चाललो मी आता टॅम्पोत बसुनी
चाललो मी आता टॅम्पोत बसुनी
खाऊनी मिसळ, आनंदाने
वर्षाव फुलांचा होई तिन्ही लोकी
टाकुन गियर, भक्तिभावे
सांगा रे सांगा रे जाऊ कुठे आता
फिरुनी गावे, दमला जीव
काढुनी तलवार हे द्वंद्व माजे
पेटवुनी दिले, रान सारे
नाही रे नाही रे आता भिती कसली
भिडलो मी साक्षात, यमराजाशी
काढा रे टॅम्पो बसतो मी तयात
जाऊद्या आता, काढीतो लक्तरं
शोधिला मी स्वर्ग सुनासुना
टाकितोय तेथे, आयटमबॉम्ब
येईल परतोनी नव अवतार
घेऊनी विरझन, कहर कहर
-घंटेश