गाण्यास पावसाच्या...
गाण्यास पावसाच्या झोकात चाल दे
थेंबास ओघळाया हलकेच गाल दे!
नभ वेढतील जेंव्हा बाहू सभोवती
क्षितिजांस रंगवाया हळवा गुलाल दे!
गाण्यास पावसाच्या झोकात चाल दे
थेंबास ओघळाया हलकेच गाल दे!
नभ वेढतील जेंव्हा बाहू सभोवती
क्षितिजांस रंगवाया हळवा गुलाल दे!
(विडंबनच आहे, ह. घ्या. हे.वे.सा.न.ल.)
.
.
.
.
महापुरुष आणि तीर्थस्थाने
बाप आणि आई
डोळ्या समोर आली नसतील तर नसू देत
तुका म्हणाला
उरलो आता
उपकारापुरता ...
मी म्हणालो
उरलो आता
भिंतीवरल्या
फोटोपुरता.
नुरली शक्ती
विरली काया
शिथिली गात्रे
आटली माया ...
उरलो आता
भिंतीवरल्या
फोटोपुरता.
खपलो झिजलो
कोड चोचले
देहाचे पुरवाया ...
उरलो आता
भिंतीवरल्या
फोटोपुरता.
वाटले -
जिंकेन जग.
लोळेन -
सुखात मग.
धडपडलो - कडमडलो
नको तिथे अन गेलो वाया ...
उरलो आता
भिंतीवरल्या
फोटोपुरता.
चिदंबरमच्या भेटी मनमोहन आला
तो झाला सोहळा तिहारात
जाहली दोघांची तुरुंगात भेट
मनातले थेट मना मध्ये
मनो म्हणे, " चिद्या, तुझे घोटाळे थोर
अवघाची inx खाऊन टाकला
चिदू म्हणे, एक ते राहिले
तुवा जे पाहिले, पंतप्रधान पदावरी
मनो म्हणे बाबा ते त्वा बरे केले
त्याने तडे गेले प्रामाणिकतेला
मॅडम अट्टल, त्यांची रीत न्यारी
माझी पाटी कोरी राज्य करोनिया
चिदू म्हणे गड्या केली वृथा पायपीट
प्रत्येकाची कोठडी वेगळाली
वेगळीच ताटे वेगळीच वाटी
जेवायला भेटे पुन्हा डाळ भात
संध्याकाळी तू गंगेतीरी व्याकुळसा बसू नकोस.....
मला घेऊन चल तिच्या वळणदार लाटांवर
लोटून दे तिच्या केशरी दिव्यांच्या लयीवर
सोडून दे तिच्या पोटातल्या भोवऱ्यात
घेऊन ये तो झुरणारा शेला पाण्यात
संध्याकाळी तू गंगेतीरी व्याकुळसा बसू नकोस....
तुझ्याकडे तोंड करून खळखळून हसू दे
बघू देत लोकांना देवांना साधुंना
माझ्या हातातले पाणी तुझ्या हातातून
तिच्या देहात लयदार मिसळताना.....
हट्ट कोणता करू तुजकडे?
थिट्या मनाची झेप थिटी
फिरून येती मनात इच्छा
भेट हवी मज, हवी मिठी.
आणि हासुनी ओळखशी तू,
देउन जाशी हवे तसे
मंतरल्यासम ते क्षण जाता,
इच्छांचे त्या पुन्हा पिसे.
'थांब थांब तू, नकोस जाऊ'
सांगावेसे तुज वाटे,
त्याच क्षणी अन् सभोवताली
काजळगहिरे तम दाटे.
म्हणून जाशी मिठी छेडुनी
झिणिझिणि वलये गात्रात
अन् पुढल्या भेटीची होते
मनी अनावर सुरुवात.