अभ्यासोनी मग ...
"अभ्यासोनी मग | प्रकटावे" ऐसे
कुण्या रामदासे | सांगितले
"दिसामाजी काही | तरी ते लिहावे
प्रसंगी वाचावे | अखंडित"
असेही वदले | तेव्हा रामदास
मना उपदेश | करताना
आता मला सांगा | लिहिणे, वाचणे
अभ्यास करणे | कोणा झेपे?
अभ्यास कशाला | प्रकटण्या आधी?
इंटरनेट हाती | असताना !
हाती जे येईल | फॉरवर्डावे तेच
पुढच्यास ठेच | लागेना का
वायफळ मळे | पिकवू अमाप
काळाची झडप | येवो सुखे