समोसे आणि व्हीआयपी समोसा
बिहार मध्ये एक म्हण प्रसिद्ध आहे, " जब तक रहेगा समोसे में आलू, बिहार में रहेगा हमारा लालू". ही आहे समोसेची महत्ता. माझ्या आयुष्याचा सुरवातीचा कालखंड जुन्या दिल्लीत गेला. जुन्या दिल्लीत अनेक बाजारांची नावे त्या बाजारात मिळणार्या वस्तूंवर आहे. आम्ही गली तेलियान मधून खाण्याचे तेल विकत घ्यायचो. बतासे वाली गल्लीत साखर, बतासे, गुड, मुरब्बा ते चॉकलेट पर्यन्त गोड पदार्थ मिळायचे. तसेच एका गल्लीचे नाव समोसे वाली गल्ली आहे. या गल्लीत विभिन्न प्रकारचे समोसे मिळतात. त्यात मुगाच्या आणि चण्याच्या डाळीचे समोसे सर्वात जास्त प्रसिद्ध आहेत. हे समोसे काही महीने टिकतात.