चाल -( निंबोणीच्या झाडामागे चंद्र...)
चायनाच्या वूहानमध्ये, कोण शिंकला गं बाई
कोरोनाच्या व्हायरसला, झोप का गं येत नाही।।धृ ।।
किंवा
(असा कोरोना कळेना, कसा जन्मला गं बाई)
लोकं झोपले घरात, रस्त्यावर रोगराई
दिवसभर फेसबुक, कसली गं नाही घाई
लॉकडाऊन आशेचा, दारू मुळी मिळत नाही।।१।।
कामवाली बाई नसता, भांडी घासणे कपाळी
जरा चुना घेण्यासाठी, याचकाची आली पाळी
काठी राखते समता, समजून गुरेगाई ।।२।।
जगातल्या व्यवहारांची, होत आहे रोज माती
स्पर्श कसे पसरत गेले, गात विध्वंसाची गाणी
टेस्ट पॉझिटिव्ह येता, हातावर येई शाई।।३।।
किंवा
(विमानांतूनी उतरता)
आरोग्यपथकं फिरती, माज त्यांना शिक्षा देई
घेऊनी दगड हाती, राजरोस घाली डोई
नर्सलाही लाज आणी, यांची वेळ कधी येई?।।४।।
रोगी रोजच खोकती, तरी दुकानात जाई
मास्क नसती म्हणूनी, रुमाल हा बांधून घेई
ताज्या भाजीला बघता, जीभेवर चव येई ।।।५।।
कारखाने बंद होता, हवा मिळे श्वासासाठी
मुक्तपणे प्राणी फिरती, तोडूनी पाशांच्या गाठी
पक्षी मोकळे उडती, गीत नवे त्यांच्या ओठी ।।६।।
कामगारांचे हे लोंढे, कष्टणाऱ्या मुंग्यांपरी
हातावरचे हे पोट, सुरू करी पायी वारी
मीठ त्यांच्या घामातले, अळणीच गं माघारी।।७।।
टीकटॉक वापरुनी, चायनाला शिव्या देती
इटलीची काशी झाली, सांगे चौकात बसूनी
यूएस्एचा स्कोअर बघूनी,अक्कलही येत नाही।।८।।
तंबाखू नसे नवीन, खाकारेही नेहमीचे
गुटखा खैनी जमवोनी, अप्रूप नसे डागांचे
आतले गं हे विषाणू, थुंकूनीच संपवायचे ।।९।।
या रोगाच्या साथीने, आपली झाली चाचणी
इथून आणि तिथून, सगळे दिव्य लक्षणी
हाव हीच महामारी, मानवाची गं करणी ।।१०।।
- अभिजीत
प्रतिक्रिया
21 Apr 2020 - 9:08 pm | वीणा३
:D , चांगलं झालाय विडंबन !!!
22 Apr 2020 - 12:11 pm | चौथा कोनाडा
भारी !
लै मज्जा आली चालीत म्हणताना !
व्वा, किती रमणिय चित्र !
25 Apr 2020 - 1:33 pm | मन्या ऽ
छान जमलंय!
3 May 2020 - 7:12 pm | गुल्लू दादा
आवडली...
3 May 2020 - 10:54 pm | Prajakta२१
छान कविता
7 May 2020 - 12:25 am | Nupur Padekar
खुप सुन्दर..