विडंबन
दारू ही केवळ निमित्तमात्र..
प्रेर्ना म्हणुनी काय पुसता?
आम्हाला तर दोन दोन प्रेर्ना !!
मग पुढे असं होतं की ..
मैत्री मधलं अंतर वाढत जातं.
गळा भेटी कमी होत जातात.
कट्टे, दंगे मागे पडत जातात..
पाठीवरचे गुद्दे होतात विसरायला..
आणि जुने दिवस लागतात आठवायला..
मैत्र लागतं विरायला..
असं होऊ नये म्हणून बसायचं..
दारू ही केवळ निमित्तमात्र..
डॉक्टर हा निमित्तमात्र..
मूळ प्रेरणा: काॅफी ही निमित्तमात्र..
(मूळ कवयित्री प्राची अश्विनी यांची माफी मागून)
मग पुढे असं होतं की ..
दातामधलं अंतर वाढत जातं.
डोळ्यामधला नंबर वाढत जातो.
बोळक्यामधलं हसू निवत जातं...
नावं होतात विसरायला..
आणि घरचे लागतात रागवायला..
फुफ्फुस लागतं धापा टाकायला..
असं होऊ नये म्हणून भेटायचं..
डॉक्टर हा निमित्तमात्र..
शोधा म्हणजे सापडेल ( परामानंदाचे झाड )
परमानंद म्हणजे काय असतॊ ?
खरचं तो असतॊ का नसतॊ ?
का उगाचं व्याख्यान देतो आपण त्यावरी ?
त्याचे झाले असे
परामानंदाचे गुपित कळले , एका भक्ताला
रोज तो जाई साधूकडे
परमानंदाची महती ऐकायला
दासी पटक्या सेवेकरी असती तेथे राबायला
साधू बोले अन भक्त डोले
चाले रात्रन्दिवसा
दुखरी पीडा कधीपण गाठे
नाही त्याचा भरवसा
दिवसागणिक काळ लोटला
परमानंद नाही सापडला
भक्त निघाला थकुनि घरासी
मनोमनी स्वतःला कोसी
जाता जाता चमत्कार घडला
पोटात जणूकाही अणुबॉम्ब फुटला
राखून ठेव दुधाचे थेंब तू
राखून ठेव दुधाचे थेंब तू
मज पाडसा पाजावया
रक्त माझे शोषलेस
काही नाही त्यास द्यावया
घास देई तू मजप्रती
दुध देते मी म्हणोनि
अर्थ नाही, व्यर्थ आहे
जीवन शिंगे असोनि
कामधेनु, गोमाता नावे
मज अनेक ती
भाकड पैदा होता
खाटीकास विकती
निचाहूनी नीच तू
तुझ्यासम कुणी नसे
धर्माचे स्तोम फक्त
अंतरी आत्माच नसे
विकशील का मुलीला ?
वांझ जर असेल ती
जरा खरचटता तिला
झोपही उडेल ती
वळू नको, भाकड नको
दुभती गाय पाहिजे
माग तू याच जन्मी
नकळत सारे घडले ४
हे एक विडंबन आहे हे कायम लक्षात असू द्या!!!!
दुसरा: सर, आपलं एफ१६ जरी पडलं असलं तरी त्या अगोदर आपल्या वैमानिकाने भारतात जाऊन तिथे मिझाईल डागलं याचा मला अभिमान वाटत होता.
पण त्याचाही नेम चुकला.
फुरफुर: कुठे धरला होता:
दुसरा: धरला नव्हता. धरणार होता.
फुरफुर: (जरा ओरडून) अरे पण कुढे?
दुसरा: भारतीय ब्रिगेडच्या मुख्यालयावर.
फुरफुर: पुढे
दुसरा: ती मिग२१ अपेक्षेपेक्षाही लवकर आली. जणू भुताटकी झाली.
फुरफुरः ?????
नकळत सारे घडले ३
हे एक विडंबन आहे हे कायम लक्षात असू द्या!!!!
तिसरा: आणि..
फुरफुर: (हताश आवाजात पण कुतूहल मिश्रीत आवाजात): अजूनही काही सांगण्यासारखं आहे तुझ्याकडे? आता एका दमात सगळं सांगून टाक. माझ्या मनाची काहीही ऐकायची तयारी झाली आहे.
तिसरा: मिग२१ ला एका एफ१६ ने मिझाईल मारले. पण ते त्याला लागलेच नाही. मिग२१ ने ते चपळाईने चुकवले. त्यामुळे..
फुरफुर: अरे बोल ना
तिसरा: त्यामुळे ते...
फुरफुर: अरे बोल ना.
तिसरा: त्यामुळे ते भारताच्या हद्दीत जाऊन पडलंय.
नकळत सारे घडले २
हे एक विडंबन आहे हे कायम लक्षात असू द्या!!!!
नकळत सारे घडले
हे एक विडंबन आहे हे कायम लक्षात असू द्या!!!!
(पाक प्रवक्ता हे मुख्य पात्र आहे. त्याचे नाव आहे फुरफुर. त्याने वॉररूम सारखी ट्विटररूम बनवली आहे. त्यात तो स्वत: व त्याचे तीन दुय्यम सहकारी बसलेले आहेत. सर्वाच्या पुढे फोन, मोबाईल, लॅपटॉप वगैरे सगळी अत्याधुनिक साधने आहेत. याच रूमला जोडून फुरफुरची एक साऊंडफ्रुफ केबीन आहे.)
भाग १
खेळ राजकारणी असा रंगला....
गदिमा आणि सुलोचना चव्हाणांची माफी मागून,
मूळ गीत - फड सांभाळ तुर्याला ग आला....
खेळ राजकारणी असा रंगला....
काका लागला काड्या घालायला || धृ ||
मूळ बारामतीचं बेणं....
हळूहळू यानं गिळलं पुणं....
धोका देण्यात अति प्रवीण....
घेतलं कडेवर जनता पार्टीला....
दिला धक्का वसंतदादांला....
बाईने हाकललं याच्या सरकारला....
परतून धरले राजीवच्या पायाला….
काका लागला काड्या घालायला || १ ||