user

अभिनंदन

प्राजक्ता पटवर्धन यांचे अभिनंदन!

मध असला की मधमाध्या गुणगुणतात, सुवास आला की भुंगे घोंघावतात आणि गुण दिसले की गुणग्राहक जमतात! या उक्तीचा प्रत्यय नुकताच पुण्यात आला, ख्यातनाम कवियत्री आणि मिसळपाव, मी मराठी आदि संस्थळांच्या सदस्या प्राजक्ता पटवर्धन यांच्या अल्बमच्या प्रकाशनाच्या निमित्ताने.

मुळातच प्राजक्ता पटवर्धन या प्रतिभावंत कवियित्री. मिसळपाव, मी मराठी आदि संस्थळावरच्या रसिक वाचकांची त्यांच्या कवितांना आधीच भरभरुन दाद मिळालेली आहे. विविध संस्थळांचे मालक, संपादक आणि समस्त जालकरी मंडळींचा समर्थ पाठिंबा देखील त्यांना सतत मिळत असतोच. नुकताच त्यांचा फुलांची आर्जवे हा कवितासंग्रह प्रकाशीत झाला आणि आता त्यांच्या कविताचा अल्बमदेखील बाजारात आला आहे. या अल्बमच्या प्रकाशन सोहळ्याचा इत्यंभुत, सविस्तर आणि सचित्र वृत्तांत मिसळपावचे संपादक बिपिन कार्यकर्ते यांनी त्यांच्या खास शैलीत सोहळ्यानंतर लगेचच दिला होताच.

आंतरजालावर रमणार्‍या प्राजक्ता पटवर्धन यांचे समस्त जालकर्‍यांनी जे कौतुक केले ते तसे अपेक्षितच होते. परंतु या सोहळ्यानंतर प्राजक्ता पटवर्धन यांचे जे कौतुक विविध भाषिक वृत्तपत्रांमधे छापुन आले ते पाहुन कुण्याही जालकर्‍याची छाती अभिमानाने फुलेल यात अजिबात शंका नाही.

आज प्राजक्ता पटवर्धन या अक्षरशः पेज थ्री सेलिब्रिटी झालेल्या आहेत. मराठी वृत्तपत्रांनी त्यांच्याबाबत लिहिले आहेच पण अगदी भाषेची दरी लीलया ओलांडुन त्यांच्या कवितांनी एरव्ही एतद्देशीय भाषिक साहित्याकडे उपमर्दानेच पाहणार्‍या इंग्रजी वृत्तपत्रांवर देखील गारुड घातलेले आहे. विविध वृत्तपत्रांनी याविषयाची दखल अशी घेतलेली दिसते:

१. सकाळ ( २० जुलै २०१० )

---------------------------------------------------------------------------------------------------------------
२. पुढारी ( २० जुलै २०१० )

----------------------------------------------------------------------------------------------------------------
३. प्रभात ( १९ जुलै २०१० )

------------------------------------------------------------------------------------------------------------------
४. लोकसत्ता ( २१ जुलै २०१० )

-------------------------------------------------------------------------------------------------------------------
५. लोकमत ( १९ जुलै २०१० )

-------------------------------------------------------------------------------------------------------------------
६. केसरी ( २२ जुलै २०१० )

------------------------------------------------------------------------------------------------------------------
७. डी एन ए ( इंग्रजी वृत्तपत्र ) ( २२ जुलै २०१० )


या सर्व फोटोंचे संकलन येथेही पाहता येईल
.

******* महाराष्ट्र सरकारचे हार्दिक अभिनंदन *******


पुरुषमुक्ती चळवळीचा विजय असो! आजच्या सकाळ मधली ही बातमी वाचा!!

कायद्याचा गैरवापर कारणा-या मूर्ख स्त्रीया आणि त्यांचा कळवळा असणारे मूर्ख वकील यांचे नाक आता ठेचले जाईल.

"498'चा गैरवापर गृहविभागाने केला मान्य
-
Saturday, July 24, 2010 AT 01:03 AM (IST)
Tags: nagpur, police, vidarbha

नागपूर - "पती वा सासरच्या मंडळींकडून छळ होतोय', अशी साधी तक्रार जरी पोलिस ठाण्यात नोंदविली की कुठलीच चौकशी न करता सासरकडील मंडळींच्या हातात बेड्या पडायच्या; मात्र या छळासाठी लावण्यात येणाऱ्या "498 (अ)' कलमाचा गैरवापर मोठ्या प्रमाणात वाढला असल्याचे शासनाच्या गृहविभागाच्या लक्षात आले. हा गैरवापर टाळण्यासाठी या विभागाने एक परिपत्रक काढून पोलिस विभागाला काही सूचना दिल्या आहेत. यापुढे शहानिशा, चौकशी व तपास होईल. तक्रारीत तथ्य असेल तरच सासरच्या मंडळींवर कारवाई होईल.

"498 (अ)' अंतर्गतचा गुन्हा हा दखलपात्र व अजामीनपात्र आहे. महिलेस क्रूर वागणूक देण्याच्या घटनेशी प्रत्यक्ष संबंध नसलेल्या नातेवाइकांवरही या कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे प्रमाण वाढत असल्याची; तसेच या कायद्याचा गैरवापर होत असल्याची बाब गृहविभागाच्या निदर्शनास आली. याबाबत कोणती दक्षता घेण्यात यावी याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्देश आणि इतर आवश्‍यक तरतुदी निदर्शनास आणून यासंदर्भात ठोस कार्यवाही करण्याची आवश्‍यकता व्यक्त केली.

498(अ) दाखल करण्यापूर्वी...
-वैवाहिक मतभेदासंबंधीच्या तक्रारीबाबत पती किंवा पतीच्या नातेवाइकांनी क्रूर वागणूक देण्याच्या प्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यानंतर प्रथम दोन्ही पक्षांना समुपदेशन करण्यात यावे. त्यांच्यातील मतभेद सामोपचाराने मिटविण्यास प्रवृत्त करण्यात यावे. हे प्रयत्न असफल झाल्यानंतरच प्रकरणाचे गांभीर्य पाहून 498(अ) अंतर्गत प्रकरण योग्य ठरत असल्यास कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

पीडित महिलेकडून तक्रारअर्ज प्राप्त झाल्यानंतर आरोपीस वॉरंटशिवाय तत्काळ अटक न करता प्राथमिक चौकशी करण्यात यावी. चौकशीत काही तथ्य आढळल्यास आवश्‍यकतेनुसार 498(अ) अथवा अन्य कायद्यांतर्गत अटक करण्यात यावी.

प्रत्येक पोलिस ठाण्यात उपलब्ध मनुष्यबळातून महिलाकक्ष निर्माण करण्यात यावा. अशा तक्रारींवर या कक्षामार्फत कारवाई करण्यात यावी. पोलिस आयुक्तालय वा पोलिस अधीक्षक क्षेत्रासाठी निर्माण करण्यात आलेल्या महिला सहायता कक्षाच्या माध्यमातून या तक्रारींचे निरसन करण्यासाठी मदत घेण्यात यावी.

कौटुंबिक हिंसाचारग्रस्त व पीडित महिलांच्या समुपदेशनासाठी महिला व बालविकास विभागामार्फत राज्यात सध्या पोलिस ठाण्याच्या आवारात 20 महिला समुपदेशन केंद्र सुरू आहेत. त्या धरतीवर उर्वरित जिल्ह्यांतही महिला व बालविकास विभागाने पोलिस ठाण्याच्या आवारात अशी केंद्र सुरू करावीत. या केंद्रांसाठी लागणारी जागा व आवश्‍यक कार्यालयीन सोयी-सुविधा संबंधित ठाण्यामार्फत पुरविण्यात याव्यात, असे निर्देश गृहविभागाने पोलिस प्रशासनाला दिले आहेत. गृहविभागाचे उपसचिव सु. ग. सोनवणे यांच्या स्वाक्षरीचे हे परिपत्रक संबंधित विभाग व पोलिस प्रशासनाला पाठविण्यात आले आहे.
दरम्यान, या कायद्याविरोधात सेव्ह इंडिया फॅमिली फाउंडेशनने (एसआयएफएफ) वेळोवेळी पाठपुरावा केला होता.

http://72.78.249.124/esakal/20100724/5136408206711286657.htm

नविन कथासंग्रह

मंडळीनमस्कार,

हल्लीमिसळपावचा साहित्य क्षेत्रात उमटलेला ठसा जसा प्राजुच्या कविता संग्रहान रेखीव झाला तसाच आणखी एक ठसा उमटला आहे आपल्या सहप्रवासी अरुण मनोहरांच्या कथा संग्रहाचा!! या बद्दल माहिती मिळाली.
अरुण मनोहर हे थोडस लांबुन पाहिलेल व्यक्तिमत्व. एकतर वयान ते जेष्ठ!! आणि सर्व कार्यक्रमात त्यांचा असलेला पुढाकार!

सिंगापुरच्या मराठी साहित्यिक क्षेत्रात, अरुण मनोहर हे नाव माहित नसलेली व्यक्ती विरळच! अतिशय परिश्रम पूर्वक उभारलेल्या 'शब्दगंध ' या कवितेला वाहिलेल्या उपक्रमाच्या पाच स्तंभांपैकी अरुण मनोहर हे एक! सिंगापुरातील हा उपक्रम पाच वर्षांहून अधीक काळ दर महिन्याला सुरू आहे.

नावाप्रमाणे अतिशय 'मनोहर' हसत मुख असं हे व्यक्तिमत्व! मुळचे नागपूरकर! तिथेच अभियांत्रिकी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यावर जगाच्या पाठीवर विविध ठिकाणी कामानिमित्य रहाण्याची संधी यांना मिळाली. अमेरिका, फ़्रान्स, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, हॉन्गकॉन्ग, जपान, ईंडोनेशिया, फ़िलीपाईन्स, कोरिया, आणि सिंगापूर इतक्या ठिकाणी वैविध्यपूर्ण संस्कृतींच्या सहवासातल वास्तव्य या कवी मनाच्या व्यक्तिमत्वावर उमटलं नसेल तरच नवल!! ते गेली दहा वर्षे मेट्रो रेलच्या संगणकी नियंत्रणाच्या विविध प्रकल्पांवर कार्यरत आहेत. १९८२ पासून पत्नी- चित्रा आणि दोन मुलांसह सिंगापूर मधेच स्थायीक! पण मुळची मराठी साहित्याची आवड अन मराठी मातीची नाळ कायम राखत ते अविरत महाराष्ट्र मंडळ अथवा शब्दगंध अशा विविध कार्यक्रमात कुटुंबासहित कार्यरत असतात. मिसळपाव व्यतिरिक्त त्यांच लिखाण दिवाळी अंक, नियतकालिके आणि इतर मराठी संस्थळांवर सुद्धा प्रकाशित झाल आहे. ithe

त्यांचापहिला कथा संग्रह, "रोजाक – एक गोपाळकाला", पुण्याच्या नंदिनी पब्लिशिंग हाऊस तर्फे प्रकाशित झाला आहे. १८ जुलाईच्या शब्दगंध कार्यक्रमात सिद्धहस्त लेखिका विद्युल्लेखा अकलुजकर ह्यांचे हस्ते उद्घाटन झालं. ithe

भारताच्या बाहेर राहून आलेले वैविध्यपूर्ण अनुभव त्यांनी या संग्रहात कथा रूपाने एकत्रित मांडलेले आहेत.

ithe

त्यांच्याच शब्दात सांगायचं तर," ह्या कथासंग्रहात मी बनवलेली सिंगापूरी मिसळ चोखंदळ वाचकांना चाखायला दिली आहे. वेगवेगळ्या चवींच्या १६ कथांचा हा "रोजाक" संग्रह आहे. सिंगापुरात "रोजाक" ही स्नॅकी डीश मिळते. गुणधर्माने ती आपल्या भेळ-मिसळला खूप जवळची आहे. माझ्या ह्या रोजाकमधे थोडा चायनीज व्हीनीगरचा शिपका, भारतातील तिखटागोडाची मिसळ, आणि कोरीयातील किमची देखील घातली आहे. जोडीला भविष्यकाळातले काही अफ़लातून फ़ुटाणे मिसळले आहेत. हे "रोजाक" किंवा गोपाळकाला रसिकांना आवडेल अशी आशा करतो."
एका

'मिसळपाव'करानी उमटवलेल्या या साहित्य क्षेत्रातला ठश्यानं आपला आनंद द्विगुणीत केल्या बद्दल ' अरुण मनोहर' यांचे हार्दिक अभिनंदन.

आम्ही : एका स्वप्नपूर्तीचे साक्षीदार

मराठी जालावर आल्यापासून जे काही लोक ओळखीचे झाले आहेत, जीवाभावाचे मैतर झाले आहेत, त्यात प्राजुचं नाव अगदी आवर्जून घ्यावं असं. मराठी आंतरजालावर जे काही लोक अगदी सातत्याने आणि चांगलं लेखन करतात त्यातही तिचं नाव अगदी अग्रणी आहे. तिच्या सुंदर कविता / गझला मराठी संस्थळांवर नियमितपणे प्रसिद्ध होत असतात. तर अश्या या आमच्या मैत्रिणीच्या कवितांचा एक अल्बम येऊ घातलाय ही बातमी कुठून कुठून कानी येतच होती. आता प्राजुचा स्वभाव माहिती असल्यामुळे हा अल्बम एकदम नीटनेटका आणि झकास होणार हे नक्की असे वाटतच होते. साधारण दीड दोन महिन्यांपूर्वी प्राजुच्या 'फुलांची आर्जवे' या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाला हजर रहायचा योग आला होता. तेव्हाच या अल्बमचा प्रकाशन सोहळाही लवकरच होणार आहे असे कळले होते. तेव्हा पासून या कार्यक्रमाची वाट बघणे चालू होते.

मध्यंतरी, प्राजुने हा सोहळा १८ जुलैला पुण्यात होणार आहे असे कळवले आणि बर्‍याच लोकांकडून 'या समारंभाला हजर राहू' अशा अर्थाचे निरोप मिळाले. या निमित्ताने प्राजुला प्रत्यक्षात भेटायची संधी मिळणार होती आणि आपल्या मैत्रिणीचे कौतुक करायला जातीने हजर रहायचेच असे तेव्हाच ठरवले. निरोप आले, निरोप दिले गेले. प्ल्यानिंग झाले आणि आम्ही १८ जुलैला सकाळी पत्रकार भवन, पुणे इथे जमलो. मी, अदिती, परा, पेठकर काका, राजे, चंद्रशेखर महामुनी, सोनाली घाटपांडे, प्रकाश घाटपांडे, मनिष, पुण्याचे पेशवे, दत्ता काळे, लिखाळ, शाल्मली, टार्‍या, राजेश घासकडवी, धम्या, अविनाश कुलकर्णी, श्रावण मोडक, मराठमोळा अशी दणदणीत उपस्थिती होती. प्राजु जातीने स्वागत करून गेली.

कार्यक्रम बरोब्बर १० ला सुरू होणार असल्याने बरेच लोक १०.३० पर्यंत आले. त्यामुळे आमच्या सारख्या टैमवर आलेल्या लोकांना जिन्यात उभे राहून धिंगाणा करायला वाव मिळाला. आल्यागेल्या लोकांवर लक्ष ठेवत, आम्ही जिन्यात गर्दी करून उभे होतो. एक दोन पुणेरी आज्यांनी आमच्याकडे थोडा जळजळीत कटाक्ष टाकून आम्ही लोकांना अडचण करतो आहोत हे आमच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला खरा. पण काही अस्सल पुणे-३० लोकही आमच्यातच असल्याने ते कटाक्ष रामानंद सागरच्या रामायणातल्या बाणांप्रमाणे मोडून पडले. शिवाय प्राजुच्या नात्यातले लोक सोडले तर एकगठ्ठा अशी आमचीच व्होटब्यांक असल्यामुळे प्राजु पण आमच्या दंग्याकडे कानाडोळा करून होती. ;)

कार्यक्रम १०.३० ला मात्र अगदी सुरूच झाला. कार्यक्रमाला बरेच ओळखीचे चेहरे दिसत होते. काही चेहरे टीव्ही आणि चित्रपटातून दिसणारे तर काही जालावर दिसणारे. बर्‍याच मराठी कार्यक्रमातून किंवा चित्रपटातून दिसणारे, प्रसिद्ध कलाकार श्रीरंग गोडबोले आणि नटरंग या चित्रपटाचे दिग्दर्शक रवि जाधव हे या कार्यक्रमाला अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते. कार्यक्रमाची धुरा मंजुश्री गोखले यांनी सांभाळली. सुरूवातीला प्रास्ताविक, पाहुण्यांचे स्वागत आणि त्यांचे दोन शब्द वगैरे झाले आणि कार्यक्रमाला खर्‍या अर्थाने सुरूवात झाली ती अल्बम मधल्या गाण्यांच्या आणि त्या गाण्यांवर केलेल्या सुंदर नृत्यांच्या सादरीकरणाने. पौलमी पेठे, अमृता काळे, मधुरा दातार, संगिता चितळे इत्यादी कलाकारांनी अल्बम मधली गाणी पेश केली. प्राजुनेही तिचे मनोगत व्यक्त केले. तिच्या आयुष्यातला एक अतिशय आनंदाचा क्षण ती आमच्या सर्वांबरोबर वाटून घेत होती... अतिशय भावनाविवश झाली होती. काय बोलू आणि काय नको असे झाले होते तिला. सगळ्या आभारप्रदर्शानात तिने आपणा सगळ्या जालिय मित्रमंडळींचे खास आभार मानले. त्यावेळी झालेला टाळ्यांचा कडकडाट (आम्हीच केलेला) सगळ्यात जास्त होता. ;)


प्राजुचे पती आणि अल्बमचे निर्माते जगदीश पाहुण्यांचे स्वागत करताना.


अमृता का़ळे


संगिता चितळे


पौलमी पेठे


प्राजु आणि जालिय मैत्रिण शाल्मली


नक्की किती मोठे व्हायचे त्याचे परिमाण सांगताना श्रावण मोडक आणि बाजूला आज्ञाधारक अभ्यासू लिखाळ भावोजी.


लिखाळ भावोजी की जान खतरे मे... द डेंजर बिहाइंड.


आधुनिक भरतभेट किंवा शिवाजी-अफझलखान भेट.


अवघडलेल्या अवस्थेतही जीवाच्या भितीमुळे बळंच कसं हसावं याचा वस्तुपाठ देताना परा


शूर‍ आम्ही सरदार.... बाजीराव पेशवे (पहिले की दुसरे ते अजून नक्की कळले नाहीये. माणूस बेरकी आहे. कळू देत नाही.)


हात जायबंदी करून घेताना प्राजु...


पुणेरी इंगा बघितलेला राजेश घासकडवी पुणेरी इंगा दाखवणार्‍या परा बरोबर...


आम्हाला काय ब्वॉ कोणी नेलं नाही कधीच समर्थ भोजनालयात, म्हणून मग आम्हीच गेलो आणि फोटो काढून हौस भागवली. मागे आमचे आधारस्तंभ (पहिले का दुसरे) बाजीराव ऊर्फ पुण्याचे पेशवे. कोपर्‍यात अर्धा मराठमोळा आणि मागे (काकूंना घाबरून) तोंड लपवत पेठकर काका.



ऑटोग्राफ घ्यायच्या निमित्ताने पुढे पुढे करताना परा, मनिष, आदिती आणि आपल्याला हे असं का नाही सुचत या विचाराने व्यथित टार्‍या.

एकंदरीत कार्यक्रम सुरेखच झाला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हाला सगळ्यांनाच भेटता आले बर्‍याच दिवसांनी. शिवाय या निमित्ताने काही जालिय भरतभेटी झाल्या, जुने मित्र परत भेटले. आपुलकीने चौकशी झाली, विचारपूस झाली. मजा आली. काही लोकांना जायची घाई असल्याने ते पळाले. आमच्या सारखे काही निरूद्योग लोक आता एकत्रच जेवू म्हणून एका हाटेलाकडे प्रयाण करते झाले. तिथेही दंगा झालाच भरपूर.


विचारविनिमय.


नंतर म्हणत होता टार्‍या की हेल्मेट सोडून देणार होता... एका फटक्यात काम तमाम.


टार्‍या त्याच्या खेळण्याबरोबर.


भाळी चंद्र असे धरिला... वडारवाडी तालुका कृषि उत्पन्न बाजार समितीचे धडाडीचे तरूण नेतृत्व धमालदादा बारामतीकर देशमुख


विद्वज्जनांना अन्नदान केल्याचे पुण्य मोजताना पेठकर काका.



संध्याकाळच्या बैठकीचे नियोजन करताना मंडळी. पेठकर काकांच्या आधाराने (कसाबसा) उभा असलेला राजे. ;)

***

प्राजुच्या निमित्ताने असेच अजून बरेच प्रसंग आम्हाला उपभोगायला मिळो हीच इच्छा. कीप इट अप, प्राजु. :)

सायना नेहवालचे अभिनंदन

सायना नेहवालने इंडियन ओपन, सिंगापूर ओपन आणि इंडोनेशियन ओपन (पैकी शेवटच्या दोन मागच्या एकाच आठवड्यात) अशा सलग तीन सुपर सीरीज जिंकून भारताची मान उंचावली त्याबद्दल हार्दिक अभिनंदन. खुट्ट झालं तरी त्या सवंग सानिया मिर्झाला प्रसिद्धी देणारी भारतीय माध्यमे गुणी, सिन्सिअर आणि मेहनती सायनाला देखील सध्या बर्‍यापैकी स्पेस देत आहेत हे पाहून आनंद होतो आहे. कालची मॅच ज्यांना पाहायला मिळाली ते भाग्यवान. आपले जे. पी. मॉर्गन सायनावर कधी लिहिणार याची वाट पाहतो आहे.

- बॅडमिंटनप्रेमी अप्पा

वटपोर्णिमेच्या शुभेच्छा


(चित्र जालावरुन साभार.)
वटपोर्णिमेच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.
मला अतिशय आवडणारा समयोचित श्लोक "सौन्दर्य लहरी" मधून -

विरिंचि: पंचत्वं व्रजति हरिरप्नोति विरतिं
विनाशं कीनाशो भजति धनदो याति निधनम|
वितन्द्री माहेन्द्रीविततिरपि अंमीलीत्-दृशा
महासंहारेSस्मिन विहरति सति त्वत्पति-रसौ||२६||

महा संहाराच्या समयी विरंची (ब्रम्हा) हा पंचतत्वामधे विलीन होतो. किनासा(यम, प्रत्यक्ष मृत्यूचा देव) मृत्यू पावतो.कुबेर, धनाच्या देवतेचा अंत होतो. इंद्र त्याच्या समस्त देवगणांसमवेत या संहार समयी डोळे मीटतो. परंतु हे सती अशा महासंहार काळी तुझा केवळ तुझा पती (सदाशिव) विहार करतो, क्रीडा करतो.

*कवीने पार्वतीच्या सौभाग्याची स्तुती वरील कडव्यात गायली आहे.

आनंदाची बातमी

अभिनंदण होSSSSSSSSSSSSSSSS
गोंद्या आला रे आला
गुड न्युज रे ..धमाल 'बाबा'??


ऐ कोण आहे रे तिकड जा जा हत्ती वरुन साखर्‍या वाटा बारा- गुंजण मावळात , तळ कोकणात तोफांची सलामी द्या

धमाल रावांच युवराज आले म्हनाव कळु दे जरा लोकांना

आमचे स्नेही व मित्र श्री धमाल मुलगा ह्यांना मुलगा झाल्याची गोड बातमी कळाली !
धमाल मुलाचा धमाल बाबा झाला होSSSSSSSSSSSSSSSSSSSS

ब्लॉगवाले सावधान!

'फुगल'ने फतवा काढला आहे की,ज्या ब्लॉगवरच्या पोस्टना दहा दीवसापेक्षा जास्त वेळापासुन एकही प्रतिसाद मिळाला नाहीये व कधीच ज्या वाचल्या जात नाहीत/गेल्या नाहीत,त्या सर्व पोस्ट delete केल्या जातील.तेव्हा..............
ज्या मिपाकरांनी व त्यांच्या संबंधीत लोकांनी उगाच मोफत खरडायला मिळत म्हणुन जे पोस्ट,लेख(अर्थात फालतु हा शब्द कमी पडतो आहे) लिहले आहेत्,ते त्वरीत दुसरा एखादा बळी बघुन तिथे टाकावेत.उशीरा जाग आलेल्या,स्व:ताला अनुभवी लेखक/कवी समजणा-यांनी(त्यांचे गैरसमज वाढवणारे ही लेखकच/कवीच असतात,त्यांचा उद्देश हाच की आपला लेख कोणी माणुसकी म्हणुन वाचेल).......आपले ते पोस्ट स्वःताच कुठेतरी हलवावेत.
काहींनी ते लेख कविता,अनुभव्,व्ययक्तिक्,रोमॅन्टीक,विनोदी,संगणकविषयी अशी नावं देउन तडफडत ठेवले आहेत्,त्या लेखांवर आता फुगल दया करणार आहे.
काहींनी कोणच वाचत नाही म्हणुन 'माझ्या मनातल माझ्यासाठीच येथे लिहतो/लिहते' अस स्वःताचे सात्वन करणार काहीतरी लिहलय.कोणी त्याला 'जगाकडे बघायचा द्रुष्टीकोन' म्हणुन उगाच दुस-याच्या माथी मारल आहे व जागा भरली आहे.
काहींनी अर्थहीन कवीता सरळसरळ यमक जुळवता येतात फक्त म्हणुन लिहल्या आहेत्,त्या कवितांच्या चार-पाच ओळी वाचुनच कवीची दया येते.खराब प्रतिक्रीया देण्यापेक्षा दुर्लक्षित केलेल्या ब-या अस म्हणुन सोडल तर इतर कुठेही लिंक देउन छळतात.त्यांच्याकडुन चाललेल्या शोषणामधे कंपनीला भागीदार व्हायचे नाही,ह्याची दखल घ्यावी.
काहींनी व्ययक्तिक आयुष्यात घडलेल्या घटनांना दहापट वाढवुन सांगुन ज्या २-४ प्रतिक्रीया मिळाल्या म्हणून लेखांचा(अर्थात साफ खोट्या) भाडीमार लावला आहे तो बंद करावा.स्वःताच्या नावाला मदर तेरेसा,मायकल जॅक्सनचा दर्जा देउन .blogspot जोडले आहे,त्यामुळे आपण आपले विचार वहीत लिहावे,आमच्याकडुन अशा सुमार लिखाणाला ह्यापुढे जागा मिळेल अशी अपेक्षा ठेउ नये.
व्ययक्तीक स्वःताचे फोटो चढवण्यास आमची बंदी नाही,पण त्याखाली जे थोतांड लिहल गेल आहे त्यासाठीही आम्ही जागा पुरवणार नाही आहोत हे ध्यानात घ्यावे.आपला खोटेपणा आपल्या लिखाणाबरोबर तो आपल्या छायाचित्रातुनही जगापुढे येत असतो.आमच्या कंपनीच्या लोगोची प्रतिमा आम्ही ढासळु देउ शकत नाही.
comments (Innocent हे वाचुन देखील आपण कोणत्या प्रेरणेने खोट्,दर्जा गामवलेल लिखाण करतच
राहता ते शोधण्यात कंपनीला स्वारस्य नाही.पण comments (Innocent हे आम्हाला आमच्याकडुन दील्या गेलेल्या संकेतस्थळावरच्या जागेवर फार काळ सहन करता येणार नाही.आपण त्या comments (Innocent मधील शुन्य घालवावा,ते आपल्या इतक्या दीवसांत न जमल्याने आता ते काम आम्ही तो संबंध लेखच उडवुन करणार आहोत.आपण 'त्या अज्ञान प्रेरणा' घेउन दुसरीकडे लिहावे,कंपनीला मोफत जागेचा चांगला वापर हवा आहे.
आपण आम्ही आपल्याला एवढ्या दीवस समजुन घेतले(अ़क्षरक्ष: अथक प्रयत्नाने सहन केले) त्याप्रमाणे कंपनीच्या भावनेला समजुन घ्याल अशी अपेक्षा आहे.

Disclaimer :
*कंपनीचे नवीन धोरण अंमलात आणल्यानंतर ब्लॉगवरचे काहीजणांचे बरेचसे लेख मिटतील्,काहीजणांचे २-४ लेखच राहतील,तर काहींचे पुर्णच लेख मिटतील(अश्यांना नव्याने जागा दीली जाणार नाही व त्यांनी पुढे लिखाण करायचे की नाही ह्यावर विचार करावा,आपल्या लिखाणाचा दर्जा आपण वेगळीकडे लिहुन तसाच कायम ठेवा.कंपनीला त्यात काही स्वारस्य नाही).

व्ययक्तिक टीपणी :
ज्या प्रेरणेने आपण इतके दीवस 'तसल' लिखाण चालुच ठेवलत,त्या प्रेरणेला आमचा सलाम.पण 'फुगल'चा प्रामाणिक भागिदार म्हणुन आम्हाला हे पाउल उचलण अपरीयार्य होत.
आपल्यास 'फुगल'ने आतापर्यंत आपले म्हणने लिखाणाच्या रुपात अंतरजालावर लिहायला(दुस-यांना छळायला नाही) जागा दील्याबद्दल आपण कंपनीचे आभार मानावेत अस वाटत.पण कंपनीला समाजसेवा करण्यात काडीची उस्तुकता नाही,आपण आपले विचार इतरत्र मांडावेत व no comments ची सवय कंपनीला नाही,तेव्हा आपले चालु द्या.)

सउशानत १०२४,
फुलटाइम सल्लागार
- Foogle Corporation Limited.

धमालरावांना वाढदिवसाच्या शुभेच्छा ...

आज सकाळी उठलो आणि पहिल्याछुट आपण "पुण्यात" नसल्याचे लै दु:ख झाले.
मायला पुण्यात असतो तर काय दणका झाला असता की बोलायचे काम नाही.
काय ते भल्लेभल्ले होर्डिंग्स, पोश्टर्स, पेप्रात जैराती, केबल टीव्हीवर शुभेच्छांच्या क्लिपिंग्स वगैरे वगैरेचा दणका उडवला असता.

आज आमच्या मित्राचा वाढदिवस.
नव्हे नव्हे, आमच्या परममित्राचा आणि आंतरजालावरचे एक लोकप्रिय व्यक्तीमत्व व 'कट्टा स्पेशालिस्ट' श्री. श्री. श्री. धमालराव डोणजे पाटलांचा वाढदिवस.

त्यांना आमच्याकडुन वाढदिवसाच्या ह्या किंचित शुभेच्छा !!!

अवांतर :
ही केवळ पोच समजावी, बाकी सविस्तर लेख कम "धमालरावांचे व्यक्तिचित्र" लवकरच येत आहे ;)
आम्ही एकेकाळचे शिवसेनाप्रेमी असल्याने आजसुद्धा 'वाढदिवसाचा मुहुर्त' आम्ही शरसंधान करण्यासाठी वाया घालवत नाही :)

शनी, अवलिया, निखील आणी मकी

आत्ता काही वेळापुर्वीच एक गंमतीशीर योगायोग लक्षात आला.

आज शनी, अवलिया, निखील देशपांडे आणी मस्त कलंदर ह्या सर्वांचा वाढदिवस आहेत.

*देव पण काय काय दिवस दाखवणार आहे अजुन काय महिती ?*

असो..

तर ह्या सर्वांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Syndicate content
Scroll to Top