✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सांग कधी कळणार तुला (विडंबन)

O — OBAMA80, Sun, 05/16/2021 - 18:01
सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला? रंग कधी दिसणार तुला लाजणाऱ्या फुलातला? सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला? /१/ गंधित नाजुक पानांमधुनी, सूर छेडिते अलगद कुणी अर्थ कधी कळणार तुला धुंदणाऱ्या सुरातला सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला?/२/ निळसर चंचल पाण्यावरती, लयीत एका तरंग उठती छंद कधी कळणार तुला नाचणाऱ्या जलातला सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला?/३/ जुळता डोळे एक वेळी, धीट पापणी झुकली खाली खेळ कधी कळणार तुला दोन वेड्या जीवातला सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला? /४/ *********************************

विडंबन

सांग कधी घटणार मला घेर तुझ्या कमरेचा? सैल कधी बसणार तुला सूट आपल्या लग्नातला? सांग कधी घटणार मला घेर तुझ्या कमरेचा?.../१/ रंगीत पट्टेरी शर्टामधुनी, पोट सांडते सगळीकडूनी ताण कधी कळणार तुला कमरेवरच्या पट्ट्याचा सांग कधी घटणार मला घेर तुझ्या कमरेचा?.../२/ कमनीय चंचल मैत्रिणी माझ्या, होऊन एक चिडवती तुजला अर्थ कधी कळणार तुला बोचर्‍या टोमण्यातला सांग कधी घटणार मला घेर तुझ्या कमरेचा?.../३/ उभे राहता काट्यावरती, काटा धावतो सत्वर वरती धोका कधी कळणार तुला वाढणार्‍या वजनातला? सांग कधी घटणार मला घेर तुझ्या कमरेचा?.../४/

प्रतिक्रिया द्या
1446 वाचन

💬 प्रतिसाद

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा