परत पेटेल मेणबत्ती
येईल नवा कायदा
वणवा आता मंदिरात पोहोचलाय
पुन्हा हवीय रक्तरंजित क्रांती
षंढ अजून करणार तरी काय
कायद्याच्याच गळ्यात पळवाटेचे पाय
पहिली झाडं तोडली जायची
नंतर रोपांवर आली हि भें_द जमात
आता कळ्यांची खुडणी चालू आहे
बुद्धी गेलीय सर्वांची जणू कोमात
मथळे भरून येतील अजून काही दिवस
असतील रकानेच्या रकाने
लढा चालेल दोन्ही बाजूस
न्याय मिळेल कैक युगाने
तोवर पुन्हा कळ्या खुरडल्या जातील
पुन्हा मेणबत्त्या पेटतील
पुन्हा येईल नवा कायदा
येतील नवीन पळवाटा
षंढ असेच बघत राहतील
ते तसंच असेल चित्र .. तीच कोमेजणारी कळी
असेल तस्साच पडून "हिणकस" तोच
पण दुसरा कुणीतरी " काटा "
सिद्धेश्वर विलास पाटणकर