पुणे कट्टा वृत्तांत- ४ ऑक्टोबर २०१५
आमचे पेर्णास्त्रोतः भव्य आवाहन ~ दिव्य आवाहन ~ दो सोनार की इक लोहार की
आमचे पेर्णास्त्रोतः भव्य आवाहन ~ दिव्य आवाहन ~ दो सोनार की इक लोहार की
दिव्यश्रींच्या धाग्यावर जरा जास्तचं मारामारी झाली. असो. कट्टा फायनालाईझ झालेला आहे. कट्टा खालीलप्रमाणे होईल.
तारिख पे तारिखः ४ ऑक्टोबर २०१५
वेळः रविवारी पहाटे ११.०० वाजता
स्थळः पुण्यनगरीमधली पाताळेश्वर ही पावन जागा
कार्यक्रम: भेटणे, गप्पा हाणणे, खादाडी, गप्पा हाणणे, गप्पा हाणणे, खादाडी, गप्पा हाणणे, गप्पा हाणणे आणि टवाळक्या करणे
फायनान्स डिटेल्सः टी.टी.एम.एम.
कोण कोण येणारे ते इथे कन्फर्म करा. म्हणजे भोजनास कुठे जायचे हे ठरवता येईल. दुर्वांकुरला जायचं का?
(संपादकांना विनंती-४ तारखेनंतर धाग्यास हेवनवासी करावे. धाग्याकर्त्याला नको)
डिस्क्लेमर : मला फोटो काढता येत नसल्याने मी फोटो काढत नाही.
परवा ठरल्याप्रमाणे, कालचा "३८-बँकॉक-स्ट्रीट-घोडबंदर रोड ठाणे कट्टा" सुरळित पार पडला.
मी आणि सौ.मुवि, कळव्याला, मि.ट्का, ह्याच्या कडे गेलो.
टका आणि मोदक, मुंबईच्या वाहतूकीमुळे थोडे उशीराच आले.
मग टकाच्या गाडीतून कट्ट्याच्या ठिकाणी रवाना झालो.
कळवा ते घोडबंदर हा प्रवास मजल-दरमजल करत गाठला.सुदैवाने टकाच्या मातोश्रींनी वाटेत खायला म्हणून काजू दिले होते.आनच्या सौ.ने आणि मि.मोदक ह्यांनी काजू खात-खातच प्रवास पुर्ण केला.
मी आणि टका मात्र गप्पा-गोष्टी करण्यात दंग होतो.
नुकत्याच समजलेल्या बातमीनुसार, मिपाकर मोदक (हे लायन सो-सो, श्री-अमुक-तमुक. अशा चालीवर वाचले तरी चालेल.), सध्या मुंबई परीसरात असून ते कट्टा करायला तयार आहेत असे समजले.
जास्त पाल्हाळ न लावता, कट्ट्या संर्दभात माहिती देत आहे.
तारीख - १५-०९-२०१५
वेळ - रात्रीचे ८
ठिकाण - ३८, बँकॉक स्ट्रीट, ठाणे. (लिंक देत आहे.)
https://www.zomato.com/mumbai/38-bangkok-street-kasarvadavli-thane-west
उत्सवमुर्ती - मिपाकर मोदक
आयोजक - टका आणि मुवि
कालच्या रविवारी एका चित्रवाणी कार्यक्रमात उंच माझा झोका हा कार्यक्रम चालू होता तेव्हा एक बातमी अचानक आठवली. ‘पीटर ड्रकर चॅलेन्ज’ नावाची एक दरवर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर भरणारी निबंधस्पर्धा २०१५ या वर्षासाठी नुकतीच संपन्न झाली. या स्पर्धेत दरवर्षी जागतिक स्तरावरून निबंध सादर केले जातात. या वर्षी ही स्पर्धा मुंबईच्या कु. नमिता नारकर या मराठी मुलीने प्रथम क्रमांक मिळवून जिंकलेली आहे. स्पर्धेचा विषय होता ‘ह्यूमन डिफरन्सेस’. नोव्हेंबरमध्ये व्हिएन्ना येथे पारितोषिक वितरण समारंभ आहे.
1. आपले वाहन नेहमी रस्त्याच्या डाव्या बाजूने चालवावे. उजव्या बाजूने चालविल्यास डाव्या-उजव्यातला फरक आपल्याला कळत नाही अशी लोकांची समजूत होऊन आपले हसे होईल.
2. चौकात आल्यावर लाल रंगाचा वाहतूक दिशादर्शक दिवा दिसल्यास तो विझेपर्यंत आणि हिरवा दिवा लागेपर्यंत थांबावे. न थांबता पुढे गेल्यास आपल्याला लाल-हिरव्या रंगातला फरक कळत नाही अशी लोकांची समजूत होऊन लोक आपली टर उडवतील.
3. नियमांचा उल्लंघन करून वाहन चालविण्यामुळे पोलिसमामाने दंड केल्यास आपली फजिती कोणाला सांगू नये कारण सगळे आपली चेष्टा करून आपल्यावर हसतील.
मिपाला स्पर्धा आयोजनाचा मोठा इतिहास आहे. कथास्पर्धा, छायाचित्र स्पर्धा आदि स्पर्धा मिपाने वेळोवेळी आयोजित केलेल्या, करत असलेल्या स्पर्धांना भरभरून प्रतिसाद मिळतो आहे.
शतशब्दकथा स्पर्धेलाही अविस्मरणीय प्रतिसाद मिळाला. स्पर्धेसाठी आलेल्या तब्बल ८३ शतशब्दकथांमधून सहा कथा अंतिम फेरीसाठी निवडल्या गेल्या.
अंतिम फेरीसाठी स्पर्धक लेखकांनी आपल्या शतशब्दकथेचा सीक्वल लिहायचा होता. सहापैकी पाच स्पर्धकांनी सीक्वल लिहिले. वाचकांच्या मतांना आणि परीक्षकांच्या निवडीला समान महत्त्व देऊन अंतिम फेरीचा निकाल जाहीर करत आहोत.
सच्चे वरण ह्याचा अर्थ ’mageireména fakés / kalós fakés’ (ग्रीक शब्द) ", "gut Linsen (जर्मन शब्द)", "bien lentilles (फ्रेंच शब्द)" म्हणजेच "चांगले शिजलेले एकजीव झालेले वरण" असा होतो. प्रत्येक व्यक्तीला जेवणाची सुरवात चांगल्या वरणभाताने आणि शेवट चांगल्या ताकभाताने व्हावा असे वाटते. परंतु ते आपल्या हातात नसते. ’सच्चे वरण हवे’ असे अंथरूणाला खिळलेल्या आजारी व्यक्तीने सांगितले तरी घरातल्यांना ते पटत नाही.
http://www.misalpav.com/node/32108
छायाचित्रणकला स्पर्धा क्र.१२ : पाऊस: निकाल
नमस्कार मंडळी! बाराव्या स्पर्धेचा निकाल जाहीर करायला काही अपरिहार्य कारणाने उशीर झाला त्यासाठी क्षमस्व. निकाल जाहीर करताना अतिशय आनंद होत आहे. पाऊस हा तसा सोपा विषय होता मात्र पाऊस कमी झाल्याने की काय कोणजाणे, छायाचित्रे जरा कमी आली. पण तरी काही खूप छान छायाचित्रे बघायला मिळाली.
पहिला क्रमांक आला कपिलमुनी यांच्या छायाचित्राचा.
कोणत्याही नात्यामध्ये दोघांपैकी जो वजनाने मोठा असतो त्याचेकडून सतत डाएटिंगची आणि जास्त कामाची अपेक्षा केली जाते. केवळ वजनाने मोठा आहे म्हणून सगळ्यांचे त्याला ऎकून घ्यावे लागते व खाण्यापिण्याला आणि आरामाला मुरड घालावी लागते. पण हाच जाड्या असलेला व्यक्ती जेव्हा लुकड्याला एखादा उपदेश करतो, दोष दाखवतो, आज्ञा करतो तेव्हा मात्र लुकडा जर त्याचे ऎकत नसेल आणि जाड्याला योग्य तो मान मिळत नसेल तर मात्र त्या नात्याला एकतर्फी नाते म्हणता येईल.