गझल

जो भी बिछडें है, कब मिले है फराज़....

आज सकाळ मधे वाचलेल्या बातमीनुसार जेष्ठ शायर अहमद फराज़ उर्फ 'सईद अहमद शाह' ह्यांचे २५ ऑगस्टला निधन झाले (सकाळ ची तारीख चुकली आहे - पाकिस्तानी आणि आंतरराष्ट्रीय बातम्यांमधे २५ ऑगस्टला निधन झाले असे म्हटले आहे). त्यांनी पाकिस्तानातील लष्करशाहीला खुलेआम विरोध केला होता. २००४ मधे त्यांना त्यांच्या साहित्यासाठी पाकिस्तानात हिलाल-ए-इम्तियाज हा पुरस्कार मिळाला होता, तो २००६ ला परत करतांना ते म्हणाले होते (विकीपिडीया च्या माहितीवरुन साभार) -

"My conscious will not forgive me if I remained a silent spectator of the sad happenings around us. The least I can do is to let the dictatorship know where it stands in the eyes of the concerned citizens whose fundamental rights have been usurped. I am doing this by returning the Hilal-e-Imtiaz (civil) forthwith and refuse to associate myself in any way with the regime..."

एका पतिभावान कवी शिवाय ते एक अतिशय सुसंस्कृत, विद्वान व्यक्तिमत्व होते. मला अर्वाचीन शायरांमधे त्यांची रोमँटीक शायरी अतिशय आवडते. रोमँटीक शायरीतही त्यांच्या कल्पनांचे नावीन्य, हळूवारपणा, हळवेपणा हा खूप भावतो. जसे -

अब के हम बिछडे तो शायद कभी ख्बाबों मे मिले,
जिस तरह सुखे हुए फूल किताबों मे मिले।

त्यांच्या कित्येक गज़ला ह्या मेहदी हसन, गुलाम अली आणि जगजीत सिंग ह्यांनी गायल्या आहेत. त्यातली मेहदी हसनने गायलेली `रंजीश ही सही...' ही अतिशय गाजलेली गज़ल. त्याशिवाय 'अब के हम बिछडे', 'दोस्त बन कर भी नहीं साथ निभानेवाला', 'कठीन है राहगुजर', 'करूँ ना याद मगर किस तरह भुलाऊँ उसे, गज़ल बहाना करूँ और गुनगुनाऊँ उसे','ज़िन्दगी से यही ग़िला है मुझे', 'जो भी दुख याद न था याद आया', 'फिर उसी राहगुजर पर...शायद', 'शोला था जल-बुझा हूँ', 'ये आलम शौक का देखा न जायें' (त्यातील खास करुन कडवे - "फराज़ अपने सिवा है कौन तेरा, तुझे तुझसे जुदा देखा न जायें|" फारच सुरेख!), 'ख्वाब मरते नहीं' अशा कित्येक एकापेक्षा एक सरस गजला/नज्म आठवतात...गज़ल गाणारे गायक खूप प्रसिद्धी मिळवतात, पण त्यामानाने हे सुंदर शब्द लिहिणारे, त्या हळूवार भावना लिहिणारे कवी कित्येकदा अपरिचितच राहतात, त्याबद्द्ल खंत वाटते. 'रंजीश हि सही ' माहित नसलेला गज़ल प्रेमी विरळाच, पण त्याचे शायर 'अहमद फराज़' होते हे कितीजणांना माहित असेल? असो!

हीच ती गाजलेली रंजीश हि सही -

रंजीश ही सही दिल हि दुखाने के लिए आ
आ फ़िर से मुझे छोड के जाने के लिये आ

पहले से मरासिम न सही फिर भी कभी तो
रस्म-ओ-रहे दुनिया हि निभाने के लिए आ

किस किस को बतायेंगे जुदाई का सबब हम
तू मुझ से खफ़ा है तो जमाने के लिए आ
कुछ तो मेरी पिंदार-ए-मोहब्बत का भरम रख
तू भी तो कभी मुझ को मनाने के लिए आ

एक उम्र से लज्जत-ए-गिरया से भी महरुम
ऐ राहत-ए-जान मुझ को रुलाने के लिए आ

अब तक दिल-ए-खुश-फ़हम को तुझ से है उम्मीद
ये आखरी शमाँ भी बुझाने के लिए आ

-अहमद फ़राज
(मरासिम = नाती, relations; पिंदार-ए-मोहब्बत= प्रेमाची खोली/अभिमान, depth/pride of love; लज़्ज़त-ए-गिरिया=दु:खाची/अश्रुंची चव, taste of tears/sorrow; महरूम=वंचित, devoid of)

रंजीश हि सही इथे ऐकता आणि बघता येईल -

आणि ही माझी स्वतःची आतिशय आवडती अब के हम बिछडे...

अब के हम बिछडे तो शायद कभी ख्बाबों मे मिले,
जिस तरह सुखे हुए फूल किताबों मे मिले।

ढुंड उजडे हुए लोगों मे वफा के मोती,
ये खजाने तुझे मुमकीन है खराबों मे मिले।

तू खुदा है न मेरा इश्क फरिश्तों जैसा,
दोनो इन्साँ है तो क्यों इतने हिजाबों मे मिले।

गमे-दुनियाँ भी गमे-यार मे शामिल कर लो,
नशा बढता है शराबें जो शराबों मे मिले।

अब न वो मै हूँ, न वो तू है; न वो माज़ी है ‘फराज़’,
जैसे दो शख्स तमन्नाओं के सराबों मे मिले।

- अहमद फराज़

(खराब=खंडहर, हिजाब=गोशा, veil, सराब= भास, illusion )

अब के हम बिछडे इथे ऐकता आणि बघता येईल -

माझी ह्या जेष्ठ कवीला माझी छोटीशी श्रद्धांजली. त्यांची लेखणी आता 'ख्वाब कभी मरते नहीं...' अशा आदर्शवादी, आशावादी किंवा 'अब के हम बिछडे तो शायद कभी ख्बाबों मे मिले, जिस तरह सुखे हुए फूल किताबों मे मिले।' अशा हळुवार रचना लिहिणार नाही...

वेळ मिळाल्यास त्यांच्या इतरही काही रचना इथे नागरीत द्यायचा प्रयत्न करीन. तुम्हालाही त्यांच्या काही रचना आठवत असल्यास इथे जरूर द्या!

- मनिष
(हा लेख केवळ मिसळपावसाठी आणि माझ्या ब्लॉगवर प्रसिद्ध केला आहे)

मनिषराव, यूट्यूबचे थेट चित्रण इथे चिकटवल्यास आय ई वापरणार्‍यांना काही अडचणी येऊ शकतात असा अनुभव आहे. सबब, यूट्यूबच्या संबंधित चित्रणाचे केवळ दुवेच इथे दिले आहेत. ही अडचण कृपया समजून घ्यावी!
-- आणिबाणीच शासनकर्ता.

(पहा वेळ झाली!)

डॉ.श्रीकृष्ण राऊत यांची 'कशी वेळ आली?' ही छोटी गजल वाचून आमच्यावर आलेली एक बिकट वेळ अंगावर काटा उभी करुन गेली! Nail Biting Timeout

पहा 'वेळ' झाली!
'ठमा' क्रूर आली!

पळे भीत 'रिंकू';
लपेटून शाली.

करा बंद गाणी;
कुठे ती पळाली?

बिछान्यात माती
बुटांची मिळाली.

कशी ही विचारे;
सदर्‍यास लाली?

मिळे चोप 'रंग्या';
घरी कोतवाली!

चतुरंग

(कहर)

विक्षिप्त ह्यांच्या गजलेचा 'कहर' बघून आसपासच्या आफिसातील काही नमुने डोळ्यांसमोर चमकले! Wink

टंच आहे टंकणारी बांधणीला
ढेर-टकल्या सायबाच्या दावणीला

आडलो नाही तसा मी बोलताना
आडला येऊन हुद्दा ऐरणीला

काय सांगू कहर हा झाला कशाने
का पुढे बसवून गेली ढापणीला?

ओठ मादक, केवढा अन् रंग त्यावर
बोलवी साहेब कसल्या चाचणीला?

ते भले मोठे नको रोखूस डोळे
संभ्रमी बघ कंप सुटतो पैरणीला

खोड 'रंग्याची' जुनी नाठाळ आहे
मार खाण्याची अखेरी वळचणीला

चतुरंग

(नूर)

कुमार जावडेकरांची 'नूर' गजल पाहून कोणे एके काळी आमचा बदललेला 'नूर' पुन्हा एकदा आमच्या आठवणीत आला!

दारावरुन गेली, पाहून हूर आलो
आता इथेच होती, शोधीत दूर आलो!

जाऊन बारमध्ये ना घेतली कशी मी
(पाहून तेथला मी आनंद-पूर आलो)

ही फौज बेवड्यांची, पाहू कशास आता
भेटीस 'पेजथ्रीं'च्या येथे चतूर आलो...

'तो भाग' शेकला पण ना बोललो कुणाला
घालून शेपटी मी काढून धूर आलो

थोडाच वेळ होतो, मी थांबलो तिथे, पण-
भलताच मैफिलीचा पाहून 'नूर' आलो

चतुरंग

रिता गाभारा .....

देहात माझीया हा
चंद्र वितळून गेला ।
अन अंतरी मोगराही
सुगंध मिसळून गेला ।

झुकवुनी लाख पाहिले
नजरेस मी माझीया ।
तीर तुझ्या नजरेचा
काळजास वेधून गेला ।

बेरंगी दुनियेचा ना
कायदा मी मोडला ।
इशाराच एक तुझा
मज हाय रंगवून गेला ।

वेचियेली मी दुःखेही
माझ्या दोहो करांनी।
फासा दुर्दैवाचा मज
दान देऊन गेला ।

ओळखले नसे कधीही
माझ्याच मी जगाला ।
सौख्याचा क्षण मजला
नेहमीच फसवून गेला ।

गर्दीत अनोळख्यांच्या
मज मैत्र एक भेटला ।
जीवलगच तो जीवाचा
मग घाव घालून गेला ।

लाविले कसास माझ्या
मी प्रत्येक श्वासाला ।
क्षणाक्षणांनी काळही
मजला परखून गेला ।

शोधियले त्रिखंडात मी
त्याच सर्वेश्वराला ।
-हुदयीचा गाभारा पण
रिताच राहून गेला ।

(बेचैन)

अनिरुद्ध अभ्यंकरांची सुंदर गजल'चैन' आम्हाला चांगलीच हलवून गेली आणि आम्ही बेचैन झालो!Wink

गजल वाचुन हालतो 'वरचाच मजला'
काय मी आता करु? घरचाच मजला

हालला आहेच तो आता तरीपण
व्यर्थ शब्दांचा तुझ्या का जाच मजला

का विडंबन रोजचे असते कपाळी?
प्रश्न मेले लाविती बघ आच मजला

वायदा सार्‍या कवींचा ज्ञात मजला
कायदा हा रोजचा झालाच मजला

मी भरवसा त्या कवींचा काय द्यावा?
छळतात जर त्याच त्या गजलाच मजला

संस्थळांची मात्र ह्या झाली दुकाने
सर्व म्हणती माल घ्या हो हाच,मजला

एकदा सोडीन म्हटले मी विडंबन
देती कसे पाताळयंत्री लाच मजला

चैन कवितेची मला करता न आली
आहेर असतो रोज, घरचाच मजला

चतुरंग

चैन

शब्द हल्ली सारखे छळतात मजला
आणि ओळी चार मग सुचतात मजला

बोलली नाहीस तू काही तरीपण
अर्थ नजरेचे तुझ्या कळतात मजला

चांदण्यांना रोजची का रात्रपाळी?
प्रश्न हे आता असे पडतात मजला

कायदे काही शहाण्यांचे असू द्या
फायदे वेडात हे दिसतात मजला

मी भरवसा माणसांचा काय द्यावा?
सावल्याही जर अशा गिळतात मजला

देवळांची सर्व ह्या झाली दुकाने
भावभक्ती रोज ते विकतात मजला

एकदा घेईन म्हटले मी भरारी
पिंजरे छद्मीपणे हसतात मजला

चैन रडण्याची मला करता न आली
एवढी कोठे सुखे मिळतात मजला

ठपका!

'ठिपका' ही सुंदर गजल घेऊन आलेल्या अनिरुद्ध अभ्यंकरांच्या वेशातल्या केशवसुमारांना आम्ही ओळखले मात्र पाठोपाठ विडंबनधर्माला जागणे आले! Wink

ठपका!

घडायचे ते घडले काही टळले नाही
पोहे खाता तुला भेटणे चुकले नाही

कळले नाही कशी अधाशी प्लेट संपली
चहा कधी मग सुरू जाहला कळले नाही

बहीण अचानक तुझी मला सामोरी आली
त्या धक्यातुन चित्त कधी सावरले नाही

मी ओठांनी निर्धाराने खूप लपवले
पण डोळ्यांना माझ्या तेही जमले नाही

नको दाखवू ओळख आता सांगत होती
तिचे इशारे पण ते मी ओळखले नाही

शरमिंदा मी झालो होतो अखेर चुकलो
विनवुन तुजला परोपरी हे पटले नाही

बदलत गेले भाव कसे मी बघत राहिलो
नकार मजला तुझा बदलणे जमले नाही

मी जाताना नजर अशी माघारी वळली
हाय! कसे ते तुला तरी पण कळले नाही?

भाळावरती 'ठपका' घेऊन बसला 'रंग्या'
लग्नाचे हे कोडे काही सुटले नाही

चतुरंग

ठिपका

घडायचे ते घडले काही टळले नाही
त्या वळणावर तुला भेटणे चुकले नाही

कळले नाही कसा कधी संवाद संपला
वाद कधी मग सुरू जाहला कळले नाही

आज अचानक अर्थ असा हा समोर आला
त्या धक्यातुन शब्द कधी सावरले नाही

तू ओठांनी निर्धाराने खूप लपवले
पण डोळ्यांना तुझ्या कधी ते जमले नाही

तशी जुनी शब्दांची माझी ओळख आहे
पण अश्रूंना का त्या मी ओळखले नाही

मान्य कधीही केले नाही आपण चुकलो
दोघांमधले अंतर मग हे घटले नाही

बदलत गेला रस्ता अन मी बघत राहिलो
रस्त्यासंगे मला बदलणे जमले नाही

तू जाताना नजर तुझी माघारी वळली
का माघारी पाय तुझे पण वळले नाही?

बघत राहीलो दूर तुला ठिपका होताना
मला कळेना का डोळे हे मिटले नाही

-अनिरुद्ध अभ्यंकर

(माउस)

ओट्यावरती तुझ्या किती बघ घुटमळला माउस..!
झाडू घेऊन आलो तरि ना अडखळला माउस..!

मला न जमले ठोकायाला तेव्हा मिश्किल हसला,
मनीपुढे पण स्वतः कसा बघ डळमळला माउस..!

कधी उगाचच रुसला, आणिक माळ्यावरती दडला.
रॅट किलर च्या गोळ्यांनी ना विरघळला माउस..!

अवचित ताज्या गरम भज्यांचा गंध पसरला तेव्हा
मित्रांसोबत बिळाबिळांतुन तळमळला माउस..!

नव्यानव्या कवितांची लागण, विडंबनांची बाधा,
कळफलकाच्या जोडीने मग सळसळला माउस..!

घराघरांतुन निरोप घेई गणरायांची स्वारी.
भिजून गेले डोळे, रडला, कळवळला माउस..!

प्रेरणा: वृत्तातील लहानमोठ्या स्पीड ब्रेकर्ससकटच्या जमिनीवर बरसलेला अभिजीत दात्यांचा पाउस. काही ठिकाणी जमिनीवरचे खड्डे बुजवण्याचे काम केले आहे.