काटेकोरांटीच्या विडंबनाचा लसावी......
हे वाह्यात लेखन http://www.misalpav.com/comment/1088367#comment-1088367 इथं प्रतिसादात लिहिल होतं...त्याला शेपरेट प्रशिद्ध करतोय.....
हे वाह्यात लेखन http://www.misalpav.com/comment/1088367#comment-1088367 इथं प्रतिसादात लिहिल होतं...त्याला शेपरेट प्रशिद्ध करतोय.....
मला लिहिते करण्यात मोलाची भूमिका बजावणारे जेष्ठ मिपाकर अविनाश कुलकर्णी (अकु काका) यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो ही प्रार्थना.
ब्रह्मांड लोकातून चिन्मय परत आल्यावर बोललेला नवस फेडायला जानकी बाई लगेच पुढल्या दोन दिवसांनी काशी यात्रेला गेल्या होत्या.
ब्रह्मांड निर्मीती..ॐ=mc^2
मी कोण आहे..आदीचा शोध घेण्याचा प्रयत्न आपल्या वैदीक ऋषि नी केला..
योगविज्ञान.मेडिटेशन..चक्र ऎक्टिवेट केली अन त्याना तो अनाघत ओम्काराचा नाद ऐकु आला..तो अलोक दिसला..
व हे ब्रह्मांड म्हणजे अणु अन उर्जे पासुन निर्माण झाले असा सिद्धांत मांडला गेला
म्हणजेच पिता शीव व माता पार्वति म्हणजेच उर्जा असे तीला नाव दिले गेले..
ब्रह्मांडातल्या प्रत्येक गोष्टीत चराचरात व त्याच्या निर्मीतित शिव पार्वती तत्व आहे असा सिद्धांत मांडला गेला..
मात्र पाश्च्याताना हा सिद्धांत माहित नव्हता
त्यानी ब्रह्मांडाची विभागणी २ ढोबळ स्वरुपात केली..
आम्ही बायका म्हणजे बोलीभाषा, बोलघेवड्या !
चुलीपासून फोनपर्यंत बडबडबड, गप्पागोष्टी....
लिपीबिपीचे बंधन नाही
व्याकरणबिकरण... हे काय असते?
आम्ही बोलतो अनंत बोलीतून ....
कुजबुज जितकी थरथरणारी
तितके भांडण कडकडणारे
कठोरतेचा शीण आम्हाला
मवाळतेचा शाप तसाही
पण बोली आमची जपून ठेवतो....
अर्थाचा पण अनर्थ करू....
खिल्ली तुमची सहज उडवू
निरर्थाला अर्थ देऊ...
पण तुटका संसार नेटका करू....
बंद जाहला वाजून वाजून, गजराचे चुकले
कठीण दिलीसे नेमून कसरत, ट्रेनरचे चुकले
मध्ये उपटला कुठून जन्मदिन, पेस्ट्रीचे चुकले
वामकुक्षीला विसावला त्या, खाटेचे चुकले
बुडून गेला दुलईमध्ये, झोपेचे चुकले
शर्ट दाटला पोटाला अन टेलरचे चुकले
तडफडला पण गेला नाही, ट्रेकिंगचे चुकले
रांजणापरी उदरी ढकले, माशाचे तिखले...
(गजब)
दुःख दर्शविण्या मझला
दुजा मार्ग नाही
रंग हजारो माझे
पाहण्या नेत्र न कोई
शोभून दिसते सुंदरी
अन् सुगंध देते मोगरी
फरक इतकाच सखे
भार तुच्छ हा उरावरी
टकटक आवाज करती
चाले गुलाबी परी
मधुर सुगंध तिचा
वाटे नभाची सरी
हे दृश्य पाहण्या मझला
दुजा मार्ग नाही
रंग हजारो माझे
पाहण्या नेत्र न कोई
डिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.
चर्चा,काव्य ,तंत्रजगत ,भटकंती व अनेक गोष्टी मिपाकरांना आकर्षीत करत आल्या आहेत.मी ही सभासदत्व मिळाल्या नंतर ह्या सर्व भागांवर भटकायचो.
वाद-प्रतिवादांच्या, समरांत इतरांच्या वादात उगाच तोंड घालण्यात एक वेगळीच झिंग असते.
ह्या दिवसांचं काही कळतच नाही बुवा...कधी शेवरीच्या कापसासारखे आपसूक उडतात,कधी लोखंडी रोलरसारखे ढकलावे लागतात....
कँलेंडरमधे दिसणारे दिवस दिसतात त्यापेक्षा अधिक जवळ असतात...
प्रत्येक उगवणारा दिवस मावळतोच...उद्याचा दिवस दिसेलच याचीही काही खात्री नसते.....
काही लोक दिवस मोजत असतात ... काही लोकांचे दिवस फुलत असतात......
काही गोष्टी फक्त दिवसा करतात....कोणी गेला तर त्याचेही दिवस इतर लोक करतात....
दिवसाढवळ्या गुन्हे घडले तर त्याची दखल लगेच घेतली जाते....
काही दिवस दिसतात .....काही दिवस दाखवले जातात....काही दिवस सरतात....काही तरीही उरतात....
नमस्कार मिपाकरहो,
तमिझ्(तमिळ)ही जगातल्या सर्वात प्रसिध्द अशा भाषांपैकी एक! सर्वात शुध्द द्रविड भाषा! म्हणूनच अन्य भारतीय भाषांच्या तुलनेत थोडीशी अवघड!
कामानिमित्य,प्रवासानिमित्य किंवा एक वेगळी भाषा म्हणून म्हणा,किंवा तमिळ चित्रपट,तमिळ संस्कृती यांची आवड,कुतुहल म्हणून म्हणा 'तमिळ' शिकावीशी वाटते.
अशा तमिळ शिकणार्यांसाठी एक WhatsApp समुह सुरु करत आहोत.