,ही बडबड आता
ऐका एका दारुड्याची कथा ॥१॥
जुने ते सोने..
प्रेषक, सचिन कुलकर्णी, Sat, 11/05/2013 - 13:50आताच्या माझ्या आजारपणात १ उपाय बाकी नामी सापडला किंवा जुना उपाय नामी आहे हे सिद्ध झाले म्हणूयात. तो असा कि अंगात ज्वर असेल तर आणि paracetamol /antibiotic ने पण फरक पडत नसेल तर कांद्याचा रस हातापायाला/अंगाला चोळावा. यात ताप वेगवेगळ्या पद्धतीने उतरू शकतो. ५ दिवसांपूर्वी माझे अंग रस चोळल्या वर १० मिनटात थंड पडले आणि रात्री तर थंडी वाजली. काल मात्र पाय अजून गरम झाले आणि नंतर थंड.(अंतिम परिणाम-ताप उतरला).५ दिवसात फक्त दोनदा हा उपाय केला. रोज नाही. बरेचदा अंगात आपल्याला चांगलाच ताप वाटतो पण thermometer मध्ये तो दिसत नाही , अश्या वेळेस हा खंग्री उपाय आहे.
व्यायामाचे प्रकार
प्रेषक, वेल्लाभट, Sat, 11/05/2013 - 12:51व्यायाम हा एकंदरितच आजकालचा `हॉट टॉपिक' आहे. तरूण आहात, तर तारुण्य खुलवण्यासाठी व्यायाम; मध्यमवयीन आहात, तर तारुण्य टिकवण्यासाठी व्यायाम; वृद्ध आहात, तर फिट राहण्यासाठी किंवा, पाय, गुडघे, पाठ दुखू लागली आहे, म्हणून व्यायाम; श्रीमंत आहात, मग शो-ऑफ साठी व्यायाम; गरीब आहात, तर मग असाही काबाडकष्ट करून व्यायामच; अभिनेता/अभिनेत्री व्हायचंय, तर इंडस्ट्री ट्रेंड आणि डिमांड म्हणून व्यायाम; लग्नेच्छुक आहात, तर लग्न पटकन जमावं म्हणून छान दिसण्यासाठी व्यायाम; रोज व्यायाम, अधून मधून व्यायाम, कुणी सांगितलं म्हणून व्यायाम, आपल्याला वाटलं म्हणून व्यायाम...
थोडे मर्मबंधातील ...
प्रेषक, ढालगज भवानी, Mon, 06/05/2013 - 13:09दादी के हाथों को जलता देख...
प्रेषक, विसोबा खेचर, Mon, 06/05/2013 - 11:04प्राध्यापक अशोक चक्रधर.
हिंदीतले एक अत्यंत दिग्गज कवीवर. एक विलक्षण, बहुआयामी व्यक्तिमत्त्व..एक भाषाप्रभू, एक शब्दप्रभू..त्याचप्रमाणे एक अत्यंत मिश्किल, हसरं व्यक्तिमत्त्व. एखाद्या विनोदाला मनमुराद दाद देताना अगदी सोडावॉटरची बाटली फुटावी असं खळखळून, मनमोकळं हसणारं व्यक्तिमत्त्व..परंतु त्याचवेळी एक तेवढंच संवेदनशील व्यक्तित्व..जीवनाकडे, माणसांकडे, त्यांच्या प्रश्नांकडे तेवढ्याच संवेदनशीलतेने पाहणारं एक सहृदय व्यक्तिमत्त्व..
कबुतरांची सभा
प्रेषक, अत्रुप्त आत्मा, Mon, 06/05/2013 - 09:15पर्वा एका सरकारी हापिसात
कामासाठी गेलो होतो
आणी नेहमी प्रमाणे वाट बघत
ताटकळत उभा होतो.
कडेला वाटलं माणसं बोलताहेत
पण कबुतरं बोलत होती
कालच्या दिवसात काय काय झालं?
याचे हिशेब तोलत होती
पहिलं दुसर्याकडे पाहुन
मिष्किलपणे हसत होतं
आणी त्यांच्या गमती पाहुन
तिसरं मधिच घुसत होतं
काल म्हणे पहिल्याला
आख्खं कणिस मिळलं
पण दुसर्यानं धक्का दिला
आणी ते हवेतच गळलं
थोड्याच वेळात कबुतरांची
भली मोठ्ठी सभा भरली
आणी आज चरायला कुठं जायचं?
यावरच पहिली चर्चा ठरली