प्रोफाइलवरती बाई..!!
(टीप: अनाहितांची साष्टांग माफी मागून)
प्रोफाइलवरती बाई
अशि काही दिसते धासू
तो फोटो पाहुन येती
झुंडीने चावट वासू
कुणी भोजनपृच्छा करतो
कुणी थेट घालतो डोळा
बाईच्या भवती जमती
भुंगे सतराशे सोळा
बाईचे आशिक मुबलक
कुणि पुतण्या तर कुणि काका
रंगेल एकसे एक
बाईस मारिती हाका
मेसेज पटापट येती
गालात हासते बाई
पाहता गड्यांची गर्दी
तिज हसू अनावर होई
ती विचार करुनी लिहिते,
पुसते, -अन पुन्हा लिहिते
ते 'टायपिंग..' दिसताच
वासूंचे भान हरपते