टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
हे ठिकाण
एक नीरीक्शन
प्रेषक नन्या ( शनी, ०५/१०/२००८ - १२:४२) .मी नन्या,
बरेच वेळा मीपा ला, पाहुणा आसतो.
पण नीरीक्शन असे की, सकाळी सदस्य बरेच पण पाहुणे कमी, दुपारी पाहुणे बरेच, सदस्य कमी. असे का?
मीपा चे हरवलेले गावकरी
प्रेषक सखाराम_गटणे ( शुक्र, ०५/०९/२००८ - ०७:४८) .मीपा हे ऐक गाव आहे. ह्या पारावर आल्याशिवाय काही करमत नाही. आणी गावकरी मन्डळिन्ची सवय लागलि आहे. बरेच लोक या पारावर आली नाहीत,
आपण त्यान्ची चौकशी केलि पहीजे. ते का येत नाहीत, काही अडचण आहे का?
हा धागा आपण हरवलेले गावकरी शोधण्यासाठी वापरुया. ज्याला कोणाला आठवण येत असेल, त्याने त्या गावकरी चे नाव टाकावे, ज्याला कोणाला तो गावकरी म्हाहीत आहे, त्याने माहीती द्यावी.
मी बरेच दिवस 'सन्जोपराव' यांना मीपावर बघितले ना?
ऑफीस मध्ये झोप येऊ नये म्हणून काही उपाय आहेत का?
प्रेषक ऋचा ( गुरू, ०५/०८/२००८ - १३:५६) .ऑफीस मध्ये दुपारचे जेवण झाले की झोप न यायचे काही उपाय ...
(बाहेर जायचा उपाय सांगू नका खुप ऊन असतं..
(खुप झोप अलेली मी)
अक्षय तृतियेच्या दिवशी काय ठरवले नविन करायचे??
प्रेषक ऋचा ( बुध, ०५/०७/२००८ - १०:०४) .आज साडे तीन मुहुर्तां तील एक मुहुर्त आहे.
आज दान करतात . पुण्य लाभतं पाण्याचं दान करुन ..
मिसळपाव वर काय आहे?
प्रेषक ऋचा ( सोम, ०५/०५/२००८ - १५:१०) .मी आत्ताच मिसळपाव वर सभासद झाले आहे.
इथे नक्की काय आहे?
मिपाचा सिंहगड कट्टा
प्रेषक इनोबा म्हणे ( रवी, ०४/२७/२००८ - ०१:४६) .मित्रहो, येत्या रविवारी दि.४ मे रोजी मिपाचा कट्टा सिंहगडावर भरवायचा मनसुबा आहे. या कट्ट्याचे मुख्य आकर्षण म्हणजे गडावर मोकळ्या हवेत मिपाच्या सदस्यांचा 'मुशायरा' आयोजीत करण्याचा विचार आहे. तरी या 'ऐतीहासिक कट्ट्यास' उपस्थित राहू इच्छिणार्या सदस्यांनी आपापली नावे/मते जाहिर करावी.
इच्छूकांनी आपले भ्रमणध्वनी क्र. कळवावे.
: ९३७२-९३७२-१८
मिपा, पुणे कट्टा...अचानक!!!
प्रेषक धमाल मुलगा ( शुक्र, ०४/२५/२००८ - १४:५७) .
मंडळी,
तुम्हा सर्वांना २२ मार्च रोजी झालेला पुणे कट्ट्याचा कार्यक्रम आठवत असेलच, नाही का?
ज्यांना येणं जमलं त्यांना तर नक्कीच. ज्यांना नाही जमलं त्यांना आपल्या बखरनवीस विजुभाऊ कलमदानेंच्या बखरीनं आपण काय चुकवलं ह्याची चांगलीच माहिती झाली!
इथं, मिपावर लिहिणारे काही तरल, काही वैचारिक, काही कवीमनाचे, काही उत्स्फुर्त, तर काही निव्वळ दंगेखोर नग एकमेकांस प्रत्यक्षात भेटले, चार गप्पा केल्या (आणि काही-काही उतमात घातला..) ह्याचं साग्रसंगीत वर्णन वाचून आणि ते वाचण्यापुर्वीही अशा अफलातून 'नगोत्तमांना' भेटण्याची मनिषा कित्येकांच्या ठायी आहे. त्यातलीच एक आमची प्राजुताई 
प्राजुताईच्या भारताभेटीमध्ये आणि कट्ट्याच्या तारखेमध्ये फक्त दोन आठवड्यांचा घोळ झाला होता. तिला बिचारीला इतकी इच्छा असुनही कट्ट्याला येणं जमलं नव्हतं.
मग तिने ठरवलं...हे असले निरुद्योगी धंदे कोण करतं? त्याला गाठायचा आणि जमतील तितक्यांना भेटायचं.
आता, आधिच्या कट्ट्याच्या जाहिरातबाजीमुळे "भडकमकरर्स क्लासेसच्या" "इव्हेंट मॅनेजमेंट" चा ऍडव्हान्स कोर्स करणार्या 'धमाल मुलगा' ह्याचं नाव तसं मिपागावात आणि ग्रामपंचायतीमध्ये झालं होतं. अनायसे प्राजुताईला एक इव्हेंट म्यानिजर मिळाला. तीने छानपैकी आधीच धमाल्याला फोन-बीन करुन त्याची 'ऍव्हेलॅबिलिटी' पाहिली. हो! आधीच्या 'भर उन्हाळ्यातल्या सुखद पावसाळी' इव्हेंट असाईनमेंटमुळे धमाल्याला बर्यापैकी कामं मिळायला लागली आहेत आता 
धमाल्यानेही 'चला, अजुन एक गिर्हाइक मिळालं आणि एक इव्हेंट पदरी पडलं' असा विचार करुन होकार भरला.
काही जुजबी फोनाफोनी करुन धमाल्याने मंडळींना गोळा करायला सुरुवातही केली.
ह्याचा घटनाक्रम काहीसा असा:
शुक्रवार तारिख.१८ एप्रिल: आपले गज़लसम्राट चित्तरशेठ, आणि विडंबन बादशहा केशसुमार ह्यांनी आयोजित केलेला गज़लवाचनाचा कार्यक्रम. स्थळ: भरत नाट्य मंदीर, वेळः रात्रौ १५:४५ ते ०१:०० दरम्यान.
केशवसुमारांचे इव्हेंट मॅनेजमेंटचे कौशल्य पाहून धमाल्याने त्यांच्या खांद्यावर दिली बंदूक ठेऊन.म्हणाला, "शेठ तुम्ही कार्यकारिणीचे अध्यक्ष व्हा, आणि मी मुख्य कार्यकारी अधिकारी."
केशवसुमारः अरे, पण आपण भेटणार कुठे? काटा किर्रर्र... ला जाऊया?
धमाल्या: (डोळे उर्ध्वदिशेला लाऊन, झुरका घेत) च्छ्या: तिथं मांजराच्या पिल्लालातरी बसायला जागा असते का?
के.सु.: मग? टिळकरोडचं संजीवनी चालेल? तिथे नसते गर्दी!
धमाल्या: मिसळ चांगली मिळते का?
के.सु.: आयला, असं करु, काटा किर्रर्र मधून पार्सल उचलू आणि पेठकरकाकांच्या घरीच जाऊ!
धमाल्या: हॅ: कोणाच्या घरी कसं जायचं असं? पोरांना लाजल्यागत होइल ना!
असं करता करता, पक्कं काहीच होइना! मग 'देखते है कल, जो होगा सो होगा' असं म्हणून ही मिटिंग मोडली. त्यानंतर रात्री एक-दिडच्या सुमारास धम्याला साक्षात्कार झाला की आज दिवसभरात आपण काहीच खाल्लेलं नाही..मग काय..सगळ्या गाड्या सुसाट 'साईबा' ला. मस्त कोल्हापुरी थाळी चापून घरी पोहोचेस्तोवर ४! धम्या 'घोडे बेचकर' छबो करुन पडला.
शनिवार, तारिख १९ एप्रिल, स्थळः धम्याचं घर.
पहाटे पहाटे ११ वाजता जेव्हा तो जागा झाला तेव्हा मोबाइलचं मुखदर्शन करायच्या सवयीनं त्याने मोबाइल घेतला आणि जाग्यावर उडालाच. टोटलमध्ये ११ मिस्ड कॉल्स...जगदंब...
झोप बीप सगळी गायब. पटकन प्राजुताईला फोन लावला...
धम्या: हॅलो प्राजुताई...
प्राजुताई: अरे...आहेस कुठे? किती फोन करायचे तुला?
धम्या: (ओशाळवाणं) झोपलो होतो.
प्राजुताई: लाज वाटते का? वाजले किती पाहिलंस? काय ठरलं? कधी, कुठे भेटायचं?
धम्या: फक्त १५ मिनिटं दे...सगळं सांगतो.
लगेच धम्यानं केसुशेठला फोन लावला...
धम्या: सायबा, कुठे जमायचं? डेक्कन बिक्कन बघा.. प्राजुताईला फार लांब येणं जमायचं नाही.
केसु: वाडेश्वर फायनल करुन टाका!
धम्या: बेष्ट! पोहोचा तिथे १२-१२:३० पर्यंत...बाकीच्यांना तोपर्यंत गोळा करुन आणतो 
मग रिवाजाप्रमाणे फोनाफोनी करुन पेठकर काका, इनोबा,नीलकांत, विवेकवि आणि छत्रपती ह्यांना निमंत्रण धाडली.
कसंबसं आवरुन १२:२५-१२:३० दरम्यान वाडेश्वरी पोचला. तिथे आधीच केसुशेठ, प्राजुताई, विवेकवि आणि छत्रपती हजर होते. थोड्याच वेळात इनोबा आपल्या मिसळपाव डाट काम च्या विश्वकर्मा नीलकांत ह्यांना घेऊन वाडेश्वरी थडकले!
कोरम तर भरला होता, फक्त कमी होती ती बल्लवाचार्य पेठकर काका ह्यांची!
काही मिनिटांत धमाल्याच्या मोबायलावर पेठकरकाकांचा फोन आला...अंदाजानंच धम्यानं गेटाकडे पाहिलं आणि नजर भिरभिरवत शोधणार्या भारदस्त पेठकर काकांना बरोब्बर ओळखलं.
काकाही आले....येता येता 'वाहतुक नियमन' नावाखाली हैदोस घालणार्या दोन शिपुरड्यांना हग्या दमही भरुन आले. नाही म्हणलं तरी धम्याची चिवचिव काकांना बघून आणि हा किस्सा ऐकून काही वेळ बंद पडली.
आता कट्टा रंगायला लागला होता.हळूहळू एकेक विषय निघत होते...पेठकर काकांनी मधून अधून टाकलेल्या कोट्यांमुळे खसखस पिकत होती..हे बघून धम्याचीही भिती जरा ओसरली..तोही चालू झाला 
जिच्यासाठी केला होता हा अट्टाहास, ती प्राजुताई, तीही मस्त गप्पा टप्पा करत होती...काय बडबडी आहे आमची प्राजुताई...मजा येते बॉ! जोडीला तिने अमेरिकेतून आणलेली चाकलिटं हाणणंही चालू होतं.
येणारे डायलॉग्ज शांतपणे ऐकून त्यावर मधूनच एखादा बाऊंसर टाकण्याचं महत्कार्य केसुशेठ नेहमीप्रमाणेच निभावत होते.
असा सगळा सुखसंवाद चालू असताना आत्मानंद आश्रमाचे संस्थापक आपले तात्याबा महाराज कट्टाभेटीसाठी मोबाइलवरुन सुक्ष्मरुपाने अवतिर्ण जाहले. सर्वांची ख्यालीखुशाली विचारुन तात्याबा अचानक अंतर्धान पावले.
ह्या सगळ्यामध्ये हळूहळू सगळ्यांना पोटातल्या कावळ्यांची कावकाव ऐकू येऊ लागली होती. मिसळपाव धर्माला जागून सगळ्यांनी मिसळपावच खाण्याचे ठरवले. पेठकरकाकांना सध्या मसालेदार चालत नसल्याने त्यांनी 'सॉल्टेड लस्सी' मागवली.
"ही सॉल्टेड लस्सी अतिशय आंबटढॅण असुन बहुधा करणारा नुकताच दांडीयात्रेहून आला असावा अशी शंका घेण्याइतकी लस्सी सॉल्टेड आहे" असा काकांचा अभिप्राय ऐकल्यावर मूढ धम्याच्या बथ्थड तोंडाकडे बघून काकांनी स्पष्टीकरण दिले की 'बहुतेक स्वीट लस्सी मार्केट करायची ही वाडेश्वरी युक्ति असावी"
तोपर्यंत मिसळही टेबलावर पोचली होती..आणि थंड अमेरिकेतून गरम भारतात आणलेल्या वितळलेल्या चॉकलेट्सकडे करुण नजरेने पाहणार्या धम्याच्या डोक्यात किडा वळवळला..इतका वेळ झाला पण आपण प्राजुताईला छळलेलंच नाहीय्ये !!!!
मग काय,
"प्राजुताईच्या प्लेटमधल्या मिसळीवर हे चॉकलेट आपण पसरवू म्हणजे ते छान लागेल.." असं धमाल्या म्हणाल्याबरोबर प्राजुताईला अगदी म्हणजे अगदीच ईईईईईईई...असं झालं....
पेठकरकाकांनीही धम्याला दुजोरा देत "चॉकलेट मिसळ" असं नाव सुचवलं आणि मिपाच्या पा.कृ.मध्ये रेशिपी टाकायची जबाबदारी घेतली!
ह्यावर तर कसंनुसं झालेला प्राजुताईचा चेहरा अग्गदी फोटोलायक होता....मठ्ठ धम्या...हा फोटो घेतलाच नाही!
छत्रपति नेहमीप्रमाणे खाण्यात दंग, तर विवेकवि आपल्याच विश्वात बुडालेले...
इनोबांना भर कामातून ओढून आणलेलं त्यामुळे ते त्या विचारात आणि विश्वकर्मा नीलकांत सगळ्यांचं पाणी जोखत बसलेले...
शेवटी खाऊन झाल्यावर नाईलाजाने तिथून निघणं क्रमप्राप्त होतं.
पुन्हा लवकरच भेटायचं ठरवून सगळ्यांनी एकमेकांची रजा घेतली.
असा हा कट्टा अचानक ठरुन अचानक पार पडला.

डावीकडूनः विवेकवि,केशवसुमार,प्राजु,प्रभाकर पेठकर,छत्रपति,नीलकांत,इनोबा म्हणे.

धमाल मुलगा,छत्रपति,नीलकांत,इनोबा म्हणे.
माझा ताटवा...
प्रेषक प्राजु ( शुक्र, ०४/२५/२००८ - ११:५७) .मंडळी,
बुधवारी पहाटेच आमचे आगमन आमच्या माहेरी म्हणजे करवीर नगरीत झाले. पहाटे ३.३० ला आम्ही आमच्या मुक्कामी दाखल झालो. घरी पोहोचताच आईने आमच्यावरून्(मी आणि माझा छोटा) भाकर तुकडा ओवाळून टाकला आणि आम्हाला घरांत घेतलं. आल्या आल्या घरातल्या लोकांबरोबरच कुत्री, मांजरी यांच्याशीही गाठीभेटी झाल्या आणि त्यांच्या मूक मायेनं मन खरंच भरून आलं. सगळ्यांसाठी आणलेल्या वस्तू बॅगेतून काढून दिल्या.. ..माझी झोप तर उडालीच होती त्यामुळे घरच्यांना (खरंतर आईलाच) झोपू देणार नाही असं सांगून टाकलं. आणि मग इथे येण्याच्या आधी काय काय धमाल चालू होती माझी.. रेडीओवर काय काय घोळ घालते आहे.. आजारी कशी पडले.. यथोचित वर्णन करून सांगून झालं. हे सगळं होईपर्यंत ५.०० वाजले होते आणि उजाडायला लागलं होतं. थोडी फ्रेश होऊन अंगणात आले.
खूप दिवसांनी माझं अंगण पहात होते तेही भल्या पहाटे. खूप बरं वाटत होतं.. एकेक प्रसंग आठवत होते. सहजच पाठिमागे बागेत गेले. पहाते तर काय.. मी लावलेल्या झाडांना सुंदर फुलं आली होती. कणेरी, जास्वंदी, स्वस्तिकाची फुलं... आणि पहाटेच्या त्या रम्य वेळी ती इतकी सुंदर दिसत होती.. वातावरण मायेनं भरून गेलं होतं. असं वाटत होतं, की हि सगळी फुलं मला म्हणताहेत," कशी आहेस गं? बघ, किती दिवसांनी भेटलीस. त्या तुझ्या दुनियेत अनेक रंगिबेरंगी फुलं पहात असशिल.. पण आमची आठवण येते का गं तुला? " मी लावलेल्या, जोपासलेल्या, त्या झाडांना इतक्या देखण्या रूपात पाहून काय करावं आणि काय नको असं झालं होतं. मनामध्ये दाटून आलेली ही हूरहूर मोकळी व्हावी म्हणून कॅमेरा घेऊन आले आणि त्या फुलांचे हसू टिपू लागले. फोटो काढता काढता एका छोट्याशा ३-४ फूट उंच अशा नारळाच्या झाडाजवळ आले. मंडळी, हे रोपाची गंमत अशी.. की एकदा आईने नारळ फोडून दे असं सांगितलं मला. तेव्हा कोठीच्या खोलीतून एक नारळ घेऊन आले. तो सोलला.. पहाते तर त्याला एक कोंब आलेला दिसला. मी तो नारळ तसाच एका मोठ्या पातेल्यात पाणी घेऊन ठेवून दिला. आणि नंतर मी माझ्याच नादात ते विसरूनही गेले. साधारण १५ दिवसांनी मला त्याची आठवण झाली आणि मी खाली जाऊन पाहिलं. चक्क त्या कोंबातून दोन इवली इवली ,नाजूकशी, नितळ हिरव्या रंगाची, निमूळती.. अंगावर रेषा असलेली पानं .. माझ्याकडे पहात होती. ती थोडी मोठी झाल्यावर मी तो नारळ बागेत लावला. पण महिन्याभराने ती पानं मरून गेली. मी निराश झाले होते. त्यानंतर काही दिवस असेच गेले. आणि पुन्हा त्यातून दोन पानं आली... आणि पुढे कित्येक दिवस ती दोनच पानं होती. आणखी पानं येण्याचं नावचं नाही. माझं लग्न झालं तेव्हा जेमतेम ३ पानं होती त्या रोपाला.. जरा मोठी होती इतकंच. त्यानंतर जेव्हा जेव्हा माहेरी आले तेव्हा तेव्हा त्या झाडामध्ये मला फारसा बदल जाणवलाच नाही. आणी आज मात्र ते चांगलं ३-४ फूट उंच जाणवलं... हे माझं झाड. मला ते जणू सांगत होतं ,"बघ, मी किती मोठा झालो... !"
दुसरं झाड म्हणजे कदंबाचं. बागेत जेव्हा मी रोपं लावत होते तेव्हा हे असं आपोआप आलेलं. त्याची पानं सिमेट्रीकल होती आणि चांगली मोठी होती. झाड मोठं झाल्यावर सावली चांगली येईल या विचारने ते तोडून नाही टाकलं. पण ते इतकं भराभर वाढलं की, त्याचा कधी वृक्ष झाला हे समजलंच नाही. आणि एकदा एक स्नेही आमच्याकडे आले होते त्यांच्याकडून समजलं की हा कदंब आहे.
हा वर्षातून एकदाच फुलतो. याचं फुलही गमतीदार असतं बरं का..! म्हणजे दिसताना ते फळासारखं दिसतं आणि त्यावर छोटे छोटे तुरे असतात. आणि एखाद्या चेंडूवर सुवर्णाने भरतकाम करावं तसं ते देखणं फुल मन मोहवून टाकतं. श्रीकृष्ण त्याखाली उभा राहून बासरी वाजवत होता अशी कथा पुराणात सांगतात. खरंतर सुवर्णाच्या त्या विलक्षण शृंगाराने नटलेल्या वृक्षाचा मोह त्याला पडला नसता तरच नवल! पहा ना, नेमका मी येण्याच्या वेळीच हा कदंब नटून, सजून उभा रहावा!! माझ्या या सख्यांनी माझ्यावर किती माया करावी??? त्यांच्या मूक प्रेमानं मी गुदम्रून गेले. मन कुठे मोकळं करावं? आपल्या लोकांजवळचं मन मोकळं करावं या विचारानं हे फोटो इथे देण्याचा माझा खटाटोप. मी कोणी निष्णात फोटोग्राफर नाही पण तरिही या माझ्या चिमुकल्यांना मी कॅमेर्यात बंद केलं. पहा बरं माझे जीवलग मित्र आणि मैत्रिणी कशा वाटतात तुम्हाला??
कणेरी

स्वस्तिकाची फुले

जास्वंदी

कदंबाचं फुल

ंबहरलेला कदंब

बहरलेला कदंब २

माझा ताटवा माझ्या मनात नेहमीच असा बहरत आणि दरवळत राहिल.
- प्राजु
भगीरथाचे वारस!
प्रेषक प्रमोद देव ( शुक्र, ०४/२५/२००८ - ०९:५९) .पाणी म्हणजेच जीवन असे आपण म्हणतो. पण आपल्याला मिळणारे पाणी कुठून येते? कसे येते? वगैरे प्रश्न आपल्याला कधी पडलेत काय? पडले असल्यास त्याची माहिती आपण कधी मिळवण्याचा प्रयत्न केलाय काय? काही अपवाद सोडल्यास आपण एकूण सगळेच जण त्याबद्दल फारसा विचार कधी करत नाही हेच खरे; मग पाण्याचा अभाव, म्हणून पडणारा दुष्काळ, दुष्काळपीडित लोक, त्यांच्यासाठी रोजगार हमी योजना वगैरे सारखी चालणारी सरकारी कामे वगैरेबाबत आपण कधी विचार करत असू असेही वाटत नाही. ह्याला कारण म्हणजे शहरी भागात न जाणवणारी पाण्याची टंचाई. त्याच्या उलट परिस्थिती खेड्यापाड्यात असते. विशेषतः उन्हाळ्यात, नदी, नाले, ओढे आटलेले असतात आणि मग तिथल्या आया-बायांना मैलोन-मैल पाण्यासाठी भटकावं लागतं; हे सगळे आपण वृत्तपत्रात वाचत असतो पण तरी त्याची म्हणावी तशी धग आपल्याला जाणवत नाही हेच खरे. अधेमधे कधी जलवाहिनी दुरुस्तीसाठी अथवा तलावात पाण्याचा साठा कमी आहे म्हणून काही टक्के पाणी कपात वगैरेची घोषणा महानगरपालिकेकडून झाली की आपल्याला त्याची तीव्रता कळते पण ती तेव्हढ्यापुरतीच असते.
पण ह्या जगात सगळेच काही आपल्यासारखे आत्मकेंद्रित आयुष्य जगणारे नसतात. पाणी सद्या जितक्या प्रमाणात आपल्याला उपलब्ध आहे त्याचा जर योग्य पद्धतीने आपण वापर आणि वाटप नाही केले तर भविष्यात पाण्यावरून युद्धे होतील असा गर्भित इशारा काही तज्ञांनी दिलेला आहे हे आपण वाचलेही असेल. काही लोक नुसतेच इशारे देतात, पण काही लोक केवळ इशारे देऊन स्वस्थ बसत नाहीत तर त्यावर तोडगा शोधण्यासाठी अविरत धडपडतात. त्यासाठी आपले आयुष्यही पणाला लावतात. अशाच पैकी एक आहेत 'पाणी पंचायत' चे विलासराव साळुंखे.
मुळातच पाणी पंचायत हा काय प्रकार आहे हे जाणून घ्यायचे असेल तर मग आपल्याला विलासरावांचा सगळा जीवनप्रवास माहिती करून घ्यायला हवा. पाणी अडवा,पाणी जिरवा, पाणी साठवा आणि त्याचे समान वाटप करा... थोडक्यात..पाण्याचे सुयोग्य नियोजन करणे असा जणू मंत्रच आहे विलासरावांच्या कार्याचा. वर म्हटल्याप्रमाणे खेड्यापाड्यात उन्हाळ्यात पाण्यासाठी होणारी परवड पाहिली आणि मग विलासरावांचे विचारचक्र सुरू झाले. त्यातून मग ह्या समस्येचा त्यांनी कसून अभ्यास केला तेव्हा लक्षात आले की सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडूनही महाराष्ट्रातला कैक भाग हा दुष्काळग्रस्त आहे. पावसाचे पाणी नदी,नाले -ओढ्यांतून वाहत जाऊन समुद्राला मिळते हे त्याचे एक कारण. दुसरीकडे जिथे हे पाणी मोठमोठ्या धरणात साठवले जाते त्याचे काय होते? ह्या प्रश्नाचा पाठपुरावा केल्यावर लक्षात आले की सरकारी योजनेमुळे ही जी मोठमोठी धरणे बांधली गेली त्याचा जास्तीत जास्त फायदा हा त्या त्या ठिकाणच्या सधन शेतकर्यांनाच झालाय. त्यातूनच भरपूर पाणी लागणारे ऊसासारखे पीक घेतल्यामुळे इतर लोकांपर्यंत पाणी पोचतच नाही. धरणाच्या आसपास असणारे शेतकरीच त्या पाण्याचे लाभार्थी ठरतात आणि इतरजण पाण्याअभावी शेतीच करू शकत नाहीत. म्हणजे एका मर्यादित भागाचा विकास तर बाकी सर्व भकास!
दुष्काळ निवारणार्थ सरकारने हाती घेतलेली पाझर तलाव निर्माण वगैरेसारखी कामे कशी चालतात. त्यात काय फायदे/त्रुटी आहेत वगैरे गोष्टींचा साधकबाधक अभ्यास त्यांनी केला. ह्यातूनच काही धडा घेऊन विलासरावांनी आपली योजना तयार केली. त्यात जमेल तिथे पाणी अडवण्यासाठी छोटे छोटे बांध बांधणे,पाणी साठवण्यासाठी तलाव सदृश खड्डे खणणे,जेणेकरून पावसाचे जास्तीत जास्त पाणी अडवता येईल असे धोरण आखले. अडवलेले,साठवलेले पाणी मग सर्वांना समान वाटून देणे. कमी पाण्यात होणारी पिके घेणे ... हे सगळे कसे करायचे त्याबद्दल योजना आखल्या. हे सगळे एकट्याच्या बळावर करणे वाटते तितके सोपे नाही म्हणून स्थानिक लोकांशी बोलून,त्यांना ह्या गोष्टीचे महत्त्व पटवून त्यात सहभागी करून घेतले. अर्थात हे काम इतक्या सहजतेने झाले नाही. कारण जे आजवर शक्य झाले नाही असले स्वप्न दाखवणारा हा माणूस खरंच काही करून दाखवू शकेल काय? आणि त्यात त्याचा काय स्वार्थ दडलाय? असे काही प्राथमिक प्रश्न तिथल्या स्थानिकांना पडणे स्वाभाविकच होते. पण अडून राहण्याचा विलासरावांचा स्वभाव नसल्यामुळे जे आले त्यांना बरोबर घेऊन त्यांनी काम सुरू केले. ह्या संबंधीचा पहिला प्रयोग त्यांनी पुरंदर तालुक्यातील नायगाव ह्या दुष्काळी गावामध्ये केला. तो कमालीचा यशस्वी झाला.तिथे निर्माण झालेली हिरवीगार शेती, वनसंपदा पाहून जो तो त्या प्रकल्पाला भेट द्यायला येऊ लागला आणि मग ह्यातून पुढे सुरू झाली पुढची वाटचाल,पुढली चळवळ!
मंडळी हे जितक्या सहजतेने लिहिले तितके सहज झालेले नाही. ही चळवळ पुढे कशी गेली, त्याला किती यश आले,सरकारने ह्या असल्या प्रयोगांना किती आणि कसे साहाय्य केले अथवा नाही. त्या त्या वेळच्या सत्ताधार्यांनी, विशेषतः लोकनेते म्हणून गाजलेल्यांनी कसा/किती प्रतिसाद दिला, लोकांनी ह्या चळवळीला किती उचलून धरले,विरोध केला हे सर्व जाणून घ्यायचे असेल तर मुळातूनच "भगीरथाचे वारस" हे वीणा गवाणकर लिखित पाणी पंचायतच्या विलासराव साळुख्यांच्या कार्यासंबंधीचे सचित्र कथन वाचायला हवेय.
पेश्याने विद्युत अभियंता असणारे विलासराव एक यशस्वी उद्योजक म्हणून प्रसिद्ध होते. परंतु आधी काही दिवस आपला व्यवसाय सांभाळून आणि नंतर आपली पत्नी आणि विश्वासू सहकारी यांच्यावर उद्योगाची जबाबदारी सोपवून पूर्णपणे त्यांनी ह्या कार्याला वाहून घेतले आणि हे करतानाच देह ठेवला.त्यांची ही कहाणी मुळातूनच वाचण्यासारखी आहे.
भगीरथाचे वारस
लेखिका: वीणा गवाणकर
राजहंस प्रकाशन,पुणे.
किंमत १६०रू.
~विजुभाऊ द-रसिकलाल 'चहा' आणि व्यंकटराव ह्या दोघांना....वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा~
प्रेषक धमाल मुलगा ( गुरू, ०४/२४/२००८ - १०:१६) .आपले विजुभाऊ, द-रसिकलाल, 'चहा'टाळ, मिपाच्या सुगरण ताईलोकांच्या अबाधित पाककृती विभागात घूसखोरी करुन त्यांच्यातील एक 'सुगरण्या' म्हणून वावरणारे, आमच्यासारख्या पोरासोरांमध्ये आमच्यापेक्षासुध्दा जास्त दंगा दंगा करणारे असा हा हरहुन्नरी 'मराठी शाळेत शिकलेला गुजराथी ख्रिश्चन' विजुभाऊ शॉ !
आज विजुभाऊंचा वाढदिवस!
विजुभाऊ......वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
तुम जियो हजारो साल...साल के दिन हो पचास हजार... और लिख्खो लाखों बार!!!
अहो काय योगायोग पाहा. आज व्यंकटराव ह्यांचा पण वाढदिवस आहे.
तेव्हा त्यांनाही खूप खूप शुभेच्छा!
