अस्साच जळत राहिलास तर , जाताना पाणी पण महाग होईल
मित्रा कधी जळू नकोस कुणावर इतका कि
स्वतःच्या बुडाचीच आग होईल
अस्साच जळत राहिलास तर
जाताना पाणी पण महाग होईल
काव्यातडाग नव्हे हे अथांग समुद्र तो
दुर्दैवी तोच जो रसिकांना पामर समजतो
वंदनीय मज सारे, तुही त्यात दुजा नसे
नित्य नवी कल्पना काव्यदेवी देत असे
हताश होऊ नको इतक्यात
कि पाठीला बाक येईल
कवन जरा नीट कर
नाहीतर प्रतिभेला डाग येईल
विझलेयत निखारे कधीच ,
लाव्हाहि निद्रिस्त तो
नको फुंकर मारू आता
जळून सारे राख होईल
मारू नको टिचकी कधी
इशाराही नको मजला