भारताच्या एकात्मतेसाठी
सीमेवर लढणार्या
वीरांना मानवंदना
नेहमीच देत असतो
त्यांचे लढणे
जसे समोर दिसते
कौतुकही समोरून मिळते
याच भारतीय एकात्मतेच्या
लढायांना कानांची गरज
असतेच गुपचरांच्या
सगळकाही जीवन, कुटूंब,
पणावर लावून
कौतुकाचे दोन शब्दही लाभतील
याची शाश्वती नसतानाही
कधी आप्तस्वकीयांकडूनच
नादान टिका ऐकुनही
निष्ठेने कर्तव्य
बजावणार्या
अनामिक कच्च्यापक्क्या
भारतीय गुप्तच'वी'रांनो
स्विकाराव्या आमुच्या
अनेक यशस्वीभव शुभेच्छा
आणि साश्रू मानवंदना
त्रिवार! त्रिवार!! त्रिवार!!!
प्रतिक्रिया
6 May 2024 - 2:46 pm | कर्नलतपस्वी
मानाचा मुजरा.
अगदी सहमत.