user

नृत्य

गणपती बाप्पा मोरया

गणपती बाप्पा मोरया

मंडळी आपला नेहमीचाच हिरो आन हिरवीन आहे. या हिरोच्या गल्लीत सार्वजनीक गणपती बसतो आहे. हिरो (चांगल्या स्वभावाचा) भाई आहे अन टपोरी पोरे घेवून फिरतो. मोठ्या पटांगणात तयारी केली आहे अन गल्लीतली सगळी पोरे घेवून हिरो नाचत आहे.
(या सिन नंतर लगेचच एक फायटिंग चा सिन असल्याने साईड हिरो पण या गाण्यात आहे.)
चाल: नेहमीचीच

(भक्तिरसपुर्ण गाण्यास अशा फालतू सिन मध्ये टाकल्याने गणपती बाप्पा मला माफ कर.)

हिरो नं १ :
चला रे चला नाचू या गावू या
बोला रे बोला गणपती बाप्पा मोरया ||धृ||

हिरो नं १ :
ढोल ताशे हे असे जोरात वाजती
रंगात येवूनी पोरे ही नाचती
पुढे होवूनी सारे एका ओळीत या रे
मखरात ठेवायला मुर्ती उचला रे
आरास केली अन आता मंडप सजवू या ||१||

कोरस:
गणपती बाप्पा मोरया
गणपती बाप्पा मोरया

साईड हिरो:
आरती आता करूया अन देवाला आळवू या
प्रसाद खावू या अन सार्‍या गल्लीमध्ये वाटूया
नाचात दंग आता सारे झाले बेधुंद
गुलाल उधळू अंगावर घेवू या रंग
श्रींचे पुजन करून भक्तिरसात सारे न्हावूया ||२||

कोरस:
गणपती बाप्पा मोरया
गणपती बाप्पा मोरया

हिरवीन:
गणपती असे ही विद्येची देवता
भजता मनोभावे पावे तो सर्वथा
आनंदी जग झाले गणपती येता
कल्याण होई तो आशिर्वाद देता
पुढल्या वर्षी बाप्पा लवकर आणूया ||३||

कोरस:
गणपती बाप्पा मोरया
गणपती बाप्पा मोरया

कोरस:
चला रे चला नाचू या गावू या
बोला रे बोला गणपती बाप्पा मोरया

नाशिक ढोल:
धडदंग...धडदंग...धडदंग...दंग

- पाषाणभेद (दगडफोड्या)
१९/०५/२०१०

चाराणे कमी !!

णमस्कार्स लोक्स ,

अंतिम वाचक वाचन करार (End Reader Reading Agreement) :-
खालील लेखात देवादिकांचे संदर्भ आहेत , अर्थात आम्ही नास्तिक असल्याने ती पात्रे आम्हाला इतर कोणत्याही कथेतल्या पात्रांप्रमाणे आहेत. तेंव्हा आस्तिक लोकांच्या भावना "उगाचंच" दुखावल्या जाण्याचा संभव आहे , एक तर त्यांनी "म्यॅच्युरिटीने" काम घ्यावे , किंवा आत्ताच "स्वगृह" वर क्लिक करावे. बाकीच्यांनी लुफ्त लुटावा.

"चाराणे कमी" एवढ्या करतांच , की पात्रांनी जर 'चाराणे" वापरले असते , तर बरीच हिंसा/नुकसान टाळता आलं असतं , तसंच त्यांचं वागणं "सेंसिबल" होऊ शकलं असतं

आमचा मित्र परिवार एकं तर डॉक्टर नाही तर इंजिनियर ह्यातलांच , त्यामुळे सगळे कसे हाडाचे नास्तिक. पण आमचे पालक डबल हाडाचे आस्तिक. कोणाच्या तरी घरी , कधीतरी असाच देवदेव विषय चालु होता , त्या रात्री आम्ही "नाईटवॉक" ला गेलो .. तेंव्हा सुचलेले काही विचार , किंवा ग्रंथपुराणातले बग्ज म्हणा नां ? तर ह्या बज्ग वर जेंव्हा आम्ही विचार मंथन केलं , टेक्निकल अ‍ॅनॅलिसीस करण्याचा प्रयत्न केला , तेंव्हा आम्हाला गडबडाट लोळण्याशिवाय काहीही रिझल्ट्स हाती लागले नाहीत .

पौराणिक संदर्भ : लक्ष्मणाने "लक्ष्मणरेखा" आखुन स्वतःचं कर्तव्य चोख पार पाडलं होतं , पण सितेने लाईन क्रॉस केल्याने रावण तिला पळवुन घेऊन जाऊ शकला .

अ‍ॅनॅलिसिस : लक्ष्मणाला भुमितीच्या क्लास ला जाण्याची सक्त गरज होती. कारण भाऊ ने एक लाईन मारली होती, जिला "लक्ष्मणरेषा" असे म्हणतात. आता लक्ष्मणरेषेची लांबी जास्तित जास्त किती असेल ? तर उंबरठ्या एवढी , चला मोघम माप घेऊन त्याच्या डबल गृहीत धरू , तरीही रावण (ज्याला बुद्धीचं आणि शक्तीचं वरदाण होतं , असा पौराणिक दावा आहे) एवढा मुर्ख होता , की त्याला उगीचंच वेषांतर करुन स्वतःच्या पावरचं असं पाण्चट प्रदर्शण करण्याची गरज नव्हती. तो त्या लाईणच्या दुसर्‍या बाजुनं येऊ शकला असता, गेलाबाजार मागल्या दारानं किंवा खिडकीतुन आत येणं रावणासारख्याला सहज शक्य होतं , लक्ष्मणाने काही फुटांची लाईन मारली होती , पृथ्वीला "लक्ष्मणपरिघ" नव्हता मारला . तरीही रावणाने वेषांतर पॉवर वापरली . आता सितेच्या बुद्धीचं कौतुक मी काय करावं ? लक्ष्मणाने रिक्वायरमेंट अ‍ॅनॅलिसीस ठिक केलं नव्हतं , त्याने 'फक्त रावण किंवा राक्षस" ह्या इनपुट साठी एक्सेप्शन हँडल केलं असतं तर चालु शकलं असतं , त्याने कोडींग मधे टाईमपास केला , आणि फक्त सितेला रेषा क्रॉस करणे अलाव्ह केलं , गेला बाजार त्याने वर्तुळ जरी आखला असता , आणि पुर्ण पर्णकुटी त्यात कव्हर केली असती तर ठिक होतं.

समरी : अलिखीत नियमांचं त्या काळी पालन केल्या जात होतं (कोणालाही स्वतःचं एक्स्ट्रा डोकं चालवण्याची मुभा नव्हती) , जर लक्ष्मणाने सिता रक्षणासाठी रेषा मारली होती , तर सिता पळवायची तर त्या लाईनला क्रॉस करुनंच , एवढी प्रामाणिकता पाळणारा रावण , नैतिकते मधे का मार खाऊन गेला ?

पौराणिक संदर्भ : जेंव्हा रामाचे दुत सिता शोधार्थ चहुदिशेला गेले , त्यात हनुमानाला सितेचा शोध लागला , सिता बहुतेक हनुमानाला ओळखत नव्हती , म्हणुन श्रीरामांचं एखादं सिग्नेचर टोकण असणं जरुरी होतं त्यासाठी तो रामनिशानी घ्यायला परत आला. रामाने सितेला स्वतः मुक्त करण्याची इच्छा दाखवली आणि हनुमानाला तिला घेऊन येण्यास मज्जाव केला. मुक्त केल्यावरही सितेला अग्निपरिक्षा अर्थात प्यॉरिटी टेस्ट द्यावी लागली.

अ‍ॅनॅलिसीस : इतर वेळी संयमाचं काम दाखवणारा , युद्ध टाळावं म्हणुन प्रयत्न करणारे श्रीराम , इथे हनुमानाकरवी (कडवी नव्हे) सितेला सोडवु शकला नसता काय ? हजारो लाखो (सर्व आकडे ऐकिव माहिती च्या आधारे) वानर्स आणि राक्षस , ज्यांचा ह्या युद्धाशी काही एक संबंध नव्हता ,त्या णिष्पाप जिवांना स्वतःच्या स्वार्थास वेठीस धरलं होतं. (युद्धात मेलेल्यांना मुक्ति मिळते, हा हस्यास्पद प्रतिवाद आहे ) येथुन श्रीरामांनी जो स्वार्थ महत्वाचा असण्याचं उदाहरण दाखवलं आहेत , त्याला आता पॉझिटिव्ह फॅक्टर म्हणुन इन्क्लुड केलेलं नाही . रामानं सितेला शेवटी भल्या मोठ्या नुकसानानंतर सोडवलं सुद्धा , पण त्यातही त्याने स्वतः सितेवर विष्वास दाखवलेला नाही, ह्यावरुनंच बायको वर अविश्वास दाखवण्याची परंपरा रुढ झाली असावी.

समरी : रामाने सरळ घास खाण्या ऐवजी , करोडोंचं आयुष्य पणाला लावण्याचा निर्णय घेतला , तरीही राम आज देव कसा ?

पौराणिक संदर्भ : आकाशवाणी १०१.० मेगाहर्ड्झ वर "मथुरा डेअरी सकाळच्या बातम्या" मधे सांगितलेल्या वृत्तानुसार देवकीचा आठवा पुत्र कंसाचा वध करणार होता.

अ‍ॅनॅलिसीस : कंसा एवढा सर्व बुद्धिमाण प्राणी मी आज तागायत कोणत्याही सिरीयल मधे पाहिला नव्हता. पण त्याआधी, ( कंसाचं आपल्या बहिणी बरोबर अतिशय छाण होतं , पण आकाशवाणी मुळे तो त्या पोरांचा दुष्मण झाला होता. असो, विधाताच स्क्रिप्ट रायटर असल्यावर तो वाटेल ते लिहु शकतो.) आकाशवाणी झाली तेंव्हा देवकी-वसुदेवाचा नुकताच विवाह झाला होता. आता ह्या हुषार कंसाने काय करावं ? ह्याला ही सरळ घास खायची आवड नसावी. आकाशवाणीमधली कंडीशण ऐकुनही पठ्ठ्यानं देवकी-वसुदेवाला "एकत्र" राहु दिलं लोकंहो , किती हुशारपणा ? देवकी आणि वसुदेवाचंही कौतुक करावं तेवढं थोडंच ... जेल मधल्या वातावरणात सुद्धा त्यांच्या इच्छा जागृक होत्या , ह्याचं सुद्धा आम्हाला आश्चर्यं वाटुन गेलं . जेलंवर चोविस तास पहारा होता, आणि सैनिक त्यांना ऑल टाईम पाहु शकत होते , तरीही त्यांची हिंम्मत होऊ शकली. असो. ज्याची त्याची आवड,ज्याची त्याची सवड.
१.कंसाला दोघांना वेगवेगळ्या सेल्स मधे ठेवता येउ शकलं असतं का ?
२. आठ पोरांच्या खुणाचं पाप घेण्यापेक्षा एकट्या देवकीचा खुण सोयिस्कर ठरु शकला असता का ? आणि उगाच आठ वर्ष स्वतःच्या डोक्याची आणि झोपेची मंडई तो थोपवु शकला असता का ?
३. फॅमिली प्लानिंग तेंव्हा होतं की नाही ? हा संदिग्ध मुद्दा असल्याने कंसाला ह्या उपायाबद्दल बेनेफिट ऑफ डाऊट दिला आहे.

समरी : ह्यातुन निष्कर्ष काढणे आमच्या बुद्धीपलिकडे आहे. कंसंच जाणो तो एवढा हुशारपणे का वागला.

पौराणिक संदर्भ : कौरवांनी पांडवांवर अनेकदा कुरघोड्या केल्या , त्यांना पाण्यात पाहिलं , छल कपट वगैर केलं , आणि म्हणुन पांडवांकडुन ते धर्मयुद्धात हारले. आणि अनेक चमत्कार्स.

अ‍ॅनॅलिसिस : महाभारत हा पुर्ण ड्रामा होता, आणि त्यातली प्रत्येक पात्रे व्यासमुनींनी लिहीलेल्या स्क्रिप्ट प्रमाणे वागत-बोलत होती. इतर वेळी संयमाचा सल्ला देणारा श्रीकृष्ण , युद्धात मात्र एकदम पलटुन गेला , पांडवांना प्रत्येक वेळेस प्रत्येक मोहोरा टिपतांना छल - आणि कपटाचाच सहारा घ्यावा लागला . आता कृष्णाचेच नियम वेळेनुसार बदलल्याचं सत्य समोर येतं तेंव्हा अशा वेळेनुसार (कारण नसतांना) बदलणार्‍या श्रीकृष्णाला देवाचा दर्जा का ? जर आधीपासुन चालणार्‍या कपटांना मुकाट्याने सहन केलं नसतं आणि तेंव्हा उगाच *डु धोरण स्विकारलं नसतं तर महाभारत वाचवता येऊ शकलं असतं का ? पर्यायानं पुण्हा अनेक निरपराध माणसं , घोडे , हत्ती वाचवता आली असती का ? जुगार (पक्षी: द्युत) खेळल्याने माणुस कसा देशोधडीला लागतो , हा एवढा साधा सिद्धांत मांडण्यासाठी एवढा मोठा ड्रामा घडवुन आणनं पटत नाही. बाणांचं इंटेग्रेशन (म्हणजे एकाचे शेकडो बाण होणे) फिजीक्स च्या कोणत्याही नियमात नं बसणारे आहे (तशा एन गोष्टी आहेत हा भाग अलहिदा).

समरी : महाभारत ही एका सिरीयल ची स्क्रिप्ट आहे , सगळं कसं पुर्व नियोजीत आहे , आणि त्यात मुर्खपणाचा कळस गाठलेला आहे.

अजुन काही मजेशिर आणि रोचक गोष्टी मी ग्रंथ , मालिका , इत्यादी माध्यमांतुन आपण पाहातो.
पुराणातली (विशिष्ठ) लोकं कधीही कुठेही (ढिष्ष करुन) प्रकट/गायब होत होती. मालिकांमधे दाखवल्यानुसार हे लोक , दरवाज्यात प्रकट होत , आणि मग आत येत. उदा. कोणत्यातरी राजाचा दरबार भरलाय , नारदमुणी बरोबर दरवाजात (ढिष्ष करुन) प्रकट होतात. आहो चालायचा त्रास घ्यायचं काय बरं कारण ? व्हा की कुठेही प्रकत (लोकांची अंतःपुरं सोडुन),
इंद्र हा त्या काळचा सर्वांत पिडीत देव/व्यक्ति होता , त्यानं कधीच स्वर्गावर एकाधिकार शाही दाखवली नाही , सदा न कदा बिचारा ह्याच विवंचनेत , उद्या मी स्वर्गात असेन की नसेन ? आणि काही झालं की , उठले सगळे देव न निघाले (ज्याचा कार्यक्रम असेल त्या) मोठ्या देवांकडे , म्हण्जे जर ओम नम:शिवाय सुरु असेल तर नेहमी शंकराचा सहारा घेतला जातो , विष्णुचा असेल तर विष्णुचाच धावा लेका जातो , गेलाबाजार "जै गंगा मैय्या" चालु होतं तेंव्हा इंद्राने त्या बिचार्‍या गरिब गंगेकडेही ३% ने मदत मागणे सोडले नाही. तर असा हा ना-लायक इंद्र , स्वर्गावर राज्य करण्याच्या लायकीचाच नव्हता असं माझं प्रामाणिक मत आहे. Smile

असो .. सांगण्यासारखे अनगिणत किस्से आहेत , पण लिहीण्याला मर्यादा आहेत. वर सांगुणही ज्या आस्तिक लोकांनी लेख वाचला आणि त्यांच्या भावणा दुखावल्या गेल्या तर त्या लोकांची माफी मागतो Smile
सर्व मते वैयक्तिक , त्यात मतांतरे असु शकतील Wink

कमिंग सुण : कधी तरी ह्या "राशीभविष्यावर" लिहीण्याचा माणस आहे.

प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा

महाराष्ट्र राज्य स्थापनेस ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्याच्या पूर्वसंध्येस महाराष्ट्र स्थापनेच्या मुहुर्तापासून आज हयात असलेल्या/नसलेल्या कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त तीन स्फुर्तिदायी मराठी व्यक्तींची नावे येथे प्रतिसादांमधे लिहीत हा धागा मोठा करूया.

त्या व्यक्ती महाराष्ट्रस्थापनेच्या आधी जन्माला आल्या असल्या तरी हरकत नाही. फक्त त्यांचा ठसा मराठी मनावर राहीलेला असला पाहीजे.

शक्यतो या कुठल्याच व्यक्तीचे नाव एकापेक्षा अधिक वेळेस (प्रतिसादात) नको.

व्यक्ती स्फुर्तिदायी असणे महत्वाचे, ती खूपच प्रसिद्ध नसली पण काम स्थानिक पातळीपासून अगदी आंतर्राष्ट्रीय पातळीवर कुठेही असले ज्याने समाजात फरक पडला असेल तर हवी.

सगळ्या क्षेत्रातील व्यक्ती याव्यात अशी इच्छा.

त्या मधे कुठेही क्रमांक लावायचा नाही, तर जे मनापासून स्फुर्तीदायी वाटले त्यांची यादी करायची इतकाच उद्देश.

धन्यवाद

युगलगित: रानातले खेळ जरा खेळू

युगलगित: रानातले खेळ जरा खेळू

हिरो:
अग ए मैना जरा इकडं ये ना
जावूया राना नको म्हणू नको ना
गंमत म्हणून जरा खेळ खेळू ना

गोड गोड पोळं झाडावर उभं
काढायंचं कसं म्हणतीस का गं
कडेवर तुला घेतो अन लाव त्याला हातं
टपटप मध चोखून घे ना
चल मधमाश्यांचे पोळं जरा काढू ना

आता नको नको म्हणू नको ना
गंमत म्हणून जरा रानातले खेळ खेळू ना

हिरवीन:
नको रे सजना आले मी राना
कुणा सांगता विना
सांगल कुणी तर माझा बा येईल ना
(दांडकं घेवून माझा बा येईल ना)

हिरो:
हा विट्टी अन दांडू तु घे गं
खेळायंच कसं विचारतीस तू का गं
हे आस्सं घेवून जोरात टोलव ना
ईट्टी शोधाया वेळ लावतो मी गं
राज्य माझ्यावरं आलं तर येवू दे ना

हिरवीन:
नको रे सजना आले मी राना
कुणा सांगता विना
सांगल कुणी तर माझा बा येईल ना

हिरो:
आता नको नको म्हणू नको ना
गंमत म्हणून जरा रानातले खेळ खेळू ना

चल तू लप तिकडं मग मी बी लपतो इकडं
चल शोध मला तू गं आता
मग मी पन शोधीलं तु लपता
आसं कटाळा करून कसं चाललं
एकमेकांचा शोध घ्यायचा आहे ना

हिरवीन:
नको रे सजना आले मी राना
कुणा सांगता विना
सांगल कुणी तर माझा बा येईल ना

हिरो:
आता नको नको म्हणू नको ना
गंमत म्हणून जरा रानातले खेळ खेळू ना

हिरवीन:
आले आले रे सजना आले मी राना
न खेळून मी बाई जाईना
कोनी बघल तर बघल पुढंच पुढं पाहू ना
आता तू जरा ईकडे येना
गंमत म्हणून जरा रानातले खेळ खेळू ना
गंमत म्हणून जरा रानातले खेळ खेळू ना
गंमत म्हणून जरा रानातले खेळ खेळू ना

दोघं:
ला ला ला ला ला ला ला ला ला हं हं हं हं हं हं हं हं हं
टारा रा रा रा रा रा रा टारा रा रा रा रा रा रा रा
ढींग च्याक ढींग च्याक ढींग च्याक ढींग

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२१/०४/२०१०

मिटींग - मिटींग

णमस्कार्स पिपल्स ,

डिस्क्लेमर्स : लेखात टेक्निकल बाबींचा उल्लेख असेल त्याचा खुलासा करण्यात येणार नाही. लेख एंजॉय करुन विसरायचा ! कळ्ळं ?

आज गुरुवार.. उदया गुड फ्रायडे ची सुट्टी .. मोठ्ठा विकांत .. पुण्याला घरी पळण्याचे वेध प्रत्येक मुंबैत जॉब करणार्‍याला लागलेले असतात. लंच नंतर कसला ही काम करायचा मुड नसतो. आणि एका मिटींगचा कॉल येतो. मी एका सॉफ्टवेयर कंपनीत काम करतो जी बँकांसाठी सॉफ्टवेयर सर्व्हिस देते. आणि ऑनसाईट पाठवल्याने मी बँकेच्या आयटी सेंटरात बसतो. मोठ्या सरकारी बँकांत प्रोजेक्ट्स खुप मोठे असतात आणि खुप वेगवेगळे सॉफ्टवेयर व्हेंडर्स , टिम्स आणि डिपार्टमेंट्स इन्व्हॉल्व्ह असतात. मिटींग म्हंटलं की मला मोठी मजा वाटते. चला .. ऑफिशियली एखाद तास डोक्याला आराम .. वर गुबगुबीत खुर्च्या, थंड थंड एसीत बसायचं .. फुकाची च्या-बिस्किटं खायची ... विकेंडच्या दिवशी तसा मी उजेडातंच निघण्याचा प्रयत्न करतो.. आणि नेमकं ४च्या ठोक्याला मिटींगला बोलावल्याने जरा नर्व्हसलो होतो.

बरं मिटींगला आमची बिजनेस डेव्हलपमेंटची लोकं, माझा सिनियर हे असल्याने माझ्या सारख्या टेक्निकल रिसोर्सचं काय काम ? असं फाल्तु निष्फळ एक्स्क्युज दिलं आणि मिटींग ला गेलो . मिटींग एका इंटरनेट बँकींग प्रोजेक्टच्या संदर्भात होती. बँकेचा डिजीएम, जीएम, सिस्टिम्स मॅनेजर , इंटरनेट बँकिंग सिस्टिम्स मॅनेजर , एटिएम स्विच मॅनेजर आणि अशी वरच्या लेव्हलची लोकं टेबलाच्या दुसर्‍या साईडला बसली होती.
ब्यँकेचं डिजीएम (हे महा विनोदी पात्र) .. साउथ चा आहे ... पण मराठीही बोलतो. अंध लोकांसाठीच्या बोलुन मार्गदर्शन करणार्‍या एटिएम च्या प्रोजेक्ट साठी त्याच्याबरोबर एकदा मिटींग झाली होती. एका टेक्निकल प्रॉब्लेम मुळे एटिएम बॅलंस बोलत नव्हता, आणि त्याचं खापर स्विच सॉफ्टवेयर व्हेंडर वर फोडावं की एटिएम व्हेंडर वर ? हे कळत नसल्याने .. तो म्हणाला .. तुम्ही त्या एटिएम मधे डाळ ठेवा ... भात ठेवा .. किंवा अजुन काय ठेवा .. मला भुक लागली .. मला जेवण पाहीजे ... (हे उच्चार त्याच्या (किंवा माझ्या) तोंडुन ऐकल्यास ह्या वाक्याची भयानक विनोदी शैली कळु शकेल ) मला डेट सांगा .. आय वाँट प्रोजेक्ट टू बी लाईव्ह .. असो ... तर हे डि.जी.एम साहेब. आता बि.डी. टिमचे लोक फुल्ल बोलबच्चन असतात. बाकी लोक येई पर्यंत मायकल (आमचा बि.डी.) ने त्याला बँकेच्या मायक्रो-फायनांस आणि रुरल बँकिंग चा विषय काढला ... तेवढा एकंच शब्द .. त्यानंतर डि.जी.एम ने कोणालाच काही बोलायची संधी दिली नाही. आणि ते अखंड अर्धा तास त्यावर व्याख्याण देत राहिले .. त्यात अजुन १०-१ वर्षांनी बँका कशा रिलायंस / टाटा / भारती / किंवा इतर मोठ्या उद्योग समुहांना लोण देणार नाहीत .. बँका कशा रोड लेव्हल ला येऊन बिझनेस करणार .. कशा छोट्या खेड्यात पोचणार ? इत्यादी नविन माहिती मला बसल्या जागीच मिळाली. मी माझ्या सिनियर ला एका कागदावर लिहीलं... "साला .. काय टाईमपास चाल्लाय रे ? " ... त्याचा रिप्लाय करुन कागद परत केला.. "काही नविन आहे का हे आपल्याला ? "

थोड्या वेळानं जीएम आणि बँकेची इंटरनेट बँकींग टिम ची लोकं आली. .. डिजीएमचं अजुनही रुरल बँकींग तत्वज्ञान वाटप सुरू होतं Smile इंटरनेट बँकिंग वाला एक जण मिटींगला बसल्या बसल्या समाधी आवस्थेत गेला. दुसरा लबालबा बोलणारा होता. तो डिजीएम ला कापत म्हणाला ... "शाल वी स्टार्ट ? जीएम ला जास्त वेळ नाही " तेंव्हा कुठे ते प्रवचन थांबलं !
मिटींग ला सुरुवातीलाच बाँब पडला ... "व्हाट इज द स्टेटस नाऊ ? व्हेयर आर वी नाऊ ? " , इति इं.बँकींग वाले.
डि.जी.एम म्हणाला .. "वेल .. दॅट्स व्हाट यु नीड टू टेल मिस्टर रस्तोगी. .. " आणि ख्या ख्या ख्या करुन हसला. आम्ही पण हसलो .. (मी सुरुवाती पासुनंच हसत होतो) मिटींग चं अजुन एक ऑब्जरवेशन असं की लोकं नोटपॅड वगैरे घेऊन येतात.. मला कधीही मिटींग मधे नोट करण्यासारखं सापडलं नाही .. मी आपला समोरच्याची कार्टुन काढतो ... किंवा मग त्या पेजेस वर चॅटिंग करतो ... मेसेज लिहुन वही पास करायची.
असो .. रस्तोगी स्वतःला संभाळत म्हणाले .. "Well , Sify team has completed the online testing with the payment gateway ! Only thing pending is , we need to test "Verified by Visa" and "Mastarcard's 3D secure code " testing . "
डिजीएम, "बर मग ? बॉल कोणाच्या कोर्टात आहे ? "
रस्तोगी . " सर , Sify has told , If we complete the transaction , the browser should delete all cache memory and close the browser automatically , aslo , On the transaction successful receipt page , if we copy the URL and open in another page , it should not open "
मी मधेच बोललो .. "सर , आपण सेशन क्लोज केला की काही युआरएल कॉपींग चा फायदा नाही .. आणि आपण ते ऑलरेडी केलंय ! " इथे मी रस्तोगीचा विनाकारण इश्युज वाढवुन आमच्या कोर्टात बॉल टाकण्याआधीच नेट वर करुन पुन्हा चेंडु उलटा टोलावला होता . महाभारतात .. शकुनीने दुर्योधनाला "पांव बारा ... " हवे असल्यावर नेमके "पांव बारा ... "मिळवल्यावर जसं कौरवांचं तोंड होतं तसं आमच्या सगळ्यांचं तोंड झालं Smile
डिजीएम ला टेक्निकल काही कळत नाही .. पण तो नाक खुपसुन काही तरी असा बोलुन जातो ही हसु दाबणं ही मुश्किल होऊन जातं ...
डिजीएम बोलला , "पण सेशन क्लोज केला तर काय होतं ? ती युआरएल कोणी कॉपी केली तर ? "
ह्या वाक्याला सामुहिक फाट्यावर मारण्यात आलं !
नेक्स्ट पॉईंट ..
रस्तोगी , " सर , When the internet transaction is declined , it should show a proper message to card holder , as of now if transaction is successful , same message is shown, but when transaction is declined , only Transaction Failed is coming ... "
डेव्हलपर बोलला , "प्रोजेक्ट सुरु होण्या आधीच एक डॉक्युमेंट शेयर केलंय ज्यात रिस्पाँन्स कोड आणि त्याचे अर्थ दिलेले आहेत. ते सिस्टिम मधे लॉग होतात, कार्ड होल्डर ला डिटेल्स देत नाही आपण, कारण एकाच रिस्पॉन्स कोड ची कारणे बरीच असु शकतात. हे सुद्धा आधीच शेयर केलं आहे. " प्रोजेक्ट युएटी फेज मधे बँक वाल्यांनी बेसिक मुर्ख प्रश्न विचारणं नविन नाही. पण हसायला येणं दाबावं कशाला ? आमची खिखिखि चालुच .. सिनियर ला म्हंटलं .. "नक्की ह्योच प्रोजेक्ट पाहातोय ना ? .. त्या शेजारच्याला बघ.. जणु संत ज्ञानेश्वर .. किती एकाग्रतेने समाधीस्थ झाला .. " पुन्हा खिखिखि...

हळु हळु मिटींग मुळ मुद्द्यापासुन दुर जात राहीली ... मी घड्याळाचे काटे चेक करुन कपाळावरच्या आढ्या वाढवत राहिलो.
एक बँक वाला म्हणाला ... आपलं इंटरनेट ट्रँसॅक्शन आज्जिबात सेक्युअर नाही. (मला माझं हसु दाबल्याने एयरप्रेशर दुसरी कडुन तर निघणार नाही ना ? अशी भिती वाटून पुन्हा हसुन घेतलं ..
तो कंटिन्यु करत होता ... "जर कार्ड नंबर आणि पिन नंबर भेटला ... तर कोणीही फ्रॉड करतो .. वि मस्ट डु समथिंग अबाऊट इट "
आयला .. मग तर एटिएम बँकींग पण सेफ नाही .. कार्ड ट्रॅक कॉपी करायला काय अवघड आहे ? आणि पीन नंबरही आहे ... सिनियर ने आणि मी पुन्हा हसुन घेतलं ... आणि पुढची गम्मत ऐकत राहिलो .
"सिंगापोर हॅज कम अप विथ द मँडेट दॅट टू हॅव अ मोबाईल नंबर , आणि मग त्यावर एक एसेमेस वर कोड येतो , जो फक्त सेशन पुरता चालतो ... हे इंटरनेट वाल्यांनी केलं पाहिजे.. " इति बँक वाला .. आता इथे "इंटरनेट बँकिंग आणि स्विच वाले .. " ह्या दोन बँकेच्या टीम्स मधेच भिडली होती. ..
आणि एक मस्त मजा पहायला मिळणार होती. मी कागदावर " पतंग उडवणे सुरू झालं बघ ... " म्हणुन लिहीलं नी सिनियर ला कागद पास केला.
रस्तोगीने पलटवार केला " तसं असेल तर मोबाईल हॅक करुन त्यावरुनही फ्रॉड करता येईल .. मी जर तुमच्या मोबाईल रेंज मधे असेल तर तुमचे इनबॉक्स अ‍ॅक्सेस करु शकतो.. इतकेच काय .. तुमच्या मोबाईल वरुन मेसेज पाठवु शकतो .. "
हा 'जर" "तर" चा गेम मोठा रोचक होत चालला होता. ... खर्‍या प्रोजेक्टचं भजं झालं होतं ..
आणि बँकेच्याच दोन टिमांमधे खडाजंगी सुरू होती.
मी सिनियर ला म्हणालो .. बघ आता ह्याला भुक लागेल .. आणि जेवण कधी देता ? म्हणुन विचारेल .. आणि तेवढ्यात
शेवटी डिजीएम म्हणाले ... "तारिख सांगा ... " ... आम्ही दोघे हसु लागलो ..
आमच्या साईडने कसलाही डिले नव्हता... तसं ही एकंच सॉफ्टवेयर पन्नास जागी विकायचं असतं .. फक्त थोडे कस्टमायझेशन्स असतात... Smile त्यामुळे आपण पुर्ण सेफ असतो..
शेवटी ज्याने "इंटरनेट ट्रांझॅक्शन अनसेफ आहे म्हणुन मुद्दा उभा केला होता ... त्यानेच ते कसं सेफ आहे हे स्वतःच पटवुन दिल्याने आमची मौज अजुन वाढली."
शेवटी १५ दिवसांनंतरची डेट फिक्स करुन (त्यातही मास्टरकार्ड व्हिजा चं रेडिनेस चे क्लॉज टाकून मिटींग संपली.. ह्या मिटींगला फक्त मिनरल पाणी मिळाल्याने थोडी निराशा झाली ...
जातांना सिनियर ला डिजीएम ने एक पेपर मागितला .. त्याने चुकून तो आमच्या मुक्ताफळांचाच कागद दिला ...चुक वेळेत लक्षात आल्याने पुन्हा मागुन घेतला आणि पुढचा अनर्थ टळला ...

आख्या मिटींग मधे बँकेच्या जीएम ने एकदाही तोंड उघडलं नाही , ढेरीचा आधार घेत त्यावर हात टेकवुन एका हाताने हनुवटीला सपोर्ट देउन जसा आला तसा शेवटपर्यंत बसुन होता. बाकी टिम च्या लोकांना काय चाललंय ते माहितीच नव्हतं !

अजुन एक मिटींग संपली .. आणि टाईमशीट मधे २ तासांची जागा भरण्यासाठी चांगली सोय झाली.

मला मेघदुताचा पुढील दुवा हवा आहे.....विदग्ध वरील .

http://vidagdha.wordpress.com/meghadoot_purna/

प्रस्तुत दुव्यावर मेघदुत आहे मराठी रसग्रहणासहित पण क्रमशः आहे ....
तरि यापुढिल दुवा अथवा सम्पुर्ण मेघदुतचे मराठी रसग्रहण कोणाकडे उपलब्ध असल्यास देण्याचे करावे .......
धन्यवाद!!

अबे राडे राजा

आमची प्रेरणा http://misalpav.com/node/11516
पूर्वी कार्यकर्ते हे चळवळीचा भाग असत. हल्ली भाडोत्री कार्यकर्ते आणावे लागतात.
अशाच एका भाडित्री कार्यकर्ते पुरविणार्‍या संस्थेची विनवणी....

"अबे राडे राजा.. रसते पे आजा
जो राडे मे तेरे प्राण बसत है वो राडे करने को चोरी
अबे राडे राजा रसते पे आजा
काहेसे मै जाऊ करने राडे, काहेसे फोडू काच बिल्डिंग के , काहेसे मै लुटू माल दुकानओके ?
अबे राडे राजा रसते पे आजा
मुख से तुम बबोलो गारी , हाथोसे करदो पत्थरबाजी, थैले मे भरके माल लाओ चोरी
अबे राडे राजा रसते पे आजा
यूपी के भैय्या ;और बाके बीहारी
भागो भागो ... अबूको जगावो
अबे राडे राजा रसते पे आजा

तुझ्या रेशमी केसांनी

मित्रानो एक सगळेमिळून एक प्रयोग करु यात
नेहमी एखाद्या काव्य प्रकारातून विडंबनाचा जन्म होतो.
आपण उलटे करू या
अगोदर विडंबन लिहुया आणि त्यावरून नन्तर त्याचे सुडंबन करुया

तुझ्या रेशमी केसांनी जीव माझा ढापला
जाता जाता सहजच कलीजा माझा कापला

का आता गमजा करू फुका आपला
भेटीत पहिल्याच तू खीसा पाचशेला कापला

सोड हा नाद झेपणार नाही तुजला
प्रेमात तुझ्या ऐसा आवाज आतला दबला

मी खुळा होतो खुळा आहे हे ठाऊक होते मजला
जादूत तुझ्या करवीयला मी माझाच खुळखुळा आपला

कळाले तरी जाहला उशीर फार हे उमजायला मजला
जेंव्ह्या तुझ्या त्या प्रीयकराने धरुनी मज बहूत चोपला.
...............विजुभाऊ

या पुढच्या ओळी तुमच्यावर सोपवतोय.....

अस्सल देशीच ( विदेशी कायकू)

माझी प्रेरणा : अस्सल देशी हायकू

१)
सिगरेट ,साहेब आणि कंपनी देशीच धरली
नाविलाजाने बायकुही देशीच पत्करली
देशातच बनलेली रम मात्र विदेशी ठरली.
२)
त्याला बघून काजूची फेणीही थरथरली
डोळ्यातून आसवे गळली
दुपारीच लागली असेल बहुतेक.
३)
डाबर,पुदीन हरा , खायचे असते
संध्याकाळी जास्त झाल्यास
दुसर्‍या दिवशीचा उत्तम उतारा असते.
४)
नोकरी देतांना एच आर ने माझेसमोर दोन पर्याय ठेवलेत.
ऑनसाईट की ऑफ शोअर....??
मला ऑफ शोअर ची गरज नव्हती... मी ऑन साईट निवडला.
चुकलच माझं ..तमिळ नाडूतल्या छोट्याशा गावात ऑनसाइट राबतोय...???
५)
संध्याकाळी मित्रांच्यात गप्पात जरा जास्तच झाली तेव्हा
भिंतीला घट्ट धरून ठेवले
सारे जग भोवताली फिरत असताना भिंत इतरांच्याअंगावर पडू नये म्हणुन.

चला जोडीनं तण हे काढू, चला ठिबकसिंचन करू

चला जोडीनं तण हे काढू, चला ठिबकसिंचन करू

पिक आलंया जोमात औंदा त्येच्यात तणं लागलं वाढू ...
अहो राया चला जोडीनं तण हे काढू ||धृ||

अहो सजणा चला जोडीनं तण हे काढू
अहो सख्या चला जोडीनं तण हे काढू
अहो धनी चला जोडीनं तण हे काढू
अहो दिलवरा जोडीनं तण हे काढू

बांधानं या येता जाता काटं बोचत्यात पायी /* (बांधावर असणारे चुबूक काटे हे सुद्धा एका तणाचाच प्रकार आहे.) */
काढून काढून मी गं थकले उपाय गावंना काही
काट्याकुट्यात कशाला फिरता?...
अहो काट्याकुट्यात कशाला फिरता?
काटं लागल्यात वाढू ||१||

तर मंग राया चला जोडीनं तण हे काढू ||धृ||
अहो सजणा चला जोडीनं तण हे काढू
अहो सख्या चला जोडीनं तण हे काढू

कोरस :
अहो दाजी जावा जोडीनं तण ते काढा...
अहो पाव्हनं जावा जोडीनं तण ते काढा...

विहीर आपली पाण्याची तिचं पाणी लई खोल
पंप विजेचा भक्कम दांडगा आनतोय त्याला वर
पर भारनियमानं वाट लागली...
पर भारनियमानं वाट लागली
हातची पिकं जातील मरू ||२||

अहो राया चला ठिबकसिंचन करू ||धृ||
अहो सजणा चला ठिबकसिंचन करू
अहो सख्या चला ठिबकसिंचन करू
अहो दिलवरा जोडीनं ठिबकसिंचन करू

कोरस :
अहो दाजी जावा जोडीनं ठिबकसिंचन करा...
अहो पाव्हनं आता जोडीनं ठिबकसिंचन करा...

तण सारं साफ झाल्यावर दिसू लागलं दाणं
भरलेलं कणसं खाय येतील जनावरं ही बेणं
पाखरं हाकलाया तुमी ओ आता...
पाखरं हाकलाया सच्या तुमी ओ आता
झाडावरती चढा ||३||

अन राया आता तण हे काढून टाका ||धृ||
अहो सजणा जावा तण हे काढून टाका
अहो सख्या तुमी तण हे काढून टाका

कोरस :
अहो दाजी जावा तण हे काढून टाका...
अहो पाव्हनं आता तण हे काढून टाका...

०९/०३/२०१०
पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
(आगामी आकर्षण : पोवाडा मर्द मावळ्याचा)

Syndicate content
Scroll to Top