मिपा - घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा २०१३

संपादक मंडळ's picture
संपादक मंडळ in जनातलं, मनातलं
8 Sep 2013 - 11:42 pm

नमस्कार मंडळी,

गणपती हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि गणेशोत्सव म्हणजे मराठी माणसाच्या मनाचा एक हळवा कोपरा! अंत्यत श्रध्देने आणि मोठ्या भक्तीभावाने हा सण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. सार्वजनिक गणेशोत्सवांच्या बरोबरीने महाराष्ट्रात घरोघरही जवळपास १२ ते १५ लाख बाप्पांची प्रतिष्ठापना केली जाते. त्यांच्या आगमनापुर्वीच घरात लगबग सुरू झालेली असते. प्रत्येकजण आपापल्या परीने गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज झालेला असतो, मग ते दिव्यांची आरास असो वा फुलांची तोरणे, थर्माकॉलचे आकर्षक मखर असो वा गणेशाची सुंदर मुर्ती! हि सजावट अगदी मनोभावे आणि जोरदार केली जाते. घरगुती गणपतींना होणारी ही सजावट लक्षात घेता मिपा व्यवस्थापनाने यावर्षीपासून घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा हा नवा उपक्रम हाती घेतला आहे. आपणा सर्वांना या स्पर्धेत सहभागी होता येईल, त्यासाठी तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची आहे ती म्हणजे आपल्या घरात गणपतीभोवती केलेल्या सजावटीचा फोटो इथे टाकायचा आहे. येणार्‍या सजावटींमधून सर्वोत्तम तीन सजावटींना मिपा व्यवस्थापनातर्फे पुस्तक स्वरूपात पुरस्कार दिले जातील. त्यासंबधीची इतर माहिती नंतर कळवण्यात येईलच.

चला तर मग!! होऊन जाऊ द्या घरातली सजावट एकदम जोरदार !!

स्पर्धेचे नियम आणि अटी खालीलप्रमाणे :-

१) स्पर्धेचा सहभाग सर्वांना खुला असेल.
२) प्रत्येक स्पर्धकाने फक्त आपल्याच घरातल्या सजावटीचा फोटो टाकायचा आहे.
३) स्पर्धकाला प्रत्येकी २ फोटो टाकता येतील.
४) आपले फोटो इथेच प्रतिसादामध्ये टाकायचे आहेत. ज्या स्पर्धकांना फोटो टाकण्यात अडचण येईल, त्यांनी व्यक्तिगत निरोपाद्वारे संपादक मंडळ या आयडीला कळवायचे आहे.
५) आलेल्या सजावटींमधून सर्वोत्तम तीन निवडण्याचा अंतिम निर्णय परिक्षकांकडे राहील.

धोरणशुभेच्छाअभिनंदन

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

9 Sep 2013 - 12:16 am | अत्रुप्त आत्मा

चला तर मग मि.पा.गावकर...होऊन जाऊ द्या दणक्यात स्पर्धा

माझ्याकडून सर्वांना ही शुभेच्छा रांगोळी!

https://fbcdn-sphotos-g-a.akamaihd.net/hphotos-ak-prn1/1235332_503773296375628_1860188034_n.jpg

चिगो's picture

9 Sep 2013 - 12:21 am | चिगो

अत्यंत आल्हाददायक रांगोळी, बुवा.. प्रसन्न वाटले.. 'गणपती बाप्पा मोरया..'

प्रचेतस's picture

9 Sep 2013 - 4:25 pm | प्रचेतस

हेच म्हणतो.
सुरेख रांगोळी.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Sep 2013 - 8:38 pm | डॉ सुहास म्हात्रे

+१

सुधीर's picture

15 Sep 2013 - 1:52 pm | सुधीर

सुंदर रांगोळी!

अनिरुद्ध प's picture

11 Sep 2013 - 12:22 pm | अनिरुद्ध प

रान्गोळी खूप सुन्दर आहे आवडली,आपला धागा परत सुरु करावा ही विनन्ती.

अनन्न्या's picture

9 Sep 2013 - 4:39 pm | अनन्न्या

मस्त उपक्रम!

अ‍ॅड्मिन, 'मि.पा वर फोटो कसे टाकावेत' चा धागा टाकाना वर हेडर मधे. म्हणजे कोणाला अडचण आल्यास आधी ते इथे बघतील आणि नाहीच जमल तर तुम्ही आहातच.

पैसा's picture

9 Sep 2013 - 6:08 pm | पैसा

मदत पान मध्ये http://www.misalpav.com/node/13573 "मिसळपाववर फोटो कसे चढवावेत" या धाग्याची लिंक आहे.

पैसा, हीच लिंक हेडर मधे टाका ना, तुम्हाला ठीक वाटलं तर.

पैसा's picture

9 Sep 2013 - 6:15 pm | पैसा

तिथे मदत पान या लिंकमधे अशा प्रकारची सर्व मदत उपलब्ध आहे.

kalpana joshi's picture

10 Sep 2013 - 9:37 am | kalpana joshi

खुप खुप छान सजावट.

घर कुणाचंय ते कसं ठरवणार?

पैसा's picture

10 Sep 2013 - 10:43 am | पैसा

त्या फोटोला बक्षीस मिळालंच तर पुस्तक पाठवण्यासाठी त्या सदस्याने आपलं नाव पत्ता संपादक मंडळापैकी कोणालातरी कळवावं लागेल. बक्षीस न मिळाल्यास प्रश्नच येणार नाही.

सदस्यांच्या प्रामाणिकपणावर आम्ही विश्वास ठेवत आहोत. यासाठी सुरुवातीला फोटो देताना नाव द्यावे अशी कल्पना आली होती पण सदस्यांची प्रायव्हसी जपण्यासाठी ती अट काढून टाकली.

घरातली सजावट आणि एखाद्या मंडळातली सजावट यात फरक नक्कीच असतो आणि एखाद्या मंडळाच्या गणपतीचा फोटो कोणी आपल्या घरचा म्हणून दिला तर नक्कीच लक्षात येईल.

कोणाची समजा २ घरे असतील आणि दोन्हीकडे गणपती आणत असाल तर म्हणून प्रत्येकाला २ फोटो देण्याची मुभा दिली आहे. ते असो. तुमच्या घरचे फोटो कुठे आहेत?

संजय क्षीरसागर's picture

10 Sep 2013 - 11:39 am | संजय क्षीरसागर

छे,छे... देव आमच्यासाठी एक मस्त टीपी आहे. पण त्यापेक्षा दुसरे चांगले टीपी उपलब्ध असल्यानं, सदर टीपी इतरांकडे सोपवला आहे.

अभ्या..'s picture

10 Sep 2013 - 11:44 am | अभ्या..

आमच्या घरी सोवळ्यातला बाप्पा असतो. देवघरात असल्याने सजावटीला वाव नाही. माझ्या कलेला ही :( . आमच्या नशीबी दिवाळीत तुळशीवॄंदावनावर श्री राधा दामोदर प्रसन्न एवढेच लिहिणे. :(
मी ती हौस मित्राच्या घरी सजावट करुन भागवतो. तेथील फोटो दिले तर चालतील काय ? ;)

पैसा's picture

10 Sep 2013 - 11:54 am | पैसा

सजावट तू केलीस ना! मग दे की!

अभ्या..'s picture

10 Sep 2013 - 11:59 am | अभ्या..

चालतेय ना? ब्येस्ट. :)
द्या पाठवून मग पैले पुस्तक मला ;)

संजय क्षीरसागर's picture

10 Sep 2013 - 1:04 pm | संजय क्षीरसागर

गाहेगाहे इसे पढा किजे,
दिलसे बढकर कोई किताब नही.... (जगजितसिंग)

मृत्युन्जय's picture

10 Sep 2013 - 11:16 am | मृत्युन्जय

Ganesh Sajavat 1

Ganesh Sajavat 2

ही घ्या आमची एण्ट्री. सजावट साधीशीच आहे. पण मागचे मोर, कोयर्‍या आणि बदाम, आकार पाडण्यापासुन पुढच्या सजावटीपर्यंत सग्ळे घरीच केले आहे.

मनिम्याऊ's picture

10 Sep 2013 - 11:58 am | मनिम्याऊ

छान आहे.

हे मोर वगैरे हाताने केले असेल तर दंडवत. महान!

जय - गणेश's picture

10 Sep 2013 - 11:59 am | जय - गणेश

decoration

केदार-मिसळपाव's picture

10 Sep 2013 - 1:48 pm | केदार-मिसळपाव

मंडळी,
दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा आम्ही गणपती बसवला आहे.

बायरॉइथचा गणपती-1
आणि

jklo

गणपती बाप्पा मोरया...

अनन्न्या's picture

10 Sep 2013 - 5:41 pm | अनन्न्या

Ganapati

अनन्न्या's picture

10 Sep 2013 - 5:42 pm | अनन्न्या

Ganapati

मीनल's picture

10 Sep 2013 - 7:26 pm | मीनल

गेल्या उन्हाळाच्या सुट्टीत भारत भेट धावती झाली. त्या कमी वेळात ही माहिम बस डेपो जवळ असलेल्या जब्बर भाईंच्या लाकडी कोरीवकामाच्या वस्तूंच्या दुकानातून हा लाकडी देव्हारा बनवून घेतला. ह्या भाद्रपद चतुर्थीला त्याचे उदघाटन करण्याचे ठरवले. मुंबईतल्या दादरच्या किर्तीकर मार्केटमधून मोत्यांच्या माळा आणल्या होत्या. (अविश्वासनीय वाटेल म्हणून आई शपथ घेऊन सांगते- एकूण ६ माळा, प्रत्येकी लांबी ६ ईंच, भारतीय रुपये ३०/- फक्त) प्लास्टिक मोत्यांचा दर्जा अतिनिम्न असला तरी अश्या सजावटीसाठी अतिउत्तम आहे. दादरच्या रानडे रोड येथिल सौभाग्य वस्तू भांडार मधून श्री मूर्तीच्या वर लावायला एक छोटी छत्री आणि नैवेद्याच्या ताटाभोवती लावायला मोत्याच्या दोन महिरपीही घेतल्या होत्या. इथे घरात ही हस्तकलेच्या वापरातले लहान /मोठे आणि शुभ्र पांढ-या ते गडद पिवळ्या रंगाच्या मधल्या विविध छटांचे बरेच मोती होते. ह्य सर्व मोत्यांचा वापर करून सजावट करण्याची कल्पना हाती घेतली. आधी छ्त्रीला धाग्याने मोती शिवून काढले. श्री गणरायांसाठी बारीक मोत्याचे दागिने ही तयार केले. ते काम जरा नाजूक वाटत होते. ते जमल्यावर इतर सर्व मोत्यांचा वापर करून देव्हारा सजवला. त्या समोर मोती लावलेल्या हळद, कुंडाच्या वाट्या ठेवल्या. समई, निरांजन वगैरे इतर मांडणी केली. त्या सजावटीचा फोटो-

!! श्री गणेश !!

आणि हा आहे पूजा,आरती,नैवेद्यार्पण झाल्यानंतरचा फोटो -

पूजा  झाल्यानंतर

खिर,पुरण,चटणी, कोशिंबीर, साधे वरण, भात, दहीभात, आमटी, पोळी, बटाटा भाजी आणि कलाकंद बर्फी (सर्व घरी केलेला) असा नैवेद्य आमच्या बाप्पाला आवडला असेल अशी आशा वाटते. तो सुख कर्ता, दु:ख हर्ता असाच पाठीशी राहो आणि आमची सेवा मान्य करून घेवो ही त्याच्या चरणी प्रार्थना.

मंगलमूर्ती मोरया.

विटेकर's picture

11 Sep 2013 - 3:51 pm | विटेकर

साधी पण मनोहारी सजावट आहे ,, मला ही अशीच साधी सजावट आवडते उगाच् लायटींग केले की बाप्पा लांअब जाऊन बसलेत असे वाटते.

पैसा's picture

10 Sep 2013 - 8:06 pm | पैसा

बुवांची रांगोळी आणि आतापर्यंत आलेले सगळे गणपतीबाप्पा मस्तच!

मीनल, गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीच्या सजावटीबद्दल एक खास धागा वाचायला आवडेल!

मुक्त विहारि's picture

10 Sep 2013 - 8:18 pm | मुक्त विहारि

सुपारी गणपती असतो.

त्याची आरास नसते.

तो फोटो टाकला तर चालेल का?

एच्टूओ's picture

10 Sep 2013 - 8:32 pm | एच्टूओ

पहिल्यांदाच ऐकतोय...पहाण्यास उत्सुक. नक्कीच टाका..!!

मीनल's picture

10 Sep 2013 - 8:53 pm | मीनल

सजावटी मुळे घरात उत्सवाचे वातावरण निश्चितच तयार होते.
सुपारीची आरास कशी करणार? पण सजावटीची हौस असते. म्हणून आम्ही ही एकरंगी मूर्ती दरवर्षी केवळ दर्शनीय रूप म्हणून ठेवतो. तिथेच सजावट करतो. समोर सुपारी मांडून तोच गणपती मानून त्याची यथासांग पूजा करतो. आता पर्यंत विसर्जन ही केवळ सुपारीचे करत होतो. परंतु आता जवळच्या वाहत्या नदीत विसर्जन कठिण होत आहे. सतत पहारा करणारी पोलिसांची गाडी, आजूबाजूचे कॅमेरा आणि कायदा भंगाच्या दंडाच्या सूचना या मुळे ह्या वर्षी पासून बादलीतील पाण्यात सुपारीचे विसर्जन होईल. आणि मग ती सुपारी तुळशीच्या कुंडीत ठेऊ.

हेच म्हणते मीनलताई, मीही बादलीतील पाण्यात विसर्जन करणार आहे. आमच्याकडे दीड दिवसांचे गणपती असतात. लगेच बादलीत ठेवायला वाईट वाटत असल्याने जागेवरून थोडे हलवून तसेच ठेवलेत. मनाची तयारी झाल्यावर विसर्जन करणार.

केदार-मिसळपाव's picture

11 Sep 2013 - 6:13 pm | केदार-मिसळपाव

आम्ही दर वर्षी लाकडी गणेश मुर्ती ची प्रतिष्ठापना करतो त्यामुळे पाण्यात विसर्जनाचा प्रश्णच येत नाही. विसर्जन करायचे म्हणजे गणपती आसनावरुन उचलुन त्याच्या नेहमीच्या जागी (एक छोटे मंदिर केले आहे) नेउन ठेवायचा...पुढ्च्या वर्षापर्यंत.

तुमचा अभिषेक's picture

10 Sep 2013 - 9:39 pm | तुमचा अभिषेक

आतापर्यंतचे सारेच बाप्पा छान.. :)

थर्माकोलच्या मकरापेक्षा फुलाफुलांची सजावट नेहमीच भावते.. हे वैयक्तिक मत, अन्यथा आमच्याकडेही जेव्हा बाप्पा असायचे तेव्हा बरेचदा थर्माकोलचे जोडलेले तुकडेच असायचे..
बाकी आता या स्पर्धेसाठी एलिजिबल नाही याचे खूप वाईट वाटतेय.. :(

आश's picture

10 Sep 2013 - 11:41 pm | आश

g1

g2

प्रचेतस's picture

11 Sep 2013 - 9:03 am | प्रचेतस

_/\_

जेनी...'s picture

11 Sep 2013 - 10:22 am | जेनी...

मान गये यार तुमको तो ......
याला म्हणतात स्पर्धेत उतरणं .... सुप्पर लाइक

गणपती बाप्पा मोरया !!!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Sep 2013 - 10:31 am | डॉ सुहास म्हात्रे

तुमचा बाप्पा तर चक्क आताच विजेता मोदक हातात घेऊन विजयोत्सव साजरा करतोय की !

केदार-मिसळपाव's picture

11 Sep 2013 - 1:00 pm | केदार-मिसळपाव

एकदम मस्त...

यसवायजी's picture

11 Sep 2013 - 8:38 pm | यसवायजी

बोल्ट रावांकडुन घेतली का प्रेरणा?
आज काल बाप्पाला क्काय-काय सहन करावं लागतं रे बाबा..

sa

जेनी...'s picture

11 Sep 2013 - 10:42 pm | जेनी...

=))

आमच्या घरचा गणपती.....बाप्पा मोरया!!!

G1

G2

सोबर ... सुबक ... सुंदर सजावट .... गणपती आवडला !

sneharani's picture

11 Sep 2013 - 3:08 pm | sneharani

आमच्या घरचा खराखुरा मातीचा गणपती अन त्याची साधीशी त्याला साजेल अशी सजावट

ga1

ga2

यशोधरा's picture

12 Sep 2013 - 8:47 am | यशोधरा

मस्त!

अभ्या..'s picture

11 Sep 2013 - 3:23 pm | अभ्या..

मला एक शंकाय.
परीक्षक कोण आहेत?
म्हणजे निकष काय आहेत सजावट सुन्दर म्हणायला?
इको फ्रेंडली की फ़क्त बाजारु चान चान?
की फ़क्त फोटोजेनिक?
कुणाला नावे ठेवण्याचा उद्देश नाही पण स्पर्धा आहे म्हणून इचारले ;-)

काळजी करू नका. सगळे स्पष्ट केले जाईल.

llपुण्याचे पेशवेll's picture

12 Sep 2013 - 10:17 am | llपुण्याचे पेशवेll

निकष? ते कोणाला जिंकवायचं त्याच्यावर अवलंबून असते. ;)
ह.घ्या. उगा काड्या करायला लिहीले आहे.

किसन शिंदे's picture

12 Sep 2013 - 12:07 pm | किसन शिंदे

अभ्या,

स्पर्धेसाठीचे निकष हे फक्त तू सजावट कशी केलीयेस याच्यावर आहेत, मग ती इकोफ्रेंडली असो किंवा आणखी वेगळ्या तर्‍हेची. गणपतीभोवती कलात्मकतेने केलेल्या सजावटी बरोबर घरी बनवलेल्या सुंदर आणि कलात्मक मखरांचाही या स्पर्धेसाठी विचार केलाही जाईल. परिक्षणाची जबाबदारी काही जेष्ठ मिपाकर पाहत आहेत.

चौकटराजा's picture

11 Sep 2013 - 6:55 pm | चौकटराजा

.
.
यावर्षी देशाची आर्थिक घसरण होत असल्याने काटकसरीचा मेसेज आमच्या पुढच्या पिढीला देण्यासाठी वरील प्रकारे सजावट केलीय. मखरासाठी जुन्या लग्न पत्रिकांचा वापर केला आहे. मागचा गुलाबी पडदा हा जुन्या तलम ओढणीतून विरळ झालेला भाग बाजूला करून उरलेला भाग वापरलेला आहे. तो ज्याच्यात अडकविला आहे ती धातूची नळी जुन्या वाकलेल्या अ‍ॅल्युमिनियमच्या हँगर पासून बनविली आहे. बाप्पाचा मुकुट त्यावरील चमकते खडे सर्व जुन्या वापरलेल्या वस्तूंपासून मिळवले आहेत.लोडात दोरा संपलेली रिळे टाकून त्यावर कापूस गुंडाळला आहे. व जुन्या जॅकॉर्ड साडीचा तुकडा खोळीसाठी वापरला आहे. बाप्पाचा प्रसाद मात्र ताज्या मालापासून बनविला आहे.

खटपट्या's picture

12 Sep 2013 - 3:50 am | खटपट्या

पहील्या चीत्रातील प्रकाश योजना आवडली

सर्वच स्पर्धकांचे फोटो आवडले ! :)
@आत्माराव :- रांगोळी लयं भारी !
@मृत्युन्जय :- मोराची आणि कोयरीची नक्षी सुरेख आहे. :)
@जय - गणेश :- काळ्या पार्श्वभुमीवर फिरणारे रंग सुंदर दिसत आहेत.
@केदार-मिसळपाव :- अशी समई पहिल्यांदाच पाहिली.
@अनन्न्या@:- दुसरा फोटो आवडला,बाप्पा आणि मखर दोन्ही गोड.
@मीनल :- देव्हार्‍याची नाजुक सजावट आवडली. बाप्पा समोरची उदबत्ती "मसाला" श्रेणीतली वाटते. मला स्वतःला मसला उदबत्तीच आवडते,आणि सेंटेड मी कधीच घेत नाही. उदबत्यांमधे मला म्हैसुर किंग आणि वुड्स फार आवडते.
@आश :- जबराट ! :)
@gaikiakash :- मस्त.
@sneharani :- फुलचामधला छोटासा बाप्पा आवडला. :)
चौकटराजा :- खरयं ! मंदीचा परिणाम जाणवण्या इतपत वातवरण आहे खरे. बाप्पाची मूर्ती आवडली.

प्यारे१'s picture

12 Sep 2013 - 3:40 am | प्यारे१

छान उपक्रम.

सग्गळेच 'गणपती' आवडले, सजावटींसकट!
(आशचा गणपती डाएटवर नि स्नेहाराणी चा गणपती फुलांनी झाकला गेला असल्याने 'गुप्त' दिसतोय. उसेन बोल्टला सोंड नसल्यानं त्याला गणपती मानत नाहीये. ;) सग्गळ्या फोटोंचा विचार केल्या गेला आहे. :) )

दीपा माने's picture

12 Sep 2013 - 4:09 am | दीपा माने

सर्वच गणपती सुंदर आणि सजीव वाटतात. आपल्या मनातल्या भावाप्रमाणे ते आपल्याला दिसतात. माझ्यामते सर्वच स्पर्धक विजयी आहेत.

स्पंदना's picture

12 Sep 2013 - 7:23 am | स्पंदना

1
3
4
बरीचशी सजावट (फुलांची) मुलीने केली आहे.

सस्नेह's picture

12 Sep 2013 - 8:11 am | सस्नेह

a
a
एक शिक्रेट सांगते. ते महिरपीचे खांब आहेत ना ? ते म्हणजे चक्क मच्छरदाणी स्टँड आहे !

जोशी 'ले''s picture

12 Sep 2013 - 9:40 am | जोशी 'ले'

माझा बाप्पा...
a

a

a

a

थर्माकोल वापरुन हि बाप्पा ची सजावट केलीय व मेटॅलीक पेस्टल कलर्स वापरलेत :-)
बाप्पा मात्र इकोफ्रेंडली आहेत :-)

सहिये एकदम .... आवडली सजावट !

केदार-मिसळपाव's picture

12 Sep 2013 - 1:08 pm | केदार-मिसळपाव

छान आकार दिलाय..प्रत्यक्ष बघतांना अधिक सुंदर दिसत असेल फोटोत दिसतोय त्याच्यापेक्षा हे मात्र नक्की सांगु शकतो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Sep 2013 - 5:03 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर !

सुमीत भातखंडे's picture

12 Sep 2013 - 9:52 am | सुमीत भातखंडे

आहेत सजावटी.
सर्व स्पर्धकांना शुभेच्छा!

गणपती बाप्पा मोरया!!!

अमोल केळकर's picture

12 Sep 2013 - 12:56 pm | अमोल केळकर

एकापेक्षा एक , मस्तच :)

सर्वांना ( बाप्पांना ) साष्टांग नमस्कार !

अमोल केळकर

विटेकर's picture

12 Sep 2013 - 3:31 pm | विटेकर

Sajaavat 2013

Varad Murti

सारी सजावट घरीच केली आहे. मगचे मोर थर्माकोलचे विकत आणले आहेत. माझ्यापेक्षा सहधर्मचारिणीचा सहभाग जास्त आहे.. माझा आपला खारिचा वाटा !

दादा कोंडके's picture

12 Sep 2013 - 4:22 pm | दादा कोंडके

असल्या अंधश्रद्धांना खतपाणी घालणार्‍या संपादक मंडळाचा निषेध!

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Sep 2013 - 5:04 pm | डॉ सुहास म्हात्रे

गणपती बाप्पा मोरया !

दादा कोंडके's picture

12 Sep 2013 - 5:20 pm | दादा कोंडके

गणपतीच्या बैलाला उंदराला हो!!!

जेनी...'s picture

12 Sep 2013 - 6:59 pm | जेनी...

गणपती बाप्पा मोरया !!!!!

दादा कोंडके's picture

12 Sep 2013 - 7:41 pm | दादा कोंडके

" सबका पती ' पती ' :) ... तेरा परी ' गणपती ' :P "

पैसा's picture

12 Sep 2013 - 7:56 pm | पैसा

गणपतीबाप्पा मोरया!

दादा कोंडके's picture

15 Sep 2013 - 11:33 am | दादा कोंडके

आता पार्वतीकाकूच अल्या की! ;)

अभ्या..'s picture

15 Sep 2013 - 2:24 pm | अभ्या..

पारवतीच्या बाळा
तुझ्या पायात वाळा ;)

स्मिता चावरे's picture

12 Sep 2013 - 5:22 pm | स्मिता चावरे

ganapati1

ganapati2

ganapati3

केदार-मिसळपाव's picture

12 Sep 2013 - 6:27 pm | केदार-मिसळपाव

कमळ सुंदर झाले आहे.

सुधीर's picture

15 Sep 2013 - 1:59 pm | सुधीर

कमळ सुंदर आहे. इतर मिपाकरांचेही फोटो आवडले.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Sep 2013 - 6:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आनंद वाटतोय सर्वांच्या सजावटी पाहतांना.

-दिलीप बिरुटे

विकास's picture

12 Sep 2013 - 7:20 pm | विकास

१००% सहमत! खुपच सुंदर! सर्वांचेच (त्यात असे उत्साही भक्त मिळाले म्हणून बाप्पा पण आले :) ) अभिनंदन!

विकास's picture

12 Sep 2013 - 7:20 pm | विकास

आता गौरीपण आल्या! खुपच छान!

दादा कोंडके's picture

12 Sep 2013 - 7:43 pm | दादा कोंडके

खुपच छान!

सहमत.

- (गणपतीत 'गौरी' बघायला जाणारा) दादा

या वर्षी घरी काही बनवायला वेळच नाही झाला. मग बाहेरून तयार मखर आणले. गणपती बाप्पा सधिभोळी भक्ती मानून घेओत ही प्रार्थना.

जाम धमाल येतेय सर्वांच्या घरच्या गणपतींचे दर्शन घेऊन

अजया's picture

12 Sep 2013 - 10:53 pm | अजया

आमच्याकडे मखर करण्याची पद्धत नाही. त्यामुळे साधीशीच सजावट आणि लायटींग केले जाते!.

जेनी...'s picture

13 Sep 2013 - 10:03 am | जेनी...

सुंदर :)

काय मस्त वाटतय पहायला. माझ्या मुलांना दाखवते. मग पुढच्या वर्षी बक्षीस माझ्च.
ए अभ्या....टाक की फोटो लवकर किती वाट पहायची ते?

आमच्या बाप्पाला बंदिस्त राहणं आवडत नसल्यामुळे मखर किंवा सजावट नसते. फक्त फुलांची आरास करतो.
q

d
गौराई..

df

नानबा's picture

13 Sep 2013 - 9:53 am | नानबा

आमचे बाप्पा, गौरी आणि त्यांची सजावट संपूर्णपणे इको फ्रेंडली असते. बाप्पांची मूर्ती संगमरवरी असल्यामुळे विसर्जन केलं जात नाही. उत्तरपूजेनंतर स्वच्छ करून झाकून ठेवली जाते आणि पुढच्या वर्षीच बाहेर निघते. गौरींच्या बाबतीत तेच. पितळी मुखवटे आणि मातीची सुगडं यापैकी कशाचंही विसर्जन होत नाही. प्लॅस्टीक आणि थर्माकोलचा सजावटीत वापर शून्य. या दिवसांत जमा होणारं निर्माल्य एकत्र करून घरातल्याच एका मोठ्या कुंडीत मातीत दाबून टाकतो. काही महिन्यांत त्याचं खत बनतं जे गॅलरीतल्या झाडांमध्ये टाकतो... पर्यावरणाचा कमीत कमी र्‍हास होईल याची काळजी घेतली जाते.. :)

किसन शिंदे's picture

13 Sep 2013 - 11:59 pm | किसन शिंदे

स्पर्धेसाठी अभ्याने पाठवलेला फोटो

1

अभ्या..'s picture

14 Sep 2013 - 1:38 am | अभ्या..

आभारी आहे किसना.
नेट चा थोड़ा प्रॉब्लम असल्यान इमेज अपलोड करता येत नव्हती. :-(
हे फ्लेक्स प्रिंट्स मधील वेस्ट वापरून केले आहे. श्री अम्बाबाई चे चित्र नसून त्रिमीत आहे. मूर्तीच्या चित्राला दागिने व् साडी नेसवली आहे. मागील प्रभावल अशाच एका फ्लेक्स मधील तुकडा वापरून केली आहे. बॉक्स आहेत ते रद्दी कंटेनर वापरून त्यावर जादा झालेली फ्लेक्सची इंक रंग म्हणून वापरली आहे. आवश्यक तिथे प्रिंट मतेरिअलचा वापर केलाय जे मला सहज उपलब्ध असते.