आत्ताच बातम्या बघायला टीव्ही लावला तेवढ्यात ब्रेकिंग न्यूज आलीच, पिवळ्या बुरशीचा पहिला पेशंट सापडला. आता बुरशी पण मॅचिंग मधेच यायला लागल्या. काळी झाली पांढरी झाली आज पिवळी सापडली आणि एक 4 नवीन रंगात आली म्हणजे चांगला सप्तरंगी घोडा लागतोय माणसाला.
ती काळी बुरशी डोळ्यावर मेंदूवर परिणाम करत्या पांढरी बाकीच 3-4 अवयव धरत्या आधीच कोरोना मूळ लोकांची गांड फाटल्या. सांगायला एक अवयव सुरक्षित नाही.निस्ता गोळीबार झालाय बघा.
चॅनेल वाल्यांची तर पार स्पर्धा सुरू असत्या तू मोठा साप सोडतो का मी मोठा साप सोडतो. आर बाबा तुमचा trp किती लोक चॅनेल बघत्यात त्याच्यावर आहे ,तुमचं चॅनेल बघून किती लोकांची फाटली यावर नाही.आरे जरा कोरोनाच्या बातम्या दाखवायचं कमी करा आणि माणसाला कायतरी positive दाखवून या संकटात कसा धीर देता येईल ते बघा.
कोरोना आज फॉर्मात असला तरी आज ना उद्या जाईल. गेलेली माणस आपण परत आणू शकत नाही पण जी लोक माग राहिली ती आता आर्थिक संकटामुळ फासाच्या जवळ चालल्यात त्यांना थांबवायचं संकट लई मोठ्ठ आहे. मीडिया न्युज चॅनेल आज खूप मोठी भूमिका घेऊ शकतात ती म्हणजे माणसे उभारण्याची .
मीडिया ने सर्व घटकांचा विचार करून त्यांना मार्गदर्शक आदर्श शेतकऱ्यांच्या, छोट्या उद्योजकांच्या मुलाखती, त्यांनी कोरोना काळात केलेलं नियोजन याबद्दल मार्गदर्शन देता येईल का ह्याचा प्रयत्न करायला पाहिजे. एखादी गृहिणी सुद्धा चहाच्या भज्यांच्या टपऱ्या चालवून , पापड कुरडया विकून संसार पेलू शकते. आता कोरोना काळात डबा पुरवणाऱ्या महिलांनी दाखवून दिलं की कुठलाही संकट माणसाच्या जिद्दीपुढं टिकत नाही . अश्या महिलांना लघु उद्योग स्थापन करायला सरकारच्या योजनांची ओळख मीडिया ने करून द्यायला हवी. शेतकऱ्याला असणाऱ्या जोडधंद्याची माहिती , ज्ञानेश्वर बोडके यांसारख्या शेतकऱ्यांच्या आदर्श मॉडेल ची त्यात सामील होण्यासंबंधी माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला मदत करायला पाहीजे.
अशी अनेक क्षेत्र आहेत जिथं आता गोंधळच वातावरण आहे ,जिथं लोकांना एक योग्य वाट दाखवणं गरजेचं आहे. अनेक संकट एक मागून एक येत असताना जर आपण लोकांना मार्गदर्शन आणि आर्थिक मदतीच्या पर्यंत पोहोचवु शकलो तर आपण कोरोना आणि त्यानंतर येणाऱ्या आर्थिक खाईत जाणाऱ्या आपल्या समाजाला रोखु शकतो.
प्रतिक्रिया
26 May 2021 - 7:39 am | चित्रगुप्त
लेखाच्या उत्तरार्धात सांगितलेल्या गोष्टींची दखल मिडियाने तातडीने घेण्याची खरोखर गरज आहे.
27 May 2021 - 10:32 am | chittmanthan.OOO
प्रतिक्रियेसाठी धन्यवाद