विराणी

दो डोळ्यांचे....

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
4 Oct 2019 - 12:46 pm

दो डोळ्यांचे झरते पाणी इथून मजला स्पष्ट दिसे
त्या पाण्याच्या आवेगावर ओठावरले गीत फिरे

डोळ्यांमधल्या रेषा तांबूस पूरी सांगते व्यथा खरी
सांगायाला शब्द कशाला झुळूक हळवी एक उरी

गदगद्णारे हृदय राजसा तुझा पोचतो इथे हुंदका
पाण्यालाही जागर असतो दिव्यात नसते केवळ ज्वाला

सहवासाचे अत्तर नाही तरी मिठीचा भास कोवळा
इथे तिथेही कुठेच नाही तरी बहराचा शुद्ध सोहळा

-शिवकन्या

मांडणीवावरकविताप्रेमकाव्यसाहित्यिकसमाजकविता माझीकालगंगाप्रेम कविताविराणीसांत्वना

संध्याकाळी तू गंगेतीरी

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
1 Sep 2019 - 12:14 pm

संध्याकाळी तू गंगेतीरी व्याकुळसा बसू नकोस.....
मला घेऊन चल तिच्या वळणदार लाटांवर
लोटून दे तिच्या केशरी दिव्यांच्या लयीवर
सोडून दे तिच्या पोटातल्या भोवऱ्यात
घेऊन ये तो झुरणारा शेला पाण्यात

संध्याकाळी तू गंगेतीरी व्याकुळसा बसू नकोस....
तुझ्याकडे तोंड करून खळखळून हसू दे
बघू देत लोकांना देवांना साधुंना
माझ्या हातातले पाणी तुझ्या हातातून
तिच्या देहात लयदार मिसळताना.....

मांडणीवावरसंस्कृतीवाङ्मयकविताप्रेमकाव्यसाहित्यिकसमाजजीवनमानकविता माझीकालगंगातहानप्रेम कविताभावकवितामनमेघमाझी कविताविराणीकरुण

जोहार परकीयासी फितुरांचा जोहार __/|__

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
18 Apr 2018 - 5:06 pm

प्रेर्ना हे आणि असेच असम्ख्य आपलेच

भारत द्वेष्ट्यांची प्रार्थना

उपहाराचे पदार्थमटणाच्या पाककृतीरतीबाच्या कविताविराणीकरुण

(बार हो)

मार्कस ऑरेलियस's picture
मार्कस ऑरेलियस in जे न देखे रवी...
22 Mar 2018 - 10:23 am

प्रेरणा : यारहो ...

दादाश्रींची विनम्र माफी मागुन ..... अर्ज़ किया है ....

ह्या उन्हाचा जोर आहे वाढलेला यारहो
शोधुया नजदीक साधा एक बियर बार हो

ड्रॉट ज्या त्या ब्रॅन्ड्ची तिथलीच बॉटल चांगली
पण अता चालेल काही फक्त असु दे गार हो

मागवा चकली चना अन हाफ चीकन तंदुरी
कावळ्यांना भूक आहे लागलेली फार हो

ती म्हणाली सोड तू जमणार नाही आपले
दावले "जमवून" मग "ठरवून" वारंवार हो

एकदा केसांस वेडे मोकळे सोडून बघ
नेत्रसुख असती गडे हे झाकले उभार* हो

विडंबनगझलgajhalअनर्थशास्त्रअभय-गझलआता मला वाटते भितीकाहीच्या काही कवितागरम पाण्याचे कुंडजिलबीफ्री स्टाइलविराणीशृंगारस्वरकाफियाहझलशांतरस

म्हणून हा पाऊस मला आवडत नाही.....

पराग देशमुख's picture
पराग देशमुख in जे न देखे रवी...
27 Jan 2017 - 7:26 pm

अजून एक काव्यकथा घेऊन आलोय,
अजून एक हृदयव्यथा घेऊन आलोय.
वेदना जुनीच...,
पावसामुळे पुन्हा फुललेली,
कॉफीच्या वादळासह,
पुन्हा मनात सललेली.

अंगणभर पसरलेला पाऊस, कुंपणाशी गुंतलेला गारवा,
उंच भिंतीच्या आडोशाला, गारठलेला पारवा |
गारठलेला मी, अन् थिजलेल्या स्मृती,
जुन्या जखमा पालवण्याच्या, पावसाच्या या जुन्याच रिती ||
म्हणून हा पाऊस मला आवडत नाही.....

कथाकविताप्रेमकाव्यमुक्तकप्रतिशब्दशब्दक्रीडासाहित्यिकprayogकविता माझीकाहीच्या काही कविताप्रेम कविताफ्री स्टाइलभावकवितामुक्त कविताविराणीकरुण

अंतरे

परिधी's picture
परिधी in जे न देखे रवी...
5 Dec 2016 - 3:43 pm

कधी उमलत्या फुलांची उडून गेली अत्तरे,
सोबतीच्या क्षणांची कशी झाली एवढी अंतरे?

प्रश्न करून पोरके का निघून गेली उत्तरे,
घेतला निरोप ज्या ठिकाणी, का सुन्न तिथले सारे?

तू जाता सांग का आठवणींचे मृगजळ पाझरे
वेचले जिथे मोती, का उद्विग्न आज ते किनारे?

तुझ्या येण्याने कधीकाळी बहरली जी शहरे,
परतून तू जाता घरी,का अनोळखी वाटते मला सारे?

कविताविराणी

प्रेम....?

Bhagyashri satish vasane's picture
Bhagyashri sati... in जे न देखे रवी...
7 Nov 2016 - 6:40 pm

भेटत....ती पण नाही,
भेटत....मी पण नाही...
निभवणे तिला जमत नाही,
आशेवर ठेवणे मला पटत नाही.
फसवत ती पण नाही,
फसवत मी पण नाही...
तिला रुसण्याचे दु:ख आहे,
मला एकटेपणाची भीती आहे...
समजत...ती पण नाही,
रागवत... मी पण नाही...
कुठल्यातरी वाटेवर
भेट होत असते नेहमी
बघत... ती पण नाही...
थांबत... मी पण नाही...
जेंव्हा पण बघतो तिला,
ठरवतो काहीतरी बोलेन तिच्याशी...
ऐकत... ती पण नाही,
सांगत.. मी पण नाही...
पण एक गोष्ट मात्र खरी आहे,

रेखाटनविराणी

मनाचा एकांत - काळे पाणी

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
30 Sep 2016 - 7:55 am

अंदमानातले काळे पाणी,
कोलूबेड्याहंटरकदान्न
सोबत तीव्र अपमानाचा overtime !
साम्राज्याचा उग्र दर्प अन
देशाने केलेली प्रेमळ उपेक्षा.......
असे सगळे, अन वरती थोडी
जयहिंदची जाळी !

या जीवघेण्या विषाणूजिवाणूंमध्येही,
काही काही रक्तांचे
malnourishment कि काय ते झालेच नाही!
उलट,
तुरुंगाच्या अजस्त्र काळभिंतीही
त्यांच्या जहालहळव्या लेखणीने
cultured झाल्या!
मातृभूमीच्या मृत्युंजय विरोत्तमांसाठी,
.
.
.
दुसरं काय होता
एकांत म्हणजे तरी!

- शिवकन्या

धोरणमांडणीवावरसंस्कृतीधर्मइतिहासवाङ्मयकवितामुक्तकसाहित्यिकसमाजराजकारणअविश्वसनीयकविता माझीकालगंगाभावकवितामुक्त कविताविराणीवीररस

बाई सोडून गेली

नीलमोहर's picture
नीलमोहर in जे न देखे रवी...
18 Apr 2016 - 10:13 am

अवचित ते घडले, जणू आभाळ फाटले, धरणी कंपली
एक सुनामी आली की जगबुडी झाली,
अन बाई सोडून गेली

किती केली विनवणी, तिज आमिषेही दिली
पाषाणहृदयी त्या बालेला परि दया जराही न आली
अन बाई सोडून गेली

म्हणे तुम्हास बाई मिळेल दुसरी, जर शोधाशोध केली
जीव माझा जरी गेला, काळजी का कोणा इथे वाटली
अन बाई सोडून गेली

तरी बयेस कधी न कामास जुंपले, कायम लाडीगोडी केली
तऱ्हा तिच्या सांभाळत, आंजारत गोंजारत कामे करून घेतली
तरीही बाई सोडून गेली

मुक्तकसमाजऔषधोपचारअनर्थशास्त्रअविश्वसनीयविराणीसांत्वनाकरुण

जर्जरी वार्धक्य माझे

तिमा's picture
तिमा in जे न देखे रवी...
7 Feb 2016 - 7:53 pm

जर्जरी वार्धक्य माझे तू पहाटे गोंजरावे
जीर्ण काया, क्षीण माया, तू जरासे थोपटावे
लागुनी थंडी कहारी, खोकल्याची उबळ यावी
हे प्रिये तू मज जरासे मधुविलेपन चाटवावे
श्वास माझा लागलेला म्रुत्युची चाहूल भिववे
आर्जवी स्पर्शात तूही मज जरासे सावरावे
दे मला आधार मांडी, जीव माझा कोंडताहे
मी तुला जागे करावे परि स्वत: निसटून जावे.

कविताविडंबनvidambanभावकविताविराणी