राजकारण

मिपा संपादकीय...! जाहीर आवाहन..

सर्व मायबाप मिपाकरांना माझा दंडवत...!

राम राम मंडळी,

मिपा हे एक साप्तहिक आहे किंवा पाक्षिक आहे असे मानून 'मिपा संपादकीय...' हे एक सदर दर आठवड्याला किंवा पंधरवड्याला सुरू करावे असे मनात आहे. आपल्याकडे सामाजिक, राजकीय भान असणारे, वाचन असणारे, उत्तम विचार असणारे बरेच जण आहेत. या मंडळींचे वृतपत्रीय/आंतरजालीय वाचनही चौरस असते असे माझ्या निदर्शनास आले आहे. या मंडळींनी 'मिपा संपादकीय' या सदरात दर सप्ताहात/पाक्षिकात एक अग्रलेख लिहावा असे वाटते. हा अग्रलेख बहुतकरून भारतातील किंवा भारताबहेरील राजकीय, सामाजिक विषयांवर, ताज्या घडामोडींवरच असेल. त्यातली मते अर्थातच संपूर्णपणे त्या संपादकाचीच असतील. वर म्हटल्याप्रमाणे हा अग्रलेख भारतातील अथवा भारताबाहेरील सामजिक अथव राजकीय विषयावर, ताज्या घडामोडींवर भाष्य करणारा असेल. प्रसंगानुरूप किंवा क्वचित प्रसंगी अर्थ, क्रीडा किंवा अन्य एखाद्या विशेष गाजत असलेल्या विषयावरही असेल.

मला खात्री आहे, दर सप्ताहाअंती किंवा पंधरवड्याअंती (जसे ठरेल तसे),

'या वेळी पाहुणा संपादक कोण आहे बरं? बघुया तरी त्याचा अग्रलेख वाचून!' अशी उत्सुकता तुम्हाआम्हा सर्व मिपाकरांना नक्कीच असेल अशी मला खात्री आहे. खूप मज येईल. काही चांगले वाचायला मिळेल! Smile

अर्थातच, दरवेळी संपादक बदलेल. म्हणजेच दरवेळी अग्रलेख लिहिणारी व्यक्ति ही त्या आठवड्यापुरती/पंधरवड्यापुरती मिपाची 'पाहुणा संपादक' असेल! Smile

अनवधानाने काही नांवे राहू शकतात परंतु,

चरुरंग, प्रियाली, चित्रा, मुक्तसुनीत, विकास, धनंजय, डॉ बिरुटे, देवकाका, विजूभाऊ, कोलबेर, नीलकांत, प्रकाश घाटपांडे, पिवळा डांबिस, इत्यादी...

या माझ्या मित्रमंडळींकडून मला खूप अपेक्षा आहेत. ताज्या सामाजिक व राजकीय विषयांवर याचं खूप चांगलं वाचन-चिंतन-मनन आहे असे माझे निरिक्षण आहे आणि म्हणूनच मी मुद्दामून या मंडळींची नांवे उद्घृत केली आहेत! यापैकी कुणालाही याबाबत व्यक्तिश: न लिहिता मी हा प्रस्ताव जाहीरपणे मांडत आहे. वरील नांवे आत्ता चटकन आठवली म्हणून मी लिहिली आहेत परंतु या मंडळींव्यतिरिक्तही जर कुणी एका सप्ताहाकरता अथवा पंधरवड्याकरता मिपाचा 'पाहुणा संपादक' होऊन छानसा अग्रलेख लिहायला तयार असेल तर त्याचेही स्वागतच आहे.

असो...

तर मंडळी, या प्रस्तावामागे मिपाकरता काहीतरी चांगलं करायचं मनात आहे, मिपा अधिकाधिक सर्वांगसुंदर बनवण्याचा विचार आहे. परंतु, हे काम अर्थातच माझ्या एकट्याचे नाही याची मला पूर्ण जाणीव आहे. मी व्यक्तिश: व्यक्तिचित्र, खादाडी, संगीत, टवाळक्या, माफक इष्कबाजी या विषयात रंगणारा मनुष्य आहे. माझ्या सामाजिक व राजकीय जाणिवा अग्रलेख लिहिण्याइतक्या समृद्ध नाहीत. तरीदेखील दर आठवड्याला किंवा पंधरवड्याला एखाद्या पाहुणा संपादकाने छानसा अग्रलेख लिहून मिपा या संकेतस्थळाचे सौंदर्य वाढवावे असे मनापासून वाटते म्हणूनच हा चर्चाप्रस्ताव!

बोला, करणार का मला या कामात मदत? स्वत:हून आळीपाळीने घेणार का अग्रलेख लिहिणार्‍या पाहुण्या संपादकाची जबाबदारी?

ज्या मंडळींची नांवे मी उद्घृत केली आहेत त्यांच्याकडून मला खूप अपेक्षा आहेत हे इथे खुल्या दिलाने नमूद करतो....

आपला,
(काही एक चांगलं काम करू पाहणारा) तात्या.

--
Not failure, but low aim is a crime..! Smile

आणिबाणी

२५ जून १९७५ ला पंतप्रधान इंदीरा गांधी आणि केंद्रीय मंत्रीमंडळाच्या शिफारशीनुसार तत्कालीन राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांनी देशांतर्गत आणिबाणी घोषित केली आणि कधी नव्हे ते प्रथमच स्वतंत्र भारताच्या इतिहासात औपचारीकरीत्या हुकूमशाही अस्तित्वात आली. त्यावेळचे अनेक किस्से खूप लहान असून देखील आठवतात - व्यक्तिगत म्हणाल तर अचानक शाळेत कुठलीतरी गाणी म्हणायची सुरवात झाली (सक्ती झाली असावी पण कळले नाही). त्या व्यतिरीक्त काहीच समजले नाही. पण एक दिवस दुर्गा भागवत आणि पुल देशपांडे हे आणिबाणीविरुद्ध कडाडल्याचे समजले. तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण (त्यांना हेडमास्टर म्हणायचे) यांनी पुलंना विदूषक म्हणून हिणावले. तेव्हढ्यात जेपींबद्द्लच्या बातम्या ऐकू येऊ लागल्या मग अचानक निवडणूका जाहीर झाल्या आणि ठाण्यात अनेक सभा होऊ लागल्या. त्या सभांना लहान असून देखील घरच्यांबरोबर हजेरी लावलेली आठवते - ठळकपणे आठवतात त्या मॄणाल गोरे, सुब्रम्हण्यम स्वामी आणि जॉर्ज फर्नांडीस यांच्या सभा. त्यात सांगीतले गेलेले अत्याचार आणि दिसला कुठेतरी त्याविरुद्ध किमान मताच्या बळावर उभा राहीलेला सामान्य माणूस.

बघता बघता "गाय वासरू नका विसरू" म्हणणारी काँग्रेस काही काळ पडद्याआड गेली. अनेक ठिकाणी दिग्गज पडले त्यात राजनारायण समोर इंदिरा गांधी पडल्या तर संजय गांधी आणि चांडाळ चौकडी पण काही काळ नामशेष झाली... अर्थात दैव देते आणि कर्म नेते या उक्तिप्रमाणे जनता पार्टी आणि त्यातील सभासद उपपक्षांना लोकशाहीतील सत्ता झेपली नाही आणि बघता बघता खेळ खल्लास झाला!

नंतर परत आणिबाणी आली नाही आणि कुठेतरी दिसलेले सामान्यांचे बळ पण परत दिसले नाही. परीणामी राजकारण खराब होत गेले आणि सत्ताधारी बदलले तरी "लहरी राजा, प्रजा आंधळी.." सारखा प्रकार कायम राहीला... एकीकडे पंजाब, एलटीटीइ , काश्मिर दहशतवाद तर दुसरीकडे इंदीरा गांधी, राजीव गांधी, यांच्या हत्येचे धक्के पचवले, नाणेनिधीचे संकट दूर केले, उपग्रह उडवले आणि अणूबाँब उडवले पण सामाजीक विषमता आणि समस्या या कमी होण्या ऐवजी लोकसंख्येच्या पटीत वाढण्याऐवजी त्याहून अधीक जोरात वाढत असल्यासारखे वाटत आहे...

थोडक्यात तत्कालीन आणिबाणी ही एका नेतॄत्वाला सत्ता टिकवण्यासाठी जाहीर करावी लागली. पण आज देश टिकवणे अथवा बळकट करण्यासाठी लागणारा सामाजीक क्षमतेचा किमान वरकरणी दिसणारा अभाव पाहीला तर आजची परीस्थिती ही खरी आणिबाणीची वाटते, असे म्हणले तर ते १००% बरोबर ठरणार नाही (निदान तशी आशा करतो) पण १००% चूक पण नाही अशी भिती वाटल्यास ती खोटी आहे का?

सैतानाची बाळे

स्थळ : - सैतानाची कंट्रोलरुम.
एका भव्य ,गोलाकार ,सुसज्ज ,बंदिस्त जागेमधे सैतानाची बाळे गोलाकार बसली आहेत. प्रत्येकाच्या समोर एक संगणकाचा पडदा. प्रत्येक बाळ आपल्याला नेमून दिलेले काम अतिशय आनंदाने चित्कारत करत आहे. सैतानाची फेरी दिवसातून एकदाच होत असते. काम व्यवस्थित चालले असेल तर न बोलताच, पण एका विलक्षण जरबेच्या वातावरणात ती पार पडते. प्रत्येकाच्या वाट्याला (वाट लावायला) एकेक देश दिलेला आहे. पृथ्वीवर काही बाळे 'सिव्हिलायझेशन्स्' वा तत्सम नांवाचे गेम्स् खेळतात तसेच. पण फरक इतकाच की हे खोटे नसतात. त्या त्या देशांत, प्रत्येक खेळी प्रत्यक्षांत येत असते. दर वर्षी 'देश' बदलून मिळतो. तशी सगळ्याच खेळांत मजा येते. पण 'भारत' हा देश कधी हातांत येईल याची सगळे आतुरतेने वाट पहातात. कारण तिथल्या 'लोड' केलेल्या खेळांत जे वैविध्य आहे ते इतर कुठेच नाही यावर सर्व बाळांचे एकमत आहे. काम चालू असताना हळु आवाजांत एकमेकांशी बोलण्याची मुभा आहे. तिथे चाललेले हे कांही 'संवाद'!

बाळ १ : काय रे इतका कसला आनंद झालाय् ?, फारच आरोळ्या ठोकतो आहेस मगापासून .
बाळ २ : अरे या भारतावर खेळायला फारच मजा येतीये रे! मला तर एक कधी न संपणारा खेळ मिळाला आहे.
बाळ १ : कुठला रे ?
बाळ २ : हे बघ, आपल्या पूर्वजांच्या वेळी एवढी प्रगती झाली नव्हती. इथे बसून असं कांही करता यायचं नाही. तिथे जाऊन काम करावं लागायचं. वेळ बराच जायचा. त्यांत तेंव्हा तिथे 'देवाची माणसं फार होती, त्यामुळे सगळ्यांची मनं काबीज नाही करता यायची. हिंसाचार, दंगली चालू केल्या तरी फार काळ टिकवता यायच्या नाहीत. ती दुष्ट देवाची माणसं आपला खेळ बंद पाडायची. आता कित्ती सोपं झालंय, इथे बसून या कठपुतळ्या हलवता येतात आणि त्यांची मनं काबीज करणं किती सोप्पं झालाय्!
बाळ १ : पण ते सगळीकडेच करता येताय्, बघ नं, मला अमेरिकेत पण खूप मजा येतीये.
बाळ २ : अरे, मला तर एक न संपणारी ' गोष्टच मिळालीये! तिथे आता माणसांची इतकी गर्दी झालीये की त्या रिकामटेकड्यांच्या धार्मिक, प्रादेशिक भावनांना हात घालणं आगदीच सोपं झालाय्.
बाळ १ : ते कसं ?
बाळ २ : हे बघ, मी तो जुना दोन धर्मांचा खेळ खेळून बोअर झालो होतो, त्यापेक्षा हा नवीन जातींवरचा खेळ फारच छान आहे. एका वेळेला एका जातीला पेटवायचं, नुसतं त्यांच्या नेत्यावर 'टिचकी' मारली की ती सगळी 'कौम' स्वयंचलित' होते. मग ते आपोआप रेल्वेचे रुळ उखडतात, तोडफोड करतात, नंग्या तलवारी घेऊन फिरतात. साहेबांना मानायला पाहिजे हं, काय जबरदस्त रचलाय हा खेळ त्यांनी, आपलं कसब दाखवायला भरपूर वाव आहे. शिवाय वैविध्य किती! एका जातीला महिनाभर खेळवलं की दुसरी! महिने बारा पण जाती अगणित.
बाळ १ : पण काय रे, ते सरकारी लोक काय नुसते बघत रहातात? त्यांत पण 'देवाची माणसं असतीलच की.
बाळ २ : छे रे, तोच तर हल्ली आपल्या साहेबांना फायदा आहे. तिथे पण सगळी आपलीच 'प्यादी' आहेत, ती आपल्या साहेबांशी एकनिष्ठ आहेत. आणि त्यातून त्यांनी कांही उपाय केले की आपण इकडे नवीन 'कौम' वर टिचकी मारायची.
बाळ १ : पण तरी देवाची खूप माणसं खाली आहेत ना ?
बाळ २ : हो, पण ती आता फारसं काही करु शकत नाहीत. ती कधी ही सत्तेवर येणार नाहीत याची तजवीज आपल्या साहेबांनी आधीच करुन ठेवलीये.
बाळ १ : अरे वा, मग आपला विजय आणि देवांचा दणदणीत पराभव आता नक्कीच की!
बाळ ३ : ए, गपा रे, मला या 'पाकिस्तानात' पण तेवढीच मजा येतीये.
बाळ ४ : हं, बघू या , यावर्षीचा 'महाविध्वंसक' चा कप कोणाला मिळतोय ते !
बाळ ५ : शू s s s s, शांतता , सैतानसाहेब येताहेत !!!

**** इंडीया-दी वन नेशन आणि धार्मीक, जातीय व प्रादेशिक अस्मिता ****

गेले काही दिवस मी अविनाश धर्माधिकारींचे "अस्वस्थ दशकाची डायरी" नावाचे एक अतिशय जबरदस्त पुस्तक वाचत होतो. आज ते पुस्तक संपुर्णपणे वाचुन, समजून व पचवून पुर्ण झाले. साधरणता १९८० ते १९९० च्या दशकातल्या देशाच्या सुरक्षेला धोकादायक घटना, सामाजीक आंदोलने, राजकीय उलथापालथ व या सर्वात सामान्य माणसाचा सहभाग ह्या सर्व बाबींचा अभ्यास धर्माधिकारींनी आपल्या नजरेतुन व जवळपास स्वत: त्या घटना जवळून पाहून अतिशय समर्पक पद्धतीने केला आहे. ह्या पुस्तकातला एक मुद्दा म्हणजे "भारत हे एक राष्ट्र आहे का ?" हा मुद्दा फ़ारच मनाला भिडला. आता तसे पहायला गेलो तर त्यांनी लिहलेले त्या "काळाला" सुसंगत असे होते पण आज घडणार्य्या विविध घटना पाहिल्या तर तो प्रश्न आज पण निर्माण होऊ शकतो असे मला काही क्षण वाटले. त्यातच "प्रादेशिक अस्मितेतुन" सुरु झालेली आंदोलने हा याचा उगम होऊ शकतो ही शक्यता नाकारता येत नाही.
१५ ऒगस्ट १९४७ साली मध्यरात्री १२ वाजता निम्मे जग झोपले असताना पंडीत नेहरुंनी "नियतीशी एक वायदा" केला होता तो म्हणजे " भारत हे अख्ख्या जगाला हेवा वाटेल असे एक महान राष्ट्र " बनवण्याचा. त्यासाठी त्यांच्यापासुन ते आत्तापर्यंत सत्ताधार्‍यांनी सच्च्या मनाने प्रयत्न केले असे जरी मानले तरी आजची परिस्थीती काही तरी वेगळेच सांगते आहे. मुळात एक लहान खंडा एवढा असणारा भारत हे "एक राष्ट्र" असणे ही संकल्पनाच अदभूत आहे. काश्मीरपासून कन्याकुमारी व गुजरातपासून ते ईशान्यपुर्व मिझोरम, नागालॆंड पर्यंत पसरलेला, एकंदरीत २८ सरकारमान्य भाषा व अनऑफ़ीशीयली १६०० भाषा बोलणारा, हवामानात प्रचंड विवीधता असणारा व प्रचंड सास्कॄतीक व वैचारीक विविधता असलेला भारत हे गेल्या "६० वर्षे एक राष्ट्र" म्हणून टिकून आहे हेच एक आश्चर्य मानायला हरकत नाही. भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा "ह्या राष्ट्राचा डोलारा" किती काळ टिकेल ह्याबद्दल अनेकांना शंका होती व ती भारतीय जनतेने खोटी करुन दाखवली हे भारतीय "एकात्मिकेचे" यश मानायला हरकत नाही. स्वातंत्र्याच्या वेळी जीन दिकसनने भविष्य सांगितले "भारताचे विभाजन लवकरच अनेक राज्यात होईल व भारताचे अनेक तुकडे होतील". हेंन्री किसींजर म्हणाले " सध्या भारतात राहणाया पण मनात फ़ुटीर प्रवॄत्ती ह्या देशाचे विभाजन करतील". त्यानंतर खरोखरच भारताला ह्या कसोटीला सामोरे जावे लागले. सर्वात आधी सरदार पटेलांनी "संस्थान विलीनीकरण" राबवून, १९४८ च्या रणात भारतीय सेनेने काश्मीर वाचवून व १९६२ च्या युद्धानंतर लालबहादुर शास्त्रींनी आपल्या प्राणाचे बलिदान करुन व इंदीरा गांधींनी काही कठोर निर्णय घेऊन व प्रसंगी आपल्या प्राणाचे बलिदान करुन ह्या देशाला " वन नेशन" म्हणून टिकवण्यात अनमोल योगदान दिले व भारत हा " वन नेशन " च राहिला . ह्यामागचे कारण म्हणजे ही सर्व आक्रमणे ही "परकीय" होती व भारताने त्याचा मुकाबला ह्या " वन नेशन" ने केला. पण आज आपल्याला ह्या "परकीय शक्तींची" जास्त भीती राहिली नाही अथवा फ़ारफ़ार तर जास्त काळजी करायची गरज नाही कारण "हा देश" त्यासाठी समर्थ आहे. सध्या देशासमोर मुख्य प्रश्न आहे तो नविनच उभ्या राहिलेल्या "प्रादेशिक अस्मिता , जातीय अस्मिता " ह्यासारख्या गोष्टींनी घेतली व परिस्थीती चिघळायला सुरवात झाली आहे.
आता मुळापासून अभ्यास करायचा म्हणजे बाहेरच्या शक्तींशी लढून त्यांचा यथायोग्य बंदोबस्त केल्यानंतर केल्यानंतर आपल्याला "सत्तेची पोळी भाजण्यासाठी" मुद्दे न राहिल्याने देशातील काही स्वार्थी राजकीय नेतॄत्वाने येथील काही "जातीय व धार्मीक असंतोषी" शक्तींना हाती धरुन एका नव्याच "वादाची " मुहुर्तमेढ रोवली व वेळोवेळी आपल्या "सत्तेची पोळी" भाजली. ह्या देशाची प्रमुख समस्या ही काही काळ "धार्मीक अस्मिता" ही होती. मग ती "हिंदु - मुस्लीम असो वा हिंदु - ख्रिश्चन वाद" ही असो पण ह्यामुळे ह्या देशाची एकात्मिका काही काळ धोक्यात आणली. मग हे हिंदुंचे "रामजन्मभुमी मुक्ती, रथयात्रा " आंदोलन असो वा मुस्लीमांचे "बाबरी मशीद , शहाबानो प्रकरण, समान नागरी कायदा, अल्पसंख्यक वर्गाला मिळणारे फ़ायदे असो वा शिखांचे स्वतंत्र खलिस्तान आंदोलन व त्यातुन झालेले ऒपरेशन "ब्यु स्टार" असो वा ख्रिश्चन मिशनयांची दुर्गम भागात चालणारी "धर्मांतर मोहीम" व त्याला विरोध म्हणून पडलेले काही मिशनयांचे खुन व त्यातुन निर्माण झालेली राजकीय महत्वकांक्षा असो ह्यातुन ह्या " वन नेशन" मधील जनता एकमेकांसमोर " शस्त्रे घेऊन" उभी ठाकली. ह्यामुळे भारतीय "एकात्मिकेला धोका" पोहचला. पण काहीश्या समंजस व हुशार नेतूत्वाने ह्या देशाचे तुकडे पडायची वेळ येऊ दिली नाही व ह्या सर्व घटनातुन तावून-सुलाखवून भारत राष्ट्र हे "वन नेशन" राहिले. ह्या प्रकारातील निरर्थकता लक्षात आल्यामुळे कदाचित सामन्य जनता ह्या प्रकारापासून दुर राहिल्याने आता काहिसे हे प्रश्न मिटले आहेत व त्यातुन "देश तुटण्याचा" धोका टळला आहे. आज शक्यतो सामान्य जनता अशा "धार्मीक समाजकंटकांना" आश्रय देईनाशी झाल्याने आपण समाधान मानायला हरकत नाही.
त्यानंतर काळ आला तो "जातीय आधारावर मांडल्या गेलेल्या असंतोषाचा", काही नेत्यांनी "जातीय आधारावर आरक्षण" ही कल्पना मांडून व ती राबवून आज पुन्हा देशाला यादवीच्या उंबरठ्यावर आणून ठेवले आहे. प्रारंभीच्या काळातील "मंडल आयोग" व त्यांनंतर झालेले दंगे, सध्या राबवू पहात असलेल्या "ओबीसी आरक्षणाची कल्पना" व त्यासाठी चालू असलेली लढाई व त्यातुन आज उभे राहिलेले " गुज्जर समाजाच्या हिंसक आंदोलन" व त्यासाठी त्यांनी वेठीस धरलेली सामान्य जनता ह्या काळजी करण्यासारख्या गोष्टी आहेत. त्याचा योग्य वेळी बिमोड केला नाही तर परिस्थीती चिघळायस वेळ लागणार नाही. सध्या "विमुक्त जाती व जमातींना" ऒलरेडी आरक्षण आहेच व आता "ओबीसी समाजाचा" प्रश्न जळता निखारा आहे व ह्यांच्या यशस्वी परिणांमांमुळे सध्या पुढारलेल्या मानल्या जाणार व उच्चवर्णीय वर्गाने म्हणजे ब्राम्हणांनी, मराठ्यांनी, ठाकुरांनी, पटेलांनी उद्या त्यांच्यासाठी "आरक्षणाची" मागणी केली तर आश्चर्य वाटायला नको. आज हे सर्व चलती नाणी आहेत हे पाहून "धार्मीक आरक्षणची" मागणी पुढे आली व ते लागू झाले तर आश्चर्यचकीत होऊ नका. सध्याच्या सरकारने आणलेला "सच्चर आयोग" ही त्याचीच नांदी आहे. ह्या सर्वांचा प्रमुख दुष्परिणाम असा की देशाच्या कल्याणासाठी एकत्र झटणाया सामान्य जनतेत ह्यामुळे एक "दुही" निर्माण होत आहे, त्यांची मने दुर जात आहेत, काही ठराविक वर्गाला चुचकारले जात आहे व काहींना उपेक्षीत ठेवले जात आहे हे भावना निर्माण होत आहे. थोडक्यात आधी "एक" असणारी मने आता "दुभंगली" जात आहेत. अशी दुभंगलेली मने जेव्हा देशाच्या विकासाठी एकत्र काम करतील तेव्हा त्यातुन निर्माण झालेला परिणाम केवळ शुन्य असेल. अशी दुभंगली मने देशाचा विकास करुन त्याला प्रगतीपदावर न्हेऊन त्याला "एक महासत्ता" बनवू शकत नाहीत हे लोकांच्या लक्षात येत नाही. समजा जरी लोक समजायला लागले तरी काही "हितशत्रू" बरोबर पुन्हा वाद निर्माण करतात ...
ह्या सर्व गोष्टींमुळे देशासाठी "विवीध पातळीवर काम" करणाया सामान्य जनतेच्या मनाच्या दोलनामय परिस्थीतीचा विचार कोणी करत नाही. ह्या देशाच्या सुरक्षेसाठी अणस्त्रे बनवणाया "अब्दुल कलामांच्या" मनात हा विचार येत नसेल का की आपण ज्या राष्ट्रासाठी झटतो आहोत त्या राष्ट्रामधील काही शक्ती आपल्याला व आपल्या जमातीला "उपरा" मानून त्यांच्या विरोधात शत्रे घेऊन त्यांच्या संहाराची भाषा बोलत आहेत, जेव्हा "युसुफ़ पठाण व इरफ़ान पठाण" हे हाती बॆट - बॊल घेऊन प्रतिस्पर्धी "पाकीस्तानी" संघावर तुटुन पडतात तेव्हा त्यांना वाटले की "अरे आपण ज्यांच्यासाठी आपल्याच जातीय भाईबंदाविरुद्ध उभे आहोत ते लोक आपल्याला उपरा मानतात" अशा परिस्थीतीत काय ? लियंडर पेस, सानिया मिर्झा ला वाटले की आपल्या धर्माबंधूंवर , धर्मगुरुंवर हल्ले होत असताना आपले ह्या देशासाठी खेळणे पटत नाही तर काय ? ह्या देशात काम करणाया हजारो मुस्लीम व ख्रीस्ती डॊक्टर्स, इंजिनीयर्सना हा देश आपला वाटला नाही तर त्यांच्या काम करण्यामागे "समर्पण" किती राहिल ? मागास आरक्षणाचा लाभ घेऊन आज देशाच्या यंत्रणेत मोठ्या पदावर काम करणाया अधिकायांना बाहेरचे "आरक्षण आंदोलन व त्यावर येणाया प्रतिक्रीया" याबद्दल काय वाटत असेल ? त्या परिस्थीतीत ते आपले काम पुर्णपणे "निष्पक्षपातीपणे" करतील का वा त्यांनी करावे का ? देशाच्या सुरक्षेसाठी सिमेवर बंदुकीच्या ट्रीगरवर बोट ठेऊन अहोरात्र उभे राहणाया विवीध जाती, जमाती मधल्या सैनीकांमध्ये दुहीची भावना वाढीस लागली तर काय ? तसे पहायला गेले तर ह्यांचा परिणाम त्यांच्या कामगिरीवर होणे अपेक्षीत नाही व मान्यही नाही. पण मी मानतो की आजूबाजूला घडणाया घटनांचा परिणाम निश्चितपणे त्यांच्या मनावर व पर्यायाने त्यांच्या "कामगिरीवर" होत असेल. अशा परिस्थीतीत आपला देश खरेच "एक वन नेशन" राहिल का ? याचा विचार आत्ताच परिस्थीती हाताबाहेर जाण्याआधी केला पाहिजे व काही तरी कठोर उपाय योजले पाहिजेत.
आता एक तिसरीच शक्ती आपले डोके वर काढू पहात आहे ती म्हणजे "प्रादेशिक अस्मितेचा" पुरस्कार करणायांची. भारतासारख्या एका मोठ्या देशात अनेक लोक राहतात, त्यांची संस्कॄती भिन्न आहे, भाषा भिन्न आहे, आचारविचार भिन्न आहेत. आपल्या जमातीची वा समुहाची ओळख टिकून रहावी यासाठी त्यांनी आपापल्या "संस्कॄती व मुल्यांची" जपणूक केली तर त्यात चुकीचे काही नाही पण पुढे जाऊन याचे परिवर्तन हे "प्रादेशिक अस्मितेत" झाले व हा प्रश्न संवेदनाशील झाला. भारताच्या विवीध भागात राहणाया "बंगाल्यांची अस्मिता, आसामी अस्मिता, मराठी अस्मिता , गुजराती अस्मिता [ हो, आता ही पण महत्वाची झाली आहे, लोकांनी निवडणूकी जिंकल्या त्याच्या जोरावर ] , दक्षिणेची वेगळी अस्मिता, युपी / बिहारची स्वता:ची वेगळी अस्मिता , वरच्या इशान्य भारताच्या जनतेची प्रादेशीक अस्मिता" असे अनेक आयाम या विषयाला मिळाले. जेव्हा व्यापार, व्यवसाय , नोकरीच्या निमीत्ताने ही लोक देशातल्या विवीध भागात पसरले व काही कारणाने तेथील लोकल अस्मिता व ह्या लोकांनी आपल्या बरोबर आणलेली स्वता:ची अस्मिता यांच्या संघर्षाची परिस्थीती निर्माण झाली व काही ठिकाणी "हिंसक आंदोलने" पहायला मिळाली. तसे पहायला गेले तर दक्षिण भारताचे पहिल्यापासून वरच्या भागात राहणाया व हिंदी बोलणाया लोकांशी पहिल्यापासून वाकडे होतेच, शक्यतो त्यांनी वरच्यांना "आपण उपरे आहोत" याची वेळोवेळी जाणीव करुन द्यायचा प्रयत्न केला. ७० च्या दशकात मराठी माणसाला त्याचे हक्क मिळवून देण्याच्या निमीत्तने उभारलेल्या आंदोलनातुन "मराठी अस्मितेची" नवी ओळख भारतला पटली व शिवसेनेसारख्या प्रादेशिक प्रश्नांवर उभ्या राहिलेल्या राजकीय पक्षांना राजकारणात चांगले दिवस येण्यास सुरवात झाली. तामिळनाडूत तर पहिल्यापासूनच "प्रादेशिक द्रमुक व अण्णाद्रमुक" ह्यांनी सत्ता आपल्याकडे ठेवली होती व कॊंग्रेस, भाजपा सारख्या राष्ट्रीय पक्षांना इथे पाय रोवायची संधी दिली नाही. त्यानंतर "आसामी अस्मितेच्या" निमीत्ताने आसामात झालेली हिंसक आंदोलने, आसु [ ऒल आसाम स्टुडंट युनियन ] सारख्या विध्यार्थी संघटना व त्यानंतर त्याचां राजकीय अवतार "आसाम गण परिषद" यासारख्यांनी पण "प्रादेशिक अस्मिता" जोपासली. सध्याच्या काळात सगळ्यात मोठ्ठी समस्या म्हणजे व्यापार व नोकरीच्या निमीत्ताने बाहेर गेलेल्या बिहारी / युपी जनतेने आपल्या बरोबर न्हेलेली आपली संस्कॄती व अस्मिता ह्यांचा तिथल्या लोकल अस्मितेशी झालेला संघर्ष. मग हे आसामात असो, महाराष्ट्रात असो वा दक्षिणेत असो ही एक राष्ट्रीय समस्या व्हायला सुरवात झाली, त्यातच त्यांच्या "नेत्यांनी" अनावश्यक विधाने व वाद निर्माण करुन ही परिस्थीती चिघळावली व ह्याचा परिणाम म्हणजे झालेली "हिंसक आंदोलने" व यासाठी वेठीस धरली गेलेली सामान्य जनता व विस्कळीत झालेले जनजीवन.प्रारंभी "मराठी माणसाचा विकास म्हणजे गुजरात्याच्या कानफ़ाडीत मारणे नव्हे" ही भुमीका मांडणाया राज ठाकर्‍यांना पण काळ बदलतोय म्हणून "बिहायांच्या थोबाडीत" मारण्याची कॄती करावी लागली व ह्या आंदोलनाला "प्रादेशिक द्वेशाची" एक वेगळी किनार मिळाली.
ह्याचा त्रास पुढे कदाचित बाहेर राहणाया "मराठी माणसाला" होऊ शकतो ही शक्यता सध्या कुणीच जमेस धरत नाही....

आज परिस्थीती अशी आहे की ह्या "प्रादेशिक वादाला" बाजूला सारुन कुठलाही पक्ष "केंद्रात सत्तेची शिडी" चढू शकत नाही व त्यांना ह्या "प्रादेशिक पक्षांना" चुचकारावेच लागेल ...
अशीच परिस्थीती कायम राहिली तर आपण "इंडीया : दी वन नेशन " म्हणू शकतो का ???

"दी वन नेशन " म्हणजे काय नक्की ? नेशन म्हणाजे येथे राहणारे लोक, ह्या भारतात राहणारी १०० करोड जनता. ही नुसती १०० करोडाची गर्दी जमवून काही होणार नाही तर तिथे पाहिजे ह्यांच्यात "ऐक्याची भावना" , आपण एका "महाशक्ती असलेल्या समुहाचा भाग" आहोत ह्याचे समाधान देणारी भावना. अशी भावना निर्माण झाली की त्यांचे "शक्तीशाली गट" बनतात व हेच गट "हाच देश" पुढे न्हेतात. पण त्याच्यासाठी गरज आहे ती लोकांनी आधी " वन वेशन" ही संकल्पना आमलात आणण्याची ...
आपण सध्या भारताच्या "मिशन २०-२०" च्या मोठ्या मोठ्या गप्पा मारत आहोत, भारताला एक विकसीत राष्ट्र बनवायचा वायदा करत आहे पण ह्या गोष्टी भारत हा " वन नेशन" झाल्याशिवाय शक्य नाहीत .... विकास म्हणजे काय ह्याचेच सध्या कंफ़्युजन [वा फ़ारफ़ार तर अद्न्यान म्हणू शकतो ] आहे. विकास भारताच्या सर्वसामान्य जनतेने विदेशी ब्रॆंडेड कपडे घालून एका विदेशी कारमधुन जाऊन एका मल्टिप्लेक्स मध्ये आपल्या "फ़ॆमीली" सोबत "बर्गर खात व कोकाकोला पित" सिनेमा बघणे नव्हे. मोठेमोठे मॊल्स उभारले, सॊफ़्टवेअर कंपन्या सुरु झाल्या, फ़ारीनच्या कार भारतात आल्या, मोबाईलचे रेट कमी झाले, पर्यटन स्वस्त झाले म्हणजे विकास झाला असे नव्हे ....विकास म्हणजे समुहातील प्रत्येक व्यक्तीच्या सर्जनशील शक्तींचा अविष्कार. ही प्रक्रीया आपल्या देशात चालू आहेच की, गेली ६०वर्षे यशस्वी पणे लोकशाही राबवून दाखवणारा, तंत्रद्न्यान व अन्नधान्याच्या बाबतील स्वयंपूर्ण, माउंट एव्हरेस्ट पासुन ते थेट अंटार्टीका व आता चांद्रस्वारी मोहीम आखणारा, एका वेळी १० उपग्रह यशस्वीपणे आकाशात सोडणारा, महापरम संगणक बनवणारा, माहिती तंत्रद्ब्यान क्षेत्रात एक महासत्ता असणारा, बाकीच्यानी नाही म्हतल्यावर स्वता:च्या दमावर अणूभट्टी उभारुन "पोखरणची अणूचाचणी" करणारा, वैश्विक शांतीचे धडे अख्ख्या जगाला देणारा, संगित आणि कलेची जगाला देणगी देणारा, देशाला "२०-२०" वर्ल्डकप जिंकून देणारा, बुद्धीबळ खेळाचा विशवविजेता असणारा असे कितीतरी चेहरे या विकासोन्मुख भारताचे आहेत. पण त्याच्याबरोबरच "जातीयतावाद, धार्मीक दुही, प्रादेशिक अस्मिता जोपासणारा", सामाजिक व आर्थीक विषमता व दुही असणारा, उपलब्ध सोईंच्या विरतणात एकांगी, दारिद्र्य, अद्न्यान, बेकारी, मुलभुत शिक्षणाची दुरावस्था , भ्रष्टाचार यांनी बुजबुजलेला, हेही भारताचे चेहरे. याला आपण "विकासोन्मुख वन नेशन" म्हणू शकतो का ?

यातील बहुतेक प्रश्न सोडवायचे असतील व भारताला "एक आंतरराष्ट्रीय महासत्ता " बनवायचे असेल तर गरज आहे ती भारतीय जनतेने " वुई, दी वन नेशन" म्हणून उभे राहण्याची !!!

मिपावरच्या मान्यवर व अभ्यासु जनांचे "इंडीया-दी वन नेशन आणि धार्मीक, जातीय व प्रादेशिक अस्मिता" याबद्दल काय मत आहे जाणून घ्यायला मला आवडेल ...

गुज्जर आंदोलन

आपण सर्व गेले ९-१० दिवस या आंदोलनाबद्दल वाचतो आहोत. एक समाज सगळ्या देशाला वेठीवर धरुन आहे, कोणी कांही करु शकत नाही. आज आठ दिवस दिल्ली -मुंबई रस्ता व रेल्वे विस्कळीत झाली आहे. अनेक लोक उत्तरेकडे अडकले आहेत. लोकांच्या हालांना पारावार राहिला नाही.
मतांसाठी सर्व लाचार पक्ष मूग गिळून बसले आहेत.
या आणि अशा प्रकारच्या हिंसक आंदोलनाचा नुसता निषेध करुन चालणार नाही. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणार्‍या प्रत्येक व्यक्तिला सरकारने 'अतिरेकी' मानून त्यानुसार कारवाई केली पाहिजे.

निर्लज्ज गृहमंत्री

आपल्या माननीय गृहमंत्र्यांनी काय अकलेचे तारे तोडले आहेत ते बघाच. हा नक्की कुठल्या देशाचा गृहमंत्री आहे तेच कळत नाही. खालील दुवा वाचा.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3078229.cms

हे राजनेते सत्तेने इतके लाचार झाले आहेत की ते ज्यांच्यासाठी राबणे अपेक्षित आहे ते काम करतच नाहीएत असे दिसते.

भाषाशुद्धी, शुद्धलेखन, मते-मतांतरे वगैरे वगैरे...

शुद्धलेखन, भाषाशुद्धी इ. इ. संदर्भात मिसळपाव वर चाललेल्या वेगवेगळ्या चर्चा लक्षात घेता बरीचशी मते पूर्वग्रहदूषित आहेत हे मला जाणवते. एकीकडे शुद्धलेखनाचा आग्रह नको म्हणताना दुसरीकडे मात्र रुळलेल्या फारसी, इंग्रजी शब्दांऐवजी मात्र सहज वापरता न येण्याजोगे शब्द सुचवणे असा विरोधाभास इथे दिसतो. प्रत्येकाने आत्मपरीक्षण करून खालील काही प्रश्न्नांची उत्तरे स्वतःशी पडताळून पहावीत.
१) मराठी शब्दांवर केवळ संस्कृत भाषेचाच प्रभाव आहे असे वाटते का?
२) फारसी किंवा इतर भाषेतील रुळलेल्या शब्दांमुळे अर्थ न समजणे, उच्चार करण्यास न जमणे असे जाणवते का?
३) नेहमीच्या वापरातील कुठला शब्द संस्कृतातून आला, कुठला फारसीतून अथवा कोण्या अन्य भाषेतून आला याचा विचार आपण लिहिता बोलताना करता का?
४) रुळलेल्या शब्दांना ( मग ते शुद्ध असोत अथवा अशुद्ध, स्वभाषेतील असोत अथवा इतर भाषेतून आलेले, मूळ स्वरूपात असोत अथवा अपभ्रंश झालेले) बदलण्याचा 'मोह' खरेच होतो का?
५) तुम्ही सुचवलेले अथवा तुम्हाला वाटलेले 'योग्य मराठी शब्द' तुम्ही स्वतः लिहिता बोलताना वापरता का?
६) तुम्ही दररोज किती तास दूरदर्शनसंचावर चलचित्रफिती पाहता? (हा प्रश्न तुम्ही कितीवेळा वाचलात? )
७) तुमच्या गाडीचे टायर कधी 'योग्य मराठीत' पंक्चर झाले आहे काय?
८) 'मला शुद्धलेखनाचा जाच नकोय आणि मला शीतकपाटातील (रेफ्रिजरेटर-फ्रिजर- फ्रिज.) गारगार पाणीही नको' या प्रकारात तुम्ही मोडता का?
९) 'मला शुद्धलेखनाचा जाच नकोय पण मला फ्रिजमधलं गारगार पाणी हवे आहे' या प्रकारात तुम्ही मोडता का?
१०) तुम्ही काल घरी फोन केला होता का?
११) तुम्हाला बसचे तिकीट काढावे लागते का?
१२) भाषाशुद्धी आणि शुद्धलेखनाच्या तुमच्या मतांना आणि प्रयत्नांना तुम्ही पुढीलपैकी कुठल्या वर्गात धराल - 'स्वान्तसुखाय', 'हौस' , 'मौज' ,'व्यवहारचातुर्य', 'कळकळ'

उपहासात्मक प्रश्नांची सरबत्ती करायची झाल्यास अनेक प्रश्न आहेत. वव्यवहार म्हटल्यास कमी प्रश्न आहेत. कळीचा मुद्दा हा की तुम्ही मांडलेल्या मतांशी तुम्ही कितपत प्रामाणिक आहात याचा.

अनादि मी अनंत मी...

अनादि मी अनंत मी, अवध्य मी भला,
मारील रिपू जगती असा कवण जन्मला...

असे म्हणणार्‍या आणि लहानपणीच शिवाजीच्या थाटात "देशाच्या स्वातंत्र्याकरता मारीता मारीता मरेतो झुंझेन" अशी शपथ घेणार्‍या स्वातंत्र्यवीर सावरकरांची आज म्हणजे २८ मे ला, १२५ वी जयंती आहे. आज म.टा. मधे त्यांच्यावर विशेष ऑनलाईन पुरवणी काढण्यात आली आहे. त्यातील श्री. भारतकुमार राउत यांचा "तात्यांच्या सहवासात" हा लेख वेगळ्याच अनुभवावर आधारीत असल्याने वाचनीय वाटला.

त्यांच्या हिंदूत्व आणि क्रांतिकार्याबद्दल बरेच बोलले जाते त्यामानाने भाषाशुद्धीबद्दल कमी बोलले जाते. म.टा. मधील या बातमीत सावरकरांनी निर्माण केलेल्या काही वापरातील मराठी शब्दांची यादी आहे ती स्वातंत्र्यवीरांना नम्र अभिवादन करत येथे देत आहे: (ती वाचताना एकच गोष्ट खटकली, ती म्हणजे म.टा./बातमीदाराने त्या प्रत्येक शब्दाचा इंग्रजी अथवा समानार्थी दिलेला प्रतिशब्द/अर्थ)

दिनांक (तारीख)
क्रमांक (नंबर)
उपस्थित (हजर)
प्रतिवृत्त (रिपोर्ट)
नगरपालिका (म्युन्सिपाल्टी)
महापालिका (कॉर्पोरेशन)
महापौर (मेयर)
पर्यवेक्षक ( सुपरवायझर)
विश्वस्त (ट्रस्टी)
त्वर्य/त्वरित (अर्जंट)
गणसंख्या (कोरम)
स्तंभ ( कॉलम)
मूल्य (किंमत)
शुल्क (फी)
हुतात्मा (शहीद)
निर्बंध (कायदा)
शिरगणती ( खानेसुमारी)
विशेषांक (खास अंक)
सार्वमत (प्लेबिसाइट)
झरणी (फाऊन्टनपेन)
नभोवाणी (रेडिओ)
दूरदर्शन (टेलिव्हिजन)
चित्रपट (सिनेमा)
मध्यंतर (इन्टर्व्हल)
अर्थसंकल्प (बजेट)
क्रीडांगण (ग्राउंड)
प्राचार्य (प्रिन्सिपॉल)
विधिमंडळ ( असेम्ब्ली)
क्रमांक (नंबर)
बोलपट (टॉकी)
नेपथ्य
वेशभूषा (कॉश्च्युम)
दिग्दर्शक (डायरेक्टर)
प्राध्यापक (प्रोफेसर)
मुख्याध्यापक (प्रिन्सिपॉल)
शस्त्रसंधी (सिसफायर)
टपाल (पोस्ट)
दूरध्वनी (टेलिफोन)
ध्वनिक्षेपक (लाउड स्पीकर)
परीक्षक (एक्झामिनर)
तारण (मॉर्गेज)
संचलन (परेड)
गतिमान
नेतृत्व (लिडरशीप)
सेवानिवृत्त (रिटायर)
वेतन (पगार)

रंगपंचमी (उत्तरार्ध)

(पात्र व घटना काल्पनीक)

रफ़िक शेख आले खरे, पण रातच्याला वशाट जास्त झाल्याने आणि सकाळीच "समाधान" चा कटींग मारल्याने त्यांना जरा अवळून आलं. आल्या आल्या ते लागलीच निघून गेले. सेनावाल्यांनी एकमेकांकडे "ह्यांनी दाखवली आपली ...." अशा थाटात पाहिलं, आणि "आयला महाराष्ट्रात एकच मर्द" अस म्हणून मा.शि.बा.ठां. ना एकदा मनातल्या मनात नमन केलं. "माझा लढा ... विठ्ठल ... **डवे (ब?)..." असही काहीतरी पुटपुटले. चिखलात पाय पडून बाजूचं पाणी जस गढूळ व्हाव, तशी गढूळता क्शणभर पसरली. खर कारण"समाधान" हे होतं हा भाग वेगळाच.

इकडे "आळेकर टावर" मधून पोट्टी जमत होती. र्हावल्या पन आला. नाश्ता करून. आज कसेरंग खेळयचे हे त्याने आधीच ठरवलेल होत. तसे खीशात ३०-३५ रुपयांचे रंग आणले होते.२ दिवसापुर्वीच त्याने कटींग केली होती. केसं कलर पण केली होती थोडी. २ महिन्यांपुर्वी इशल्या बरोबर जिम स्टार्ट करून थोडी बॉडीबिल्डिंग केली होती. गेल्या वेळी पोरांनी उचलून हौदात टाकला होता त्याला ... य धूतला होता !! यंदा तो सावध होता. आजचे कपडे पन आधीच ठरवलेले होते.बॉडी दिसेल याची काळजी त्याने घेतली होती. फ़ुल्ल आवरून आला होता तो.(पावडर पण लावली होती थोडी).

तेवढ्यात मागून त्याची आई आली आणि आपल्या निरमा आणि नारळाच्या काथ्यांनी भांडी घासून खरखरीत झालेल्या हाताने र्हावल्याला फाडदिशी ओढली. त्याचे कान गरम झाले.
"पयला घरी चल ह्यंद्र्या .... इचकट कार्ट .... सणावारी भांडण करतय"
"हात्तीच्यायला कसली वोढली ... लय बेक्कार .. ह्यॆ ह्यॆ ह्यॆ" .. कोणीतरी आपले reflexes दाखवले.आणखी ४-५ पोट्टी हसली. र्हावल्या ला आयशी चा लय राग आला.
"दद्या ला सांग ... आईवरून शिवी दिली त्याने मला" .... दादा .. सख्खा भाऊ !!

इतक्यात इकडे रंगपंचमीचा एकच गलका उडाला. धडाक्यात सगळ्यांनी एकमेकांना रंगवायला सुरुवातकेली. सर्वांच्या मनात "मी पन आन्नाला लावनार ... आ !" अशी प्रेमभावना दाटली. प्रत्येक कार्यकर्ता आन्नाच्या गालावर दोन रंगीत बोटं फिरवून क्रुत:क्रुत्य होत होता. आन्ना पण नवरदेवाचा हळदीचा कार्यक्रम असावा तसा सगळी कौतुकं करून घेत होता (आयला यडपट !!). वरतुन बायको पहात होती. नव-याच्या कर्त्रुत्वाने तिचा ऊर भरून आला. आईचा कंठ उगाचच दाटला. "बाप पडला पन पोरगा नाव काढनार" .. अस तर त्या मायेला वाटल नसेलना !! सत्या ने रंग लावल्यावर अन्ना ने त्याला मिठी मारली. सत्या पुन्हा लाडात. पिच्या ला खुपलं हे, पण त्यानेदु:ख गिळून टाकल. आन्ना नंतर दोन काची ची दोन बोट त्याने Mercedes (बरं एस्टीम ... खूश ??)ला पण लावली. इशल्या-गन्या गॆंग ने नेहेमी प्रमाणे अक्रस्ताळेपणा आणि अगाचोरपणा सुरू केला. शेट्टी रंगल्यावर फ़ार ओंगळ दिसत होता (च्ययला आपण बरे दिऊन काय दिवे लावले ... किमान त्याची .. असो.)

... तर रंगपंचमी थाटात साजरी झाली.

(समाप्त)

मी जर हा असतो तर : भाग २

ह्यावेळी मी मिपा कुटुंबियांवर लिहणार नसून एकंदरीत सामाजीक परिस्थीतीवर आपली छाप सोडणाऱ्या व्यक्तींवर लिहणार आहे...

मी जर कॉन्ग्रेसचा नेता असतो तर,
मी आपल्याला निवडणूकीत लोकांसमोर जायला कुठलेच विधायक कार्यक्रम उरले नाहीत का याचा विचार केला असता.
महात्मा गांधींनी स्थापन केलेया पक्षाची आपण लावलेली वाट पाहून व त्या बद्दल शरम वाटून राजघाटावर जाउन गांधींची क्षमा मागितली असती.
राहूलसाठी केलेल्या चापलूसकीमुळे आपली प्रतिमा बिघडत चालल्याबद्दल विचार केला असता. आरक्षणाच्या मुद्द्यावर एक ठाम भुमीका घेतली असती.
सत्तेसाठी आपण डाव्यांचे लाड करून देशाचे नुकसान करतो आहोत जे जाणून सत्तीला लाथ मारली असती व ताठ मानेने निवडणूकीला सामोरे गेलो असतो ....

मी जर राहुल गांधी असतो तर,
पहिल्यांद्या आपल्या भोवती असलेल्या चापलूसकांच्या चांडाळ चौकडीला लाथ मारून आपली जनमानसातील प्रतिमा सुधारली असती.
गांधी घराण्याच्या वलयाचा वापर देशाच्या व पक्षाच्या कल्याणासाठी केला असता.
झालच तर स्वताच्या मनाने परिस्थीतीचा अभ्यास करून भाषणे दिली असती, सध्यासारखी नुसती वाचून दाखवली नसती.
दलितांबरोबर मिसळण्याचे नाटक बंद केले असते.
स्वताबद्दल पंतप्रधानपदासाठी उडणाऱ्या वावड्यांना आपण अजून तेवढे परिपक्व नसल्याचे नमूद करून पुर्णविराम दिला असता.
स्वताला आपण देशावर राज्य करणाऱ्या गांधी घराण्याचे युवराज नसुन देशाच्या कल्याणासाठी अनेक वेळा बलिदान करणाऱ्या गांधी घराण्याचा एक पुढचा सैनिक आहे असे समजावले असते.

मी जर भाजपा नेता असतो तर,
मी कुणा एकाचे नेतत्व मान्य करून पक्षबांधणीसाठी स्वताला वाहून घेतले असते.
उठसुठ गांधी घराण्यावर टिका करण्यापेक्षा आपल्या पक्षातल्या नाठाळांवर कसा काबू करायचा याचा विचार केला असता.
विरोधी पक्षाची भुमीका नुसती "विरोधासाठी विरोध " अशी नसते हे समजावून घेतले असते.
पुढच्या निवडणूकीसाठी आत्ताच तयारी सुरु केली असती व त्यासाठी जनतेच्या व देशाच्या कल्याणाचा एक कार्यक्रम लोकांसमोर ठेउन त्याआधारे निवडणूकांना सामोरे गेलो असतो.
पराभवानंतर मनाला लाजवेल असे आकांडतांडव केले नसते व विजयानंतर हुरळून पण गेलो नसतो ...

मी जर गोपीनाथ मुंडे असतो तर,
महाजनांनंतर पक्षाला मी सोडून महाराष्ट्रात कुणीच वाली नाही ह्याचा गैरफायदा घेतला नसता.
पक्षाला उठसुठ ब्लॅकमेल केले नसते.
गडकरींशी एकदा काय आहे ते मिटवून शेवटी दोघांनी मिळून पक्ष पुढे न्हेला असता.
मिडीयाच्या व लोकांच्या मनात पाल चुकचुकेल अशी "जातीच्या आधारे पक्ष" काढण्याबद्दल हालचाल केली नसती.

मी जर लालू प्रसाद यादव असतो तर,
उठसुठ कुणाला दमात घेण्यापेक्षा आपली भारतीय राजकारणात प्रतिमा "जोकर" कशामुळे झाली याचा विचार केला असता.
"राज ठाकरे" यांच्या घरासमोर "छटपुजा" घ्यायचा हट्ट टाकून ती सुधारलेल्या बिहारच्या भुमीत कशी घेता येईल यांसंबंधी विचार केला असता.
येवढी वर्षे सत्ता असुन आपण काहीच करू शकलो नाही याबद्दल शरम वाटून राजकारणातुन सन्यास घेउन स्वताच्या मालकीची मालकीची "गोपालनशाळा" काढली असती व राबडीला बरोबर घेउन मस्त धंदा संभाळला असता. आत्तापर्यंत पाळलेल्या साधू यादव सारख्या गुंडांचा वापर आपली गुरे सुरक्षीत ठेवण्यासाठी केला असता.
राज ठाकरेंवर टिका करण्याआगोदर "ते रस्ताने गेले तर लोक पाया पडतात व आपण रस्ताने चाललो तर लोक दगड का मारतात ?" याचा विचार केला असता ....

मी जर अबु आझमी असतो तर,
राज ठाकरेंना धडा शिकवायला थेट आझमगढहून २०००० माणसे आणण्यापेक्षा त्यांचे कल्याण तिकडेच कसे करता यीएल हे पाहिले असते.
आपली लायकी काय आहे हे न समजता भैय्या चॅनेल्स वर अशा बेफाट मुलाखती दिल्या नसत्या.
परिस्थीती लै बिघडली व आपल्याला महाराष्ट्रात जाणे अशक्य झाले तर पोट कसे भरावे यासाठी प्लॅनिंग चालू केले असते.

मी जर अमरसिंग असतो तर,
सगळ्यात पहिल्यांदा स्वताला अमिताभचा दत्तक भाउ, जयादिदींचा दत्तक कोणीतरी [ नवरा म्हणता येत नाही ना ] , अभिषेकचा दत्तक बाप, ऐश्वर्याचा दत्तक सासरा असे जाहीर करून टाकले असते. पुन्हा कुणी विचारले की बच्चन घराण्याशी तुमचा काय संबंध तर ही नाती त्याच्या तोंडावर फेकली असती.
त्यांच्यापैकी कुणाला साधी शिंक जरी आली तरी न्युज चेनेल्सना हाताशी घरून सगळे वातावरण पेटवले असते व राज ठाकरेच्या अटकेची मागणी केली असती.
उत्तर प्रदेशातली सत्ता गेलीच आहे आता लोकसभेत परिपत्य झाल्यावर पळायचे कुठे ह्याचा प्लॅन रेडी ठेवला असता. कधीतरी वेळ काढून शिवसेनेच्या संजय राउतांबरोबर मिसळपार्ट्या झोडून "मी कसा मराठी संस्कृतीशी मिसळून राहतो " ह्याबद्दल न्युज चॅनेल्सवर अखंड बडबड केली असती.
थोडक्यात सध्या वागतो तसेच मुर्खासारखे वागलो असतो.

मी जर राज ठाकरे असतो असतो तर,
वर उल्लेख केलेल्या माकडांच्या चिडवण्याकडे लक्ष न देता आपले कार्य चालू ठेवले असते.
शिवसेनेशी न भांडता मराठी माणसाचा उत्कर्ष कसा करता येईल हे पाहिले असते.
शक्यतो आपल्या आंदोलनात सामान्य माणसे भरडली जाणार नाहीत याकडे लक्ष ठेवले असते.

मी जर देवेगौडा असतो तर,
कोलांट्याउड्या मारण्यामध्ये आपला एक नवा जागतीक विक्रम झाला आहे असे गिनीस बूक वाल्यांना कळवले असते व त्याची सगळीकडे जहिरात केली असती.
सध्या होणाऱ्या निवडणूकात पण ह्या विक्रमाच्या आधारे मते मागितली असती.
आम्हाला स्थिर सरकार द्या म्हणणाऱ्या लोकांना व पक्ष कार्यकर्त्यांना कर्नाटकच्या "विधानसौधेवरून" फेकून दिले असते.
समजा ह्या निवडणूकीत पराभव झाला तर मी पक्ष कार्यालयात "राईस सांबार" विकण्याचे दुकान काढले असते व शेजारी आपल्या मुलाला म्हणजे कुमारस्वामीला कॉफी व सिगारेट विकायची टपरी काधून दिली असती व दिवसभर गल्ल्यावर "फक्त कन्नड गाणी " ऐकत झोपा काढल्या असत्या.

मी जर कुमार केतकर असतो तर,
सगळ्यात पहिल्यांदा राहुल गांधीच्या चापलूस गटाचे कायदेशीर सदस्यत्व घेतले आस्ते.
आपण जे मुर्खासारखी विधाने करतो अथवा लेख लिहतो त्यामागचे कारण म्हणजे आपल्याला लागलेला "म्हातारचळ" आहे का याचा विचार केला असता.
आपण खरेच निरपेक्षपणे लिहू शकत नाही हे ओळखून वर्तमानपत्राच्या सम्पादकपदाचा राजीनामा दिला असता.
कुठल्या संभेलना बोलावल्यास तेथे जाउन, आयोजकांबरोबर भांडणे काढून, कुढल्या जातीवर टीका करुन स्वताला पळून जायची वेळ येउ दिली नसती ...
लोक आपल्याला सुमार केतकर का म्हणतात याचाही अभ्यास केला असता.

मी जर संजय राउत असतो तर,
सामना हे फक्त शिवसेनेच्या बातम्याला वाहून घेतलेले वृत्तपत्र नव्हे हे दाखवून दिले असते.
ह्या गोष्तीमुळे आपल्या वर्तमानपत्राची प्रतिमा संध्यानंदसारखी होत आहे याची काळजी केली असती.
मराठी माणसाचे हित लक्षात घेउन राजच्या सभेचा पानभर वृत्तांत दिला असता.
दररोज शिवसेनेच्या विजयाबद्दल व विरोधकांच्या पराभवाबद्दल देमार बातम्या देउन स्वताचे हसे करून घेतले नसते.
एकेकाळी सामना हा मराठी माणसाचा मानबिंदु होता याची आठवण ठेवली असती ....

मी जर न्युज चॅनेल्सवाला [ आजतक, स्टार न्युज इ. इ. ] असतो तर,
सर्वप्रथम आपले चॅनेल हे राष्ट्रीय नसुन फक्त बिहार, युपी साठी मर्यादीत असल्याचे जाहीर केले असते.
एक स्वतंत्र वेगळे चॅनेल्स काढून त्यावर अखंड महाराष्ट्र व दक्षिण भारत विरोधी बातम्यांचा रतीब चालू ठेवला असता.
देशाच्या समस्यांकडे लक्ष द्ययचे सोडून अमिताभची सर्दी, प्रिन्सचे खड्ड्यात पडणे, दी ग्रेट खलीचे भारतात आगमन अशा बातम्या जोमाने दिल्या नसत्या.
लै डोक्याला कटकट झाली तर बच्चनसाठी एक वेगळे चँएल, खलीसाठी अजुन एक वेगळे, ठाकरेविरोधी एक वेगळे, खड्ड्यात पडणाऱ्या मुलांसाठी वाहून घेतलेले एक वेगळे चॅनेल, राहूल गांधीच्या बातल्यांसाठी एक वेगळे चॅनेल अशी चॅनेल्सची रांग लावली असती.
हे सर्व होउन "आम्हीच कसे सबसे तेज व सच दिखाने वाले" याचा डांगोरा आख्ख्या जगात पिटला असता ...