हट्ट
दाराआडचा पप्पू (आणि त्याची मम्मी)
एक पप्पू दाराआडून बघतो आहे बाहेर
आशाळभूत नजरेने.
किती बाहेर ?
मम्मीच्या पदराआडच्याही बाहेर..
ल्युटियन्स झोनच्या पार, वायनाडच्याही पलिकडे...
समुद्रापारच्या वाटिकनातल्या परमेश्वराच्या सर्वोच्च प्रतिनिधीकडे,
हिरव्या झेंडयाच्या देशातल्या त्या हिमरानाकडे ...
देतील का ते मला सिंहासन मिळवून ???
पण सिंहासनावर चौकीदार बसलेला आहे.
चुस्त, मस्त, व्यस्त ....
चतुर, धाडसी, जबरदस्त ...
नवनव्या योजना आखत, शत्रूच्या उरात धडकी भरवत.
(तू मतदार माझा)
प्रेर्ना - विळखा पाहू
तू मतदार माझा
भोट, भोंगळ अजीजी
तुझे मत मागण्या तुलाच नादी लावणारा
मस्तवाल नेता मी ....
घेऊन जमेस तुला
निव्वळ उगी तुंबडी भरावी
बोभाटा करावा मी एव्हढा
की लाभावी मज(समोरची) वाटणी
सर्व अडेल,पडेल,चढेल, संधिसाधू,भूछत्री उमेदवारांना समर्पित.
वाचकांचीच पत्रेवाला नाखु बिनसुपारीवाला
तळवे
हेच ते जीवघेणे हळवे तळवे
ज्यावर तू तुझे काळीज काढून ठेवलेस!!
शक्य वा हिंमत असती तर
हे तळवे बाजूला काढून
फोटोत घडी घालून
पुरून टाकले असते...
ना ही असोशी असली असती...
ना अंधारात डोळे खुपसून
न उजळणार्या पूर्वेकडे
पहात राहिले असते....
ना रक्तातून तुझे भिरभिरणे ऐकत राहिले असते....
नाहीतर,
माझ्या दोन्ही तळव्यांना
पंख व्हायची शक्ती घटकाभर देता,
तर विधात्याचे काय जाते?
-शिवकन्या
निघताना....
मी हळूहळू पण निश्चितपणे
पार दिसेनाशी होईन
तेव्हा तू चौकट ओलांड,
आणि निघताना.....
आपल्या हसल्याबोलल्या
आवाजांची फूले घेऊन ये
आपल्यातल्या गहिवरांचे
कढ, न हिंदकळता आण
मी न ओलांडलेली अंतरे
तू सहजच पार करुन ये
माझे न उच्चारलेले नाव
चारचौघांत सरळच घे
सगळे उठून जातील तेव्हा
आपल्यातल्या शब्दांची
आरास मांड
त्यानंतर आपोआप दिवा लागेल
तुझ्या डोळ्यांतले पाणी विझेल
हट्ट!
हट्ट कोणता करू तुजकडे?
थिट्या मनाची झेप थिटी
फिरून येती मनात इच्छा
भेट हवी मज, हवी मिठी.
आणि हासुनी ओळखशी तू,
देउन जाशी हवे तसे
मंतरल्यासम ते क्षण जाता,
इच्छांचे त्या पुन्हा पिसे.
'थांब थांब तू, नकोस जाऊ'
सांगावेसे तुज वाटे,
त्याच क्षणी अन् सभोवताली
काजळगहिरे तम दाटे.
म्हणून जाशी मिठी छेडुनी
झिणिझिणि वलये गात्रात
अन् पुढल्या भेटीची होते
मनी अनावर सुरुवात.