बिभत्स
मिपामिपा खेळणार
खुलासा, डिस्क्लेमर, आवाहन, माफी - संपादकांना वाटल्यास धागा उडवू शकतात, मी उडाल्याची तक्रार अथवा निषेध करणार नाही. धागा निखळ करमणुकीसाठी आहे कृपया हलके घ्या. प्रतिसादातुन कवितेत बिन्धास्त भर घाला ही मिपाकरांची कविता आहे. आणि हो, दोघा मित्रांची आगाउ माफी मागतो.
म्यानेजर ब्रेक घेणार | आम्ही मिपामिपा खेळणार||
कोरम फुल्ल जमणार| मज्जा येणार निश्चित||
गल्लीत आमचा नार्या जाणार | मोशणी त्याला हात करणार||
सिद्धहस्त लेखक बनणार | अर्धा साबण संपणार निश्चीत||
हॅकिंग पॅपीलॉन शिकवणार | क्रिप्टीकगुर्जींचा आधार||
सग'ळे शिकवणी लावणार | संगणक क्रॅश निश्चीत||
दिवसामागुन दिवस जाणार| ऋतुचक्र नियमीत बदलणार||
काका आवाहन करणार | जालीय अंक निश्चित||
शिशुवर्ग धागे काढणार | निष्कारण चर्चा पसरणार||
परत ते काढून घेणार| फेड अप होणार निश्चित||
रात्रभर पेंगत बसणार| झोपेचे खोबरे होणार|
पहाटे गुगल करणार | फिफापान अप्डेट निश्चित||
क्रिप्टीकचे गुगली पडणार | पब्लीक झाडावर चढणार||
प्रभुचा उद्धार होणार| फांदी तुटणार निश्चित||
तू तू मैं मैं जोरदार | मस्करीची कुस्करी होणार|
संपादक कार्यान्वित होणार | धागा उडणार निश्चित||
(भांडणशब्द २)
प्रेरणा शुचि यांची सुंदर कविता चांदणशब्द, व नामप्रेरणा ३_१४_अदिती यांची (न कळलेली) भांडणशब्द.
शुचिंच्या शृंगारिक कवितेचं समाजात दिसणाऱ्या झुंडशाहीच्या संदर्भातल्या कवितेत रूपांतर करायला मजा आली.
भांडणशब्द
प्रक्षुब्ध वाणी॥१॥
नग्न प्रतीके
ठायीठायी॥२॥
स्नायुप्रतापी
टवाळभाषा॥३॥
गरम माथा
केविल चडफड॥४॥
शब्द प्रसूती
हीन व हिणकस॥५॥
उसना आवेश
व्यर्थ हि धडपड॥६॥
कोण त्रुटीचे
कांपेन्सेशन?॥७॥
'सही' विडंबना-
सही विटंबन||८||
(आज अचानक गाठ पडे)
सक्काळी सक्काळी ग्रासस्टांझाजचे अफलातून इडंबन, त्यावरच्या मुसुंच्या एक्सपर्ट कमेंट्स आणि मग मिभोकाकांचे नाडी शब्द न आणता करायच्या विडंबनाचे आव्हान असा तीनकलमी मसुदा पुढे असल्यावर देरी किस बात की? ;)
आज अचानक गाठ पडे
भलत्या वेळी भलती खेळी
असता तन भलतीच कडे
बोटे वळता सहज कुठेतरि
एकाएकी गाठ पुढे
नसता मनिमानसी कसा हा
अवचित मेला टाका भिडे
दचकुनि जागत धाव नीजेतच
भरभर कपडेपट उघडे
निसटुन जाई लघुशंका क्षण
सदा बरी ती चेन गडे!
-चतुरंग
फर्निचर
ईंटरनेटच्या जाळ्यात मुली शोधीत असता
चॅटींगच्या सेशनात एकमेका अजमावता
कुणी एक घराविषयी विचारत होती सगळे
म्हणाली जुने फ़र्निचर आहे तुम्ही ठेवले?
म्हटले अग सारे नवीनच घेतले
लग्नाच्या तयारीनेच प्लॅन केले
तशी म्हणाली ओ गॉश! विकत मिळणाऱ्या नव्हे
आधीच्याच जुन्या फ़र्निचरचे विचारते मी आहे
अग आमच्याकडे जुने सामान नाही
जुने ठेवायला येवढी जागाही नाही
तशी म्हणाली हे ऐकून बरे वाटले
आपले मत ह्या बाबतीत बरोबर जुळले
लग्नानंतर जागेची मला गरज भासणार
सांग तू केव्हा आईबाबांना बाहेर पाठवणार?
जुने फ़र्निचर!!! अचानक बाउन्सर तिचा
डोसक्यात पसरला माझ्या तिखटजाळ लोचा
तडकावून म्हटले माझी ट्यूब आत्ता पेटली
आधुनिक मुलींची फ़र्निचरची व्याख्या कळली
तसेच म्हणायचे तर आहे माझ्या कडे
जुने फ़र्निचर, जपतो मी जिवापलीकडे
बाबा, नेहमी लाकडाचा घोडा झालेले
आईने मांडीच्या पा्ळण्यात झोके दिलेले
खांदे बाबांचे हाय बॅक चेअर माझी
लहानपणचा पलंग होता आईची कुशी
मी लग्नाचा झालो तरी त्यांच्या मनात
अजून मला लहानासारखेच जपतात
जुन्या फ़र्निचरची तुला अडचण वाटत असेल
फ़ाईव्ह स्टार वाल्याशीच मोट तुझी जुळेल
नवीन बेडसारखा वापरुन टाकेल तुला मोडीत
जुने फ़र्निचर फ़ेकून तोही घेईल नवे मस्तीत
तिच्या बाऊन्सरला फ़ाऊल ठरवून
मॅच मधूनच तिला टाकले काढून
X( X( X( X( X(
(काढदिवस)
हे रोजचेच झुरणे, सोसण्यात वेळ गेला
फ्लॅट हर विकेंडला शोधण्यात वेळ गेला ||१||
(कोरस)
जमवु किती किती मी, वाचवू किती किती मी
दमडीस दमडी जोडण्यात वेळ गेला ||२||
(कोरस)
प्रेस नसता कपडे , संपला टुथपेस्ट ही
गार पाण्याने अंघोळ करण्यात वेळ गेला ||३||
(कोरस)
अजमावुनी मेसची चपाती चावताना
जबड्यास वात का आला? गिळण्यात वेळ गेला ||४||
(कोरस)
मासिक बजेट बसवताना, हळूच जॉब शोधताना
दहा तारखेलाच मंथ एंड कशी बघण्यात वेळ गेला ||५||
म्हणे काढ दिवस येतात तसे , जमव येक्स्पिरेंस पाठीशी ..
जय जय म्हाराष्ट्र म्हणे टारू बाळा ||शरदिनी||
(ते जीवच वेडे होते)
क्रांती ताईंची सुंदर गझल ते जीवच वेडे होते वाचुन आणि वर्षअखेर जवळ आल्याने नेहमीप्रमाणे अॅप्रायझल आठवलं :< 8} ~X(
असो..
ते जीवच वेडे होते, जुंपुन काम करणारे
टेचात पुढे ते येती, मागे पुढे करणारे
त्यांच्या न्यायाचा डंका, उंदरास मांजर साक्षी!
मागावुन प्रमोशन घेती, काहिच न करणारे
आपलेच आपण गाती पोवाडे मर्दुमकीचे,
म्यनेजर म्हणवती स्वतःला, 'काडि'चे न कळणारे
माहित जरी वरवरचे, आतून रिकामी घोडी,
ते देखावे बघणारे, हे देखावे करणारे!
नेहमीच पैदा करती, मुद्दाम पंक्ती घोळांच्या
अन् पाठ थोपटुन घेती, "आम्हीच घोळ निस्तरणारे!"
सुंदर रिसोर्सच्या नावे ठरवून ठेवती माया,
निश्चिंत, होउनी म्हणती ; मरतील, मरो मरणारे!
इलिनॉईच्या दुगाण्या
किंचित झरणी बोधित करणी
मेलामेली भर्तृहरी
अमर्त्य सेना वसंतसेना
सेनासमथिंग कलहारी
तूच सहारा...
तूच सहारा रखरखीत या
गूगल संकटनेवारी
संतसंतिणी , मुग्ध हिरॉईनी
उपग्रहाचा त्वरितध्वनी
शरीरबांधणी भेटीगाठी
रिचर्ड बेकहॅम चपळ त्रिपाठी
ओहो राहुल
आहा राहुल
ब्रायन लारा दत्ता भट
ब्रायन लारा दत्ता भट
<<<<वळवळ>>>>>
तू आहेस, पण आज तर बुधवारही नाही
मिपास कवितेच दर्शनही नाही
विंडबत होतो च्यायला जरा मी
ठेवणीतली वाक्येही प्रतिसादात नाही
वेड्या, मिपास लड असे वळवळीय सभासदांची
बडवायला आयडी जवळ एकही नाही
खास शैली अजूनही कवितेत आहे
पण आंत,नेहेमीचा टारगेट आयडी नाही
सांग आता धन्या काय करु मी?
"बुधवारविना कवितेची अजून मौज नाही"
सदरहु कविता पुणेरी पेशवे उर्फ धन्याच्या "बुधवारातील कवितांना " समर्पित..
झणझणीत
तुम्ही कोणाकोणाची प्रेरणा ते ठरवत बसा .. तो पर्यंत मी आणि प्रेरणा थोडी मज्जा करून येतो.
- चालू टार्या :)
झणझणीत!
मिपावर वाचताना
तो स्वतःशीच म्हणाला
"गणित!, (गणित!),((गणित)),<अगणित>,[गणित!] , दहाजणीत
की झीरो ?"
लेखण वाचेनासं झालं तेव्हा,
वायु सरला हळुवार फुटलेला एक हुंदका
'ही विडंबणं एकामागुन एक पडलीत तर
एखाद हिणकस चपराक टाकायलाच हवं !!
***
घरून आणलेल्या फराळाचा बकना भरताना
त्यानं हळूच बजाजच्या स्कूटरसारखं कलंडवलं
तेव्हा त्याच्या 'हिडीसते'तही त्याला
एक अंमळ मौज दिसली...
पकाऊ लिहीणं, आणि *गणं
हे एकच की..
हेच उमजून त्याने अजुन एक बकना भरला
हसत विकट पणे मॉनिटर अॅडजस्ट करत
एका (खडुस) नजरेनं
तो हिणकस कुमार वदला ,
"आज काय फराळ जास्त झाला ? जुलाबासारखी विडंबणं पाडायला ?
-- रचना : तिच्याबरोबर उद्या संध्याकाळी ६:००
सुचणा : "एक्सलंट!! जियो टार्या" ह्या आशयाचे प्रतिसाद खपवून घेतले जाणार नाहीत !! दबा धरून काटा काढण्यात येईल ! सुचना संपली!
(खाज)
उबलेले धोतर आणि कपडे डागाळलेले
खाज मला घामोळ्याची, केसही ओलावलेले
बघ ठुसते ते बेंड...., गरमीच्या दु:खाने
ओघळ ते पुवाचे मी सोग्याने झाकोळलेले
कसे काचणे धोत्राचे अवघडजागी वळकटलेले
साम्राज्य हे घामाचे अन नखही वखवखलेले
बल्बफुटणे लाईट नसणे , बिब्बे आणणे शेजार्याचे
बेंडा शेकता कळवळाणारा,बेंड ही पिकुळलेले
असेच खाईन तिखटखाणे, 'बसेन' आधाराने
पिकलेले बेंडसपाट, मीच कधीचे खरवडलेले
आमच्या कवितेची प्रेरणा 'माज'

