((मित्र घरी जायला निघतो तेव्हा))

Primary tabs

कानडाऊ योगेशु's picture
कानडाऊ योगेशु in जे न देखे रवी...
26 Jun 2020 - 9:43 pm

प्रेरणा अर्थातच इथुन

मित्र घरी जायला निघतो तेव्हा,
अगदी शेवटचा म्हणुन ठेवलेला पेग..सगळाच्या सगळा..एका दमात पिऊन टाकतो.. सवयीने
खंबा सुद्धा अगदी थेंबही न उरेल इतका साफ केलेला असतो..अगदी रिकामा
डिशमधला चकणा..चकल्या..उबले हुए शेंगदाणे..चना डाल
वेटर कडुन मागावलेला कॉम्प्लिमेंटरी पापड..विथ ग्रीन चटणी..
योल्क काढलेले बॉईल्ड एग्ज फिंगर चिप्स अन ओनिअन रिंग्ज.
मेन कोर्स मागवतच नाही.
चकण्यातच पोट कसे भरुन जाते कोण जाणे....!

खरकटलेला असतो अजुनही टेबल..
बाजुला काढलेले खवट शेंगदाणे..मूंग डाल..तर्जनीला चिकटवुन ते ही टिपतो..सराईतपणे..एका तंद्रीत..
माझा तेवढा शिल्लक असतो..पावशेर बिअरचा ग्लास..
अन अर्धा खाल्लेला पकोडा..
"हे ही मी घेतो..करपट ढेकर येतात तुला" असे म्हणत त्याच्या उदरात गेलेले असते.
आता फक्त उरतात रिकाम्या डिशेस..रिकामे ग्लास..सवयीने भींतीकडे सरकवतो..
अन टेबल आता मोकळा दिसतो...

मला आठवतात त्याच्याशी समोरासमोर उगाच घातलेले वाद
आणि मग एकामागोमाग एक मागवलेले पेग..
त्याचा बरळलेला आवाज..
आणि एखाद्या अर्ग्युमेंटवर त्याने घेतलेली पप्पी..

निघताना बिल द्यायच्या गडबडीत राहिलेच कि असे म्हणत खिशातुन काढलेली टिप..

हुश्श्य गेला म्हणुन एकदाचा मी थोडा रिलॅक्स होतो इतक्यात,
तो परत येताना दिसतो..
"आता घरबसल्या घरी मागवता येते...नेशनच्या इकॉनॉमीला हातभारही लावता येईल..आता घरी बसुनच मागवता येईल.." हे पुन्हा सांगायला..
अन इतक्यात मी तो गेल्यानंतर मागवलेला एक पेग वेटर घेऊन येतो..
मित्र घरी जायला निघालेला असतो..
..तो आता पुन्हा बसतो...
आणि....
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

मी अजुन एक पेग मागवतो...!

विडंबन

प्रतिक्रिया

एस's picture

26 Jun 2020 - 10:34 pm | एस

यथार्थ वर्णन.

रातराणी's picture

27 Jun 2020 - 10:42 am | रातराणी

भारीच!! :)

गणेशा's picture

27 Jun 2020 - 1:02 pm | गणेशा

हा हा हा..

भारी

प्राची अश्विनी's picture

27 Jun 2020 - 6:49 pm | प्राची अश्विनी

भारीच!!!
अर्थात असा अनुभव बिल्कुलच नाही.

सतिश गावडे's picture

27 Jun 2020 - 6:55 pm | सतिश गावडे

मैत्रीमधील अत्त्युच्च मित्रप्रेमाच्या प्रसंगांचे यथार्थ वर्णन केले आहे.

ज्ञानोबाचे पैजार's picture

27 Jun 2020 - 9:38 pm | ज्ञानोबाचे पैजार

असे मित्र असतील तर घरी कशाला जायचे?
पैजारबुवा,

कानडाऊ योगेशु's picture

28 Jun 2020 - 1:34 pm | कानडाऊ योगेशु

धन्यवाद एस,रातराणी,गणेशा,प्राची अश्विनी,सगासर,ज्ञानोबाचे पैजार
@सगासर
>मैत्रीमधील अत्त्युच्च मित्रप्रेमाच्या प्रसंगांचे यथार्थ वर्णन केले आहे.
खरे आहे.प्रसंग बराचसा आयुष्यातील प्रसंगाशी मिळता जुळता आहे.

टवाळ कार्टा's picture

29 Jun 2020 - 12:14 am | टवाळ कार्टा

ख्या ख्या ख्या