user

धोरण

पुण्यात PMT चे वाढते भाडे !

नमस्कार !

काल परवाच्या 'सकाळ' मधली मुख्य बातमी वाचली.
पुण्यात पंत चे भाडे कमीत कमी ५ रु.तसं पाहायला गेलं तर PMT भारताच्या प्रमुख शहरांच्या सार्वजनिक वाहतुकीपेक्षा महागच आहे .
आणि जर सुविधांचा विचार केला तर अगदीच शून्य.
PMT ची दरवाढ रास्त आहे असा आपल्यास वाटते का ?

*पुण्याचे आणि पुण्याबाहेरचे लोकही प्रतिक्रिया देऊ शकतात !

मिसळपावला मराठी करू चला...

नमस्कार,

नव्या बांधणीत मिसळपाववर अनेक जागी इंग्रजी शब्द किंवा वाक्ये दिसत आहेत. ते ताबडतोब मराठी करण्यासाठी ज्यांची इच्छा असेल त्यांनी येथे त्या त्या इंग्रजी शब्द किंवा वाक्यांसाठी प्रतिशब्द किंवा वाक्य सूचवावे.

असे करते वेळी मूळ शब्द किंवा वाक्य येथे देऊन त्यासमोर मराठी शब्द किंवा वाक्य द्यावे.

यामुळे एखाद्या शब्दास प्रतिशब्द कुठला असावा या विषयावर चर्चा होऊ शकते मात्र मूळ काम सोडून अवांतर चर्चा टाळाव्यात.

मुक्तस्त्रोत विश्वात अश्या प्रकारे अनेक भाषांतर प्रकल्प चालत असतात. याप्रयत्नामुळे आपल्याला त्याची ओळख होईल. याशिवाय काही कल्पना असतील तर स्वागतच आहे.

चला तर मग मिसळपावच्या मराठीकरणात सहभागी होऊया.

- सरपंच

असले पण गुरु असतात!

नमस्कार्,नमस्कार........
हा लेख माझ्या आवड्त्या पण आता भुतकाळात जमा झालेल्या मिपाच्या जुन्या रुपाला अर्पण.
काल गुरुपोर्णिमा झाली,काहींनी लेख लिहुन तर काहींनी मनातच गुरुंविषयी आदर व्यक्त केला.पण ज्यांना नेहमीच खडुस्,मुद्दाम रागावणारे,जळपटे शिक्षक लाभले त्यांनी काय करायचं?
गप्प रहायच?..........नाही,नाही तस कस चालेल?
त्यांनी असे लेख लिहायचे.

मी कालखंडानुसार सर्वांची 'ओळख' करुन देतो.आणि तुम्हाला काही अन्जान सत्याची जाणीव करुन देतो.

काळ : १ ते ४ थी
स्थळ : **** हायस्कुल्,बोरीवली.

त्यादीवशी उशीर झाला होता.दुपारची शाळा होती.मी रडवेला झालो होतो,छडी घेउन मारकुट्या म्हशी
(कुपोषीत)सारखी बघणारी ती 'बाई' डोळ्यासमोर उभी दीसली की जीव तुटत होता.हे सर्व चेह-यावर दीसत होत्,पण बघायचा त्रास फक्त राणे मॅडमनी घेतला.
"सुशांत्,उशीर झाला? रडु नकोस,नाही मार बसणार"
मी उसण हसत त्यांच्याबरोबर गेलो.त्यांनी माझ्या खांद्यावर हात टाकला होता.मला खरच आधाराची गरज होती.आम्ही गेटमधुन आत गेलो.'बाई' माझी वाट बघत होत्या.मी 'बाईं'समोर उभा राहीलो.वर गेलेली छडी हातावर बसली.
राणे मॅडमः "अहो मॅडम्,नका मारु!"
"अहो मारुन झाल आता काय नका मारु?" मनात बोललो.
मी "आई'आई" करत भो़काड पसरल.
'आई,तुच ग माझी!......हे सर्व साले मतलबी!' असे काहीसे मनात आले.मला पळत आईकडे जावस वाटल.पण ते शक्य नव्हत.म्हणुन मी त्या बाईंकडे बघत,तिला दया येईल ह्या आशेने मुद्दाम आवाज काढुन रडत होतो.
"पुन्हा होईल उशीर?" तिचा प्रश्न.
मी एखाद्या प्राण्याच्या पिल्लासारखा "कुं,कुं" करत मान 'नाही' अशी हलवली.राणे मॅडम सहानभुती दाखवत माझ्याकडे बघत होत्या.मी 'अरे ज्जा,नको तुझी सहानभुती' अशा भावात त्यांच्याकडे बघितल व दप्तर नीट करत वर्गात गेलो.
ह्या बाईच्या बाबतीत एक आठवत की त्या फार कडक्या,उंच होत्या व रागवल्या की त्याच्या गळ्यात काही नसा उठुन दीसायच्या.मी घाबरत त्या नसांकडे बघत रहायचो व त्यांनी काय विचारल हे लक्षात नाही रहायच म्हणुन फटके खायचो.जाम सतावल मला ह्यांनी.पीटीच्या वेळी मुद्दाम माझ्याबाजुला उभ राहुन माझ्या चुका काढायच्या,आणि माझ्या नाजुक पायांना वेदना द्यायच्या.मी माझ्या आईला आठवायचो......"अग,तु बोलतेस म्हणुन येतो ग शाळेत!............"आई,तुला कळल ना की शाळेत मला असा मुद्दाम मार दीला जातो,तर मला घेउन जाशिल ना गं इथुन?"
आईच "हो रे मुला" अस उत्तर ग्रुहीत धरायचो व सर्व सहन करायचो.
होळीच्या दीवशी मी तापलेल्या दींड्याच्या काठ्या हाताने जोरात आपटत ह्या असल्या शिक्षकांच्या नावाने 'बोंबा मारायचो'.

काळ : १ली ते ४थी.
स्थळ : तेच.
पुणीन्द्रे सर.......
हा एक मारकुटा होता.मला स्कॉलरशिपला शिकवायचा.मी रवीवारी त्याचा 'तास' असला की खुप रडायचो.माझी आय "आरं जा पोरा,हे साल कळ काढ रे!"
मी "आय,तु म्हणतीस म्हणुन नायतर ह्यांच्या आता....बोललो असतो!"
हे असे संवाद कधी झाले नाहीत.पण मला आईबरोबरच्या संवादांमधे हेच बोलायच असयच.
मी पुनीन्द्रेचा छळ सहन करुन घरात आलो,की आईच्या कुशीत बसुन खुप तक्रारी करायचो.
आईचा आधार होता म्हणुन सर्व झेपत होत,नाहीतर ह्या सर्वांणी पागल करुन सोडल असत.
ह्या महाशयांची एक आठ्वण......
"काय गणित सुटल नाही का अजुन" पुनीन्द्रे.
"सर,सर ते........." पुनीन्द्र्याचा अवतार बघुन माझी शंका घशातच राहली.
"का नाही शिकवल का तुझ्या क्लासवाल्यांनी" पुनीन्द्रे.
"जा ना सर तुम्ही त्यांच्याशी भांडा ना,मला कशाला त्रास देता?" मला अस सारख बोलावस वाटायच.
खरा लफडा हा होता की मी संध्याकाळी राणे मॅडमच्या क्लासला जायचो.हा पुनीन्द्रे माझा 'वर्गशिक्षक' असुनही मी 'राणे'च्या क्लासला जायचो म्हणुन त्याच्या पोटात दुखायच.म्हणून तो राणेंच्या शिकवणीतल्या चुका काढायचा.
एक हजाम दुस-या हजामाने दाढी चांगली नाही केली अस म्हणतो ना,हे अगदी तसच आहे.
"अरे ते त्यांची भांडणं माझ्यासारख्या लहान पोरावर का काढतात?" अश्या अर्थाचे रडगाणे मी आईशी गायचो.
आई पण माझ्या रोजच्या तक्रारींना कंटाळली होती,"अरे ही स्कॉलरशिप तेवढी पास हो,मग जाउ आपण इथुन" अस बोलायची.
मी: "तु गप्प बस!!........खोट बोलतेस." अस बोलत आता आईला पण माझा कंटाळा आला,अशी भावना मनात येउन मी भोकाड पसरायचो.आई समजावयला आली की मी लाडात आईचा हात माझ्या हाताने जोरात लांब ढकलायचो.कधी कधी "मी आज जेवणारच नाही!" अस बोलायचो.आई जास्त काही बोलायची नाही.कारण मी अस बोलुन घरातुन पळुन जातो व नंतर खेळुन परतल्यावर जेवायला बसतो हे तिला माहीती होतं.(आम्ही खरच एका वर्षानी बोरीवली सोडणार होतो हे मला माहीत नव्हत.)
एकदा मला क्लासच्या ट्रीपला जायच होत तेव्हा "नाही आज रवीवार आहे,माझ्या तासाला बसुन नंतर जाउ दे ट्रीपला!" अस माझ्या वडीलांना बोलणारा हाच तो पानुन्द्रे!

मग त्यादीवशी माझे वडील पानुन्द्र्याचा तास संपेपर्यंत बाहेर बसुन राहीले व नंतर मी बाहेर आल्यावर मला ट्रीपच्या स्पॉट्वर स्वःता सोडुन आले.मला त्यादीवशी पानुन्द्र्याचा जास्तच राग आला.मला जायच आहे माहीती असुनही मला 'गणित सोडव लवकर!' असे दम भरत होता.एकदाचं जायला भेटल मला ट्रीपला.
माझ्या आईला खुप आनंद झाला,मी मनात तिचेच आभार मानले.बाप फक्त 'कामापुरता मामा'.

असो,तर असे हे आमचे गुरु........ज्यांनी आम्हाला गुरु असण्याचा फायदा घेत कामचोर गुरासारख छळल.
अशांना गुरुपोर्णिमेच्या दीवशी आठवायच का?
(अजुन आहेत त्याच्याबद्दल पुन्हा कधीतरी.)

नवनिर्माण सूचना.

नमस्कार,

मिसळपाव नवीन स्वरूपात सादर करतांना आनंद होतो आहे. मुख्य तांत्रीक बदलानंतर आज मिपा नव्या दमाने पुढे जायला तयार आहे. आता सर्व सदस्यांना विनंती आहे की मिसळपावच्या ह्या नवीन रूपातील काही दोष आढळल्यास ते येथे या धाग्यावर लिहावेत. मिसळपावच्या स्वरूपाबद्दल केवळ येथेच चर्चा व्हावी ही विनंती.

जे आवडलं त्याचे कौतुक आणि जे राहून गेलंय त्याची आठवण आणि ते पुर्ण होई पर्यंत त्याचा पाठपुरावा. हे सर्व येथे व्हावं. आता मुख्य काम झाल्यामुळे अधिकाधीक नवीन सोई देण्याकडे कल असेल. तुमच्या सूचनांचे स्वागतच आहे.

- सरपंच

पाध्यांचे मनोगत

निवेदनः संपादकांच्या अधिकारांबाबत नाराजी व्यक्त करून वातावरण कलुषित केल्याचे प्रायश्चित्त म्हणून काही दिवस स्वसंयमाची रजा घ्यायचे ठरवले होते. त्यामुळे गढुळलेले वातावरण निवळेल असे वाटले होते.

परंतु दुसर्‍या बाजूकडून अपेक्षित असलेला संयम दिसला नाही. आणि मुद्दाम खाजवून काढल्याप्रमाणे धागे -- धागे येत राहिले. (आणि ते उडाले नाहीत). म्हणून प्रायश्चित्त रद्द करून पुनरागमन करीत आहे. ते धागे उडाले नसल्याने हा ही उडणार नाही अशी अपेक्षा आहे.

अजून एक: कविता या लेखनप्रकारात माझा पहिलाच प्रयत्न आहे. त्यामुळे यातल्या व्हेटरन्सनी सांभाळून घ्यावे ही विनंती. :)

कोणती युक्ती अता मी वापरू |
लोकशाही फार लागे वावरू ||

जाहले निर्माण नव येथे जरी |
आणि वाढे आमुची संख्या जरी ||

मूळ कारण लोकशाही, ती सरेना |
दीन, पदभ्रष्ट तिज कैसे करू ||

जाब हे कंटक अम्हा पुसती कसे |
काय मी येथे तयाला उत्तरू ||

"तो न मी" हे पालुपद मी सांगतो |
घाम फ़ुटतो पाहता त्या रूबरू ||

माझिया सत्तेस काही धार नाही |
सर्व शक्ती मालकाची "क्या करूं?" ||

क्रमश: - ?

डिस्क्लेमरः

१.(सहज यांच्या प्रतिसादावरून) = वरील वर्णन प्रत्येक पाध्यांना लागू नाही. किंवा सगळे पाध्ये असाच विचार करतात असे नाही.
२. काही पाध्यांशी झालेल्या संपर्कात "नेहमी सगळ्याच गोष्टी उघड करता येत नाहीत" असा सूर होता. त्यामुळे समोर दिसणार्‍या गोष्टींतून सदस्यांचे काय समज होऊ शकतात याचे उदाहरण म्हणूनही ही कविता पाहता येईल.

नितिन थत्ते

निषेध त्या न्याय व्यवस्थेचा अन त्या अन्यायी व्यवस्थेचे समर्थन करणारांचा....

या चर्चेतील मुद्दे वाचले
मुलतः कोणत्याही थोर व्यक्तीच्या बद्दल कुणाही सोम्यागोम्याने काहीही माहीती द्यावी कुणाही लंपट लेखकाने काहीही लिहावे अन शासनाने अशा लिखानावर बंदी आणली असता कुणाही येरागबाळ्याने न्यायालयात याचिका दाखल करावी की अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होते आहे? हे कितपत योग्य आहे? आपल्या पैकी कितीतरी जण न्याय व्यवस्थेच्या या अन्यायी निर्णयाचे समर्थन करतांना दिसतात तेंव्हा न्यायाची चाड आपणाला आहे काय? हा प्रश्न निर्माण होतो. सावरकरांचे वाक्य अंदमान तुरुंगातुन हटविले तेंव्हा आक्रोश करनारे आपण आज शिवरायांच्या विरोधातील निकालाचे समर्थन करतांना आपले मन बुद्धी संस्कार गहाण टाकुन तर बोलत नाही आहोत ना........?

कुणा स्त्रीच्या चारित्र्यावर चिखलफेक करणार्‍याला कसले आले अभिव्यक्ती स्वातंत्र्य?

निषेध त्या न्याय व्यवस्थेचा अन त्या अन्यायी व्यवस्थेचे समर्थन करणारांचा....

प्रतिक्रिया दैनिक Daily Navnagar Mumbai 18-7-10

मिसळपावाची धोरणे सांगण्याचा फायदा

झालेली एकूण चर्चा बघता कोणतेही नवीन मुद्दे उपस्थित होत नाहीयेत तेच ते गुर्‍हाळ चालू आहे. बहुतेक सर्व मुद्द्यांचा विचार संपादक मंडळाने आधीच केलेला आहे.
आता येणारे प्रतिसाद हे वेगळेच वळण घेत आहेत त्यामुळे इथे लेखात दिलेल्या 'आधिकारिक धोरणांच्या' कलम ९ अनुसार हा धागा आता केवळ वाचनमात्र करण्यात आला आहे.
कळावे.
-संपादक मंडळ

हल्लीच मिसळपावाची आधिकारिक धोरणे प्रसिद्ध झाली आहेत. त्या बाबतीत दोन प्रकारचे मूलभूत प्रश्न काही प्रतिसादकांच्या मनात उद्भवले आहेत.
(१) एक मूलभूत प्रश्न कोणी असा आहे - दंड करण्याचा अधिकार हा जवळजवळ नेहमीच अतिरेकाने वापरला जातो. उदाहरणार्थ : आणिबाणीच्या पूर्वीच्या काळात न्यायालयाने सर्व महत्त्वाच्या बाबतीत इंदिरा गांधींना निर्दोष ठरवले, मात्र कुठल्याशा क्षुल्लक बाबतीवरून त्यांना पदच्युत केले. त्याच इंदिरा गांधींनी आणिबाणीची घटनात्मक तरतूद वापरूणिलोकांना स्थानबद्ध करण्याच्या अधिकाराच अतिरेकी वापर केला. हा मूलभूत प्रश्न कुठल्याही व्यवस्थेबद्दल आहे. अमुक एक व्यवस्था [मिसळपाव] या धोक्यापासून कशी वाचू शकेल, हे ठरवण्यासाठी व्यवस्थेची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन प्रश्न मांडला पाहिजे.
(१अ) या मुद्द्याचा नेमकेपणा वाढवत असे सांगण्यात येते, की निर्णय घेणार्‍यांची "चौकडी" - उदाहरणार्थ : मर्यादित संपादकमंडळ - असेल, तर "चौकडी"चा निर्णय बहुतेक सदस्यांना अमान्य होतील. यात पुन्हा इंदिरा-गांधी-आणिबाणीमधील उच्चाधिकारी "चौकडी"चा दृष्टांत दिला जातो. परंतु या मुद्द्याची व्याप्ती सुद्धा नको तितकी रुंद आहे. राज्य/लोकशासनाच्या संदर्भात बघता शासनातच "मंत्रीमंडळ" असते, "विधानसभा" असते, हे सर्व विशेष अधिकार असलेले मतदार-नागरिक असतात. म्हणजे "चौकडी"च होय. "चौकडी"च असू नये असे म्हणता येत नाही. मात्र लोकशाहीत ही "चौकडी" बहुमताने बदलण्यासाठी सर्व मतदार-नागरिकांना काहीतरी प्रक्रिया उपलब्ध असते. सर्व मतदार किंवा नागरिक मूलभूत दृष्ट्या समसमान असतात, ते मतदार-नागरिक कोण त्याची व्याख्या... या सर्व गोष्टी घटनेमध्ये बर्‍याच स्पष्ट सांगितलेल्या आहेत. समूहस्थळाच्या बाबतीत "सर्व सदस्य" म्हणजे कोण, हे तितके स्पष्ट माहित नसते. मिसळपाव संकेतस्थळासाठी "लोकशाही शासनव्यवस्था" हा सुयोग्य दृष्टांत नव्हे. "सेवाभावी संस्थेकडून सेवा मिळवणारे लोक" हा "सदस्य"करिता सुयोग्य दृष्टांत आहे. अशा रीतीने सेवा मिळवणार्‍यांना अधिकार वगैरे असतात, पण ते बहुमताचे अधिकार नसतात. याबद्दल अधिक विचार मिसळपावावर पूर्वी झाला आहे. (मिसळपावाची घटना : लोकशाही संस्था : "लोक" म्हणजे कोण?) सेवाभावी संस्थेतही कार्यकारी मंडळ, विश्वस्त, वगैरे "चौकडी" असते. सेवाग्राहक या चौकडीला काढू शकत नाहीत. अमुक सेवा पुरवावी की नाही, वगैरे निर्णय घेतले जातात. मात्र ही व्यवस्थाच मुळापासून अन्याय्य आहे, असे ऐकिवात नाही.
- - -
(२) आणखी एक वेगळाच मूलभूत मुद्दा काही लोक उपस्थित करतात : जर शेवटी असे म्हणायचे आहे "व्यवस्थापनापाशी सर्वाधिकार आहे" तर बाकी धोरणे सांगण्याची गरजच काय आहे? या बाबतीत आक्षेपक आपल्या रोजव्यवहारातल्या अनुभवांकडे पुरेसे लक्ष देत नाहीत. एखाद्याकडे अंततोगत्वा सर्व अधिकार असले, तरी रोजव्यवहारासाठी काही धोरणे सांगण्यात काही सोय असते. अगदी वाईट उदाहरणसुद्धा घ्या : गल्लीत दमदाटी करून वर्गणी घेणारा गुंडही "(१) वर्गणी दिली तर पुढच्या सणापर्यंत पैसे मागणार नाही, (२) शेजारच्या गल्लीतला गुंड वर्गणी मागायला आला तर त्याला पळवून लावेन..." अशी काही तात्पुरती धोरणे सांगतोच. ही धोरणे बदलायचे सर्व अधिकार गुंडाकडे असले तरी तात्पुरती धोरणे कळण्यात काही सोय असते.

वाईट गोष्ट सोडा - या ठिकाणी "मिसळपाव" स्थळ काही सेवा मोफत पुरवते आहे. या कुठल्या सेवा आहेत? ते सांगणारे धोरण कळले तर बरे असते. पुढे कधी "मिसळपाव" संकेतस्थळावर झुलू कविता लिहिण्याची मुभा देण्याचे सर्व अधिकार व्यवस्थापनाकडे आहेतच. तरी हल्लीच्या काळात मराठी संदेशनाचीच मुभा देत आहोत, हे धोरण सांगण्यात आणि वाचण्यात मला तरी खूपच सोय वाटते.

आक्षेपकांचे खरा रोष "सर्वाधिकार असूनही धोरणे सांगतो" याविषयी नाही, असे वाटते. आपल्याला ठीक वाटतो तो मजकूर संपादित करण्याबाबत, आणि सदस्यत्व काढून टाकण्याबाबत आहेत. "अमुक प्रशस्त आहे" हा आपला विचार कधी कोणी अमान्य करेल, आणि अमान्य करणार्‍यास काही विशेष अधिकार असेल, याबद्दल अन्यायाची भावना आहे.

या बाबतीतही त्यांचा रोष त्यांच्या रोजव्यवहारातल्या अनुभवांशी विसंगत असावा. कोणी चहापानासाठी, गावजेवणासाठी आवतन देते. घरातून किंवा मांडवातून कोणालाही घालवून टाकायचा अधिकार आयोजकांना असतोच. तरी "जेवायला, वधूवरांना आशीर्वाद द्यायला जरूर या" असे आवतन असते. त्यातही "आमच्या पाहुण्यांचा अपमान करू नका" अशी विनंती असते. ("आम्ही तुमच्या जावयबापूचा अपमान केलाच नाही" असे म्हणणार्‍याचे युक्तिवाद नामंजूर करण्याचा सर्वाधिकार लगीनघराला असतो.)

"गाण्याच्या कार्यक्रमात मुलांना धिंगाणा घालू देऊ नका" असे कोणी सांगते. (कोणी आईबाप म्हणतात - "आमची बेबी रडतेदेखील सुरेल", त्यांच्या युक्तिवादाला नामंजूर करण्याचा सर्वाधिकार आयोजकांना असतो.)

व्यवस्थापकांना सर्वाधिकार असले, तरी या काळीची धोरणे कळणे उपयोगी असते, आणि सोयीचे असते. दंडसंहिता बदलू शकत असली, तरी दंडसंहिता काय आहे, ते कळलेले बरे. सोयी पुढे बदलू शकल्या तरी हल्ली उपलब्ध सोयी काय ते कळलेले बरे. मिसळपावावर हीच धोरणे आता प्रसिद्ध होत आहे, ही उत्तम बाब आहे.

मिसळपावचे आधिकारीक धोरण

नमस्कार,
आज दिनांक १३/०७/१० ला मिसळपावच्या धोरणांना प्रसिध्दी देतांना आनंद होत आहे. ही धोरणे मिसळपावची यापुढील मार्गदर्शक असतील. यापुढे मिसळपाववर वावर करतांना आणि लेखन करतांना सदस्यांना ही धोरणे मान्य आहेत असं गृहीत धरल्या जाईल.

१. मिसळपावावरील लेखनात ललित किंवा वैचारिक लेखन, गद्य, पद्य, पाककृती यांना स्थान दिले जाईल. या व्यतिरिक्त खेळीमेळीचे धागे मिसळपावावर ठेवले जातील. लेखन मिसळपावावर राहण्यास योग्य आहे किंवा नाही हे ठरवण्याचा आणि मिसळपावावर येणारे साहित्य प्रकाशित किंवा अप्रकाशित करण्याचा अंतिम निर्णय संपादक मंडळाचा असेल. एखाद्या सदस्याने मिसळपावाचे सदस्यत्व सोडले असता त्याचे लेखन प्रकाशित ठेवण्याचा किंवा अप्रकाशित करण्याचा निर्णय संपादक मंडळ घेईल.

२. स्वरचित साहित्याखेरीज इतर कुणाचेही लेखन, मूळ लेखकाच्या परवानगीशिवाय मिसळपावावर प्रकाशित करता येणार नाही. एखाद्या लेखा/चर्चेदरम्यान केवळ संदर्भाकरता म्हणून इतरांच्या लेखनातील दोनचार ओळी किंवा एखादा लहानसा परिच्छेद द्यावा. इतरत्र प्रसिद्ध झालेले लेखन जर मिसळपाव सदस्यांनी वाचावे व त्याच्यावर चर्चा घडवून आणावी असे जर लेखकाला वाटत असेल तर त्याने/तिने संबंधित लेखनाचा दुवा (लिंक) द्यावा.

३. आस्वादात्मक, कलात्मक, अनुवादात्मक भाष्य करायचे झाल्यास मिसळपावाव्यतिरिक्त इतर ठिकाणी प्रसिद्ध झालेली एखादी कविता/गझल/लेख/ संदर्भाकरता म्हणून मिपावर प्रसिद्ध करता येईल.

४. व्यक्तिगत पातळीवर उतरणारे लेखन, लेखनाशी संबंधीत नसणारे अनावश्यक प्रतिसाद यासाठी मिसळपावावर खरडवही, खरडफळा आणि व्यक्तिगत निरोपांची सुविधा देण्यात आलेली आहे. मिसळपावावर प्रकाशित झालेल्या साहित्यात अशा प्रकारचे प्रतिसाद संपादक मंडळ कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय अप्रकाशित करू शकते याची नोंद कृपया सर्व सदस्यांनी घ्यावी.

५. मिसळपाव सदस्यांवर लेखन करताना अपमानास्पद, सांसदिय भाषेस सोडून केलेले लेखन, सार्वजनिक शिष्टाचारांना सोडून केलेले लेखन, अश्लील शब्दांचा/ चित्रांचा वापर असलेले साहित्य, सदस्यांमधले वैयक्तिक हेवेदावे, जुने हिशेब चुकते करणे (score settling) प्रकारातील प्रतिसाद किंवा लेख अप्रकाशित करण्याचा निर्णय संपादक मंडळाचा असेल.

६.नवे लेखन करताना एक-दोन ओळींचे लेखन करू नये. असे लेखन अप्रकाशित करण्याचा निर्णय संपादक मंडळ घेऊ शकते याची नोंद घ्यावी.

७. संपादकीय धोरणात परिस्थिनुरुप बदल करण्याचे हक्क संपादकांकडे राखीव आहेत. त्याचा वेळोवेळी वापर करता येईल. गरज भासल्यास सदस्यांना जाहीर निवेदनामार्फत तशी सूचना दिली जाईल.

८ . वारंवार सूचना/ ताकीद देऊनही एखाद्या सदस्याचा खोडसाळपणा दिसून येत असेल तर विशिष्ट कालावधीसाठी व्य.नि. आणि खरडवहीची सुविधा काढून घेण्याचे अधिकार संपादक मंडळाला आहेत. या उपायानंतरही सदस्याच्या वागणूकीत सुधारणा नसल्यास सदस्याचे खाते बंद होऊ शकते ह्याची कृपया नोंद घ्यावी.

९. संकेतस्थळावरील अडचणी, लेखांचे संपादन, संपादनाविषयी तक्रारी यांच्यावर निघणारे धागे संपादन मंडळाला अनावश्यक वाटल्यास त्वरित उडवले जातील आणि त्याविषयी कोणतेही स्पष्टीकरण दिले जाणार नाही.

मिसळपावाच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी वरील सूचनांचे पालन करावी अशी अपेक्षा आहे. सदस्यांना लेखनविषयक धोरणांची जाणीव करून देण्यास आणि वेळोवेळी मदत करण्यास संपादक मंडळ नेमलेले आहे. लेखनविषयक प्रश्न असल्यास जाहीर लेख न टाकता संपादकांना खरडी किंवा व्यक्तिगत निरोपांद्वारे विचारावेत. संपादक मंडळ या आयडीवर निरोप पाठवूनही हे प्रश्न विचारता येतील.

बेळगावी मराठी बांधवांवर हल्ला: सीमावासीयांनो आमचा तुम्हाला पाठिंबा आहे

काल दि. १२ जुलै २०१० रोजी बेळगाव शहरात सीमावासीयांनी मराठीचा झेंडा फडकावत बेळगावात उत्स्फूर्तपणे काढलेल्या मोर्चावर कर्नाटक सरकारने अमानुष लाठीमार केला. शांततेने चालणार्‍या मोर्चावर अचानक लाठीमार करून सीमावासीयांच्या भावना कर्नाटकी सरकारने पायदळी तुडवल्या. म्हातार्‍या कोतार्‍या माणसांनाही पोलीसांनी सोडले नाही. केंद्रसरकारला अजून किती वेळा लाठीमार व सीमावासीयांचे बळी हवेत? न्याय्य मागण्यांना न्याय मिळेल की नाही? सीमाबांधवांनो, तुम्ही एकटे समजू नका. आमचा तुम्हाला पाठिंबा आहे.

http://www.saamana.com/2010/July/13/Link/Main1.htm
http://72.78.249.124/esakal/20100712/4667969515589123216.htm
http://epaper.pudhari.com/epapermain.aspx
http://epaper.prahaar.in/
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6161109.cms
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=853...
http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/MainEditio...

आरं आरं आबा आता वर्डप्रेस डॉट कॉमवर

सामान्य जनतेपर्यंत पोचायचा मार्ग महाराष्ट्राचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी निवडला हाये.
जनतेशी संवाद साधता यावा म्हून त्यायनी आबा पाटील्स ब्लॉग या नावाने ते वर्डप्रेस डॉट कॉमवर हजर झाले हायेत. ही एक चांगली सुरुवात झाली हाय असे वाट्टे.

आबा म्हणत्यात ''जनतेपर्यंत पोचण्याचा सोपा आणि कोणतेही हितसंबंध नसलेला, आणि गटबाजीला वाव नसलेला मार्ग म्हणून मी हे आधुनिक तंत्रज्ञान आता निवडले आहे. याच भावनेतून आज हा ब्लॉग मी तुमच्यासमोर आणतो आहे.''

मिपाकरांना आबाच्या नव्या धोरणाबद्दल काय वाट्टे ?

Syndicate content
Scroll to Top