मी हळूहळू पण निश्चितपणे
पार दिसेनाशी होईन
तेव्हा तू चौकट ओलांड,
आणि निघताना.....
आपल्या हसल्याबोलल्या
आवाजांची फूले घेऊन ये
आपल्यातल्या गहिवरांचे
कढ, न हिंदकळता आण
मी न ओलांडलेली अंतरे
तू सहजच पार करुन ये
माझे न उच्चारलेले नाव
चारचौघांत सरळच घे
सगळे उठून जातील तेव्हा
आपल्यातल्या शब्दांची
आरास मांड
त्यानंतर आपोआप दिवा लागेल
तुझ्या डोळ्यांतले पाणी विझेल
मग मी मुक्त होऊन रेषा होईन
तुझ्या तळहातांवर खोल रुतेन..
तू हळूहळू पण निश्चितपणे
पार दिसेनासा होऊन
माझ्याजवळ पोहचेपर्यंत...
Shivkanya
प्रतिक्रिया
24 Aug 2018 - 7:00 am | प्राची अश्विनी
आहा! हळवी, तरल!
24 Aug 2018 - 11:53 am | चाणक्य
साॅलिड झालीये
24 Aug 2018 - 12:21 pm | श्वेता२४
तरल कविता
आपल्या हसल्याबोलल्या
आवाजांची फूले घेऊन ये
आपल्यातल्या गहिवरांचे
कढ, न हिंदकळता आण
हे खासच
26 Aug 2018 - 3:51 pm | अभ्या..
आह्ह्ह्हा,
अप्रतिम
26 Aug 2018 - 5:15 pm | यशोधरा
सुर्रेख! फार देखणी.
26 Aug 2018 - 6:05 pm | चित्रगुप्त
सुंदर गहन र्हदयस्पर्शी कविता.
30 Aug 2018 - 10:30 am | राघव
प्रतिसाद देण्यासाठी खास लॉग ईन व्हावे असे काहीतरी! आवडले! :-)
30 Aug 2018 - 5:25 pm | नाखु
भारीच आहे
2 Sep 2018 - 9:30 pm | शिव कन्या
सर्व रसिक वाचकांचे मन:पूर्वक आभार.
5 Sep 2018 - 7:39 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
क्या बात!