छत्रपती शिवाजी महाराज जयंती २०२०

विडंबन

(प्रार्थना!)

गड्डा झब्बू's picture
गड्डा झब्बू in जे न देखे रवी...
13 May 2019 - 6:36 pm

(मनमेघ यांची क्षमा मागून)
स्वामि भेटो वा न भेटो येऊ दे हे मागता
आतला मराठी माणूस माझ्या नित्य राहो जागता ।

लिहितो कुठल्या दिशेला हे न उमगे ज्या क्षणी
एक ही साधी कसोटी नं आठवो लिहिताक्षणी
दुःख वाचका देउनी सुख नं लाभे लेखका।।

हासता यावे मला पाहून मिपाकरांना सुखी
भावना माझी नसो सहवेदनेला पारखी
या विचारांना कृतीही येऊ दे मज जोडता ।।

कोण मी? हा प्रश्न राहो सारखा माझ्या मनी
काय नाते या मिपाशी? हे असावे चिंतनी
आरसा बघतो तसे जग येऊ दे मज पाहता ।।

प्रेरना-प्रार्थना!

विडंबन

स्वामि धागे घेऊन येतात

सोन्या बागलाणकर's picture
सोन्या बागलाणकर in जे न देखे रवी...
8 May 2019 - 11:55 am

स्वामि धागे घेऊन (का) येतात
एकएक हट्टी जिलबी
जिद्दीने पाडून ठेवतात,
प्रत्येक जिलबीमध्ये
अनेक बिनबुडाचे मुद्दे
मनोरंजन म्हणून ठेवून जातात...

स्वामि धागे घेऊन येतात
अलंकारिक वाक्ये भिरकावून
केवळ डोकेदुखी देऊन
मिपाकरांच्या डोक्यात जातात
ट्रोलबाजी करून
मजा बघत अज्ञाताच्या अंधारात
गुडूप होतात......

(दुसऱ्या दिवशी परत) स्वामि धागे घेऊन येतात....

- हे काव्यपुष्प स्वामिचरणी अर्पण

कवितामुक्तकविडंबनव्यक्तिचित्रणसोन्या म्हणेआता मला वाटते भितीमुक्त कविता

[माणसे इंजिनिअर होऊन येतात]

मराठी कथालेखक's picture
मराठी कथालेखक in जे न देखे रवी...
6 May 2019 - 12:13 pm

प्रेरणा
माणसे इंजिनिअर होऊन येतात
एकएक हट्टी सेमिस्टरे
अटीतटीने लढवून ठेवतात,
दोन वर्षांमध्ये
एखादे ईयर डाऊन
विसावा म्हणून ठेवून जातात...

माणसे इंजिनिअर होऊन येतात
ज्ञानबिन भिरकावून
केवळ परीक्षार्थी होऊन
रात्रभर GT मारत बसतात
उजाडताना परत
सिगरेटच्या धूरात
गुडूप होतात......

माणसे इंजिनिअर होऊन येतात...

विडंबनvidamban

(धागा काढण्याची तल्लफ)

नाखु's picture
नाखु in जे न देखे रवी...
3 May 2019 - 4:41 pm

स्वामी चरणी समर्पित
...

डोक्यातील उजेड कमीकमी होऊ लागला
वाचण्यातील साधेपणा संपू लागला
तेव्हा मी धागा काढण्याचा विचार करू लागतोच....

तर्कशुद्धीला ठेंगा, वायफळांचा मळा
आशयाची पातळी इतकी खोल
इतकी खोल....
कि आतला हेतूच दिसेनासा झाला !
धागा काढल्यावर चर्चा होईलच
हे मी तरी कशाच्या आधारावर ठरवले?

डोक्यातील उजेड संपताना, संपू द्यावा
उगाचच हसे होताना, होउ द्यावे
मुळातच धागा बदबदा काढू नये
वाचकांना कष्ट देऊ नयेत .....
इतकेच काय स्वधाग्याचीही वाट लावू नये

हे ठिकाणकविताविडंबनसमाजअदभूतकाहीच्या काही कविताकॉकटेल रेसिपीजिलबीभूछत्रीभयानकहास्यबिभत्सकरुणवीररसअद्भुतरसरौद्ररस

दाराआडचा पप्पू (आणि त्याची मम्मी)

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in जे न देखे रवी...
29 Apr 2019 - 4:20 am

एक पप्पू दाराआडून बघतो आहे बाहेर
आशाळभूत नजरेने.
किती बाहेर ?
मम्मीच्या पदराआडच्याही बाहेर..
ल्युटियन्स झोनच्या पार, वायनाडच्याही पलिकडे...
समुद्रापारच्या वाटिकनातल्या परमेश्वराच्या सर्वोच्च प्रतिनिधीकडे,
हिरव्या झेंडयाच्या देशातल्या त्या हिमरानाकडे ...
देतील का ते मला सिंहासन मिळवून ???

पण सिंहासनावर चौकीदार बसलेला आहे.
चुस्त, मस्त, व्यस्त ....
चतुर, धाडसी, जबरदस्त ...
नवनव्या योजना आखत, शत्रूच्या उरात धडकी भरवत.

संस्कृतीइतिहासबालकथाबालगीतविडंबनविनोदसमाजजीवनमानकालवणव्यक्तिचित्रणराजकारणमौजमजाआता मला वाटते भितीइशाराकालगंगाकाहीच्या काही कविताचाटूगिरीजिलबीबालसाहित्यहट्टकरुण

माणसे मित्र बनून येतात...... ( प्रेरणा :: माणसे कविता बनून येतात...)

खिलजि's picture
खिलजि in जे न देखे रवी...
26 Apr 2019 - 12:14 pm

माणसे मित्र बनून येतात
सदैव गाती मैत्रीचे गोडवे
तोंडात जणू साखर ठेवतात,
काही महिन्यांमध्येच
एक जीवघेणी कळ देऊन
पाठीत वार करून जातात ...

माणसे मित्र बनून येतात
मनातलं बाहेर काढून
केवळ अर्थाचा अनर्थ घेऊन
दिवसभर कानाशी बसतात
आपली लागताना खोलून
मैत्रीच्या अंधारात
पुन्हा गुडूप होतात......

माणसे मित्र बनून येतात...

हे ठिकाणविडंबन

बियर

सोन्या बागलाणकर's picture
सोन्या बागलाणकर in जे न देखे रवी...
23 Apr 2019 - 4:28 am

मूळ प्रेरणा: पाणी

इतक्या बियरचे पेग बनवताना
विचार करायचा भावा,

शरीराला इतके झोके देताना
उसंत घ्यायची भावा....

उसळून पुन्हा फेसाळते बियर
बर्फ द्यायचा भावा...

दोन पाय पुरत नाहीत
बॉडीचा भार पेलताना...

भावा, आता बार बंद करा
अन् पिण्यातून मुक्ती द्या....

कविताविडंबनआरोग्यथंड पेयकविता माझीमुक्त कविताविडम्बनहास्य

(तू मतदार माझा)

नाखु's picture
नाखु in जे न देखे रवी...
21 Apr 2019 - 7:29 am

प्रेर्ना - विळखा पाहू

तू मतदार माझा
भोट, भोंगळ अजीजी
तुझे मत मागण्या तुलाच नादी लावणारा
मस्तवाल नेता मी ....

घेऊन जमेस तुला
निव्वळ उगी तुंबडी भरावी
बोभाटा करावा मी एव्हढा
की लाभावी मज(समोरची) वाटणी

सर्व अडेल,पडेल,चढेल, संधिसाधू,भूछत्री उमेदवारांना समर्पित.

वाचकांचीच पत्रेवाला नाखु बिनसुपारीवाला

नाट्यमुक्तकविडंबनसमाजकाहीच्या काही कविताजिलबीफ्री स्टाइलभूछत्रीरतीबाच्या कवितारोमांचकारी.वाङ्मयशेतीशेंगोळेहट्ट

तू ट्रोल माझा

चामुंडराय's picture
चामुंडराय in जे न देखे रवी...
19 Apr 2019 - 7:21 am

वरिज्नल प्रेर्ना क्र. १ https://www.misalpav.com/node/44410

प्रेर्ना क्र. २ https://www.misalpav.com/node/44413

प्रेर्ना क्र. ३ https://www.misalpav.com/node/44417

तू ट्रोल माझा
गुप्त, मास्क्ड, चोम्बडा
पिंक टाकण्या मज मागे उडणारा
उठवळ टोळ तू ....

विडंबन

तू हमाल माझा

खिलजि's picture
खिलजि in जे न देखे रवी...
16 Apr 2019 - 5:42 pm

तू हमाल माझा

शांत , नेभळट , गरीब, बिचारा (?)

तुझी मारण्या , तुज मागे धावणारी

चंडिका , महामाया , तुझी कडक लक्ष्मी ....

येऊन कामावर तुझ्या

चोरून दुरून पाहावे

पकडावे रंगेहाथ तुजला

कि लाजावी मजसमोर बॉन्डपत्नी ...

===============================

तुझी आणि फक्त तुझीच

सातजन्म मारणारी चि सौ का ?

हे ठिकाणविडंबन