विज्ञान
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ................?भाग - १० या इथे ही लेखमाला संपवत आहे.
Reprinted with permission from EnlightenNext magazine,
© 2005 EnlightenNext, Inc. All rights reserved. www.enlightennext.org
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - १
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - २
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ३
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ४
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ५
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ६
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ७
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ८
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ९
उपसंहार
हे लेखन आपण सर्वांनी वाचल्याबद्दल मी आपला आभारी आहे. हे वाचल्यामुळे हा विषय किती महत्वाचा व रंगतदार आहे हेही आपल्या लक्षात आले असेल.
मी हे सगळे लिहील्यावर माझ्या मनात विचार आला, कोण वाचणार आहे हे ? आणि जे वाचतील त्यांच्या मनात काय विचार येतील? त्यांना हे वाचल्यानंतर जे प्रश्न पडतील त्यांची उत्तरे मी देऊ शकेन का ? मी नाही देऊ शकलो, तर त्यांनी ती उत्तरे कुठून मिळवायची ?
मनाच्या खोलवर कप्यात मात्र मला असं वाटते आहे की युगानुयुगे जो चैतन्याचा शोध चाललेला आहे, त्याचा मी आणि तुम्ही एक छोटासा भाग आहे आणि हा शोध जोपर्यंत या विश्वात चैतन्य असलेल्या वस्तू असणार आहेत तो पर्यंत चालणार आहे, यात शंकाच नाही. माझ्या या प्रवासात जे अनुभव मला आले, त्या अनुभवांना सामोरे जाताना माझ्या मनात आणि मेंदूत बरीच उलथापालथ झाली. भौतिकवाद्यांबरोबर मी जास्त वेळ घालवला की मला त्यांचे म्हणणे पटू लागते आणि अध्यात्मावाद्यांबरोबर चर्चा केल्या तर मला त्यांचे म्हणणे पटू लागते. या सगळ्या वादांची आणि माझ्या जाणिवेची मोट बांधायची कशी हा माझ्या समोरचा अवघड प्रश्न आहे.
दोन्ही बाजूंची मते जरा बाजूला ठेवता येणे सहज शक्य आहे. भौतिकवाद्यांचे मत आहे की हे मन मेंदूचीच फलोत्पत्ती आहे. त्याच्या विरूध्द अध्यात्मवादी मनाला स्वर्गियत्व बहाल करून म्हणतात, मेंदूचा आणि मनाचा काही संबंध नाही. मला प्रामाणिकपणे वाटते की सत्य हे मधे कुठेतरी लपलेले आहे. पण कुठे आणि काय आहे ते ?
या शोधात माझे, तुमचे योगदान असायलाच पाहिजे.
सापडले तर मला खात्री आहे त्या उत्तराचा वापर करून अखिल मानवजातीला विनाशापासून निश्चितच वाचवता येईल.
मला खात्री आहे ! तुम्हाला ?.........
जयंत कुलकर्णी
भाग १० व लेखमाला संपन्न.
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ................?भाग - ९
Reprinted with permission from EnlightenNext magazine,
© 2005 EnlightenNext, Inc. All rights reserved. www.enlightennext.org
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - १
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - २
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ३
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ४
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ५
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ६
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ७
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ८
“जर मेंदूला ज्ञान देणार्या ज्ञानेंद्रियांची संख्या कमी केली तर त्या माणसाची ग्रहणशक्ती निश्चितच वाढेल या समजुतीने १९७० साली संशोधकांनी एक छोटी आणि साधी पध्दत शोधून काढली. एक माणूस, ज्याला आपण “पाठवणारा” म्हणूया आणि ज्याला पाठवले आहे त्याला “स्विकारणारा” म्हणूया. पाठवणार्याला एक प्रतिमा काही वेळ दाखवून त्याला ती प्रतिमा स्विकारणार्याला पाठवायला सांगितल्या गेल्या. (टेलीपाथीने). जो स्विकारणारा होता त्याची अगोदरच तयारी करून घेण्यात आली होती. दहाएक मि. त्याला बाकिच्या ज्ञानेंद्रियांपासून वंचित करण्यात आले आणि त्याला चार वेगवेगळ्या प्रतिमा दाखवण्यात आल्या. त्यातच एक जी पाठवली जाणार होती ती पण अंतर्भूत होती. जर योगायोगानेच ही प्रतिमा ओळखली जाते असे गृहीत धरले तर २५ टक्केच यश मिळाले असते. पण गेल्या तीस वर्षात हा प्रयोग तिन हजार एकशे वेळा वेगवेगळ्या प्रयोगशाळांतून करण्यात आला आणि त्यात ३२ टक्के यश मिळालेले आहे. सांख्यशास्त्राप्रमाणे ही बाब उल्लेखनीय आहे. परंतू विज्ञानाप्रमाणे हा एक लाखातला एक योगायोग असेच समजले जाईल. पण हे अनुमान एस्पिरीन ह्रदयरोगावर एक चांगले औषध आहे हे ठरवण्यासाठी जे प्रयोग करण्यात आले त्यापेक्षा चांगले आहेत. हेही लक्षात घेतले पाहिजे की परचित्तज्ञान हा या शास्त्रातला फार छोटास भाग आहे. म्हणून नुसते पुरावे गोळा करुन चालणार नाही तर या विषयावर मुलभूत संशोधन विज्ञानानीच हाती घेतले पाहिजे.”
गेली तीस वर्षे रॅडीन सगळ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत असल्यामुळे त्याच्या कडे माहितीची (डाटा) आजिबात वानवा नाही. हे सगळे मुद्दे आता कालबाह्य झाले आहेत. हे सगळे पुरावे, ज्यांना, विज्ञानशास्त्राचे नियम लावले गेलेले आहेत, त्याने हे सिध्द झाले आहे की अतिंद्रीय शक्ती अस्तित्वात आहे. पण वैज्ञानिक जगत त्याला अजून मान्यता देत नाही कारण सैध्दांतिक विश्लेषणाचा अभाव. मान्यता नाही कारण त्याचे पटण्याजोगे स्पष्टिकरण देता येत नाही.
मी जेव्हा मागच्या थंडीत रॅडीनला भेटलो तेव्हा तो अजून एक पुस्तक लिहायच्या तयारीत होता. त्याचे नाव होते – एनटॅंगल्ड माईंड. या पुस्तकात त्याने काही सिध्दांत मांडायचा प्रयत्न केला आहे. त्याची अपेक्षा ही आहे की हे पुस्तक वाचल्यावर विज्ञानजगत अतिंद्रिय शक्ती तत्सम गोष्टींना शास्त्र म्हणून मान्यता देतील आणि या विषयाकडे जरा गंभीरपणे बघतील. ज्याप्रमाणे सरळ साध्या स्पष्टिकरणाचे स्त्रोत आटले की क्वांटम फिजीक्सचा आधार घेतला जातो त्या प्रमाणे रॅडीनसुध्दा त्याचा आधार घेऊ पहात आहे. तो म्हणतो “ अतिंद्रीय ज्ञानाचे गूढ हे पदार्थ्विज्ञानाचे गूढ आहे. प्रश्न फार सोपा आहे. तुमच्या मेंदूत काहितरी आहे जे तुमच्या नेहमीच्या ज्ञानेंद्रियातून गेलेले नाही. पण काळ आणि अवकाशाच्या सीमा त्याने गूढरित्या ओलांडलेल्या आहेत. हे जीवशास्त्र नाही, हे मानसशास्त्र नाही आणि चेताशास्त्रही नाही”
क्वांटम एनटॅंगलमेंट्च्या धर्तीवर त्याने “बायो एनटॅंगल्मेंट” असू शकेल का ? असा प्रश्न विचारला आहे. एनटॅंगलमेंट हा क्वांटम फिजीक्समधला एक अत्यंत विस्मयजनक सिध्दांत आहे. (या सिध्दांताप्रमाणे कुठलेही दोन क्वांटम कण, अणू असुदेत किंवा प्रकाशाचे रेणू असूदेत, एकामेकांना असे जोडता येतात, किंवा असे जोडलेले असतात की तुम्ही त्यांना कितीही अंतराने वेगळे केले तरीही एकात थोडा जरी बदल केला तरी दुसर्यात तो बदल ताबडतोब होतो. किती ताबडतोब ?तर प्रकाशाच्या वेगापेक्षाही अगोदर.) जगप्रसिध्द पदार्थवैज्ञानिक श्री. श्राडिंजर यांनी याविषयी आपले मत मांडले १९३७ साली. परंतू याचे अस्तित्व सिध्द व्हायला १९८० साल उजाडावे लागले. गंमत म्हणजे क्वांटम मेकॅनिक्सचे जनक श्री. आइनस्टाईन याच्या पूर्णपणे विरोधात होते. १९७२ सालात मानवाला याचा पहिला अनुभव आला आणि त्यानंतर रॅडीनच्या म्हणण्यानुसार “याची नवनवीन उदाहरणे आता सापडत आहेत. या सगळ्याचा आपण ज्या जगात आहोत ते समजून घेण्यावर काही परिणाम होईल का ? मला वाटते जर एनटॅंगल्ड होण्यासाठी दोन वस्तूमधे जर फक्त त्यांच्या इतिहासात कधीतरी संपर्क झाला असला पाहिजे हीच अट असेल तर सगळे विश्वच एनटॅंगल्ड आहे असे म्हणावे लागेल. कारण खगोलशास्त्रज्ञ आपल्याला नेहमीच सांगतात की या विश्वाचा उगम एकाच वेळी आणि एकाच स्फोटातून झाला आहे.” ( तसे जर असेल तर शनीची जागा बदलल्यावर आपल्यातील काही अणू जागा बदलत असतील का ? :-) ). सुक्ष्म जगातून बाहेर पडून नेहमीच्या जगात या सिध्दांताचा उपयोग अनेक गोष्टींचे स्पष्टिकरण देण्यासाठी करता येईल हे वैज्ञानिक अजूनही मानायला तयार नाहीत हे आपले दुर्दैव आहे.” पण रॅडीनच्या म्हणण्यानुसार बायोएन्टॅगलमेंट वर जर खरंच आभ्यास झाला तर अतिंद्रीय अनुभवांचे स्पष्टिकरण संशोधकांना निश्चितच देता येईल ( जे भौतिकशास्त्राने देता येत नाही).
जर मेंदू क्वांटम कणांप्रमाणे वागत असतील तर ते एनटॅंगल पण होऊ शकतात. “कशाशीही किंवा सगळ्याशी” हे जर आपण एकदा मान्य केले तर टोकाला जाऊन असेही म्हणता येईल की एक मेंदू दुसर्या मेंदूला माहिती पाठवतो असे म्हणण्याऐवजी आपण असे म्हणू शकतो की मेंदू आपले लक्ष स्वत:कडेच असलेल्या माहितीवर केंद्रित करतो. थोडक्यात थोडासा अतिशोयक्तीचा भाग सोडल्यास आपण असेही म्हणू शकतो की आपला मेंदू सगळ्याशी एकरूप आहे तर दुसर्याच्या मनात काय चाललेले आहे किंवा त्या पलिकडे काय चाललेले आहे याची माहिती आपल्या मेंदूत अगोदरच असणार. आपण फक्त आपल्या मेंदूला त्या माहितीकडे लक्ष द्यायला शिकवले पाहिजे.”
भौतिकवाद्यां विरूध्द या लढाईत रॅडीन आणि शेल्ड्रेक आता एकाकी नाहीत. गेल्या काही वर्षात तत्वज्ञानी, धर्मशास्त्र जाणणारे पंडीत, विश्वाचा अभ्यास करणारे आणि विज्ञानाच्या मुख्य प्रवाहात असणारे काही शास्त्रज्ञ यांचाही त्यांना पाठिंबा मिळतोय. याचा सगळ्यात मोठा फायदा असा झालाय की मेंदू आणि शरीर या संबंधी नवनवीन, वेगवेगळे सिध्दांत मांडले जाऊ लागलेत.
तत्वज्ञानाच्या दृष्टीकोनातून विचार केला तर भौतिकवाद आणि शरीर-मन संबंधाविषयी सध्या सगळ्यात आवडती कल्पना आहे “पॅनसायकीझम”ची. तशी ही जुनीच कल्पना आहे पण सध्या विचारल्या जाणार्या बर्याच प्रश्नांची उत्तरे यात मिळू शकतात म्हणून हा सिध्दांत लोकप्रिय झाला आहे. “पॅनसायकिझम” म्हणजे काय हे थोडक्यात सांगायचा प्रयत्न केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही.
पॅनसायकिझम” मधे सांख्यवादाशिवाय दुसरे काही नाही. या सिध्दांतामधे असे मानण्यात येते की सर्व भौतिक वस्तू, हे जगसुध्दा, एक चैतन्य असलेला जीव आहे. त्याला वैश्विक बुध्दी, वैश्विक मन आहे तर त्याच्यात वैश्विक स्थूल तसेच सुक्ष्म भुते आहेत. सर्व वस्तू या जिवंत असतात, त्यांच्यात प्राण असतो. याचा अर्थ असा नाही की या तत्वानुसार सर्व जडद्रव्यात चैतन्य असते आणि त्यात प्राण असतो. त्यांना एवढेच म्हणायचे असते की जड द्रव्याचा काही भाग मात्र चैतन्ययुक्त असतो.
या सिध्दांतानुसार आपण शरीर/मन यांचे गूढ उकलण्यासाठी आपण हे मान्य करतो की हे विश्वाच्या अनेक गुणधर्मापैकी चैतन्य आणि अनुभव हे मुलभूत गुणधर्म आहेत आणि ते या विश्वात कोठेही कुठल्या ना कुठल्या स्वरूपात असतातच अगदी अणूरेणूमधेसुध्दा ! त्यांच्या मते हे चैतन्य मेंदूत कसे येते हे शोधून काढायची गरज नसते कारण ते सर्व विश्वात त्याच्या जन्मापासूनच असते. म्हणजे माळरानावरील दगडे आपापसात सुखदु:खाच्या गोष्टी का नाही करणार, असा प्रश्न तुम्ही विचारू शकाल, पण एक लक्षात घेतले पाहिजे की त्यांचे चैतन्य आणि आपले चैतन्य यामधे फरक आहे. अर्थात काही संशोधक याचा उपयोग करून भविष्यात चैतन्यमय यंत्रे असतील असा दावा करतात, त्या कडे आत्ताच एवढे गंभीरपणे बघायची आवश्यकता मला वाटत नाही. मला वाटते तसल्या यंत्रा अगोदर चैतन्य असलेला संगणक तयार होईल. असो.
“रिडक्शनीझम” (याचा अर्थ आपण मागे बघितलेला आहे) ला उत्तर म्हणून आधुनिक शास्त्र “इमर्जन्स” कडे बघत आहे. आता आपण याचा अर्थ थोडक्यात बघूया. एखादी वस्तू अनेक घटकांची बनलेली असते. या सर्व घटकांचे मूळ गुणधर्म असतात त्यापासूनच ही नवीन वस्तू बनलेली असते, पण त्या नवीन वस्तूमधे त्या घटकांच्या गुणधर्मापेक्षाही अधिक काहितरी असते. उदा. असे म्हटले जाते की चैतन्य हे मेंदूचा, त्यातून उदय झालेला गुणधर्म आहे. गुंतागुंतीच्या व्यवस्थेचे स्पष्टिकरण देताना “इमर्जन्स”चा वापर केला जातो आणि मेंदू ही एक अत्यंत गुंतागुंतीची व्यवस्था (system) आहे हे आपण जाणतोच. त्यामुळे या संकल्पनेचा वापर संशोधकानी केला नसेल तर नवलच. थोडक्यात सांगायचे म्हणजे खालच्या पातळीवरच्या घडामोडी वरच्या पातळीवरच्या अतर्क्य घडामोडींना उदय देतात आणि त्या घटनांचा उगम त्या खालच्या पातलीवरच्या घडामोडीत आहे असे आपण सिध्द करू शकत नाही. उदा. ऑक्सीजन ओला नसतो आणि हायड्रोजनही ओला नसतो पण त्यापासून तयार होणारा पदार्थ – पाणी मात्र ओले असते. त्याच प्रमाणे मनाचे जे गूणधर्म, उदा. विचार करणे, इच्छाशक्ती, निर्णयक्षमता, भावना इ. आपल्याला मज्जातंतूच्या गुणधर्मात सापडत नाहीत. या संकल्पनेचे विशेष असे आहे की ती मनाचे मूळ हे जीवशास्त्रीय आहे हे नाकारत नाही पण त्याच्याही पलिकडच्या काही अनुभवांचा ती पाठराखण करते.
माणसाच्या अतर्क्य अनुभवांना आता काही भौतिकशास्त्राच्या वैज्ञानिकांचाही पाठिंबा मिळत आहे. प्रसिध्द तत्वज्ञानी जॉन सर्ल म्हणतात ते फार महत्वाचे आहे. “चैतन्याच्या गुणधर्माची फोड आपण करू शकत नाही याचे कारण ते शब्दातीत किंवा गूढ आहे म्हनून नाही तर तो एक वैयक्तिक अनुभवच असू शकतो. विज्ञानाने आणि तत्वज्ञानाने एक फार मोठी चूक केली आहे ती म्हणजे ते म्हणतात, जर तुम्ही द्वैतवाद नाकारला तर तुम्हाला भौतिकवाद स्विकारावा लागेल किंवा भौतिकवाद नाकारला तर द्वैतवाद स्विकारावा लागेल. हे असेच असायचे सध्या काहिच कारण नाही. कारण या दोन्हीमधेच भरपूर गोंधळ आहे तो आधी निस्तरला पाहिजे.”
“इमर्जन्स आणि पॅनसायकीस्ट” वाल्यांचे असे म्हणणे आहे की जर भौतिकवाद्यांना माणसांच्या सगळ्या अनुभवांचे स्पष्टीकरण देता येत नसेल तर त्यांना या अभ्यासातून वगळले तरी चालेल. त्यांना अर्थात या अभ्यासाचा भाग म्हणून मान्यता मिळेल पण त्यांच्या ठराविक पठडीतील सिद्धांत आणि मते यांना आता कितपत मान्यता मिळेल याची शंकाच आहे. आता असा काहितरी सिध्दांत मांडायला पाहिजे की आंतरिक अनुभवाचे विश्व आणि भौतिक विश्व यांच्यातील अनुभवांची सत्यता दोन्ही विश्वात सिध्द करता येईल. अवघड आहे ते !
प्रसिध्द विश्वघटनाशास्त्रज्ञ श्री. जॉर्ज एलीस म्हणतात “सर्व शास्त्रातील मुलतत्ववादी एक मोठी चूक करतात ती म्हणजे एखद्या गोष्टीचा कार्यकारणभाव समजावून सांगताना ते एखाद्या छोट्या कारणाला त्या घटनेचे संपूर्ण कारण म्हणून पुढे करतात. तेथे न्युरॉन्स आहेत हे कोणीच नाकारत नाहीत. पण मेंदूच्या कार्याचे ते एक अत्यंत छोटे कारण आहे. या शास्त्रज्ञांना वरच्या पातळीवरून खाली बघण्याचा अनुभव नाही. खरंतर तेच जीवनाला खरा अर्थ प्राप्त करून देते. आता तुम्ही खालच्याच पातळीवरून वर काय चालले आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न केलात तर तो अर्थ तुम्हाला कधीच कळणार नाही. उदा. एखादे उडणारे विमान घ्या. खालून त्याच्याकडे बघताना, ते का उडते आहे या प्रश्नाचे उत्तर फार सोपे आहे. त्या विमानाच्या पंखावर हवेचे कण खालून आदळतात आणि त्याच्या वरती असणार्या हवेचा वेग हा त्याच्या वेगापेक्षा कमी असतो, म्हणून विमान उडते. विमानाच्या वरच्या पातळीवरून हाच प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर येईल की कोणीतरी ते विमान उडण्यासाठी तयार केले आहे, त्यासाठी अनेक शास्त्रांच्या नियमांचा उपयोग करण्यात आलेला आहे, संगणकाचा वापर केलेला आहे. विमानाच्याच पातळीवरून ह प्रश्न विचारला तर उत्तर येईल की ते विमान उडते आहे याचे कारण एक वैमानिक ते उडवतोय. आता चेताशास्त्रज्ञ वरच्या पातळीवरचे आणि त्याच पातळीवरचे विचार करत नाहीत. (Level) ते म्हणतील त्या वैमानिकांच्या काही न्युरॉन्सच्या कार्यामुळे त्या विमानाला उडवता येत आहे. पण ते हे विसरतात की त्याने लहानपणीच वैमानिक व्हायचे ठरवले होते, त्यासाठी त्याने कष्ट काढलेले आहे.इ.इ.... एकाच पातळीवर लक्ष केंद्रित केल्यामुळे ते दुसर्या पातळीवर लक्ष देत नाहीत. या असल्या सिध्दांतांची आता मुळीच वानवा नाही पण पश्चिमेने भौतिकशास्त्राच्या बाजूने जो पक्षपातीपणा चालवला आहे त्यामुळे हे सिध्दांत मागे पडत आहेत. अमेरिकी तत्वज्ञानी थॉमस कून म्हणतो “ लवकरच आपल्याला या सगळ्याकडे बघण्याच्या दृष्टीकोनात मुलभूत फरक करावा लागेल हे स्पष्ट आहे.”
विज्ञान जर मन/शरीर या जोडीचे गूढ उलगडू शकला नाही तर त्याची उपयुक्तता अंतिमत: संपेल का ? हाही एक महत्वाचा प्रश्न आहेच. का न्युरोसायन्स मेंदू/शरीर यांच्यातले गूढ उकलेल आणि ज्यावर हा समजुतींचा डोलारा उभा आहे तो धडाधडा कोसळेल ?
हा खरा अवघड प्रश्न आहे !
भाग ९ समाप्त.
जयंत कुलकर्णी.
भाग १० हा शेवटचा भाग असेल.
रानवा संस्थेबद्दल माहिती हवी आहे.
पुण्यामध्ये "रानवा" नावाची पर्यावरणाशी निगडीत संस्था आहे. मला या संस्थेचा पत्ता आणि संपर्क क्रमांक हवा आहे. कुणाला माहिती असल्यास व्यनि करुन कळवावे..
धन्यवाद,
पिंगू
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ................?भाग - ८
Reprinted with permission from EnlightenNext magazine,
© 2005 EnlightenNext, Inc. All rights reserved. www.enlightennext.org
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - १
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - २
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ३
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ४
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ५
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ६
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ७
सुसानबाई काहीही म्हणत असल्यातरी हे ही खरे आहे की या अनुभवांवर वाचन केल्यावर हे जाणवत रहाते की भौतिक शास्त्रात या अनुभवांचे स्पष्टीकरण देण्यासाठी बरेच प्रयोग चाललेले आहेत. उदा. बर्याच डॉक्टरांनी आणि परिचारीकांनी नमूद केले आहे की बर्याच की कित्येक रूग्णांना ते बेशुध्दावस्थेत असताना, किंवा त्यांचा मेंदू मेंदू मृत्यू पावला असताना काही गोष्टी सांगता येत होत्या. उदा. एका रुग्णाने ज्या परिचारिकेने तो बेशूध्द असताना त्याची दाताची कवळी काढली होती तिला बरोबर ओळखले होते आणि ती तिने कुठे ठेवली होती हेही बरोबर सांगितले. एकीने तर म्हणे शरीराच्या बाहेर जाउन त्या रुग्णालयाच्या तिसर्या मजल्यावरच्या पायर्यांवर ठेवलेल्या टेनिसच्या बुटांचे बरोबर वर्णन केले. पण सगळ्यात नाट्यमय घटअना आहे ती म्हणजे एरिझोना प्रांतातल्या एका पाम रेनॉल्डस् नावाच्या स्त्रिची. तिला मृत्यूपासून वाचवण्यासाठी त्यांना तिच्या मेंदूला रक्तपुरवठा करणारी रक्तवाहिनी मेंदूला जिथे जोडली जाते तेथील एक गाठ काढायची होती. त्यासाठी त्यांनी तिच्या शरीराचे तापमान उणे साठ अंश फॅरनाईट पर्यंत खाली उतरवले. त्यामुळे तिचे ह्रदय गोठले आणि तिचा श्वासोश्वास थांबला. मग त्यांनी तिच्या शरीरातील आणि मेंदूतील (म्हणजे मेंदूच्या बाजूचे) सर्व रक्त काढून घेतले. तिचा EEG आता एक सरळ रेषा होती. तिचा मेंदू आता तिच्या कानात ठेवलेल्या आवाज करणार्या यंत्राला कुठलाही प्रतिसाद देत नव्हता. खरंतर ती आता मृतच होती. पण आश्चर्य म्हणजे या दुखण्यातून बरं झाल्यावर डॉक्टरांना असे आढळले की तिला NDE चा अनुभव आला होता आणि एवढेच नाही तर त्या शस्त्रक्रियेच्या वेळी कुठली उपकरणे वापरली ते शल्यविशारद काय चर्चा करत होते हे तिने अगदी सविस्तरपणे सांगितले होते.
NDE चे आत्तापर्यंतचे संशोधन हे तसे विशेष महत्वाचे मानले न गेल्यामुळे या सर्व गोष्टींना पुरावा म्हणून तिसर्याच व्यक्तिंची साक्ष काढण्यात आली नाही हे दुर्दैव. पण या अनुभवावरूनच वैज्ञानिक क्षेत्राला यावर संशोधन करण्याची प्रेरणा मिळाली हे निश्चित. या प्रकरणानंतर मात्र असल्या अनुभवांचा पूर्ण दस्त करण्यात येऊ लागला. विशेषत: ह्रदयरोगविभाग, जेथे बरेच मृत्यू होत असतात, ही त्यांची प्रयोगशाळा झाली. श्री. पीटर फेनविक म्हणतात “संशोधकांच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा आहे की मृत्यूनंतरचे अनुभव का येतात.... आपण जर शास्त्रियदृष्ट्या हे सिध्द करू शकलो की मृत्यूनंतरचे हे अनुभव बेशुध्दावस्थेत, जेव्हा मेंदू काम करत नसतो, त्याचवेळेस येतात तर आपण असे म्हणू शकतो की चेतना ही मेंदूशिवाय वेगळी राहू शकते. ( या वाक्याचे महत्व लक्षात घ्या) आणि असे म्हणणे फार महत्वाचे आहे”. श्री. फेनविक आणि त्यांच्या सहाय्यकांचे जरी असे म्हणणे असले की याच्यावर अजून बर्याच संशोधनाची आवश्यकता आहे, तरी जी काही माहीती बर्याच इस्पितळातून जमा झाली आहे त्यावरून असे वाटते की मन हे निश्चितच अभौतिक आहे. या सगळ्या अभ्यासातून काही मुलभूत माहीती जमा झाली तर मात्र आत्मा/चित्त आणि मेंदू यांच्या संबंधाविषयी बरेच प्रश्न निर्माण होतील.
मग मन जर मेंदूत नसेल तर कुठे असेल ? पारंपारिक द्वैतवादी, म्हणजे देकार्तपासून त्यांचे म्हणणे आहे की मन म्हणजे एक अजडद्रव्य असून ते मेंदू आणि शरीराबरोबर कुठ्ल्यातरी गूढ तत्वाने बांधले गेले आहे. हे तत्व काय आहे यावरूनच मन-शरीर या संबंधी वाद चालू झाले आहेत. पण विज्ञानाने हे वाद आता फार तर्कशुध्द आणि समजण्याइतपत सोप्पे केले आहेत.
श्री. रुपर्ट शेलड्रेक यांनी या बाबतीत अजून एक वेगळेच मत मांडले आहे. ते म्हणतात मन आणि हे आयुष्य या संधर्भात अभ्यासासाठी “क्षेत्र” (field) ही संकल्पना फारच उपयोगी पडेल. ही संकल्पना आपल्याला चांगलीच माहीती आहे. ही मायकेल फॅरेडेने प्रथम विद्यूतचुंबकीय आणि गुरुत्वाकर्षणाच्या क्षेत्रासंधर्भात मांडली होती. या कल्पनेने बर्याच गोष्टींकडे याच दृष्टिकोनातून बघितले जाते. सर कार्ल पॉपर यांनी म्हटल्याप्रमाणे “मॉडर्न पदार्थविज्ञानामुळे आपल्या भौतिक ज्ञानामधे बरीच भर पडली असली तरी हेही समजले आहे की आता जडद्रव्य हा मुलभूत सिध्दांत रहिला नाही. पण क्षेत्र आणि शक्ती हे मात्र मुलभूत आहेत. हे जर खरं असेल तर मेंदूकडे या कल्पनेतून बघायला काय हरकत आहे ? म्हणजे बघा, जसे एखाद्या वस्तूभोवतालचे क्षेत्र हे त्या वस्तूमधे कोंडून रहात नाही, त्याप्रमाणे ज्या क्षेत्रावर मेंदूचे काम अवलंबून असते, ते त्या मेंदूत कोंडून रहात असेल असे कशावरून ?
हा सिध्दांत जर आपण खुल्यामनाने स्विकारला तर शेल्ड्रेकच्या मते आपण बर्याच प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देऊ शकू. उदा. चित्ताचे मेंदूवरचे अवलंबित्व आणि त्याने स्वत: केलेल्या प्रयोगांची उत्तरे. त्याने परचित्तज्ञानावर बरेच प्रयोग केलेले आपणा सर्वांना माहिती असतीलच. या प्रयोगात त्याने आपले चित्त आपला मेंदू सोडू शकतो हे सिध्द करण्याचा बराच प्रयत्न केला आहे. ज्या प्रमाणे तुमच्या सेलफोनमधल्या वायरलेस सर्किटमधला एखादा भाग तुम्ही बदलला तर त्या सेलफोनच्या भोवतालचे क्षेत्र बदलेल का नाही ? तसेच मेंदूत काही उलथापालथ झाली तर त्या भोवतालचे क्षेत्र बदलेल का नाही? त्याच प्रमाणे काही बाह्य घडामोडींमुळेही हा बदल होणे शक्य आहे असे कोणी प्रतिपादन केले तर ?
विल्यम्स् जेम्स नावाच्या शास्त्रज्ञाने अजून एक सिध्दांत मांडला. तो म्हणाला की मेंदू हे एक प्रकारचे चित्ताचे आदान प्रदान करण्याचे यंत्र आहे. हे यंत्र ज्यांना मृत्यूनंतरचे अनुभव येतात त्यांच्या बाबतीत कशा प्रकाराने काम करते? कारण त्यावेळेस तर मेंदूचे काहिच कार्य चालु नसते. एक ह्रदयरोगतज्ञ आणि NDEचे संशोधक श्री. पीम व्हॅन लोमेल यांनी एक कल्पना मांडली आहे, ती विचार करण्यासरखी आहे. आपल्या चित्ताचे किंवा चैतन्याच्या माहितीचे आणि आठवणिंचे क्षेत्र आपल्या भोवती विद्यूत/चुंबकीय क्षेत्राप्रमाणे पसरलेले असते. मात्र हे क्षेत्र फक्त आपल्या जागत्या चैतन्याला, आपल्या मेंदूच्या आणि इतर पेशींमार्फत उपलब्ध होत असते. जेव्हा मेंदू मृतवत होतो तेव्हाही ही क्षेत्रे आपल्या भोवताली उपललब्ध असतात. त्यामुळे ज्यांचा मेंदू मृतवत होतो ते जेव्हा हळूहळू शुध्दिवर येऊ लागतात त्यावेळी हि क्षेत्रे त्यांना माहितीसाठी उपलब्ध होतात. त्यामुळे या लोकांना स्वत:ची ओळख, आजूबाजूची माहिती, लक्ष देणे, आणि भावना इ.ची माहिती होत असते. पण त्याची प्रत्यक्ष जाणीव ही मेंदू पूर्वस्थितीला आल्यानंतरच होते. म्हणून हे लोक शुध्दीत आल्यावर या सगळ्या आठवणी सांगतात.”
अर्थात या अशा कल्पनांना सध्याच्या वैज्ञानिक जगतात थारा मिळणे जरा कठीणच वाटते आहे. त्यामुळेच की काय शेल्ड्रेकसारख्या लोकांनी आता कर्मठ शास्त्रज्ञांना पटवायचा नाद सोडून जनसामान्यांना या विषयाचे (para psychology) शिक्षण द्यायला सुरवात केली आहे. त्यासाठी त्याने इंटरनेट आणि पुस्तकांचा वापर सुरू केला आहे आणि त्यांना खात्री आहे की एक दिवस जनसामान्यांना या विषयात रस निर्माण होईल आणि तेच शास्त्रज्ञांवर हा विषय गंभीरपणे घेण्यासाठी दबाव टाकतील.
Institute of Noetic Sciences चे प्रमूख श्री. रॅडीन म्हणतात “ पुराव्यांची आमच्याकडे कमी नाही. परंतू नुसत्या पुराव्याने काय होणार? आम्ही आता सैध्दांतिक मांडणी केली पाहिजे.” रॅडीन १९८० सालापासून या क्षेत्रात काम करत आहेत आणि त्यांनी त्यांच्या संशोधनावर आधारित एक पुस्तकपण लिहिले आहे. त्या पुस्तकाचे नाव आहे “The conscious Universe: The scientific Truth of Psychic Phenimena”. या पुस्तकात त्यांनी अभ्यासलेल्या सर्व अतिंद्रीय अनुभवांचे सविस्तर वर्णणे आणि विश्लेषणे आहेत. यात त्यांनी असे सिध्द करण्याचा प्रयत्न केला आहे की माणसाचे चैतन्य/चित्त/मन याची कार्यसीमा मेंदूच आहे असे मानायचे काही कारण नाही.
मन-जडद्रव्य यांच्यातील परस्पर संबंध किंवा अन्योन्यक्रियांच्या अभ्यासादरम्यान शस्त्रज्ञांना असे आढळून आले आहे की माणसे इलेक्ट्रॉनिक नंबर जनरेटर्सवर नुसत्या इच्छेने प्रभाव टाकू शकतात. ( भिमाने इच्छेने फासे बदलले हे खोटे मानायचे आता कारण नाही :-). दुरदृष्टी च्या संशोधनात, ज्याचा खर्च CIA ने उचलला होता/आहे, काही माणसांनी दुरवरच्या स्थानाचे वर्णन केले आहे. ( संजय उवाच ?) अर्थात याची संख्या लाखात एक अशी आहे हेही नमुद केले पाहिजे. सध्या वादग्रस्त ठरलेल्या दाव्याच्या – म्हणजे प्रार्थनेने दुरून एखाद्याला बरे करणे याच्या अभ्यासात असे आढळून आले आहे की त्याने सेकंडरी इन्फेक्शन कमी झालेले आहे तसेच नैसर्गिक प्रसूतीला मदतच होते. या संशोधनाला अमेरिकी सिनेटने ५० लाख डॉलार्सची मदत जाहीर केली होती हेही इथे नमूद केले पाहिजे. ( याचे कारण दुसरेच असण्याची शक्यता नाकारता येत नाही).
अतिंद्रीय शक्तिंच्या अभ्यासाला आणि तो करणार्यांना विज्ञानाकडून फार कठोर टीका सहन करायला लागली आहे. त्यांच्या संशोधन करायच्या पध्दतींवर, त्यांनी अभ्यास केलेल्या नमुन्यांची संख्या अत्यंत कमी असल्यामुळे तो अभ्यास विश्वसनीय नाही पासून तो नि:पक्षपाती नाही असे विविध आरोप त्यात करण्यात आलेले आहेत. म्हणून मी मुद्दामच रॅडीनला विचारले की त्याच्या संशोधनाचा असा कुठला भाग आहे ज्याने तो अतिंद्रीय शक्तींचे अस्तित्व आहे असे ठामपणे प्रतिपादन करू शकतो ? आणि टीकाकार त्याचे खंडन करू शकणार नाहीत ? त्यावर त्याचे उत्तर होते
“विज्ञानामधे असा एकही सिध्दांत नाही की त्याचे आपण खंडन केलेले नाही. टीका तर झालेलीच आहे”. असे म्हणत त्याने परचित्तज्ञानाबद्दल सांगितले. आपल्याला सर्वांना केव्हाना केव्हातरी लोकांच्या मनातले आपण ओळखले असे वाटतेच. फोन उचलायच्या अगोदर आपल्याला उगाचच असे वाटते की हा फोन अमुक अमुक व्यक्तिचाच असेल आणि तो त्याचाच असतो. आपण एखाद्याला इ-मेलने एखादा प्रश्न विचारावा म्हणून आपला लॅपटॉप उघडावा तर त्याच्या कडून त्याच विषयावर इ-मेल आलेला असतो. यावर टीकाकारांचे ठराविक उत्तर असते “ तो निव्वळ एक योगायोग आहे” पण या वरचे संशोधन आता असे सांगू पहाते आहे की योगायोगाच्या पलिकडे यात काहितरी दडलेले आहे.
रॅडीनच्या म्हणण्यानुसार याला पुरावा म्हणून देता येतील “गॅझफिल्ड प्रयोग”
काय आहेत हे प्रयोग ?
जयंत कुलकर्णी.
भाग ८ समाप्त.
पुढे चालू.......
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ................?भाग - ७
Reprinted with permission from EnlightenNext magazine,
© 2005 EnlightenNext, Inc. All rights reserved. www.enlightennext.org
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - १
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - २
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ३
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ४
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ५
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ६
संभाषण आणि समजणे या क्रियांचा जीवशास्त्रीय विचार ही फक्त एक सुरवात आहे. जसजसे नवीन तंत्रज्ञान उपलब्ध होत जाईल तसतसे आपल्या मेंदूची बाकिची रहस्येपण उजेडात येतील. “Mapping of Mind” या आपल्या पुस्तकात रीटा कार्टर म्हणते “ आता काहिच वर्षांनी माणसाच्या विविध भावनांचे स्पष्टीकरण देता येईल. राग म्हणजे काय ? हिंसक म्हणजे काय ? प्रेमळ, विनोदी क्रूर, अहंकार इ. भावनांचा छडा मेंदूमधे लावणे आता शक्य होईल.”
अधुनिक तंत्रज्ञान वापरुन मेंदूच्या विविध प्रतिमा काढून त्याचा अभ्यास करून शास्त्रज्ञांना आता तुमच्या वैयक्तिक आयुष्यात आता डोकवता येऊ शकते. कोण खोटे बोलते आहे, कोण नाटकी आहे, गुन्हा केला आहे का ? इ.इ. आणि या प्रश्नांची उत्तरे लपवता येत नाहीत कारण त्याचेही प्रतिबींब या प्रतिमांत पडते. याच मूळे बहुदा “Ethical Neuroscience” या शब्दाचा जन्म झाला असावा. एखादा माणूस वाईट वागतो किंवा चांगला वागतो असे आपण सहजच म्हणून जातो. या सगळ्या अभ्यासावरुन माणुस कसे वागायचे हे ठरवत असेल हे मानायला कठीण जाते. तो काही ठरवून करत असेल याचीच शंका आहे. जर आपल्या सर्व हालचाली, आचार विचार हे जर मेंदूमुळे होत असतील आणि मेंदूची जडणघडण ही आपले जीन्स आणि वातावरण यांच्यातील अन्योन्यक्रिया ठरवत असतील तर आपल्या इच्छेचा आणि इच्छाशक्तिचा प्रश्न येतोच कुठे? तत्वज्ञान, ज्याला हजारो वर्षांची परंपरा आहे त्याच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न मुर्खपणाचा असू शकेल. पण चेताशास्त्रामधे काम करणार्या शास्त्रज्ञांना असे आढळून आले आहे की तुम्ही एखादा निर्णय जाणीवपूर्वक घेण्याअगोदरच मेंदूनी तो निर्णय घेतलेला असतो. त्यामुळे आपण निर्णय घेतो किंवा इच्छाशक्ती हाच एक मोठा भ्रम आहे हा एक वादग्रस्त विषय होण्याचा संभव नाकारता येणार नाही. कारण त्यापुढे हे सिध्द होण्याची शक्यता आहे की धर्माची आपल्या मनातली उत्पत्ती किंवा धार्मिकता ही मेंदूमधील भौतिक क्रियांचा परिणाम आहे.
मी त्या परिषदेहून परतीच्या प्रवासात घेतलेल्या टाईम्सचा अंक उघडला. तो “मन आणि शरीर” विशेषांक होता आणि त्याचा मुख्य विषय होता “आनंदाचे विज्ञानशास्त्र”. तो चाळताना जे पान मी उघडले त्यावर एका ध्यानस्थ बौध्दभिख्कूचे छायाचित्र छापले होते. त्याच्या डोक्याला अनेक विद्युताग्र लावलेले होते. ते लावत होते मानसशास्त्रज्ञ रीचर्ड डेव्हिडसन. त्यांच्या अभ्यासाचा विषय ध्यानधारणा करणार्याच्या मेंदूतील क्रिया हा आहे. नुकताच त्यांचा “आनंदाचे जीवशास्त्र” हा लेख छापून आला होता. त्या लेखात त्यांनी आध्यात्मिक अनुभव आणि मेंदू यांच्यातले नाते शोधण्याचा प्रयत्न केला आहे. याच्याही अगोदर मे २००१ मधे त्यांचा एक लेख आला होता “ परमेश्वर आणि मेंदू: आपण आध्यात्मिक अनुभवासाठी या जालामधे कसे जोडले गेलेलो आहोत” या लेखामुळेच मला यांची ओळख झाली. आता मी त्यांनाच भेटायला चाललो होतो.
न्युबर्ग, पेनसिल्वानिया मेडिकल सेंटरमधे क्ष-किरण तज्ञ म्हणून ते काम करत होते आणि त्यांनी ध्यानधारणा आणि मेंदू या विषयावर नव्वद सालात दोन पुस्तके लिहीली होती. एक होते “Mystical Mind” आणि दुसरे “Why God wont go away”. या पुस्तकामुळे त्यांना चांगलीच प्रसिध्दी मिळाली होती. या पुस्तकानंतर त्यांनी या विषयावर बरीच भाषणे दिली होती. “What the Bleep do we know” या चित्रफितीतही त्यांनी हजेरी लावली आहे. या सगळ्या भाषणांनंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली आणि ती म्हणजे जनमानसात अध्यात्माचे मूळ आपला मेंदू आहे हे जाणून घ्यायची उत्सुकता आहे, तसेच ते खरे ठरेल की काय याची प्रचंड भितीही आहे.
त्यांच्या खिडकी नसलेल्या क्ष किरणांच्या प्रयोगशाळेत आम्ही प्रवेश केला तेव्हा त्यांच्या टेबलावरच्या लॅपटॉपकडे बोट दाखवून ते म्हणाले “मला तुला हे दाखवायचे होते”. त्या लॅपटॉपच्या पडद्यावर दोन मेंदूची चित्रे होती. “डावीकडची प्रतिमा ही माणूस ध्यानस्थ होण्याच्या अगोदरची आहे. उजवीकडची तो ध्यानात असतानाची आहे.” ध्यान करणारा माणूस एक अमेरीकी बौध्द होता आणि तो तिबेटच्या ध्यानपध्दतीचा अभ्यासक होता.
न्युबर्ग आणि एक्विली यांनी सुरवातीच्या संशोधनात आठ अमेरीकी बौध्दांचा आणी चर्चच्या तीन नन्सचा अभ्यास केला होता. जे बौध्द होते ते मन एकाग्र करुन ध्यान लावायच्या पध्द्तीचा अवलंब करत होते तर त्या नन्स भक्तिभावाच्या मार्गाचा अवलंब करत होत्या. या दोन्ही समूहाच्या अभ्यासाचा निष्कर्ष वेगळा असला तरी एकंदरीत तो एकाच दिशेने होता. या अभ्यासात त्यांना असे आढळून आले की ध्यान आणि प्रार्थनेच्या वेळी मेंदूच्या पुढच्या भागात बरीच हालचाल होत होती. हे त्यांच्या अपेक्षेप्रमाणेच घडत होते. पण त्यांना अजून एक महत्वाची गोष्ट समजली. न्यबर्गने एका ठळक पिवळ्या रंगाच्या ठिपक्यावर बोट ठेवून म्हटले “ या मेंदूच्या मागच्या भागाकडे जर बघितलेस तर तुला आढळेल की ध्यानाच्या वेळी या भागात नेहमीपेक्षा कमी हालचाल दिसून आली. हा मेंदूचा भाग आपल्या स्थळकाळाच्या/स्थितीज्ञानाच्या जाणिवेचे केंद्र आहे. हे केंद्र या अवकाशातील आपल्या स्थितीबद्दल सतत माहिती घेत असते आणि आपण आणि सभोवतालचे जग यांच्यातल्या रेषा आखते. म्हणजे आपण कुठे संपतो आणि इतर जग कुठे सुरु होते याची आपल्याला सतत जाणीव करुन देत असते. ध्यानाच्या वेळी ध्यानस्थ माणसाला आपल्या व्यतीरिक्त इतर जगाचा विसर पडतो किंवा इतर जगाची त्याला जाणीव
रहात नाही ही या गोष्टीचा आणि या केंद्रामधल्या कमी हालचालींचा सबंध आपल्या अपेक्षेप्रमाणेच आहे.
थोडक्यात काय, अध्यात्मिक अनुभव किंवा साक्षात्कार इ. हे मेंदूतील त्या केंद्रातील कमी हालचालींमुळे होतो हे समजल्यावर या गोष्टींना जे अवास्तव महत्व प्राप्त झाले आहे ते आपसुकच कमी होईल. हे समजल्यावर मी त्यांना सरळच प्रश्न केला “ तुमच्या संशोधनावरुन तुम्हाला असे म्हणायचे आहे का, की आपला सगळा धार्मिक अनुभव हा मेंदूच्या एका कोपर्यातील हालचालीवर अवलंबून असतो ? हे सगळे साक्षात्कार इ. आपल्याच डोक्यात तयार होतात असे म्हणायचे आहे का तुम्हाला ?
त्यांना माझ्या या प्रश्नाची बहुतेक अपेक्षा होतीच. ते म्हणाले “असे वाटण्याचा संभव नाकारता येणार नाही. पण संशोधन आज तरी तसे म्हणते असे मी तरी म्हणणार नाही. ते एवढे सोपे नाही. हे एका सोप्या उदाहरणाने सांगायचा प्रयत्न करतो. समजा एखाद्याच्या मेंदूच्या सफरचंदाकडे बघताना प्रतिमा घेतल्या तर त्या सफरचंद पहाण्याच्या अनुभवातून जाताना मेंदूत त्या वेळेस काय घडते आहे हे मी सांगू शकतो. पण ते सफरचंद तेथे अस्तित्वात आहे किंवा नाही हे मी त्या प्रतिमांकडे बघून नाही सांगू शकत. त्याचप्रमाणे जेव्हा एखादा माणूस तो देवाच्या सानिध्यात आहे असे म्हणतो त्यावेळी त्याच्या मेंदूत कुठे काय चाललंय हे मी सांगू शकतो. पण त्या प्रतिमेकडे बघून मी तेथे खरोखर काय होतं हे मी काही सांगू शकत नाही. तो अनुभव होता, पण ज्याचा होता ते तेथे खरच होते का नाही अशा प्रश्नांची उत्तरे चेताशास्त्र देऊ शकत नाही, सध्यातरी !”
“समजा आपण पूर्णपणे भौतिक दृष्टीकोन स्विकारला आणि हे मान्य केले की आपल्याला कुठलिही जाणीव ही मेंदूमुळेच होते, म्हणजे त्याचा अर्थ, एखाद्या वस्तूचे अस्तित्व हे मेंदूच ठरवतो. पण असे गृहीत धरण्यात एक छोटाशी अडचण आहे, तो म्हणजे ज्या सर्व लोकांना गूढ अनुभव आलेले आहेत ते ठामपणे हेच सांगतात की त्यांनी जे अनुभवलेले आहे ते नेहमीच्या भौतिक सत्याएवढेच सत्य आहे. त्यांच्यावर विश्वास ठेऊन जर त्यांचे म्हणणे खरे मानले तर आपण वरती जे गृहीत धरले आहे त्याचे काय होईल?
या संभाषणाच्या ओघात न्युबर्गने हे मान्य केले की या अत्यंत महत्वाच्या प्रश्नाचे उत्तर होय किंवा नाही असे देता येत नाही. पण त्यांनी हेही सांगितले की त्यांनी ज्या आभ्यासाचा प्रारंभ त्यांच्या तारूण्यात केला, त्या आभ्यासातच या प्रश्नाचे उत्तर दडलेले आहे. जरी त्यांच्या संशोधनातून हे सिध्द झाले की अध्यात्मिक अनुभव हा मेंदूमुळे होतो, या सिध्दांतामुळे झाली तर अध्यात्म्वाद्यांना झाली तर मदतच होईल. कारण या शोधामुळे विज्ञानाचा अध्यात्माकडे आणि तत्सम शास्त्रांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल. कदाचित असेही घडेल की अध्यात्म विज्ञालाला काही न उलगडलेली कोडी उलगडायला मदत करेल. नाहीतरी विज्ञानाच्या आत्ताच्या ज्या काही सीमा आहेत त्यात “काल्पनिक जाणीव” म्हणजे काय हा एक अनुत्तरीत प्रश्न आहेच. आपण आजही मेंदूच्या बाहेर पडून त्या पलिकडे काय आहे हे सांगू शकत नाही. अध्यात्म किंवा तत्सम शास्त्रांचे मला त्यामुळे मला अप्रूप वाटते की ते निदान त्यांच्या गूढ अनुभवातून त्याचे वर्णन करु शकतात. “त्याचे” म्हणजे चित्ताला भेदून अंतीम सत्य काय आहे या विषयी चर्चा करु शकतात. म्हणून शास्त्रज्ञांना याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. कारण सध्यातरी आपल्यापुढे हाच एक मार्ग आहे.”
“जर आपण असे समजले की सगळ्या मुळाशी वस्तू (मॅटर) आहे तर आपल्याला भौतिक जगातल्या बर्याच गोष्टींचा उलगडा होतो. पण आपले चित्त कुठून येते याचे पूर्ण उत्तर हा सिध्दांत देऊ शकत नाही. याच्या उलट आपले चित्त हेच सगळ्याच्या मुळाशी आहे ही संकल्पना स्विकारली तर मॅटरचे स्पष्टीकरण देता येणे फार कठीण आहे. मला वाटते हे दोन्ही एकाच गोष्टीकडे बघण्याचे दोन दृष्टीकोन आहेत. पण खरं सांगायचे तर आपल्याला ते अजून नीटसे माहित नाहीत.”
न्युबर्गबरोबरच्या माझ्या या मुलाखतीनंतर माझे डोळे चांगलेच उघडले. मी त्यांच्याकडे गेलो होतो ते मेंदू हाच आपल्या अनुभवांच्या मागे आहे याचे पुरावे गोळा करायला. पण झाले भलतेच. माझ्या विचारांमधे अजून एका दृष्टिकोनाची भर पडली. न्युबर्गचा या क्षेत्रातला अनुभव फार दांडगा होता. माझ्याकडे जी माहिती होती ती त्यांच्याकडे तर निश्चितच असणार, किंबहुना जास्तच असणार त्यामुळे त्यांनी जे मत व्यक्त केले त्याचा मान तर राखवाच लागणार होता. ज्याअर्थी त्यांना अध्यात्माबद्दल अजून विश्वास वाटत होता, याचाच अर्थ चेताशास्त्र म्हणते त्यापेक्षा अजून काहितरी या विश्लेषणात दडलेले आहे.
मन ही मेंदूचीच उत्पत्ती आहे हे सिध्द करण्यासाठी चेताशास्त्राने कितीही पुरावे दिले तरीही न्युबर्ग म्हणतात त्या प्रमाणे त्या शास्त्राने मेंदू ही उत्पत्ती कशी करतो याची कल्पनासुध्दा मांडलेली नाही, उत्तर तर दूरच राहिले. मन आणि शरीर यांचा प्रश्न अजून रहस्यच आहे. या क्षेत्रातल्या उर्ध्वर्यूंनी जीवशास्त्र आणि मेंदूचा अभ्यास यांच्यातल्या रिडक्शनिस्ट वृत्तीच्या विरोधात आता काम चालू केले आहे. रिडक्शनिस्ट हे एखाद्या अवघड प्रश्नाचे उत्तर शोधताना त्याचा भाग असणार्या सोप्या प्रश्नांची उत्तरे अगोदर शोधतात आणि त्याचा आधार घेत त्या अवघड प्रश्नाची उकल करण्याचा प्रयत्न करतात. सोप्या केलेल्या प्रश्नांना जी तत्वे लागू पडतात ती अवघड म्हणजे मुळ प्रश्नाला लागू पडतातच असे नाही. या लोकांचे असे म्हणणे आहे की चेतनेकडे किंवा चित्ताकडे आपण ज्या नजरेने बघतो त्याचाच खरा प्रश्न आहे. या दृष्टिकोनातच मुलभूत फरक पडला तरच आपल्याला अंतीम सत्याच्या जवळपास जाता येईल. काही विचारवंत हाती असलेल्या माहितीचा उपयोग करून वेगवेगळे सिध्दांत मांडू पहात आहेत. याच वैज्ञानिक माहितीचा उपयोग करून ते प्रयोगानेच हे सिध्द करण्याच्या प्रयत्नात आहेत की वैज्ञानिकांनीच गोळा केलेल्या माहितीने हे सिध्द होत आहे की भौतिकवादाकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरे नाहीत. या सगळ्या शास्त्रज्ञांमधे एक समान विचार आहे तो म्हणजे या सगळ्या यंत्रवत प्रयोगामधे आणि या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरामधे मानवाला उपयोगी असे काहितरी पाहिजे आणि दुसरे म्हणजे विज्ञानाच्या हटवादीपणाला विरोध करणे, त्यांच्यातला कर्मठपणा संपवला पाहिजे याबद्दल एक मत.
चेताशास्त्रज्ञांना सगळ्यात जास्त सकारात्मक विरोध होतो आहे तो मरणाप्रत पोहोचलेल्या अनुभवांचा अभ्यास करणार्यांकडून. इंग्रजीमधे त्याला “Near Death Experiences” असे म्हणतात. (NDE). आपणही त्याला एन्. डी. ई. असेच म्हणूया.
या क्षेत्रात काम करणार एक ख्यातनाम शास्त्रज्ञ आहेत श्री. मुडी रेमंड. पौराणीक काळापासून ते आत्तापर्यंत, आणि सर्व संस्कृतींमधे मरणाच्या वेळेस आलेल्या गूढ अनुभवांबद्दल लोक बोलत आलेले आहेत. काही ठिकाणी तर असे अनुभव लिहूनही ठेवले आहेत. माणूस मरतो म्हणजे नक्की काय होते याच्या अभ्यासात आधुनिक वैद्यकशास्त्राची फार मदत झाली आहे. कारण त्यामुळे मरणाच्या दाढेतून ओढून आणल्या गेलेल्या माणसांची संख्या वाढून अभ्यासाला ती उपलब्ध झाली. मुडी आणी त्यांच्या चमूने या क्षेत्रात ७० सालात मुहूर्तमेढ रोवली त्यानंतर बर्याच शास्त्रज्ञांनी या विषयाला वाहून घेतले आहे. सध्याच्या काळात दुरदर्शन आणि इतर प्रसारमाध्यमांमुळे आपल्याला त्यांच्या मुलाखती ऐकायला मिळून त्यांच्या अनुभवांची ओळख झाली आहेच. जेव्हा जेव्हा ही माणसे मेली आहेत असे जाहीर केले जाते त्यानंतर ही माणसे असा दावा करतात की त्यांच्या शरीराच्या बाहेर पडून ते त्यांचे शरीर किंवा ती अपघाताची जागा, शस्त्रक्रियेच्या टेबलावरून बघू शकले. ज्या इतर गोष्टी ते सांगतात त्यात त्यानंतर त्यांचा प्रवास एका अंधार्या बोगद्यातून चालू झाला. त्या बोगद्याच्या शेवटी मग त्यांना त्यांचे आधीच मृत्यू पावलेले मित्र, आप्त दिसले. त्यानंतर एक दिव्य प्रकाश त्यांना त्यांच्या पूर्वायुष्याचा आढावा घ्यायला सांगतो. जवळपास सगळ्याच लोकांनी हा दिव्य प्रकाश भेटल्याचे सांगितले आहे. हा प्रकाश भेटल्यावर त्यांना आनंदाच्या, प्रेमाच्या उर्मी वर उर्मी आल्या आणि तरी सुध्दा त्यांचे मन शांत होते. त्यानंतर त्यांना शोध लागतो किंवा त्यांना त्यांच्या कानात कोणीतरी सांगते की तुमच्या मृत्यूची वेळ अजून आलेली नाही तेव्हा तुम्ही तुमच्या शरीरात परत जा. सर्वच लोकांना असा अनुभव येतो असे नाही. काही लोकांना या स्वर्गिय आनंदाऐवजी दु:खद अनुभवपण आलेले त्यांनी नमूद केलेले आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे ज्यांना या अनुभवातून जावे लागले होते त्यांच्या व्यक्तिमत्वात फारच मुलभूत फरक पडला आणि त्यांची मृत्यूची भिती नष्ट झाली. हा फरक का पडला हे समजायला काही अवघड नाही. या असल्या अनुभवांनंतर आपल्या शरीर आणि या वास्तव जगाच्या पलिकडे आत्म्याच्या अस्तित्वाची शंका घ्यायचे काही कारण नाही असे त्यांन खात्रीपूर्वक वाटत असते. अर्थात NDEचा अभ्यास करणारे आणखी एक संशोधक श्री. फेनवीक म्हणतात “हे असले अनुभव काहीही संगत असले तरी आत्म्याचे मेंदूबाहेरील अस्तित्व त्याने सिध्द होत नाही. काय सांगावे हाही एक मेंदूचाच खेळ असू शकेल. त्याने तयार केलेला एखादा भास !” मृत्यू पावत असलेल्या मेंदूवर अभ्यास करणार्या मानसशास्त्रज्ञ श्रीमती. सुसान ब्लॅकमोर यांच्या मते हे सगळे अनुभव हे मेंदूची, तीव्र बौध्दिक ताण, टोकाची भिती आणि मेंदूला होणार्या प्राणवायूची कमतरता, यावरची प्रतिक्रिया आहे आणि प्रत्येक माणूस मरताना यातून जात असतोच."
प्राणवायूची कमतरता हे मेंदूमधे काय खेळ करू शकतात हे आपल्याला माहिती आहेच.
जयंत कुलकर्णी.
भाग ७ समाप्त.
पुढे चालू.
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ................?भाग - ६
Reprinted with permission from EnlightenNext magazine,
© 2005 EnlightenNext, Inc. All rights reserved. www.enlightennext.org
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - १
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - २
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ३
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ४
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ५
मागच्या भागात म्हटल्याप्रमाणे मेंदूचा डावा भाग हा शरीराच्या उजव्या भागावर ताबा ठेवते आणि उजवा भाग डाव्या भागावर हे आता सर्वमान्य आहे. दृष्टीच्या बाबतीत पण हेच खरे आहे. प्रत्येक डोळ्याच्या दृष्टीचे डाव्या बाजूचे क्षेत्र हे मेंदूच्या उजव्या बाजूला जोडलेले असते आणि उजव्या बाजूचे हे डाव्या. हे माहीत असल्यामुळे आता आपल्याला हे कळू शकते की दृष्टीच्या एखाद्या क्षेत्रात जर एखादी माहीती मेंदूला दिली तर ती मेंदूत कुठल्या भागात पोहोचेल. हीच पध्दत वापरून यांनी पूर्वी हे शोधून काढले होते की मेंदूचा डावा भाग हा कार्यकारणभाव, भाषा इत्यदींसाठी जबाबदार असतो. उदा. जर एखादी माहीती मेंदूच्या फक्त डाव्या भागालाच जर पोहोचती केली आणि जर त्या माणसाला त्या बद्दल विचारले तर तो बर्यापैकी माहिती देऊ शकतो. पण हेच जर उलटे केले तर तो माणूस त्या माहितीविषयी बर्यापैकी अनभिज्ञ असतो. उदा उजव्या मेंदूला जर आपण एका चमच्याचे चित्र दाखवले तर त्या माणसाचा डावा हात अनेक वस्तूमधून चमचा बरोबर शोधून काढू शकतो. एवढेच काय, तो हेही सांगतो की ती वस्तू त्याने प्रत्यक्ष बघितलेली नाही. उजवा मेंदू जरी व्यक्त करू शकत नसला तरी त्याला इच्छाशक्ती आणि स्वत: विचार करण्याची ताकद आहे हे निश्चित. हे तपासून बघण्यासाठी चेताशास्त्रज्ञ डोनाल्ड मॅकने एक २० प्रश्नोत्तरांचा खेळ तयार केला आणि तो स्वतंत्रपणे खेळायला मेंदूच्या दोन्ही भागांना शिकवले. पहिल्यांदा त्याच्या विरुध्द आणि नंतर एकामेकांविरुध्द. पण या खेळाचे लवकरच शोकांतिकेत रुपांतर झाले. या तथाकथित दोन मेंदूंच्या माणसांना त्यामुळे एका नवीन रोगाचा सामना करायला लागला. त्याचे नाव “एलियन-हॅंड सिन्ड्रोम” कल्पना करा, तुमच्या उजव्या हातानी तुम्ही तुमच्या पॅंटची चेन लावली आणि त्याच वेळी तुमचा डावा हात ती चेन काढतोय. किंवा तुम्ही मित्राशी हस्तांदोलन करायला उजवा हात पुढे केला आणि त्याच वेळी डावा हात त्याला मारण्यासाठी उगारताय ! हे काल्पनिक वाटेल कदाचित, पण त्या सर्व रुग्णांनी अशाच काहीश्या तक्रारी करायला सुरवात केली होती. एका स्त्रीने अशी तक्रार केली की तिला तिची बॅग भरायला हल्ली दुप्पट/तिप्पट वेळ लागतो कारण ती एका (उजव्या) हाताने बॅग भरते आणि लगेचच दुसर्या हाताने भरलेले कपडे बाहेर फेकते. एकाने तर अशी तक्रार केली की तो आता झोपायला घाबरतो कारण त्याला झोपायच्या वेळी असे वाटते की त्याचा डावा हात त्याचा गळा आवळतोय.
मेंदूच्या दोन्ही भागात वेगवेगळा विचार चालू असतो हे ऐकायला विचित्र वाटेल कदाचित पण हे शेवटी प्रयोगाने सिध्द झालेच आणि ते केले एका चेताशास्त्रज्ञ मायकेल गाझींगा आणि जोसेफ दू यांनी. जरी आपला डावा मेंदू भाषेचे केंद्र असले तरी काही जणांच्या बाबतीत उजवा मेंदूपण ते काम करतच असतो. एका तरूण मुलावर यासाठी प्रयोग करण्यात आला. या मुलाच्या मेंदूचे पण असेच दोन स्वतंत्र भाग झाले होते पण उजवा मेंदू भाषेच्या संदर्भात थोडेसे काम करायला शिकला होता. संशोधकांनी या मेंदूच्या दिन्ही भागांना काही प्रश्न विचारले आणि असे आढळले की जेथे मत आणि आवडीनिवडीचा प्रश्न आला तेव्हा दोन्ही मेंदूमधे मतभेद आढळले. जेव्हा त्याला तू पदवीधर झाल्यावर काय होणार असे विचारले तेव्हा डाव्या मेंदूने त्याचे उत्तर व्यवस्थित दिले “मला ड्राफ्ट्समन व्हायचे आहे. मी त्याचेच शिक्षण घेतो आहे ना !” पण हाच प्रश्न त्याच्या उजव्या मेंदूला विचारण्यात आला तेव्हा त्याने पुटपुटत अडखळत उत्तर दिले “au...to.mo....bile...r-a-c-e-r”.
मेंदूचे दोन भाग झाले तर तो दुभंगलेल्या व्यक्तिमत्वाला जन्म देतो ही कल्पना वैज्ञानिकांना आव्हानात्मक वाटते त्यापेक्षाही मेंदूमुळेच आपले चित्त आणि व्यक्तिमत्व तयार होते हे सिध्द करण्याच्या प्रयत्नांवर याचा काय परिणाम होईल, हा शोध ते घेऊ लागले. त्यामुळे वैज्ञानिकांमधे हा एक वादाचा मुद्दा झाला होता. परंतू या आभ्यासामुळे ज्यांना नोबेल पारितोषीक मिळाले त्यांच्या मते एक गोष्ट स्पष्ट आहे “आम्ही जे काही बघितले आणि प्रयोग केले त्यावरून हेच सिध्द झाले आहे की त्या शस्त्रक्रियेमुळे दोन अंतर्मने असलेली माणसे तयार झालेली होती हे निश्चित.”
मी जेव्हा संशोधन करत होतो तेव्हा म्हणजे साधारणत: बघा मागच्या उन्हाळ्यात एका सकाळी माझा कॉलेजमधला मित्र माझ्या कार्यालयात येऊन धडकला. त्याच्या चेहर्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. “ माझ्या वडिलांना काहीतरी झालंय” तो म्हणाला. “ते नेहमीसारखे वागत नाही आहेत”.
हे माझ्या मित्राचे कुटुंब माझ्या चांगल्या परिचयाचे होते. त्याच्या वडिलांनापण मी गेले कित्येक वर्षे ओळखत होतो. गेले २० वर्षे ते पार्किंसनशी लढा देत होते. त्या त्रासामुळे या एके काळच्या कायदेतज्ञ आणि धावपटूची स्वच्छ विचार करायची कुवत चांगलीच कमी झाली होती. त्यांच्या चेहर्यावर त्यामुळे वेदना आणि वैचारिक गोंधळ याची कायमची छाप पडलेली मी बघत आलेलो आहे. हे सगळे मला आणि माझ्या मित्राला माहीत होते. पण आज काहीतरी वेगळेच दिसत होते.
“म्हणजे काय? परत पार्किन्सन का ? मी विचारले.
“समजत नाही. पण त्यांच्या औषधाचा काहीतरी विचित्र परिणाम झालेला दिसतोय. ते भयंकर विचित्र वागायला लागले आहेत. काल रात्री माझ्या भावाला ते, खेळण्यातली पिस्तोल घेऊन फाटकाच्या इथे उभे राहिलेले दिसले. ते म्हणे आमच्या घराचे कुठल्यातरी दरोडेखोरांच्या टोळीपासून संरक्षण करत होते.”
“आपल्या इथे ? मी विस्मयाने विचारले. क्षणभर त्याच्या चेहर्यावर विषादपूर्ण हसू पसरले.
“हो ना ! एवढेच नाही तर माझा भाऊ तेथे पोहोचल्यावर ते त्याला म्हणाले “बरं झालं तू आलास मला जरा मदत पाहिजेच होती.
“आता कसे आहेत ते ?” मी विचारले.
त्यांना आता हॉस्पीटलमधे दाखल केले आहे. त्यांच्या खोलीत जर कोणी नसेल तर ते लगेचच पळून जायचा प्रयत्न करतात. फारच वाईट परिस्तिथी आहे त्यांची. मला सांग, ज्या माणसाला आपण आयुष्यभर जवळून बघत आलो आहोत, तो माणूस फक्त रासायनिक बदलामुळे एवढा बदलू शकतो ? काय म्हणायचे त्यांना ? कोण आहोत आपण ? कोण आहेत ते? वकील ? धावपटू का पोलीस? का फक्त मेंदू? त्याने वैतागून विचारले.
मेंदूचे रसायनशास्त्र आणि चित्त/मन यांच्यामधले नाते या सध्याच्या युगात महत्वाचे ठरत आहे. न्युरोबायोलॉजीस्ट मुळे आता मेंदूमधल्या रसायनांमधल्या बदलामुळे आपली मनस्थिती आणि हेतूही बदलत असतात हे सिध्द झाले आहे. एन्ड्रेनलीन, एन्डॉरफिन्स, डोपामाईन, सेरोटॉनीन हे शब्द आता आपल्या चांगल्याच ओळखीचे झाले आहेत. या क्षेत्रात काम करणार्या माणसांनतर आता माणसाच्या वागण्यामागे कुठल्या ना कुठल्या स्वरुपात मेंदूचे रसायनशास्त्रच आहे याची खात्रीच पटली आहे.
स्टीव्हन जॉन्सन यांनी “Mind Wide Open: Your Brain and the Neuroscience of Everyday Life.” त्याचे सार म्हणून खालील मत मांडले आहे.
“आपले व्यक्तिमत्व, (जे एकमेव आहे आणि ज्याचे एक व्यक्ती म्हणून इतरेजण मान्यता देऊ शकतात) हे मेंदूत जी वेळोवेळी रसायने तयार होतात आणि ज्या प्रकाराने तयार होतात त्यावर ठरते.” माझ्या मित्राच्या वडिलांसारख्या अनेक मनोरुग्णांच्या अभ्यासानंतर या मताला आता मान्यता मिळाली आहे. १९५० सालच्या मानसरोगतज्ञांनी जेव्हा थोराझाईन नावाच्या औषधाने अनेक मनोरुग्ण बरे केले, त्यानंतर रसायनशास्त्राचा मेंदूच्या कार्यात सहभाग या संशोधनाला बरीच चालना मिळाली. एवढेच कशाला दारु पिऊन झिंगणार्या माणसाचा आपण जर नीट अभ्यास केला तर आपल्याला हे लगेच पटेल. याचा वापर करुन जर उद्या आपला स्वभाव बदलायच्या गोळ्या मिळायला लागल्या तर आश्चर्य वाटायला नको. सायकोफार्माकॉलॉजीमधेही शक्यता पडताळून पाहिली जात आहे.
आपल्याला सगळ्यांनाच प्रोझॅक नावाचे औषध माहीत असेल. हे एक औदासिन्य दूर करायचे जालीम औषध आहे. गेली दोन दशके या औषधाने फार महत्वाची भुमीका बजावली आहे. पेशी जे रसायन बाहेर टाकतात तेच रसायन परत शोषूनही घेऊ शकतात. सेरोटोनीन हे एक संदेशवहनाचे काम करणारे रसायन आहे. मेंदूमधल्या ज्ञानतंतूच्या पेशी हे रसायन तयार करतात. याचा वापर करुन या पेशी एकामेकाम्शी संपर्क साधतात. पेशी हे रसायन त्यांच्या अवती भोवती सोडतात. हे रसायन मग प्रवास करुन दुसर्या पेशींच्या ग्रहण करणार्या जागांना चिकटतात आणि त्यांना संदेश देतात किंवा ज्या पेशींनी हे तयार केलेले आहे त्याला पण परत चिकटते. या पेशी ते रसायन ते पुढच्या वापरासाठी परत शोषून घेतात. या क्रियेला re-uptake असे म्हणतात. या स्वशोषणामधे आणि दुसर्या पेशींना जाऊन चिटकणे, यामधे एक सुवर्णमध्य साधलेला असतो. काही औषधे हे स्वशोषण थांबवतात ज्यामुळे संदेशवहनासाठी जास्त सेरोटोनीन उपलब्ध होते. हे औषध वापरुन औदासिन्य दूर करता तर येतेच पण बरेचजण हे औषध जरा 'जास्तच' बरं वाटावं म्हणूनही करतात. याचा हा वापर योग्य आहे का नाही हा वादाचा मुद्दा आहे. पण प्रोझॅकचा खरा उपयोग हा काही आजारात महत्वाचा आहे हे मात्र निर्विवाद.
क्रॅमरने त्याच्या “Listening to Prozac” पुस्तकात रोग्यांचे प्रोझॅक घेतल्यानंतरचे अनुभव नमुद केले आहेत.या अनुभवाबद्दल लिहीतांना त्यांनी म्हटले आहे की प्रोझॅक घेतल्यावर त्यांच्या चित्तवृत्ती उल्हसित तर झाल्याच पण त्यांच्या व्यक्तिमत्वात जाणवण्याइतपत बदल झाला होता. अशाच एका स्त्रीबद्दल, तिचे नाव टेस, त्याने लिहीले आहे की या बाईचे औदासिन्य तर दूर झालेच पण ती अधिक आनंदी, मित्रमैत्रिणी जोडणारी, हसतमुख, कटकट न करणारी झाली. एवढेच नाहीतर तिच्या कार्यालयीन कामात अधिक कार्यक्षम झाली. तिचे हे व्यक्तिमत्व जवळजवळ सहा महिने टिकले. क्रॅमरने जेव्हा तिचे प्रोझॅक बंद केले तेव्हा ती परत हळूहळू आपल्या मूळ स्वभावाकडे परतली. हे लक्षात आल्यावर क्रॅमरला तिचा प्रोझॅकचा डोस परत चालू करायला लागला. दुसरी एक मनोरुग्ण, जिचे नाव ज्युलिया होते तिचा आजारही बरा झाला आणि तिच्यातही असाच चांगला बदल झाला. जेव्हा क्रॅमरने तिचा डोस कमी करायचा प्रयत्न केला तेव्हा दोनच दिवसांनी तिचा फोन आला. ती म्हणाली “मला अत्यंत निराश वाटते आहे. आत्महत्या करावीशी वाटते. मला आताशा सारखा राग येतो आणि माझ्या लोकांकडून अपेक्षा अवास्तव वाढल्या आहेत. मी रात्रीच उठून घर आवरायला काढते आणि जे शेवटचे वाक्य तिने म्हटले तेच टेसनेही म्हटले होते “ मी मीच राहिले नाही”
क्रॅमरच्या या लिखाणावर भाष्य करताना त्याच्या पुस्तकात (The Future of the Self) एंडरसन म्हणतो “क्रॅमरने ज्या रुग्णांबद्दल लिहीले आहे त्या सर्व रुग्णांची अशी ठाम खात्री होती की प्रोझॅक घेतल्यावर त्यांचा जो स्वभाव झाला होता तोच त्यांचा मूळ स्वभाव आहे. मग त्यांचे खरे व्यक्तिमत्व कोणचे? आणि ते कोण ठरवते ? क्रॅमरला, ज्याने हे लिहीले त्यालाही हे कोडे उलगडलेले नाही. म्हणुन तो विचारतो “जर मेंदूतले छोटेसे बदल आपल्यात एवढे बदल घडवतात तर आपल्या व्यक्तिमत्वातील बदलांवर आपल्या मेंदूचा ताबा नसतो असे म्हणण्याचे धाडस आपण कसे करणार ? या सगळ्या अभ्यासातून हे सिध्द होण्याच्या मार्गावर आहे की आपण आपल्या मेंदूचीच एक फलोत्पत्ती आहोत.”
इजा पोहोचलेल्या मेंदूचा अभ्यास (split brain) आणि मज्जातंतूंचे रसायनशास्त्र याचा मेळ घातला तर मेंदू आणि मन यांच्यातील दृढ संबंध स्पष्ट होतो. नवनवीन छायाचित्रणाची परिभाषा वापरुन ज्या काही त्रुटी राहिल्या आहेत त्या भरुन काढायचा प्रयत्न चालूच आहे. मेंदूच्या विविध भागातील रक्ताभिसरणाचा अभ्यास करुन आणि PET,SPECT,fMRI या आधुनिक तंत्रांचा वापर करून मेंदूच्या विविध भागाम्चे सर्वेक्षण केले गेले आहे. या तंत्राचा वापर करुन शास्त्रज्ञांनी मेंदूमधील जवळजवळ बारा केंद्रे फक्त संभाषणासंबंधी आहेत हे शोधून काढले आहे. तीसहून आधिक ही दृष्टीसंबंधी शोधून काढली आहेत. एवढेच काय एक केंद्र उभ्या रेषांचे आहे तर एक फक्त आडव्या रेषांसाठी आहे. हालचाल टिपण्यासाठी एक तर निळ्या रंगासाठी एक आहे. चेहरा ओळखण्याची क्रियातर फार गुंतागुंतीची आहे. आपला विश्वास बसणार नाही पण काही चेहयाच्या प्रतिमा एका विशिष्ठ कोनात दाखवल्यावरच काही मज्जातंतू प्रकाशमान झाले असे आढळून आले आहे. आपल्या मेंदूत आपल्या आजीसाठी एक खास केंद्र असल्याचाही संशय आहे.
पुढे चालू........
जयंत कुलकर्णी.
भाग ६ समाप्त.
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ................?भाग - ५
Reprinted with permission from EnlightenNext magazine,
© 2005 EnlightenNext, Inc. All rights reserved. www.enlightennext.org
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - १
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - २
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ३
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ४
तेवढ्यात कॅमर्स माझ्याकडे येताना मला दिसला. एका दुसर्या अभ्याससत्राचा निमंत्रक न आल्यामुळे ते काम करशील का? असे तो मला विचारत होता. मी आनंदाने त्याला होकार दिला. त्याने मला त्यातील वक्त्यांची नावे सांगितली आणि त्यांची ओळख करुन घेण्यासाठी ते कुठे भेटतील तेही सांगितले. हे अभ्याससत्र ज्या सभागृहात होते ते मुख्य सभागृहापेक्षा खूपच लहान होते आणि श्रोत्यांची संख्या असेल जेमतेम २००/३००.
पहिले भाषण होते अतिंद्रीय शक्तीचे नावाजलेले अभ्यासक गॅरी श्वार्टझ यांचे. त्यांनी जे “After Life Experiments” नावाचे पुस्तक लिहिले होते त्यात त्यांनी केलेल्या बर्याच प्रयोगांची माहिती लिहिली आहे. त्या पुस्तकात त्यांनी हे सिध्द करायचा प्रयत्न केला आहे की चित्त/आत्मा वगैरे जे काही असते त्याचे अस्तित्व माणसाच्या शारीरिक मृत्यूनंतरही असते. ते एरिझोना विद्यापिठाच्या “Human Energy Systems Labs” या प्रयोगशाळेचे प्रमुख म्हणून काम करतात. त्यांचा या क्षेत्रातील आधिकार फार मोठा आहे. त्यांनी त्यांच्या विद्वत्तापूर्ण भाषणात त्यांचे विचार मांडले आणि असा खेदही व्यक्त केला की विज्ञानजगत या शोधांना फारसे गांभीर्याने घेत नाही. त्यानंतर फ्लोरिडामधल्या एका विद्यार्थ्याचे ’दूरदृष्टी” वर भाषण झाले. त्यानंतर एका जर्मन संशोधकाचे. त्यात त्याने आपण दुसर्याची मज्जारज्जूची व्यवस्था जाणीवपूर्वक कशी मृतवत करु शकतो हे सांगितले. मुख्य सभागृहामधे ऐकलेल्या कंटाळवाण्या शास्त्रीय भाषणांपेक्षा मला हे अभ्याससत्र आवडले कारण यात मेंदूच्या पलिकडे जाऊन शोध घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला गेला होता आणि हे सगळे सगळ्यांनाच नवीन होते. परिषदेचा मुख्य विषय चेताशास्त्र हा असतानासुध्दा हे विषय चर्चेला आलेले पाहून मला फारच आश्चर्य वाटले. एका अभ्यासकाचा विषय तर चेतना आणि ध्यान धारणा हा होता तर दुसर्याचा कला, आत्मा आणि जाणीव असा होता. या सगळ्या चर्चांना चांगलीच गर्दी होती. एका सभागृहात कृत्रिम मेंदू आणि यंत्रमानवावर चर्चा चालली होती. मी कॅमर्सला या बाबतीत विचारले असता तो म्हणाला “ या विषयांवर आपल्याला इतकी थोडी माहिती आहे की जेवढे विचार ऐकायला मिळतील ते आपल्याला हवेच आहेत. काय सांगावे काहीतरी महत्वाचे हाती लागायचे. या बाबतीत माझी भूमिका १०० फुले उमलू देत अशीच आहे." आयोजकांनी जरी या कारणाने सगळ्यांना आपले विचार मांडायला परवानगी दिली होती तरी सगळ्या परिषदेचा कल हा वैज्ञानिक विश्लेषणाकडेच होता. मेंदूच्या कामाचे रहस्य हे विज्ञानाच्या नियमाने सिध्द व्हायला हवेत हे सगळ्यांचे स्पष्ट मत होते. मला पण हेच आपेक्षित होते. आठवड्याच्या आतच आपला मेंदू आपले चित्त तयार करतो हे मला पटायला लागले होते. हे जर खरे असेल तर आपण ज्याला सत्य समजतो ते बर्याच प्रमाणात चूक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या आठवड्यात मला इतरही गोष्टी माहीत झाल्या त्या अशा –
१ स्वतंत्र इच्छाशक्ती हा एक भ्रम आहे.
२”मी” हा पण एक भ्रम आहे
३ चित्त हेही एक प्रकारचा भ्रम आहे किंवा ते स्वत:हून काहीही करत नाही.
हे सगळे कळल्यावर माझी अवस्था एखाद्या खोल विहिरीत पडल्यासारखी झाली. मी पुरता गोंधळून गेलो. एक सामान्य माणूस म्हणून मी या सर्व संशोधकांची भाषणे ऐकली होती आणि या क्षेत्रातला प्रवेश किती अवघड आहे हेही मला चांगलंच समजलं होतं. मला आश्चर्य वाटत होते की हे सगळे या लोकांना कसे पटत होते ? समजा तुमची प्रेयसी तुमच्या डोळ्यात बघून म्हणाली की हे एक अल्गोरिदम आहे तर तुम्हाला कसे वाटेल ?तशीच माझी अवस्था झाली. मला तर शेवटी असे वाटायला लागले की या सर्वांचा मेंदू आम्हाला हे ( आपण म्हणजे फक्त आपला मेंदूच आहे) पटवण्यासाठी प्रोग्रॅम केला आहे की काय !
मनाचा संक्षिप्त इतिहास
परवा परवा पर्यंत माणसाच्या मानसशास्त्रामधे मेंदूचा सहभाग आहे हे बहुसंख्य लोग मानायला तयार नव्हते. माणसाच्या मनाचा आणि मेंदूचे काहीतरी नाते आहे हे सांगणारा आणि तसे लिहून ठेवणारा या भागातला पहिला माणूस म्हणजे क्रोटॉनचा पायथॉगोरिअन अल्मिऑन. हे त्याने ५व्या शतकात लिहून ठेवले आहे. त्या अगोदर अशी समजूत होती की माणसाचे मन ह्रदयात आहे. उदा. इजिप्तचे पुजारी जेव्हा प्रेताची ममी तयार करायचे तेव्हा नाकावाटे सर्व मेंदू कोरुन बाहेर काढायचे पण ह्रदयाला मात्र हात लावायचे नाहीत. कारण ह्रदय हे माणसाच्या बुध्दीचे निवासस्थान समजले जायचे आणि मृत्यूनंतरच्या जगात त्याला बुध्दीची गरज भासणार आहे याची त्यांना खात्री होती. पुरातन काळात प्रेताचे विच्छेदन निषिध्द मानले जायचे त्यामुळे मज्जातंतुची माहीती असायचे काहीच कारण नव्हते. त्यामुळे भावना अनावर झाल्यावर ह्रदय धडधडायला लागायचे याचे कारण, ह्रदयात मन आहे असेच ते समजायचे. माणसाच्या मानसिक आणि बौध्दिक विश्वाचे केंद्र ह्रदयात आहे असा त्यांचा दृढ समज होता. गंमत म्हणजे एरिस्टॉटलसारख्या थोर वैज्ञानिकाचीसुध्दा याला पुष्टी होती. एक बुध्दिमान जीवशास्त्रज्ञ असल्यामुळे त्याला एक खात्री होती ती म्हणजे मेंदूसारख्या अवयाला (डोक्यातल्या भागाला) काहीतरी महत्वाचे काम असणारच. मेंदू हाताला गार लागल्यामुळे त्याने असे अनुमान काढले की या अवयवात रक्त गार करायची रचना निसर्गाने केली आहे. माणसाच्या मेंदूच्या (इतर प्राण्यांच्या तुलनेत) मोठ्या आकारचे, त्याने त्याचे पण मजेशीर स्पष्टीकरण दिले – माणसाला विचार करण्याची ताकद दिली असल्यामुळे त्याचे रक्त जास्त गरम होते म्हणून रक्त गार करण्यासाठी मोठी व्यवस्था लागते.
एल्मिऑनच्या सिध्दांताला हिप्पोक्रस व प्लॅटोसारख्यांचा पाठिंबा मिळाल्यामुळे सुदैवाने वरील समजूत मागे पडली. नंतर एरिस्टॉटलच्या विरोधाला न जुमानता रोमन काळातल्या वैद्यांनी या कल्पनेला उचलून धरले. त्यांनी अजून एक महत्वाचे काम केले, ते म्हणजे कर्मठ लोकांचा विरोध झुगारुन त्यांनी चक्क शवांचे प्रयोगासाठी विच्छेदन चालू केले आणि त्यात त्यांना झाडांच्या फांद्याप्रमाणे कवटीतून आणि मणक्यातून विस्तारत जाणार्या मज्जातंतूंचे अस्तित्व सापडले. १७ व्या शतकापर्यंत या शोधावर वाद चालले होते, जसे त्याच शतकात तत्वज्ञानी हेन्री मूर म्हणाला “हा माणसाच्या कवटीतला करड्या रंगाचा पदार्थ माणसाला विचार करायची ताकद देतो असे म्हणणे हास्यास्पद आहे." हे ही लक्षात घेतले पाहिजे त्या काळातली मेंदूची प्रतिकृती आणि आत्ताची प्रतिकृती यात महदंतर आहे. आपण आता मेंदू हे अब्जावधी न्युरॉन्सचे, विद्युत आणि रसायनांचे जाळे म्हणून ओळखतो. पण त्या वेळी ते असे समजत की मेंदूमधे असंख्य कप्पे आहेत आणि त्यात एक स्वर्गिय रसायन भरले आहे. हे रसायन, जे चैतन्य मज्जातंतूमधे असते, त्याच्या मार्फत शरीराच्या कानाकोपर्यापर्यंत आपल्या आज्ञा पोहोचवते. हा जो बदल झाला म्हणजे चैतन्यावर आधारीत मेंदूच्या कामाचे विश्लेषण करणे ते आता शुध्द विज्ञानाचा आधार घेऊन त्याच्या कामाचे विश्लेषण करणे, याच्यामुळे धर्माच्या कर्मठ पाठिराख्यांना अजिबात न आवडणार्या कल्पनेचा जन्म झाला असे म्हणायला हरकत नाही. मन, आत्मा, इत्यादींना मेंदूच जन्म देतो तीच ही कल्पना. थोडक्यात काय या सगळ्याच्या मागे मेंदूच आहे ही कल्पना.
अर्थात इतर शास्त्रीय कल्पनांप्रमाणे या कल्पनेलाही बराच विरोध झालाच. एका घटनेमुळे मात्र या कल्पनेच्या विरुध्द असलेल्या लोकांमधे खळबळ उडाली. त्याचे असे झाले- वर्ष होते १८४८. फिनीस गेज नावाचा एक कामगार एका रस्त्याच्या कामावर देखरेख करत असताना एक स्फोट झाला अणि एक इंच व्यासाच्या सळईचा तुकडा जो उडाला तो एखाद्या बंदूकीच्या गोळीसारखा, त्याच्या डाव्या गालात घुसून, डोक्याच्या पुढच्या भागातून जाऊन, डोक्याच्या वरच्या भागातून बाहेर पडला. बाहेर पडताना त्याने मेंदूचा बराच भाग आपल्याबरोबर नेला. आश्चर्य म्हणजे गेज त्या धक्क्यातून काही मिनीटातच सावरला आणि काहीच न झाल्यासारखा वागू लागला. ज्या डॉक्टरांनी त्याला प्रथमोपचार दिले, त्याने असे नमूद केले आहे की त्या घटनेनंतर त्याबद्दल, गेज इतर घाबरलेल्या लोकांपेक्षा जास्तच स्पष्ट बोलत होता. त्याच्या माहीती गोळा करण्याच्या क्षमतेला काहीही झाले नव्हते. कालांतराने मात्र त्याच्यात काहीतरी मुलभूत फरक पडला आहे असे जाणवायला लागले. डॉ. जॉन हार्लो, ज्यांनी त्याच्यावर उपचार केले होते ते म्हणाले – गेज हा एक अत्यंत कुशल, जबाबदारीने वागणारा कामगार होता. त्या अपघातानंतर त्याचे वागणे अनिश्चित झाले. तो केव्हा काय करेल याचा भरवसा रहिला नाही. त्याचे वागणे उध्दट वाटू लागले. त्याचा धर्माबद्दलचा अनादर कमालीचा वाढला. त्याच्या इच्छेच्या विरुध्द काही झाले की त्याला त्या व्यक्तीबद्दल घृणा वाटायला लागली. हा सगळ बदल इतका भयंकर होता की त्याचे मित्र म्हणायला लागले की हा गेज नसून दुसराच कोणीतरी आहे.
गेजच्या या अपघाताच्या काळात शास्त्रिय जगतात, विषेशत: फ्रेनॉलॉजीमधे (आता हे शास्त्र लोप पावले आहे कारण ते शास्त्र मेंदूचा आकार आणि तो करतो ते काम याचा संबंध जोडण्याचा प्रयत्न करत होते.) मेंदूचा प्रत्येक भाग हा वेगवेगळ्या कामासाठी राखून ठेवलेला आहे या बद्दल एकवाक्यता होती. उदा. मेंदूत आलेल्या एखाद्या संवेदनाचा यथाशक्ती अर्थ लावणे, माहिती गोळा करणे, आणि या सगळ्याचे विश्लेषण करुन त्या निर्णयाप्रमाणे वागणे या सगळ्यासाठी वेगवेगळ्या जागा ठरलेल्या असतात असे त्यांचे म्हणणे होते. पण गेजमधे झालेल्या बदलामुळे या जगात परत एकदा खळबळ उडाली कारण मेंदूत अशा काही जागा आणि व्यवस्था आहेत ज्या तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख आणि वागणे ठरवतात, हे प्रकाशात आले. त्यानंतरच्या काळात मेंदूचे काम आणि आपण जे जगात अनुभवतो, वागतो यांच्यातला संबंध शोधण्यासाठी शास्त्रज्ञांनी अनेक दुखापत झालेल्या मेंदूंचा अभ्यास केलेला आहे. या आभ्यासातूनसुध्दा अनेक नवीन व धक्कादायक बाबी बाहेर पडल्या.
श्री. व्ही. एस. रामचंद्रन यांनी त्यांच्या एका ऑर्थर नावाच्या तरुण रुग्णाची हकीकत सांगितली आहे. ऑर्थरच्या गाडीच्या अपघातात त्याच्या डोक्याला जबर दुखापत झाली. त्यानंतर तो असे म्हणायला लागला की त्याला भेटायला येणारे हे त्याचे आई-वडील नसून दुसरेच कोणीतरी, पण त्याच्या आई-वडीलांसारखे दिसणारे आहेत. सगळ्यांनी त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण व्यर्थ. जेव्हा जेव्हा तो त्यांना बघत असे तेव्हा त्यांना तो स्पष्टपणे सांगत असे की भले तुम्ही माझ्या आई-वडीलांसारखे दिसत असाल, पण तुम्ही माझे आई-वडील नाही. गंमत म्हणजे तो त्यांना दुरध्वनीवर मात्र लगेचच ओळखायचा आणि त्यांच्याशी गप्पा मारायचा. या प्रकारच्या रोगाला आत्तापर्यंत “कॅपग्रास” असे म्हणत. या प्रकारच्या रुग्णांची इतिहासात बर्याच वेळेला नोंद झाली आहे आणि त्याचे उत्तर मानसरोग शास्त्रज्ञांनी सिगमंड फ्रॉईडच्या “ओडिपस कॉम्प्लेक्स” मधे शोधले आहे. ( थोडेसे ओढून ताणूनच म्हणाना). हा कॉम्प्लेक्स थोडक्यात असा सांगता येईल – जेव्हा माणसाचा इगो तयार होत असतो त्यावेळी कधी कधी त्याला एकदम त्याच्या विरुध्द लिंगाच्या पालकाबद्दल आपुलकी वाटायला लागते आणि त्याच्या समान लिंगाचा पालकच नकोसा वाटू लागतो.
पण रामचंद्रन यांनी याचे उत्तर वेगळे दिले.ते म्हणाले...... त्याच्या मेंदूमधल्या एका दृष्टीच्या केंद्राचे भावनांच्या केंद्राशी असलेला संबंध त्या अपघातात तुटला असणार. त्यामुळे तो आई वडिलांना ओळखत होता, पण त्यांच्याबद्दल त्याच्या मनात त्या भावना मात्र मुळीच नव्हत्या. त्याच्यावर उपाय म्हणून त्याच्या वडिलांनी त्याला सुरवातीला वेळ नसल्यामुळे तोतया पाठवल्याबद्दल त्याची क्षमा मागितली. त्याचा थोडा काळ उपयोग झाला पण त्यानंतर परत तो तेच म्हणू लागला. जर आपण नेहमी आपले जे सामर्थ्य वापरतो ते एकदम काढून घेतले तर काय होईल याची कल्पना करणे फार अवघड आहे. उदा. एखादी घटना बघितल्यावर त्याच्यावर भावना व्यक्त करायचे सामर्थ्य गेले तर आपली काय अवस्था होईल ?
या सगळ्या कहाण्यांचा मतीतार्थ लक्षात घ्या. या सगळ्या कहाण्या आपल्या पुरातन समजुतीला धक्का देत आहेत. चेताशास्त्राच्या अनेक पुस्तकातून अशा अनेक घटनांची नोंद झालेली आहे.मेंदूच्या एका कुठल्याही भागाला थोडी जरी दुखापत झाली तर आपल्या कुठल्यातरी क्षमतेवर त्याचा परिणाम निश्चितच होतो. याचाच दुसरा अर्थ असा होतो की जरी मेंदू सगळ्या क्षमता एकत्र करून त्याचा परिणाम दाखवतो पण त्यातल्या एखाद्या क्षमतेला जर धक्का पोहोचला तर त्या एकत्रित क्षमतेवर परिणाम झाल्याशिवाय रहात नाही आणि तो जाणवण्या इतपत असू शकतो.
मेंदूला इजा पोहोचायची कारणे ही अपघातच असतात असे नाही. शल्यविशारद काही आजार बरे करायला मुद्दाम मेंदूच्या एखाद्या भागाला शस्त्रक्रिया करुन इजा करतात. (चांगल्यासाठी, पण इजाच ती). मेंदूच्या सर्व केंद्रामधे दळणवळण असते आणि या सर्व केंद्रांचे काम एकामेकांवर चांगलेच अवलंबून असते हे सध्या माहित असल्यामुळे तसल्या शस्त्रिक्रिया करायला सध्या कोणी सहसा जात नाही. काही अत्यंत न टाळता येण्याजोग्या शस्त्रक्रिया अर्थातच केल्या जातातच पण तो शेवटचा मार्ग म्हणून. (माझ्या माहितीच्या एक स्त्री आहेत, त्यांच्या मेंदूत कसली तरी शस्त्रक्रिया झाली. त्यांनी तिखट खाल्ले तर त्याचा तिखटपणा म्हणे त्यांना त्यांच्या गालावर जाणवायचा. मी स्वत: या विषयावर त्यांच्याशी बोललो आहे. त्यांच्या या सांगण्याशी त्या अत्यंत ठाम होत्या. नंतर हळू हळू काही वर्षाने हे कमी झाले पण त्यांची तिखटाची चव फारच नाजूक झाली.) पण १९४० ते १९५० या दरम्यान अपस्मार या रोगावर उपचार म्हणून मेंदूवर (पुढच्या भागावर) अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तसेच १९६० मधे ज्या शस्त्रक्रिया याच कारणासाठी करण्यात आल्या त्यामुळे मेंदू आणि स्व चा संबंध काय आहे यावरही बराच प्रकाश टाकता आला.
अगदी सामान्य माणसालाही हे माहिती असते की आपल्या मेंदूचे दोन भाग असतात- एक डावा आणि दुसरा उजवा. या दोन्ही आपल्या वागण्याच्या प्रकारांमधे योगदान असते. आपल्याला हे माहिती आहे की डाव्या भागात तर्कशास्त्र इ. सारख्या ज्ञानाचे केंद्र असते तर उजवा भाग हा भावना, कला, अंतर्ज्ञान इत्यादीचे केंद्र असते. वैज्ञानिकांच्यामते हे वाचल्यावर हे सगळे सोपे आहे असे वाटायला लागते. पण ते तेवढे सोपे आणि बरोबरही नाही. असो. पण हेमीस्फेरीक स्पेशलायझेशन” हा सिध्दांत मात्र बर्यापैकी मान्य आहे. मेंदूच्या या दोन अर्धगोलात संवाद असतो आणि तो त्यांना जोडणार्या एका मज्जारज्जूतून होत असतो. त्याचे नाव आहे “कॉरपस कॉलोसम” हा स्त्रियांमधे आकाराने किंचित मोठा असतो म्हणून स्त्रिया एकाच वेळी अनेक गोष्टींवर आपले लक्ष केंद्रीत करु शकतात असे मानले जाते. पण या दोन बाजूंचा संबंध काही कारणाने तुटला तर आपल्या डोक्यात दोन मेंदू तयार होतील का ? मग आपली स्थिती शरीर एक आणि मने दोन अशी होईल का ? काही शास्त्रज्ञांना हा प्रयोग करायची नशिबाने आयतीच संधी मिळाली.
अपस्माराचे झटके अनेक प्रकारचे येऊ शकतात. त्यातले काही अत्यंत तीव्र असतात तर काही सौम्य. त्यातला सगळ्यात वाईट प्रकार म्हणजे सलग झटके येणे, ज्याने रोग्याचे जगणे मुष्कील होते. १९६० सालात चेताशल्यविशारदांनी मेंदूच्या एका अर्धगोलातून तो झटका दुसर्या अर्धगोलार्धात पोचू नये म्हणून मधल्या “कॉरपस कॉलोसम” वर शस्त्रक्रिया करून त्या दोन भागांचा संबंध तोडायचा प्रयत्न केला. ही युक्ती बर्यापैकी यशस्वी झाली असे म्हणायला हरकत नाही कारण जगणे अशक्य असणार्या रुग्णांना या शस्त्रक्रियेमुळे बर्यापैकी शांत जीवन जगता येऊ लागले. या दोन मेंदूंच्या माणसांवर प्रयोग करायची संधी डॉ. रॉजर स्पेरी यांनी घेतली. असे पूर्वी कधीच झाले नव्हते. त्यांनी पुढील काही वर्षे या अभ्यासात घालवली आणि ते काम प्रसिध्द केले. ते काम इतके महत्वाचे ठरले की या कामासाठी त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले. या अभ्यासाचा हेतू हा मेंदूच्या दोन भागांचा अभ्यास करणे हा होता, परंतू नंतर असे आढळून आले की या अभ्यासातून अजून काहीतरी पण महत्वाचे निष्पन्न होत आहे.
पुढे चालू.....
भाग - ५ समाप्त.
जयंत कुलकर्णी.
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ................?भाग - ४
Reprinted with permission from EnlightenNext magazine,
© 2005 EnlightenNext, Inc. All rights reserved. www.enlightennext.org
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - १
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - २
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ३
“मेंदुत घडणार्या भौतिक घटना काल्पनिक अनुभवांना कसा जन्म देतात हा खरा अवघड प्रश्न आहे. उदा. मेंदूत घडणार्या रासायनिक क्रिया, इलेक्ट्रॉन्सच्या हालचाली इ.इ. यामुळे आपल्याला जे अनुभव येतात ते का ? त्याचे कार्यकारण काय ? या प्रश्नाच्या तुलनेत मज्जातंतूच्या जाळ्याचे काम कसे चालते, आपण लक्ष देतो म्हणजे काय करतो, किंवा झोपणे आणि जागे असणे म्हणजे काय हे प्रश्न सोपे आहेत. या सोप्या प्रश्नांवर बरेच काम झाले आहे.पण या कामामुळे मुळ अवघड प्रश्नाच्या उत्तराच्या जवळ आपण आलो आहोत असे म्हणणे जरा धाडसाचेच ठरेल. आणि “चैतन्य” म्हणजे काय याचा अर्थ ““मेंदुत घडणार्या भौतिक घटना काल्पनिक अनुभवांना कसा जन्म देतात” याचे उत्तर मिळाल्याशिवाय, कसा सांगणार ?
जे कॉलेजमधे तत्वज्ञान शिकले आहेत, त्यांना हा अवघड प्रश्न म्हणजेच शॉफेनहरने मांडलेला शरीर-मनाच्या संबंधित “The World Knot”ची सुधारीत आवृत्ती आहे हे लक्षात येइलच. पण ज्यांना याची कल्पना नाही त्यांच्यासाठी हे सोपे करुन सांगायचा प्रयत्न करतो. जेव्हा आपण गुलाबाचे फुल बघतो तेव्हा आपण त्याचा रंग डोळ्याने बघतो, नाकाने त्याचा वास घेतो, स्पर्शाने त्याला काटे आहेत हे ओळखतो. हे सर्व आपला मेंदू आपल्या ज्ञानेंद्रियाद्वारे करतो. पण त्याच वेळी आपण त्या फुलाच्या सौंदर्याचा आनंद आपण कसा घेऊ शकतो हे गुढ आहे. म्हणजे आपली भौतिक जाणीव आणि आपली अंतर्मनातील अशी जी खास जाणीव - आनंद (ज्याला आपण कल्पना म्हणतो कारण आपण ती दाखवू शकत नाही) या दोन्हीतील अंतर काय आहे आणि का आहे हा खरा प्रश्न आहे. रेने डेकार्तने शरीर आणि मन या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत हे सिध्द केल्यापासून भौतिक जाणीव आणि वरती लिहीलेली अंतर्मनातील जाणीव या दोन्ही एकामेकांशी कसा संबंध कसे ठेवतात, हा ही एक संशोधनाचा विषय आहे.
वरच्या उदाहरणात त्या फुलाचे अस्तित्व आपल्या मनात आपण दाखवू शकत नाही अशा काल्पनिक जाणीवा ( आनंद, राग इ.) कशा उत्पन्न करु शकतात? तसेच त्याच्या विरुध्द या भावना ज्यांच्यावर कुठलेही भौतिकशास्त्राचे नियम चालत नाहीत त्या भौतिक गोष्टींवर परिणाम करतात का ? हा ही एक प्रश्न आहेच.
जरा आता आपल्या चर्चासत्रांकडे वळूयात.
उदघाटनानंतरच्या पहील्या सत्राचे नाव होते “Neural Co-relates of Consciousness” म्हणजेच “अंतर्मनाच्या जाणीवांचे ज्ञानतंतू लावत असलेले अर्थ. ज्याला आता सगळे NCC म्हणून ओळखतात. सगळ्या चर्चासत्रांचा केंद्रबींदू जवळ जवळ हाच होता असे म्हणायला हरकत नाही. कॅमर्सच्या स्वागतपर भाषणांनंतर तीन व्यक्त्यांनी मज्जाजीवशास्त्राचा अंतर्मनातील जाणीवांकडे बघायचा दृष्टिकोन व त्याची प्रगती याच्यावर भाषण दिले. पहिला व्यक्ता होता ख्रिस्टॉफ कॉच. त्याने फ्रॅन्सीस क्रिक यांच्या बरोबर दृष्टी आणि त्याची मेंदूतील जाणीव याच्यावर जे काम केले होते त्यामुळे त्यांनी विज्ञानाच्या या क्षेत्रात बरीच प्रसिध्दी मिळवली होती. प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास त्यांचे भाषण माझ्या डोक्यावरुनच गेले. पुढच्या दोन व्यक्त्यांची भाषणे मी जेव्हा ऐकली तेव्हा एकूण जे मला कळाले त्याची गोळाबेरीज ही अशी होती –
NCC चा अभ्यास करणार्यार या शास्त्रज्ञांचे हे प्रयत्न चाललेत
– १ ज्ञानतंतूंच्या पातळीवर आपला मेंदू, जेव्हा आपण एखाद्या वस्तूची जाणीव करुन घेत असतो, तेव्हा कसा वागतो.
- २ जेव्हा आपण तीच वस्तू आपण जाणीवेच्या पलिकडे जाऊन बघतो तेव्हा मेंदू तसाच वागतो का?
आता जाणीवेच्या पलिकडे जाऊन आपल्याला कशाची तरी जाणीव होऊ शकते हेच पटणे कठीण आहे. याच्यात विरोधाभास आहे हे आपल्या लगेचच लक्षात येते. पण थांबा. त्याला काय म्हणायचे आहे हे समजवून सांगण्यासाठी कॉचने एक अत्यंत वेगळे व विचित्र उदाहरण दिले. त्याला त्याने नाव दिले “ दृष्टींची स्पर्धा”. थोडक्यात ते असे सांगता येईल –
आपण जगाकडे डोळ्याने बघतो हे या वाक्याइतके सोपे नाही. बघणे ही एक फार गुंतागुंतीची क्रिया आहे. तसे म्हटले तर मेंदूतील प्रत्येक क्रिया ही फार गुंतागुंतीची व समजण्यास अत्यंत अवघड अशी असते. जेव्हा आपण बघतो तेव्हा काय होते ते आता बघूया. जेव्हा आपण एखाद्या वस्तूकडे बघतो तेव्हा त्यावरील परावर्तित प्रकाशाचे किरण आपल्या बुबुळात शिरुन आपल्या दृष्टीपटलावर पडतात. त्याच्या मागे दृकशास्त्राच्या नियमानुसार त्या वस्तुच्या दोन उलट्या पण द्विमितीय प्रतिमा तयार होतात. या प्रतिमा जेथे त्यांच्यावर प्रक्रिया केली जाते अशा मेंदूमधील वेगवेगळ्या ३० ठिकाणी पाठवल्या जातात. या प्रक्रियेनंतर मेंदू आपल्याला एक त्रिमितीतील प्रतिमा दाखवतो. या प्रक्रिया काय आहेत आणि मेंदू त्या कशा तयार करतो हे गुढ अजून पूर्ण्पणे उलगडलेले नाही. चेताशास्त्रामधे याला “बाइंडींग प्रॉब्लेम” असे म्हणतात. थोडक्यात काय, दोन डोळे एखाद्या वस्तूचा वेगवेगळा भाग पहातात, पण मेंदू मात्र तुम्हाला आपल्याला त्याची एकच लांबी, रुंदी आणि खोली असलेली वस्तू दाखवतो.
आता आपण अशी कल्पना करुया की या दोन डोळ्यांना आपण एकामेकांपासून वेगवेगळे केले आणि त्यांना एकदम वेगळी चित्रे दाखवली तर ती दोन्ही चित्रे आपल्याला एकदम दिसतील का ? आता डोळे वेगवेगळे कसे करायचे? नाक त्यांना वेगवेगळे करतेच. एक मोठा कागद घेऊन जर त्याला नाकाचा आकार कापून तो कागद पुढे एका भिंतीला नेऊन चिकटवला तर दोन्ही डोळे वेगवेगळे जोऊ शकतात. ते कसे करायचे ते आपण त्यांच्यावर सोडूयात. होते काय ते आपण बघुया. वरील प्रश्नाचे उत्तर आहे “नाही”. जेव्हा दोन्ही डोळ्यांना वेगळी चित्रे दाखवली जातात तेव्हा त्या दोन्ही डोळ्यांमधे स्पर्धा चालू होते. मेंदू तुम्हाला एका वेळेस एकाच वस्तुची जाणीव (येथे बघणे) करुन देऊ शकतो. त्यामुळे जरी त्याला दोन इनपूट मिळत असले तरी त्याला त्यातल्या एकाच इनपूट्वर काम करावे लागते. बर्याच वेळा तो एकावरच काम करतो आणि दुसर्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो. जर या प्रतिमा सुसंगत क्रमाने दाखवल्या तर तो त्यांच्यावर आलटुनपालटुन काम करतो. आता इथे काय महत्वाचे घडतंय ते पहा. कुठल्याही एका क्षणी ज्या प्रतिमेची जाणीव मेंदू आपल्याला करत असतो त्यावेळीसुध्दा पहिली आणि दुसरी प्रतिमा आपल्या मेंदूत पोहोचत असतेच आणि तो इनपूट समान असतो. कॉच आणि त्याच्या सहकार्यांना हे समजणे फार महत्वाचे वाटते. याचे मुख्य कारण म्हणजे आता मेंदूच्या छायाचित्रणाचे अत्यंत प्रगत असे तंत्रज्ञान वापरून आता ते - १ मेंदू जेव्हा वस्तू जाणिवेतून बघतो (या वेळी आपण बघतो) आणि २ जाणीव नसताना बघतो ( वर सांगितल्याप्र्माणे) त्या वेळेच्या प्रतिमा काढून त्यांची तुलना करु शकतात. यावरुन त्यांना खात्री आहे की ते एक दिवस अंतर्मनाच्या जाणीवेचे, ज्ञानतंतू लावत असलेले अर्थ शोधून काढू शकतील.
हे वाचल्यावर तुमच्या मनात एक प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे आणि तो म्हणजे या प्रकारचे संशोधन आपल्याला आपले चित्त म्हणजे काय, हे समजायला कसे काय मदत करु शकेल ? हाच प्रश्न कॅमर्सने विचारला. आपण मागे बघितल्याप्रमाणे त्याच्या मते हे किरकोळ प्रश्न आहेत. वरील अभ्यासाने इतर बर्याच प्रश्नांची उत्तरे मिळाली तरी मेंदू आपल्या चित्तातला अनुभव कसा काय तयार करु शकतो, हा प्रश्न सोडवण्यास या अभ्यासाचा उपयोग होईल असे वाटत नाही. तत्वज्ञानी जॉन सर्ल याने कॉचच्या “The quest for Consciousness” या पुस्तकाच्या परीक्षणात म्हटल्याप्रमाणे ज्या माणसांवर हे सगळे प्रयोग केले जातात ते सर्व अगोदरच चेतन असल्यामुळे आपण या अभ्यासामुळे जास्तीतजास्त एवढेच म्हणू शकतो की जो मेंदू चेतन आहे तोच जाणीव उत्पन्न करु शकतो..... मला असे वाटते की चित्त म्हणजे काय हे आपल्याला तेव्हाच कळेल जेव्हा मेंदू चेतना असलेले चित्त कसे तयार करते हे आपल्याला कळेल.”
कॉचच्या भाषणानंतर झालेल्या प्रश्नोत्तरांच्या कार्यक्रमात एका स्त्रीने त्याला विचारले की तुमच्या या शास्त्राने काही माणसे जो मरणानंतरचे अनुभव सांगतात त्याचे काही स्पष्टीकरण देता येईल का ? त्यावेळी तर त्याचा मेंदू मृत अवस्थेत असतो. कॉचने काहीच विचार न करता पटकन उत्तर दिले “जर ते त्यांचे अनुभव सांगत असतील तर त्यांचे ज्ञानतंतू निश्चितच त्याचा अर्थ लावत असणार. मला त्यासाठी “डबल ब्लाईंड अभ्यास करावा लागेल” डबल ब्लाईंड म्हणजे
प्रयोग केला जात आहे आणि जे प्रयोग करतात त्या दोघांनाही त्या प्रयोगाचे उद्दीष्ट काय आहे हे न सांगता तो प्रयोग करणे. याचा फायदा असा असतो की दोघांचेही पूर्वग्रह या प्रयोगाच्या आड येत नाहीत.
भाग - ४ समाप्त
जयंत कुलकर्णी.
गाय आणि विदाकेंद्रे (अर्थात डेटा सेंटर्स)
left
आपण जे काही इंटरनेट वापरत असतो, ऑफिसातील कामात विदाचे आदानप्रदान करत असतो, साठवत असतो, त्या सर्वाला विदाकेंद्रे अर्थात डेटासेंटर्स लागतात. अनेक सर्वर्स जोडलेली ही क्रेंद्रे अथक आणि अहोरात्र कार्यरत असतात.
प्रचंड उर्जा खर्च होत असते. अमेरिकेच्या संदर्भात, पर्यावरण खत्याने (इपिए) प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार केवळ अमेरिकेत १.५% उर्जा ही विदाकेंद्रे वापरत असतात. १.५% हा आकडा तसा जास्त वाटणार नाही, कदाचीत पण त्याचे पैशात रुपांतर केले तर २००६ साली विदाकेंद्रे चालवण्यासाठी लागणार्या उर्जेचा खर्च, एकत्रीत $४.५ बिलीयन्स इतका होता. तो १९९६ सालच्या तुलनेने ८००% वाढला आहे. २००७ सालच्या या अहवालात असेही म्हणले आहे की विदाकेंद्रे ही पाच वर्षाच्या काळात दुपटीने वाढणार आहेत. अशाच इतर अभ्यासानुसार विदाकेंद्रांना लागणार्या उर्जेची किंमत हा त्याला लागणार्या सर्वरच्या किंमतींपेक्षा अधिक महत्त्वाचा घटक झाला आहे.
थोडी अधिक कल्पना यावी म्हणून विदाकेंद्रे किती या पेक्षा नामांकीत कंपन्यांच्या एकूण विदाकेंद्रांच्या आकडेवारीपेक्षा त्यात असलेल्या सर्वर्सच्या उपलब्ध आकडेवारीवरून कंपन्यांचे यात किती पैसे गुंतत असतील याची कल्पना येईलः
गुगल - अंदाजे ४५०,००० (२००५/२००६ ची आकडेवारी)
मायक्रोसॉफ्ट - अंदाजे २१८,०००
इंटेल - १००,०००
फेसबूक - ३०,०००
विदाकेंद्रांच्या बाबतीत अजूनही एक गोष्ट म्हणजे प्रचंड उर्जावापरामुळे असलेली कार्बन फूटप्रिंट, म्हणजे पर्यावरण बदलास कारणीभूत असलेला कार्बन आणि कार्बनसमान (इक्वीवॅलंट) किती उत्सर्जीत होतो ती संख्या. बहुतेक कंपन्या या आजकाल स्वत:ची कार्बन फुटप्रिंट काढतात, जाहीर करतात.
Source: http://www1.eere.energy.gov/
गुगलच्या संकेतस्थळावर एक मजेशीर माहीती त्यांच्या अधुनिक विदाकेंद्राच्या संदर्भात मिळाली: गुगलच्या म्हणण्याप्रमाणे, आपण जेंव्हा काहीही त्याच्या संकेतस्थळावर शोधतो तेंव्हा साधारण त्याच्या विदाकेंद्राची ०.०००३ किलोवॅट-अवर्स इतकी उर्जा वापरतो अथवा त्यातून ०.२ ग्रॅम्स इतका कार्बन उत्सर्जीत होतो. त्याची तुलनाच करायची तर एक ग्लास ऑरेंज ज्यूस तयार करायला १०५० गुगल शोध घेण्याइतकी उर्जा लागते अथवा सर्वसाधारण अमेरिकन गाडीतून ५ मैल गेले तर ते १०,००० गुगलशोधांइतके होईल! हे अर्थातच गुगलने "हरीत विदाकेंद्रे" तयार केल्याने कमीत कमी उर्जेत होत आहे.
असो, तर मुद्दा हा की कंपन्या विदाकेंद्रास लागणार्या उर्जेसंदर्भात गांभिर्याने विचार करत आहेत. त्यातून त्यांचे जसे पैसे वाचतात तसेच कंपनीचे पर्यावरणमित्र म्हणून नाव होण्यास मदतही होते, ज्याचा उपयोग खप वाढवायला होऊ शकतो. याच संदर्भात एच पी या जगप्रसिद्ध माहीती, तंत्रज्ञान आणि संगणकीय कंपनीची विदाकेंद्रांसाठी लागणारी उर्जा ही गायीच्या शेणापासून तयार करायचा आगळावेगळा प्रकल्प वाचनात आला.
संदर्भः न्यूयॉर्क टाईम्स, स्मार्ट प्लॅनेट आणि अर्थातच एच पी .
एचपीच्या सस्टेनेबिलिटीचे प्रमुख असलेल्या चंद्रकांत पटेल यांनी जाहीर केले. त्यातील काही प्रमुख गोष्टी:
* गायीचे दरदिवशीचे सरासरी शेण हे १२० पाउंड जे ३ किलोवॅट-अवर उर्जानिर्मिती तयार करते.
* या गणिताने १०,००० गायींचे वार्षिक शेण हे १ मेगावॅट वर चालणारे विदाकेंद्र चालवून शिवाय अतिरिक्त उर्जा शेतकर्यांना देऊ शकेल.
* यामुळे शेतकर्यांना सतावणार्या मिथेन या ग्रीनहाऊस गॅसचा प्रश्न सुटू शकतोच शिवाय उर्जा निर्मिती होऊ शकते.
* दोन वर्षात गुंतवलेले पैसे वसूल होऊन शेतकर्यांना एकत्रित वार्षीक $२ मिलीयन इतका फायदा होऊ शकतो!
या डिझाइनमध्ये विदाकेंद्रामध्ये तयार झालेली अतिरीक्त उष्णता, तशीच विद्यूत निर्मितीत तयार झालेली उष्णता देखील ही गायीच्या शेणाचे "डाय्जेशन" करण्यासाठी वापरली जाते. तयार होणारी वीज ही जशी विदा केंद्रांना मिळेल तशीच ती शेतकर्यांना देखील मिळू शकेल. खालील चित्रामध्ये याचे चांगले चित्रिकरण केले गेले आहे:

(स्त्रोत)
अर्थात केवळ विदाकेंद्रांच्या वापरासाठीच अशी उर्जानिर्मिती करायची गरज नसून, त्यातून नागरी उर्जेचे प्रश्न देखील सोडवता येतील.
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ................?भाग - ३
Reprinted with permission from EnlightenNext magazine,
© 2005 EnlightenNext, Inc. All rights reserved. www.enlightennext.org
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - १
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - २
माझ्या बाबतीत खरं सांगायचे तर तो लेख डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा ठरला. मेंदू आणि मन यांच्यातल्या परस्पर संबंधाबद्दल माझी स्वत:ची कल्पना विझार्ड ऑफ ऑझ सारखी होती. त्या सिनेमात ते बुजगावणे सारखे “अरेरे मला मेंदू असता तर.... असा मंत्र घोकत असला तरी त्याचे काही अडत नसते. त्या गवत ठासलेल्या आकारात भावना आणी व्यक्तिमत्व जरुर होते आणि त्याच्या आधाराने ते बुजगावणे जीवन जगतच असते याचे मुख्य कारण म्हणजे त्याची माहीती गोळा करायची क्षमता. आता एवढ्या वर्षांनंतर माझ्या या विषयावरच्या कल्पना बर्यापैकी परिपक्व झाल्या असल्या तरी हे नाकारण्यात अर्थ नाही की आत्ता जर माझे मत विचारले तर माझे मत मॅक्ससारखेच असेल. पण जर समाजात माझ्यासारखीच माणसे जर बहुसंख्य असतील तर हा प्रश्न गंभीरच मानला पाहिजे. लहान मुलांच्या बाबतीत हे समजू शकते पण ज्यांचे शिक्षण झाले आहे त्यांच्या बाबतीत हे जरा गंभीर वाटते. चेताशास्त्राने कितीही ओरडून सांगितले की आपले वागणे आणि अनुभवाच्या मागे मेंदूच आहे तरीही आपल्यापैकी हे अविश्वसनीयच वाटेल. असे का ? याची बरीच कारणे आहेत. पहिले कारण हे आहे की जर आपण हे मान्य केले तर , “आत्मा जडद्रव्य नाही” हे आजवर उराशी जपलेले तत्व एकदम खोटे ठरेल. ज्यांचा आत्मा इ. विषयांवर विश्वास नाही, त्यांनाही हे मानणे जड जाईल, कारण आपण म्हणजे फक्त मेंदू आहोत हे सहन करणे जरा जडच जाईल. समजा हे मानले तरी आपण आयुष्यभर जपलेल्या कल्पनांचे काय ? मी स्वत: बराच प्रयत्न करुन बघितला पण मी म्हणजे फक्त मेंदूच ही कल्पना काही माझ्या पचनी पडली नाही. याचे कारण मला काही भौतिक जगापलिकडचे अनुभव आलेले आहेत हे नसून, माझे असणे हे फक्त मज्जातंतूच्या कार्यावर अवलंबून आहे असे माझा अनुभव सांगत नाही. ज्या प्रमाणे चेताशास्त्रज्ञ त्यांच्या मतावर ठाम आहेत त्या प्रमाणे मलाही वाटते की “मी” म्हणजे अजून काहीतरी असू शकेल. इथेच सगळी गोची आहे. मी जर मान्य केले की “मी” म्हणजे अजून काहीतरी असेल, तर इतरत्र होते तसेच माझ्याबाबतीतही होणार. धार्मिकबाजूचे लोक जेव्हा विज्ञान त्यांना आव्हान देते तेव्हा याचाच आधार घेतात नाही का ? मग मी जर असाच विचार करणार असेन तर गॅलिलीओच्या वेळेच्या चर्चमधल्या धर्ममार्तंडांच्यात आणि माझ्यात काय फरक आहे ? त्यांनी गॅलिलीओला जी शिक्षा सुनावली त्या मुळे ते अपराधी ठरणार असतील तर माझे काय ?
या परिस्थितीत फरक पडलाय असे मला कोणीतरी सांगितले तर मला निश्चितच बरं वाटेल. आत्तापर्यंतच्या विश्वाच्या शोधात आपण पृथ्वीला विश्वाच्या केंद्रस्थानातून बाहेर ढकलले आहे आणि सूर्याच्या बर्याच जवळ पोहोचलो आहे. या संघर्षाचा आत्तापर्यंतचा इतिहास आपण बघितला तर मला वाटते चेताशास्त्राच्या मतावर आपल्याला आता गंभीर्पणे विचार केलाच पाहिजे. निरिश्वरवादी किथ ऑगस्टाईन त्याच्या एका लेखात काय म्हणतो बघा “ जर धर्म आणि विज्ञानाच्या संघर्षाच्या इतिहासात आपण डोकावून बघितले तर आपल्याला हे मानावेच लागेल की धर्माला नेहमीच विज्ञानाच्या म्हणण्यापुढे मान तुकवायला लागली आहे. आपण कधीतरी उलटे झालेले बघितले आहे का ? या एकाच गोष्टीमुळे मला वाटते विज्ञानाचे श्रेष्ठत्व सिध्द झालेले आहे. विज्ञानाने इतक्या प्रश्नांची उत्तरे शोधून काढलेली आहेत की आता सर्व धर्मांनासुध्दा विज्ञानावर आधारित धर्माची आवश्यकता वाटू लागली आहे.
ज्याप्रमाणे या संघर्षात आपण टाकून दिलेल्या दुराग्रही मतांचा खच पडलेला आपल्याला दिसतो, त्या प्रमाणे जेव्हा शास्त्रज्ञ मेंदूवर संशोधन करायला लागतील तेव्हासुध्दा हेच होणार आहे, याची अपेक्षा होतीच. खरं तर आपली अवस्था फार बिकट आहे कारण आपल्याला सत्यच स्विकारायाचे आहे. विज्ञान का धर्मशास्त्र ? या संघर्षात कोणाची बाजू घ्यायची या बद्दल आपल्या सगळ्यांच्या मनात द्वंद चालूच असणार. या संघर्षातली ही सगळ्यात अवघड फेरी आहे कारण ही फेरी तुमच्या मेंदूवर आहे. गंमत म्हणजे ज्या धर्मात सत्याची कास धरा हे सांगितले आहे, त्या धर्माच्या पाठिराख्यांसाठी फारच अवघड आहे. या सत्याच्या शोधात आपल्याला स्वत:ला प्रश्न विचारावे लागतील. आपण त्याची प्रामाणिक उत्तरे द्यायला घाबरणार का ? हा ही एक प्रश्न आहेच.
पण एक गोष्ट निश्चित. या संघर्षात मला तिसर्या बाजूचा विजय अजुबात नकोय. ती बाजू म्हणजे “अज्ञान” यासाठी मला आजवर मला अनभिज्ञ असलेल्या मेंदूच्या अभ्यासात उडी मारावी लागणार आणि हे सगळे काय चालले आहे हे शोधून काढावे लागणार.
आपल्या सगळ्या अनुभवाच्या मागे आपला मेंदू असतो याचा अर्थ काय? त्याला पुरावा काय ?आणि जर हे खरे असेल तर अध्यात्म, साक्षात्कार हे सगळे खोटे ठरवावे लागेल का ?मेंदू हाच आत्मा असेल का? याचा शोध घेताना माझी जाम दमछाक झाली. अनेक वेळा मी या आणि त्या बाजूला ओढला गेलो. काही वेळा माझी फरफट झाली. या सगळ्यातून माझ्या सर्व शंकांचे निरसन झाले असे म्हणणे धाडसाचे ठरेल पण एक निश्चित, की आजवर मला माझ्या ज्या अवयवाचे सगळ्यात कमी ज्ञान होते त्याची व माझी थोडीशीतरी ओळख झाली – मेंदुची.
ट्कसनची कॉन्फरन्स !
सकाळचे नऊच वाजत होते पण उन्हं चांगलीच तापली होती. मी टकसनच्या “कॉन्फरन्स सेंटर” ला चाललो होतो. उकडून जीव चालला होता. मला तेथे पाहून कोणीही हेच विचारले असते की गावची थंडगार हवा सोडून तू इथे काय करतो आहेस ? पण ज्यांना माहीत नाही त्यांना सांगायला हरकत नाही की इथेच दरवर्षी जगातले सर्व शास्त्रज्ञ जे “मन आणि त्याचे चैतन्य” या विषयावर अभ्यास करतात, गोळा होतात. येथे होणारी चर्चासत्रे ही एक या विषयावरची मेजवानीच असते. गाडीचे ब्रेक्स लागले तसे मी काचे बाहेर बघितले तर समोरच्या गाडीच्या मागच्या काचेवर लिहीलेले ते मजेशीर वाक्य नजरेस पडले “दोन डुलक्यांच्या मधला काळ : चैतन्य. ते वाचून मला हसू आले.
चैतन्य या विषयावर शास्त्रीय अभ्यास ही कल्पनाच तशी नवी आहे. विज्ञानामधे वस्तूनिष्टतेवर जास्त भर दिला जातो त्यामुळे विज्ञानाकडून हे काल्पनिक वाटणारे शास्त्र तसे उपेक्षितच राहिले आहे. मानसशास्त्राच्या सुरवातीला विल्यम्स जेम्स या शास्त्रज्ञांनी स्वत:च्या मनावर प्रयोग करुन आणि त्याची टिपणे करुन याच्या अभ्यासाला चालना दिली. त्यानंतर १९०० सालाच्या सुरवातीला वॅटसन यांनी माणसाच्या वर्तवणूकीचा वस्तूनिष्ट अभ्यास करायच्या पध्दती शोधून या शास्त्राला प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यात त्यांनी निरिक्षणाला फार महत्व दिले होते. या सगळ्यामुळे विज्ञानात त्या पध्दती मान्यता पावल्या. १९६० मधे कॉग्निटीव्ह मानसशास्त्राचा जन्म झाल्यावर ( याचा अर्थ मला समजला तो असा – ज्ञान किंवा अनुभूती या संदर्भात होणारी वैचारिक किंवा मनाची कार्यप्रक्रीया) चैतन्य हा शब्द परत ऐकू यायला लागला. या शास्त्रामधे मेंदूमधे होणार्या् क्रियांचा अभ्यास केला जातो. उदा. दिसते म्हणजे मेंदू मधे नक्की काय होते ? गणित सोडवताना मेंदूत काय होते ? भाषा म्हणजे मेंदूच्या दृष्टीने नेमके काय? आपल्याला आठवते म्हणजे मेंदूत निश्चित काय होते? इ.इ. पण या आभ्यासाला खरे महत्व प्राप्त झाले ते ख्रिस्टॉफ कॉच आणि क्रिक या द्वयीने देवाचे आणि आत्म्याचे अस्तित्व नाही हे सिध्द करण्यासाठी चेताशास्त्राची मदत घेतली तेव्हा. चेताशास्त्राचा उपयोग त्यांनी चैतन्याची वस्तुनिष्ठ व्याख्या करायला घेतली तेव्हा मात्र या जगतात खळबळ उडाली. ( चैतन्य म्हणजे मला येथे conscienceness असे म्हणायचे आहे. याला योग्य असा शब्द जो सर्व ठिकाणी चपखलपणे वापरता येइल असा न सापडल्यामुळे माझी बर्यागच ठिकाणी गडबड उडाली आहे हे मी मान्य करतो. त्या मुळे आपलीही गडबड उडण्याची शक्यता आहे हे मी नाकारत नाही).
हे संशोधन जेव्हा १९९४ साली मांडले गेले. यावर आणि या नंतरच्या संशोधनावर २००४च्या चर्चासत्राचा पाया घातला गेला. ही चर्चासत्रांना मी उपस्थिती लावली होती. जे मी बघितले त्या वरुन मी म्हणतो की चैतन्याचा अभ्यास हा एक महत्वाचा विषय तेव्हाच झाला होता.आत्ता मी जेव्हा या सभागृहात प्रवेश केला तेव्हा सगळे सभागृह तुडूंब भरले होते. एक खुर्ची पकडून मी उत्सुकतेने वाट पाहू लागलो. कॅमर्स आणि मंडळींनी व्यासपीठाव्र प्रवेश केला आणि सभागृहात शांतता पसरली. १९९४ पासून या विषयावर चर्चा, वाद यांचे नाव घेता होणे जरा अशक्यच आहे.
जयंत कुलकर्णी.
भाग - ३ समाप्त.


