प्रतिशब्द

मजेशीर शब्द

आज काल भाषाशुद्धी-शुद्धलेखन या आणि अशा बर्‍याच विषयांवर बराच काथ्याकुट करुन झाला आहे.
शब्दकोश हा धनकोशापेक्षा वेगळाच आहे! तो वापरल्याने मोठा होतो आणि नुसताच ठेवून दिला तर त्याचा र्‍ह्सा होतो, हाच धागा पकडून ऐक नविन चर्चा पुढे चालू करु.

मिपावर फक्त पश्चिम महाराष्ट्रातले नसून जगातल्या विविध भागातले सदस्य आहेत / गेलेत. चला तर मग आपला शब्द संग्रह वाढवूया. पण अट ऐकच वाद नघालता नव नविन आणि गंमतशीर शब्द सांगायचे आपल्या प्रांतातले
( तात्या अशी चर्च्या यापुर्वी झाली असल्यास लीखकाच्या संमती शिवाय विषय काढुन टाका)

सुरवात मी करतो
शासकीय कामानिमीत्य काही महिन्यांपुर्वी विधान-सौधा (बेंगळूरु) येथे जाण्याचा (जेवण्याचाच म्हणाना) योग आला. बरीच वेळ चर्चा झाल्या नंतर तत्कालीन मुख्यमंत्री कुमारस्वामी महोदय आले, तिथेच आमच्या चर्चांना पुर्णविराम मिळाला आणि त्यांच्या कन्नड भाषणाला सुरवात झाली (त्यांना ईंग्रजी येत नसावे बहुतेक)
काय बोलले राव ! अधी आदर आणि मग हसु यायला लागलं मला. शब्दच कळेनात मला आणि मी ते मराठी शब्दांना जुळवले. अगदी शाळेत करतो ना तसचं जोड्या जुळवा / गाळलेल्या जागा भरा ईत्यादी.
पण आता अर्थ लागलेत त्यांचे ते असे-

गळू - लोकहो / जनहो (आदरार्थी बहूवचनी संबोधन) ऊदा : यलार सल्लागार गळू - सर्व सल्लागार लोक
हागु - आणि / तसेच (ऊभयान्वयी शब्द)
भंगार - सोने
कुंडी - ढुंगण
सोप्पु - पालेभाजी
मेले / मेलगडे - वर , केळे / केळगडे - खाली
केळी - विचारा
हेळी - सांगा
हळ्ळी - गाव, पाळ्या - भाग (देवन हळ्ळी, कद्रेनहळ्ळी, मरीयप्पन पाळ्या, कळासी पाळ्या)

(किंमत)

कवी अनिरुद्ध अभ्यंकर यांची "किंमत" ही सुंदर गझल धरुन केलेली हि रचना (विडंबन म्हणा हव तरं)

कारणे होतीचं तशी लिहायला
प्रतिक्रीया होत्याच तशा न पटलेल्या

प्रश्न हा साधाच होता पण तरी
लागला तो काहीतरीच कारणे द्यायला

मी जरी आता सुखी दिसतो तुला
खूप किंमत लागली मोजायला (हे मात्रं खरे)

काळजी त्यांची नका करू एव्हढिही
की काळजी लागेल ही खटकायला

बंद कधीही नाही केले मी उमलायचे
आणि तो आला नेहमीप्रमाणे फुले तोडायला

कॉ. स्वतःला म्हटलेस तू पहिजे तसे
लागलास् तु वाट्टेल तसे लिहायला

भाव नाही तुला थोडासाही दिला
काजवे लागले दिवसाचं चमकायला

माणसे येतील नक्कीचं रस्त्यावरी
जेव्हा भूक ही लागेल बोलायला

लोकल मराठी भाषा(शब्द-प्रतिशब्द-वाक्यप्रकार)

आख्खा 'इंडिया' मधे 'वर्ल्डफेमस' असलेल्या 'मुम्बईय्या हिंदी' प्रमाणेच मराठीतसुद्धा अशा प्रकारचे गमतीशीर शब्द व वाक्यप्रकार आहेत जे ठराविक शहरात वा गावात वापरले जातात.आपण अशाच प्रकारचे शब्द इथं इतर गावकर्‍यांनाही सांगावेत,जेणेकरुन आपले शब्द-वाक्यप्रकार ही आख्ख्या मिपात 'वर्ल्डफेमस' होतील.

आमच्या पुण्यात आम्ही वापरत असलेले काही शब्दः
गोड आमटी: बोलीभाषेतही लेखी मराठी,जड शब्दांचा वापर करणारे 'महाशय'(शक्यतो 'सदाशिव पेठेतला')
अनपरवडेबलः न परवडणारे
अनझेपेबलः न झेपणारे
मसशाणा: अतिशहाणा
नव्वदने कल्टी खाणे: लगेच सटकणे
निगाहे बघ: निघायचे बघ
केशवः नाकासमोर चालणारी व्यक्ती
होमीओपॅथीचा पेशंटः होमोसेक्शूअल
चंद्रावर असणे,टांगा पल्टी-घोडे फरारः पिऊन टुन्न झालेला
घे मिटवून नायतर दे पेटवूनः नुसताच आवाज करुन भांडणार्‍यांना उद्देशून,'हात' न लावता भांडणार्‍यांसाठी

असे आणखी बरेच शब्द आहेत.तुर्तास एवढेच.
(बोलीभाषेवर प्रेम करणारा) -इनोबा

शुद्धलेखन नियम,काय बदल केले पाहिजेत ?

मराठी शुद्धलेखनाची नवी नियमावली तयार करण्याचा निर्णय अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने घेतला आहे. त्यासाठी त्यांनी एक कृती आराखडा तयारही केल्याची बातमी वाचनात आली. १९६१ ला महामंडळाने शुद्धलेखनाची नियमावली तयार केली. सर्व नियम संस्कृत भाषेला आधार मानूनच करण्यात आले होते. आता आधुनिक काळात मराठी भाषेचा शुद्धपणा आणि मराठी भाषेच्या प्रगतीसाठी नवीन शुद्धलेखनाची नियमावलीची गरज वाटत असावी.संस्कृत भाषेतून आलेल्या शब्दांचा फेरविचार, इंग्रजी आणि हिंदी शब्दांचा अभ्यास आदी प्रमुख सूत्रे डोळ्यासमोर ठेवून नियमावली तयार करण्याचा विचार महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी बोलून दाखविला आहे. त्यांच्या आराखड्याप्रमाणे राज्याच्या विविध भागातील भाषातज्ञांची एक बैठकही झाली आहे. आता दुस-या टप्प्यात अभ्यासक, वाचक, तज्ञ, मुद्रितशोधक, यांच्याकडून सूचना मागविण्यात येत आहेत. -हस्व,दीर्घ, शब्दांसाठी कोणते नियम असावेत.लेखन उच्चारानुसार असावे का ? दंतमूलीय व्यंजनांसाठी एकच चिन्हे वापरावे का ? कोणत्या उच्चारासाठी कोणती चिन्ह असावीत; तसेच देवनागरी लिपीत काही बदल करावे का, याबद्दल सूचना अपेक्षित आहेत. त्यावर महामंडळाच्या बैठकांमध्ये सविस्तर चर्चा होईल. शिवाय मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद येथे मराठी शिक्षकांसाठी कार्यशाळा होणार आहेत. त्यानंतर नियमावली अंतिम करुन शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. तेव्हा शुद्धलेखनाबद्दल काही उत्तम चर्चा झाली तर सदरील चर्चेची प्रिन्ट काढून अध्यक्षापर्यंत पोहचविण्याचा आमचा मानस आहे.

सध्याचे शुद्धलेखनाचे नियम इथे पाहावेत.

सूचना:- वरील लेखनातील शुद्धलेखनाच्या चुका काढल्यास हरकत नाही, चुका व्य.नि. ने किंवा खरडीत लिहावे, म्हणजे आपल्या सूचनेनुसार त्यात बदल केले जातील.

हस्ताक्षरावरुन स्वभाव

तात्या रोशनी -४ आले

आता "हस्ताक्षरावरुन स्वभाव" याचे काय?

आपला
एक साधारण सदस्य!

रोशनी ४

तात्या रोशनी ४ भाग प्रकाशित केल्याबद्दल धन्यवाद!

तात्या रौशनी.. ..... चे काय?

तात्या रौशनी.. ..... चे काय?

तात्या रौशनी.. ..... चे काय?

तात्या रौशनी.. ..... चे काय?

तात्या रौशनी.. ..... चे काय?

तात्या रौशनी.. ..... चे काय?

अतिदीर्घ बोधकथा (संपूर्ण काल्पनिक)

ही कथा खरे तर नेहमीच्या स्टँडर्डप्रमाणे लघुकथा आहे. मात्र काही आधुनिक कथांशी तुलना करता तिला कादंबरी किंवा अतिदीर्घ कथा म्हणणे योग्य ठरेल.

शिवाय नारदमुनी वगळता सर्व कथापात्रे (म्हणजे उरलेले एक) काल्पनिक.

नेहमीप्रमाणे पगाराचा करमुक्त भाग असणारा लीव्ह ट्रॅव्हल अलाउंस क्लेम करण्यासाठी रजा घेऊन नारदमुनी पृथ्वीवर आले (अन्यथा त्या पैशावर त्यांना कर भरावा लागला असता.) मंडळी करांविषयी नंतर कधीतरी. मिसळपाववरच!

पृथ्वीवर त्यांना एक गोंडस डुक्कर दिसले. काय त्याचे सौंदर्य वर्णावे महाराजा. पण डुकरांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून त्याला आपण वराहगंधर्व म्हणूयात. कसें?

नारदमुनी म्हणाले, "नारायण, नारायण! हे वराहकुलभूषणा, इथे पृथ्वीवर काय करतोयेस?"
वराहगंधर्व: "हँ हँ, काही नाही, आपले नेहमीचेच"
नारदमुनी: "अरे पण तुझी जागा तर स्वर्गात आहे."
वराहगंधर्व: "का? स्वर्गात काय आहे?"
नारदमुनी: "अरे स्वर्गात अमृतफळे लागणारी झाडे, दुधातुपाच्या नद्या, मधूर कूजन करणारे पक्षी आहेत."
वराहगंधर्वः "मग?"
नारदमुनी: "मग तू स्वर्गात चल. यू डिझर्व बेटर."
वराहगंधर्वः "पण तिथे रस्त्याच्या कडेने वाहणारे सांडपाणी, ताजी स्वच्छ घाण मिळेल ना?"
नारदमुनी: "अरे वेड्या, स्वर्गात हे कुठे मिळणार? आणि तुला ते हवे तरी कशाला?"
वराहगंधर्वः "छे छे, मग मी स्वर्गात येऊन काय करू. मला याच गोष्टी अतिप्रिय आहेत. मला स्वर्गात यायचे नाही. लई बिल झाले. मारा डबल आणि निघा."

असो.

आपला,
(स्वर्गवासी नारदमुनी) आजानुकर्ण