कारण हे निमित्तमात्र

शब्दानुज's picture
शब्दानुज in जे न देखे रवी...
30 Mar 2019 - 11:15 pm

मग पुढे असं होतं की ..

अोळखीचा समोरचा आज अनोळखी वाटतो
हाच का तो हा प्रश्न मनास पडतो

शोध नव्याच्या नव्यानी चालू होतो
डोके टेकवायला 'ताजा' खांदा शोधतो

नवा खांदाही शेवटी जुना होतो
अपेक्षांच्या अोझ्याला जरासा बळी पडतो

सोबतीच्या लक्षावधी क्षणांना क्षणात विसरतो
एखादा फुटकळ क्षण बाहेर डोकावतो

अव्याहत भूक हा तर इथला जिवनमंत्र
नाती संपावयास कारण हे निमित्तमात्र..

विडंबन

प्रतिक्रिया

प्राची अश्विनी's picture

31 Mar 2019 - 7:10 am | प्राची अश्विनी

ही सुद्धा आवडली.

ज्ञानोबाचे पैजार's picture

1 Apr 2019 - 4:34 pm | ज्ञानोबाचे पैजार

हा दृष्टीकोन देखिल आवडला.
प्रत्येक खांद्याला कधिना कधी त्याच्यावर पडणारा भार असह:य होतोच.
ती वेळ येण्या आधी आपण दुर झालो तर गोडवा टिकून रहातो.
पैजारबुवा,