((मित्र घरी जायला निघतो तेव्हा))
मित्र घरी जायला निघतो तेव्हा,
अगदी शेवटचा म्हणुन ठेवलेला पेग..सगळाच्या सगळा..एका दमात पिऊन टाकतो.. सवयीने
खंबा सुद्धा अगदी थेंबही न उरेल इतका साफ केलेला असतो..अगदी रिकामा
डिशमधला चकणा..चकल्या..उबले हुए शेंगदाणे..चना डाल
वेटर कडुन मागावलेला कॉम्प्लिमेंटरी पापड..विथ ग्रीन चटणी..
योल्क काढलेले बॉईल्ड एग्ज फिंगर चिप्स अन ओनिअन रिंग्ज.
मेन कोर्स मागवतच नाही.
चकण्यातच पोट कसे भरुन जाते कोण जाणे....!