व्यक्तिचित्रण

नास्तिकता दिवसांच्या शुभेच्छांच्या निमीत्ताने

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
23 Mar 2019 - 1:36 pm

मुलतः अज्ञेय (अ‍ॅग्नॉस्टिक) राहून दर क्षणास विविध विचारधारांच्या दृश्टीकोणातून विचार करण्याचा अधिकार राखून ठेवणारा अशी स्वतःची लांबलचक व्याख्या करणारा असल्यामुळे आस्तिकांसोबतच नास्तिकांनासुद्धा (टिकेप्रमाणेच) मनापासून शुभेच्छाही देत असतो तशा या २३ मार्च २०१९ या जागतिक नास्तिकता दिवसाच्या नास्तिकांना हार्दीक शुभेच्छा.

शुभेच्छाधर्मव्यक्तिचित्रण

देवा, क्लोरोफिल देतो का रे , क्लोरोफिल

खिलजि's picture
खिलजि in जे न देखे रवी...
21 Jan 2019 - 7:27 pm

देवा, क्लोरोफिल देतो का रे , क्लोरोफिल

दे ना रे मजला

मी कि नई छान छान खायला

करून घालेन तुजला

कशाला हवाय डोक्याला ताप नि तो पगार

कशाला होतील चोऱ्या नि माऱ्या

कुठेच पडणार नाहीत दरोडे कि होणार नाहीत कुणाचे खून

लुटेल , हो फक्त लुटेल

ते सूर्यनारायणाचे ऊन

तू काया बनवलीस

सोबतीला कमी कि काय म्हणून माया बनवलीस

खायला तोंड दिलेस नि भरायला पॉट

तरी बी सारे शोधत बसलेत

कुठं लागतोय का ते जॅकपॉट ?

झाड बघा ना, कुठंच जात नाही

तिथेच राहतं नि ऊन खाऊन जेवण बनवून देतं

जीवनमानराहणीव्यक्तिचित्रणगुंतवणूक

कहीं दूर जब दिन ढल जाये

Anand More's picture
Anand More in जनातलं, मनातलं
2 Dec 2018 - 8:27 pm

कॅन्सरशी झुंज देत ओंकारने इहयात्रा संपवली. ओंकार माझा शाळूसोबती. घट्ट गूळपीठ ज्या मोजक्या लोकांशी जमलं त्यांच्यापैकी एक.

आमची जोडी तशी गमतीदार होती. तो जगन्मित्र, मी घुम्या. तो तल्लख स्मरणशक्तीचा, मी संदर्भासाठी पुस्तक धुंडाळणारा. तो तापट आणि शीघ्रकोपी, तर आता रागवायचा हक्क मला आहे का? याच गोंधळात मी अडकलेला. पण आमच्या दोघांत एक समान दुवा म्हणजे पुस्तकप्रेम. त्याच्या घरी एन्सायक्लोपीडियाचे खंड होते. समग्र पुलं होते. दळवी होते. इतकंच काय तर गादीखाली लपवलेलं आनंदध्वजाच्या कथाही होतं. त्यामुळे किशोरावस्थेतून तारुण्यात आम्ही एकत्र प्रवेश केला.

सद्भावनाव्यक्तिचित्रण

पुलं "दैवत"

MipaPremiYogesh's picture
MipaPremiYogesh in जनातलं, मनातलं
23 Nov 2018 - 11:04 pm

आमचं कुलदैवत ~ पुलदैवत
पुलंची जन्मशताब्दी असं वाचल्यावर जरा आश्चर्यचकित झालो. पुलं आज असते तर 100 वर्षाचे झाले असते. पण झाले असते? पुलं गेलेच कुठे आहेत..ते अजूनही त्यांच्या पुस्तकातून, वेगवेगळ्या व्यक्तीरेखांतून आजूबाजूलाच आहेत. परवा कोकणात फिरतांना अंतू बरवा दिसले..हेदवी ला शिवराम गोविंद दिसले, बेळगाव- कारवार ला रावसाहेब दिसले. पुलं त्यांच्या पुस्तकांमधून, नाटकांमधून अजूनही आपल्याला भेटतातच की. शेवटी एवढेच म्हणेन की..

लेखकलावाङ्मयव्यक्तिचित्रव्यक्तिचित्रण

मला भेटलेले रुग्ण - १८

डॉ श्रीहास's picture
डॉ श्रीहास in जनातलं, मनातलं
6 Nov 2018 - 10:53 am

https://www.misalpav.com/node/42929

“डॉक्टर ईस दवा के क्या साईड इफेक्ट्स है”.....

टिबीचं निदान झालं , औषधं लिहून दिली आणि एकही दिवस सोडायचं नाही असं अगदी बजावून सांगितलं मग विचारलं काही प्रश्न आहेत का अजून तर त्या पेशंटनी हा प्रश्न विचारला ....

ह्यावर नेहेमीचं उत्तर देण्याआधी पेशंटचा नेमका रोख समजून घेऊन बोललो “ ईसके साईड इफेक्ट तो बहोत है लेकीन ईसका सबसे बडा जो ईफेक्ट है ना वो आपकी जान बचायेगा !!”

प्रकटनविचारप्रतिसादप्रतिक्रियाअनुभवसल्लामाहितीप्रश्नोत्तरेआरोग्यआरोग्यऔषधोपचारव्यक्तिचित्रव्यक्तिचित्रण

मोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा भाग ४.

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in जनातलं, मनातलं
15 Oct 2018 - 1:44 pm

यापूर्वीचे कथानक:
मोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा भाग १,२,३
https://www.misalpav.com/node/43228

लोरेंझो जेरार्दिनीची रोजनिशी :

प्रकटनआस्वादलेखअनुभवमाहितीप्रतिभाविरंगुळावावरसंस्कृतीकलानृत्यधर्मइतिहासवाङ्मयकथासाहित्यिकसमाजजीवनमानराहणीप्रवासभूगोलदेशांतरव्यक्तिचित्रणराजकारणमौजमजारेखाटनस्थिरचित्र

‘मास लीडर’ सुधीर मुनगंटीवार...प्रभावी, उत्तम आणि अफाट जनसंपर्क व कुशल प्रशासन, उत्तम नियोजन, आदर्श व्यवस्थापन...

मुकेश चौधरी मेळघाट's picture
मुकेश चौधरी मेळघाट in जनातलं, मनातलं
31 Jul 2018 - 1:30 pm

‘मास लीडर’ सुधीर मुनगंटीवार
प्रभावी, उत्तम आणि अफाट जनसंपर्क व कुशल प्रशासन, उत्तम नियोजन, आदर्श व्यवस्थापन...

लेखव्यक्तिचित्रण

एक होता भारतीय स्पायडर मॅन...

मुकेश चौधरी मेळघाट's picture
मुकेश चौधरी मेळघाट in जनातलं, मनातलं
17 Jul 2018 - 11:32 am

एक होता भारतीय स्पायडर मॅन...

अमरावती, दि. १४ - मध्य भारतातील सातपुडा पर्वत म्हटले की इथल्या वाघांची व व्याघ्र प्रकल्पांची चर्चा होते. परंतु सातपुडा पर्वतरांगेतील या व्याघ्र प्रकल्पांनी वाघांशिवाय रानपिंगळा, पिसोरी (माऊस डिअर), कॅरॅकल, चांदी अस्वल, महासीर मासा व कोळ्यांसारख्या दुर्मिळ प्रजातींचेही संवर्धन केले आहे. या वन्यजीवांच्या प्रजातींवर काही वेडे लोक काम करतात व त्यानंतर या वन्यजीवांची तसेच त्यांना पोसणाऱ्या या जंगलांच्या नवखेपणाची जगाला ओळख होते.

लेखव्यक्तिचित्रण

८६ वर्षांचं तारुण्य हरपलं!

अबोलघेवडा's picture
अबोलघेवडा in जनातलं, मनातलं
8 Jul 2018 - 7:59 pm

आदरणीय सर –

कोणी म्हणेल की आता तर सर गेले मग आता त्यांना पत्र लिहून कसं चालेल? पण आमच्यासाठी तुम्ही गेला नाहीत सर. आपल्या धडाडीने कर्तृत्व गाजविणाऱ्या असामान्य लोकांच्या बाबतीत लौकीकार्थाची फुटपट्टी लावायचीच नसते. स्वतःच्या मृत्यूने नाहीशी होतात ती सामान्य माणसं. तुमच्यासारखी माणसं तर हयातीत आणि मरणानंतर लोकांच्या हृदयात विराजमान असतात. अशी माणसं कधी मरत नाहीत.

सॅटर्डे क्लबच्या संस्थापकाला शनिवारीच आपल्या जवळ बोलावून साक्षात मृत्यूनेच तुम्हाला मानवंदना दिली सर.

सद्भावनाव्यक्तिचित्रण

मला भेटलेले रुग्ण - १७

डॉ श्रीहास's picture
डॉ श्रीहास in जनातलं, मनातलं
2 Jul 2018 - 7:58 am

https://www.misalpav.com/node/42846

अहो डाॅक्टर तुम्ही सांगीतलं होतं की प्रत्येक वेळेस अपॉईन्टमेन्ट घेऊनच या , पण तुमचा फोनच लागत नाहीये ; परवा पासून किमान १५ वेळा तरी प्रयत्न केला .......

मी विचारलं नेमका कोणता फोन नंबर लावताय दाखवा बरं .... मग पेशंटनी नंबर दाखवला आणि मी एवढच बोलू शकलो की हा नंबर कधीच लागणार नाहीये !! ....

कारण हा मनुष्य फोन नंबर ऐवजी माझा रजिट्रेशन नंबर (मेडीकल काॅन्सिल कडून मिळालेला) डायल करत होता....

_/\_....

__________________•______________

प्रकटनविचारप्रतिसादप्रतिक्रियालेखअनुभवसल्लाआरोग्यआरोग्यऔषधोपचारव्यक्तिचित्रव्यक्तिचित्रण