user

प्रतिक्रिया

क्रिकेट वेळ वाया घालवून बघण्याचा खेळ आता उरला आहे का?

दिवसेंदिवस क्रिकेट खेळात होत असलेला गोंधळ ,रडीचा डाव ,मँच फिक्सिंग,भ्रष्टाचार यामुळे क्रिकेट वेळ वाया घालवून बघण्याचा खेळ आता उरला आहे का?

प्रिय राहूल देशपांडे,

प्रिय राहुल देशपांडे,

(केवळ वयाने मोठा असल्यामुळे) अनेक आशीर्वाद,

मी तात्या अभ्यंकर. तुझा एक चाहता. तुझ्या गाण्यावर लोभ असलेला. साक्षात वसंतरावांचा नातू म्हणून तुझं खूप कौतुक असलेला. वसंतरावांच्या आणि कुमारांच्या गायकीचा एक छान ब्लेन्ड आहे तुझ्या गाण्यात. मुकुल कोमकलींसारख्या अवलियाचा तू शागिर्द. जे काही गातोस ते सुरेल गातोस, लयदार गातोस. एका बड्या खानदानी गवयाचा नातू म्हणून कुठेही दुराभिमान नाही, बडेजाव नाही, की त्यांची कुठे भ्रष्ट नक्कल नाही. स्वत:च्या बुद्धीने गातोस, कसदार गातोस, जमून गातोस.

तीनेक वर्षांपूर्वी प्रथमच तुझी संपूर्ण मैफल मी ऐकली होती आणि दाद देण्याकरता हा लेखही लिहिला होता.. असो.

अभिषेकीबुवा आणि वसंतराव यांनी अमर केलेलं, मराठी संगीत रंगभूमीला नवसंजिवन देणारं, नवचैतन्य देणारं 'कट्यार..' तू करायला घेतलंस तेव्हा तर मला तुझा अभिमान वाटला होता, आजही वाटतो.. 'कट्यारच्या..' एखाददोन तालमींनाही मी हजर होतो..

पण.......

दोनच दिसांपूर्वी मी सहज म्हणून मी झी मराठी सुरू केला आणि मला दु:खद धक्का बसला. मराठी झी सारेगमप मध्ये तू चक्क परिक्षक?? इतकी कशी काय तुझी अधोगती? आणि ती ही अशी अचानक?

मान्य करतो, तिथे जी मुलं गायला येतात ती आपापल्या परिने गुणी असतात. संगीतात काही एक प्रयत्न करणारी असतात, धडपडणारी असतात. अरे पण तुला हे माहित्ये का?(माहिती असेलच नक्की) की तो केवळ एक संगीताचा बाजार आहे? तिथे परिक्षकांच्या मताला पूर्ण किंमत नसते. तिथे अर्धअधिक राज्य हे प्रेक्षकांच्या/श्रोत्यांच्या मतांचं असतं आणि पर्यायाने झी आणि आयडिया सेलच्या आर्थिक राजकारणाचं असतं..

सन्माननीय परिक्षक या नात्याने आणि न्यायाने तू तुझ्या सांगितिक ज्ञानानुसार, अनुभवानुसार एखाद्या स्पर्धकाची गुणवत्ता तपासणार.. परिक्षक या नात्याने जर तुला तो योग्य वाटला, तुझ्या पसंतीस उतरला तर तू त्याला 'क्ष' गुण देणार.. पण कुणीही चार आंडुपांडू श्रोते/प्रेक्षक दुस-याच एखाद्या स्पर्धकाला एसएमएस पाठवून '४क्ष' गुण देणार..!

मला सांग, यात काय राहिली तुझी किंमत? झी मराठी आणि आयडियाला त्या स्पर्धकांशी किंवा तुझ्या गुणग्राहकतेशी काहीही देणंघेणं नसून त्यांचा मतलब आहे तो त्या चार आंडुपांडूंनी पाठवलेल्या एसएमएसशी...!

राहुल देशपांडे म्हणजे नुसतं एक शोभेचं बाहुलं..?

अरे काय रे हे? केवळ एसएमएसच्या अर्थकारणाकरता जी स्पर्धा चालते किंवा जिचे निकाल मॅनिप्युलेट होऊ शकतात अश्या स्पर्धेचा तू एक परिक्षक?

कुणी म्हणेल - एसएमएस पाठवतो तो जनता जनार्दन..!

मान्य.. अगदी मान्य..! साक्षात नारायणराव बालगंधर्व त्यांचा उल्लेख 'मायबाप' असा करायचे..! पण जनता जनर्दनाचं काम दाद देण्याचं, कौतुक करण्याचं. गांभिर्याने जर एखादी सांगितिक स्पर्धा सुरू असेल तर स्पर्धकांना मार्क देण्याचा अधिकार फक्त आणि फक्त गुणवंत, जाणकार परिक्षकांचा..! केवळ एक बटण दाबून एसएमएस पाठवून जनता जनार्दनाला तो अधिकार प्राप्त झाला आहे असं तुला खरोखरच वाटतं का? (तसं वाटत असेल तर या माझ्या पत्राचं काही प्रयोजनच नाही.. मी हे पत्र बिनशर्त मागे घेतो आणि तुझी क्षमा मागतो)

अरे ती स्पर्धा म्हणजे लोकसभेची निवडणूक नाही की जिथे फक्त एक बटण दाबून मत देता येतं.. अत्यंत दुर्लभ अश्या गानविद्येची स्पर्धा आहे ना ती?

तू कसा काय असा झी मराठी आणि आयडियाच्या बरबटलेल्या सिस्टिमचाच एक भाग झालास?

अरे तेवढाच जर फावला वेळ तुझ्याकडे असेल तर स्वत:चं गाणं कर की.. खूप चांगला गातोस, अजूनही चांगला गाशील. वसंतराव, भीमण्णा, कुमार यांची नावं घेतली की संगीत म्हणजे 'स्काय इज द लिमिट..' हे मी तुला सांगायला नको.. कर की जरा चिंतनमनन. अजूनही कर की जरा मिळालेल्या तालमीचा वैचारिक आणि रियाजी रवंथ..!

दोन सूर धडपणे गाता आले नाही तर लगेच कालपरवाच्या पोरांची नसती कौतुकं, फजिल लाडावलेलं निवेदन, स्पर्धकांचे आणि त्यांच्या मायबापसांचे रुसवेफुगवे, सारी जाहिरातबाजी, शोबाजी असलेल्या आणि मुख्य म्हणजे एसएमएसच्या अर्थकारणाने बरबटलेल्या झीमराठी आणि आयडियाच्या वाममार्गाला कसा काय लागलास बाबा तू?!

तू एक उत्तम गवई आहेस, याचं कारण तू एक उत्तम शिष्य आहेस, गाणं टिपणारा आहेस..वसंतराव, कुमारजी, आणि अवलिया मुकुल शिवपुत्रांची परंपरा तुला लाभली आहे. मला सांग - वसंतराव, कुमारांनी केलं असतं का रे असं धेडगुजरी परिक्षकाचं काम? ज्यांना चिंतन-मनन करायला दिवसातले २४ तासही कमी पडत अश्या कुमारांचा वारसा ना तुझा?

मी पुन्हा एकवार स्पष्ट करतो की कुठलीच स्पर्धा वाईट नसते. गुणी मंडळींकरता ते एक आव्हानच असतं, प्रगती साधण्याचा तो एक मार्ग असतो. पण त्या स्पर्धकांची कलात्मक मूल्यं तपासण्याचा अधिकार फक्त आणि फक्त गुणवंत परिक्षकांचा. एसएमएस पद्धतीचा नाही, कधीही नाही, त्रिवार नाही..!

असो..

जे काही वाटलं ते मोकळेपणी लिहिलं.. वरील सर्व मतं माझी व्यक्तिगत मतं आहेत तरीही ती तुला कळवाविशी वाटली.. एक सामान्य श्रोता म्हणून मी नेहमीच तुझा चाहता राहीन. तुझ्या 'मुख तेरो कारो..'च्या यमनकल्याणचा, 'दीप की ज्योत जले..' च्या धनबसंतीचा नेहमीच भुकेला राहीन.!

तुझा,
तात्या.

श्री. श्री धमाल मुलगा यांचे अभिनंदन

आज काल मिपाचा दर्जा खुप खालवलाय म्हणे.. सारखे कैच्या कैच फुटकळ धागे येत असतात!!!!
मग अशा फुटकळ धाग्यात आम्हीही एक भर घालावीच म्हणतो. संपादक मंडळाला आमचा धागा उडवायचा पुर्ण अधिकार आहे याचे भान आम्हाला आहेच. पण मिपाच्या लेखनप्रकारात आम्हाला सद्भावना, शुभेच्छा आणि अभिनंदन असे लेखनप्रकार दिसले आणि आम्ही हा लेख लिहायची हिम्मत केली. (आता तुम्हाला म्हणून सांगतो, आम्हाला कळलंय की संपादक मंडळाला असे अभिनंदनाचे धागे आवडत नाहीत. कोण म्हणे रे तो आम्हाला कसे कळले??? अरे संपादक मंडळात राहुन अशा बातम्या कळत नाहीत रे भौ. त्यासाठी खास उपक्रमावर जाऊन रिकामटेकड्या लोकांचा खरडवह्या चाळ्यावा लागतात Wink. हो तिथे सध्या मिसळपाव उर्फ बालवाडी याच 'उपक्रमावर' चर्चा चालु असतात. कोणता आयडी खरा, कोणता खोटा यांची इत्यंभुत माहिती उपक्रमावर मिळते म्हणे Smile ) असो. आता नमनाला घडाभर तेल झालेच.

या लेखाचा उद्देश मिसळपाव वरच्या एका महान साहित्यिकाचे Tongue अभिनंदन करण्याचा आहे. ते महान साहित्यिक म्हणजेच सर्वांचे लाडके, मिपाचे भुषण असलेले रा.रा. धमाल मुलगा उर्फ बाबासाहेब देशमुख बारामतीकर. एssssss कोण ओरडलाय रे तिकडुन की धम्या ने एक पण कथा पुर्ण केली नाही? अहो, हा कथा वगैरे प्रकार बाबा देशमुखांचा नाहीच. त्यांचा सगळ्यात लाडका साहित्य प्रकार म्हणजे खरड. क्कॉय? तुम्हाला खरड हा साहित्य प्रकार माहित नाही? वाटलंच. मिपावर नवीन आहात. त्वरित परिकथेतिल राजकुमार यांना संपर्क साधा आणि "खरडवही-उचकपाचकः एक अभ्यास" या क्रॅशकोर्स ला अ‍ॅडमिशन घ्या!!

तर मंडळी आज आपण इथे जमलो आहोत धमाल मुलगा यांचा अभिनंदन करायला. अभिनंदन करायचे कारण काय??? सोप्पंय. त्यांचा खरडवहीत खरडींची संख्या आता २०००० च्या पार गेली आहे. आज जर एखाद्याने या खरडवहीचा अभ्यास केरुन पियेचडी करायची ठरवली तर नेमाड्यांचा खंडेराव पेक्षा नक्कीच जास्त वेळ लागंल. आणि त्या जोरावर तुम्ही चार काय? चाळीस भागाची एक कादंबरी नक्कीच लिहून काढाल.

काय काय नसते या खरडवहीत?? ऊन सावली प्रमाणे सुखदु:खाचा खेळ सुरु असतो, एकमेकांची चौकशी, विचारपुस असते, खुप दिवसांनी ऑनलाईन आलेला एखादा सदस्य वळवाच्या पावसासारखा बरसतो... कोटीकेसरी नंदन सारखा एखादा सदस्य ज्याने गेला दिवाळी अंक ते या दिवाळी अंक(?) एकही लेख लिहिला नसला तरी 'दिसामाजी काहितरी' म्हणत एखादीतरी कोटी करुनच जातात. प्रभु मास्तर येऊन एखादा दुसरा क्रिप्टिक टाकून सगळ्यांची दांडी उडवतात. टिंग्या हॅ हॅ हॅ करत सगळ्यांच्याच खवमधे उंडारत असतो. आक्रस्ताळी अदिती आपला विक्षिप्त पणा सगळ्यांचा खवमधे दाखवत असते. एवढेच काय, पण खरडवही मधुन वितंडवाद सुद्धा चालू असतात. अहो खंडेराव, तुमच्या उत्खननात तुम्हाला झेंड्यांची चड्डी सापडली नाही काय??? छ्या!!! झेंड्यांची चड्डी हा एतिहासिक वाद तुम्ही खव मधे वाचायलाच पाहिजे होता. असो. आता खंडेरावच्या जीवनावरच्या "खरडवही : एक समृद्ध अडगळीची" वाट पहा.

बरं, आता परत बाबा देशमुखांकडे वळूयात. तुम्ही जर मिपावर नवीन आहात आणि तुम्हाला वाटते की तुमच्या सहज २०००० खरडी होऊ शकतात तर तो तुमचा गैरसमज आहे. त्यासाठी आमच्या धम्यासारखा जनसंपर्क लागतो. अहो मिपावरच्या थोरामोठ्यांपासुन सगळ्यांचीच या खवमध्ये येजा दिसतेच. त्यासाटनं लै म्हेनत घ्याया लागतीया.. Smile गावपातळीवरचे खोटे नाटे राजकारण खेळाया लागतं, कोणाचीतरी ठरवुन टर उडवावी लागती... असे बरेच काही केल्यावर तुम्हाला २०००० चा टप्पा आपॉप गाठला जातो. पण कधी कधी कीव वाटते काही लोकांची जे या खरडवहीसारख्या महान ऐतिहासिक वारशाला पुसून टाकतात. असो तर आता आपण टॉप फाईव्ह खरडवाल्यांचे स्टॅटिस्टिक बघूयात म्हणजे एवढ्या खरडी टाकायला किती माकडं लागतील हे मिभोकाका सांगू शकतील.

धमाल मुलगा 20002 entries
आनंदयात्री 14046 entries
छोटा डॉन 12642 entries
बिपिन कार्यकर्ते 10918 entries
परिकथेतील राजकुमार 10307 entries

टवाळक्या संपवून शेवटी नेहमी सिरियस लिहित जावे असे म्हणतात म्हणुन आता उगाचच हा सिरियसपणा. एवढ्या खरडी लिहिण्यासाठी जेवढा वेळ या लोकांनी घालवलाय त्यात धम्याची शिकार आणि पोकळवाडी पुर्ण नक्कीच झाली असती. वायदेआझम डॉनरावांना ही पदवी द्यावीच लागली नसती. किंबहुना त्यांनी कबुल केलेले किमान ३० लेख पुर्ण झाले असते. आंद्या सारखा मस्त हळवा लिहु शकणारा माणुस आपल्याला अजुन हरवलेले सुख वाचायला देऊ शकला असता. बिकांनी मातीची माती न करता पुर्ण केली असती, तसेच आफ्रिकेतले अनुभव पण लिहून काढले असते. परा ने त्याच्या सगळ्या कथा पुर्ण केल्या असत्या. असो या झाल्या जर तर च्या गोष्टी. पण तुर्तास सगळ्यांनी धमाल रावांच्या खव मधे जाऊन त्यांचे अभिनंदन करायला विसरु नका हो...

born insomniac....! झोप हविये झोप....!

झोप नाही येत यार!
sometimes i feel like i am born insomniac!
बेड मध्ये जाण्याआधी असं वाटतं की आज तरी थोडा वेळ झोप लागेल्,,..पण नाही...सहज चुळबुळ म्हणुन घड्याळ पाहिलं जातं..रात्रीचे २-३० वाजलेले असतात...
असं वाटतं कि बराच वेळ गेला...आणि थोड्या वेळानी परत घड्याळ पाहिलं जातं ...२.१४...
का होतं आहे असं!
बरं दिवसा झोपावं तर कितीही प्रयत्न केला १५ मिनिटांपेक्षा जास्ती झोप लागतही नाही..
म्हणजे मला महिनोन महिने १-३ तास झोप पुरेशी होते आहे? is it so?
i need help friends!
असा निद्रानाश का होतो?
FYI..मी जास्ती विचारात असते/ चिंतेत असते( जाई आणि चिंता?????)
मग मी तो वेळ वाचण्यात्/गाणी ऐकण्यात तत्सम आवडते कार्यक्रम करण्यात घालवते.पण तरिही..असं का होतं? याचा विचार त्रास देत राहतो,
मित्रांनो,
प्लीज मदत करा..
झोप येण्यासाठी काय करावे?
प्लीज ...!

मैसूर

२ महिन्यापुर्वीच मैसूर - ऊटी ला जाउन आलो. तेव्हापसुन मनात होते की तिकडचे फोटु टाकावेत म्हणुन. पण मि पा वर इतकी उद्बोधक चर्चा चालु होती की उगा लोकांना डिस्टर्ब करावेसे वाटले नाही.

हा मैसूरचा प्रसिद्ध राजवाडा. ज्यानी राजस्थानमधले महाल पाहिले असतील त्यांना यात विशेष असे काही वाटणार नाही. पण राजवाडा छान जतन केलेला आहे. आणि इथली सर्वित्तम गोष्ट म्हणजे राजवाड्यातील तैलचित्रे. इतकी जिवंत तैलचित्रे मी आजवर इतर कोठेही पाहिलेली नाहीत. दुर्दैवाने आत कॅमेरा न्यायला बंदी आहे. त्यामुळे छायाचित्रण करता आले नाही. त्यामुळे राजवाड्याची फक्त बाहेरुनच छायाचित्रे काढुन समाधान मानावे लागले

वृंदावनचे पण फोटो टाकणार होतो पण का कोणास ठाऊक, २० वर्षांपुर्वी जे वृंदावन पाहिले होते ते हे नव्हेच असे वाटले. आता ती शान नाही उरली वृंदावनची. गणेशोत्सवात चिंचेच्या तालमीचे कारंजे पण त्याच तोडीचे असते. त्यामुळे असेल कदाचित पण काही विशेष नाही वाटले खरे.

वृंदावनने केलेली निराशा चक्क मैसूरचे प्राणिसंग्रहालय बघुन दुर झाली. आता झू बघुन खुष होण्याचे दिवस गेले खरे म्हणजे. माकड बघुन लहानपणी जे हसु यायचे ते पण येत नाही आता (मि पा ची कृपा. बरीच माकडे आहेत इथे. रोज आरसाही बघतो. त्याचाही परिणाम असेल कदाचित). पण मैसूर चा झू खरोखर अप्रतिम आहे. काही छायाचित्रे:

वरचा फोटो पुर्ण झूम लावुन काढलेला आहे. त्यामुळे क्लॅरिटी थोडी गंडली आहे.

वरच्या फोटोतला मिपाकर कोण हे ज्याचे त्याने ठरवावे Wink

लहानपणापसुन मैसूरचे सर्वात मोठे आकर्षण होते महिषासुराचा पुतळा. त्याचा हा पुतळा बघुन अंमळ थोडी निराशाच झाली. माझ्या कल्पनेतला हा पुतळा चांगला ५० -१०० फूट उंच आणि १०-१२ फूट रुंद होता. प्रत्यक्ष पुतळा बघुन पुतळ्याचा बोन्साय बघितल्यासारखा वाटला. माझ्या बरोबर असलेल्य मित्रांची पण थोड्याफार फरकाने अशीच निराशा झाली. तरी "तु अजुन थोडा जाड असला असतास तर असाच दिसला असतास" असे म्हणुन मित्राने त्यातल्या त्यात त्याचे मानसिक समाधान साधुन घेतलेच

हेच ते चामुंडा देवीचे सुप्रसिद्ध मंदीर

मैसूर मध्ये आमचे सर्वात जास्त निराशा केली मैसूर मसाला डोश्याने. मैसूर मसाला डोसा हवा असे म्हणालो की लोक आमच्याकडे फार विचित्र नजरेने पाहायचे. हा डोसा पुण्याच्या शेट्ट्यांनी चक्क मैसूरच्या नावावर खपवला आहे. शेवटी या डोश्यावर तडजोड केली. डोसा होता मात्र अप्रतिम

बाकी उटी भाग -२ मध्ये.

ढिसाळ, ढोबळ 'पीपली लाईव्ह'

'पीपली लाईव्ह'बद्दल सध्या बरीच चर्चा चालू आहे. चित्रपट खूप आवडल्याचं सांगणारे अनेक भेटले म्हणून अखेर तो पाहिला.

चित्रपटाचं थोडक्यात सूत्र असं सांगता येईलः शेतकर्‍यांच्या आत्महत्या हा गंभीर आणि करुण प्रश्न आहे, पण आपली माध्यमं, राज्यकर्ते वगैरे तो प्रश्न अतिशय उथळपणे आणि क्रूरपणे हाताळतात; आपल्या स्वार्थापुरता त्याचा वापर करून घेतात. त्यामुळे प्रश्न अधिकच चिघळतो आणि अधिकच गंभीर आणि करुण बनतो. एक विचार म्हणून हा पटण्यासारखाच आहे. त्यामुळे चित्रपटाद्वारे मांडलेल्या विचारसरणीशी माझे मतभेद नाहीत.

चित्रपटाची मांडणी उपहासात्मक आहे. यातले शेतकरी-गावकरी सालस, निरागस वगैरे नाहीत. द.मा. मिरासदार किंवा शंकर पाटलांच्या कथांमधून दिसणार्‍या गावकर्‍यांसारखे इरसाल आहेत. ते खोटं बोलतात, एकमेकांवर कुरघोडी करण्याचा, स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतात. थोडक्यात, मर्त्य, स्खलनशील, विकारी अशा सर्वसामान्य माणसांची सर्व लक्षणं त्यांच्यात दिसतात. अशा माणसांचं चित्रणही त्यांच्याविषयी जिव्हाळा/कणव उत्पन्न होईल अशा प्रकारे करता येतं. त्यामुळे असं दाखवण्यात काही गैर आहे असं वाटत नाही.

चित्रपटात अनेक गुणी अभिनेते आहेत. रघुवीर यादवसारख्या ओळखीच्या चेहेर्‍यांपासून ते हबीब तन्वीर यांच्या 'नया थिएटर'मधे घडलेल्या पण आपल्याला परिचित नसलेल्या कलाकारांपर्यंत अनेक कसलेले नट, उत्तर भारतीय गावात शोभतील असे रोचक चेहेरे चित्रपटात दिसतात. ते आपापल्या जागी शोभतात आणि अभिनयही चित्रपटाच्या शैलीला अनुसरून करतात.

तरीही चित्रपट पाहून फारच अपेक्षाभंग झाला. त्यामागची कारणं अशी सांगता येतील:

तपशिलांमध्ये रंग भरण्यात चित्रपट कमी पडतो असं वाटतं. उदा: 'लगान'मध्ये ज्याप्रमाणे विविध व्यक्तिरेखांच्या माध्यमातून गाव उभा राहतो, तसं इथे होत नाही. आत्महत्या करु इच्छिणारा नत्था, त्याचा भाऊ, पत्नी, आई यांच्या व्यक्तिरेखा सुरुवातीला थोड्या दिसू लागतात तोच माध्यमं, राजकारणी यांच्या गदारोळात पटकथेला त्यांचा विसर पडतो. या गदारोळात ही माणसं हरवून जातात किंवा त्यांचं माणूसपण बेदखल होतं असं खरं तर दाखवायचं आहे. पण ते प्रेक्षकाला जाणवण्यासाठी मुळात त्यांचा या गदारोळातला वावर हवा तेवढा ठळक, करुण होत नाही. हीच बाब पत्रकार, राजकारणी वगैरेंच्या बाबतीत घडते. या व्यक्तिरेखा केवळ एकरंगी, ढोबळ अशा उभ्या राहतात.

थोड्या काळात पुष्कळ गोष्टी दाखवण्याचा हव्यास चित्रपटाच्या आशयाला मारक ठरतो. प्रसंग रंगण्यासाठी जेवढा वेळ द्यावा लागतो, तेवढा दिलाच जात नाही. हे कसं करावं याचं अशाच उपहासात्मक शैलीतलं उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर श्रीलाल शुक्ल यांच्या 'राग दरबारी' या कादंबरीकडे निर्देश करावासा वाटतो. विविध प्रसंगांद्वारे लेखकानं यातल्या व्यक्तिरेखांना विलक्षण परिणामकारक पध्दतीनं जिवंत केलेलं आहे. तसं 'पीपली'मध्ये होत नाही.

माध्यमं टी.आर.पी. साठी वाटेल त्या थराला जातात, राजकारणी स्वार्थापोटी सर्वसामान्यांना कस्पटाप्रमाणे वागवतात, या गोष्टी तर आता शेंबडं पोरही सांगू शकतं. त्याहून वेगळं किंवा जास्त गुंतागुंतीचं यात काहीही दाखवलं जात नाही. जे दिसतं तेही अगदीच वरवरचं आणि शाळकरी आहे. त्यासाठी वापरलेले विनोदी प्रसंगही पटापट उरकून घेतलेले आहेत.

'लालबहादूर', 'इंदिरा', नेहरू' वगैरे नावांचा वापर करून केलेले विनोद चांगले आहेत. त्यात राजकारण्यांचा बेगडीपणा आणि सरकारी योजनांचा फोलपणा दिसतो. हे चित्रपटाच्या आशयाला पूरक असलेले घटक आहेत म्हणून ते विनोद अस्थानी होत नाहीत, तर परिणामकारक होतात.

अशी कल्पकता इतरत्र मात्र फारशी दिसत नाही. नत्था गावच्या पुढार्‍याकडे मदत मागायला जातो या प्रसंगात पुढार्‍यांच्या समोर ठेवलेल्या अंड्यांवर कॅमेरा ज्या प्रकारे भिरभिरतो त्यावरून आता पुढच्या प्रसंगात नत्थाचा डांबिसपणा दाखवण्यासाठी अंड्यांचा वापर केला जाणार हे उघड होतं. नंतर पुन्हा त्याच प्रसंगाचा आधार घेऊन एक गावकरी आपली आणि नत्थाची कशी जवळीक होती ते सांगतो तेव्हा तर अगदी शिळ्या कढीला उत आणल्यासारखं वाटतं.

शिवाय, जर नत्था इतपत डांबिस असेल तर तो भावाच्या 'मी आत्महत्या करतो; नको? मग तू कर'च्या जाळ्यात सहजासहजी फसतो ते तेवढंसं पटत नाही. इतका गांजलेला असतानाही ज्याची जीवनेच्छा इतकी जिवंत असते तो आत्महत्येसारख्या गोष्टीला मूक संमती देईल असं वाटत नाही.

'गां* फ* रही है', 'मा****'' वगैरे शब्द/वाक्यं वापरली की प्रेक्षक हसणार म्हणून त्यांचा फैलाव आहे. मलमूत्रासारख्या क्रियांशी संबंधित प्रसंग दाखवले की त्याला प्रेक्षकांची प्रतिक्रिया येणार म्हणून तेही आहे. शौचाचा प्रसंग येतो तोवर माध्यमांच्या नावानं पुष्कळ टी.आर.पी. खेचून झालेला असतो. त्यामुळे त्या प्रसंगात चकटफू हशे कमावण्याची शाळकरी हौसच दिसते. चित्रपटाच्या गाभ्याशी असल्या विनोदांचा संबंध लागत नाही ('लालबहादूर'चा तसा लागतो). त्यातून परिणामकारक अर्कचित्र उभं राहात नाही.

अर्कचित्र परिणामकारक वठण्यासाठीही कष्ट घ्यावे लागतात. चॅप्लिन जेव्हा 'ग्रेट डिक्टेटर'मध्ये हिटलरचा बुटबैंगणपणा, वचावचा भाषण करण्याची त्याची शैली यांचा वापर करतो तेव्हा तो हिटलरचं अर्कचित्रच उभं करत असतो. पण त्यामागचे कष्ट (आणि बुध्दीही) जाणवतात. जर्मन भाषेतले ध्वनी, हिटलरची वक्तृत्वशैली यांचा अभ्यास करून त्यांतलं विनोदमूल्य चॅप्लिन हेरतो. पृथ्वीगोलाबरोबरच्या नृत्याच्या प्रसंगात हिटलरच्या आवडत्या वॅग्नरच्या संगीताचा चॅप्लिन वापर करतो. कलेविषयीच्या नाझींच्या मूर्खासारख्या मतांचा चॅप्लिन विनोदनिर्मितीसाठी वापर करतो. ज्याचं अर्कचित्र काढायचं त्याच्यातल्या 'अर्क' घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी बुध्दी लागते; त्यांचा वापर करून प्रसंग घडवण्यासाठी कल्पकता लागते. 'पीपली'मध्ये दोन्हींचा अभाव जाणवतो.

सर्व हास्यास्पद गोष्टी संपवून चित्रपट जेव्हा शेवटाकडे जातो तेव्हा फारच उरकून टाकल्यासारखा वाटतो. प्रेक्षक अंतर्मुख होण्यासाठी करुण प्रसंगांतलं कारुण्य अधिक उठावदार व्हायला हवं होतं. त्यासाठी करुण प्रसंगांची लय धीमी हवी होती. पण तसं होत नाही. दोन एस्.एम्.एस्.च्या दरम्यान जमलं तर चित्रपटाचा आस्वाद घेणार्‍या तरुण प्रेक्षकांना कंटाळा येईल अशी भीती त्यामागे असावी की काय अशी शंका मनाला चाटून जाते.

एकंदरीत, मूळ विचार पटण्याजोगा असूनही, शैली रोचक असूनही, दमदार अभिनय असूनही ढोबळ पटकथा आणि तिचं ढिसाळ चित्रण यांमुळे चित्रपट योग्य उंची गाठू शकत नाही. चांगल्या विषयाला हात घालण्याचा एक वाया गेलेला प्रयत्न एवढंच अखेर हाती उरतं.

झी मराठी लिटिल चॅम्प्समधून अभिषेक सराफ अन्यायपूर्वक बाहेर....

बहुतेक जणांनी झी मराठीवर सोमवार १६ ऑगस्ट आणि मंगळवार १७ ऑगस्टला रात्री लहान मुलांचे सारेगमप बघितले असेल. त्यावर आपापल्या प्रतिक्रियाही नोंदवल्या असतील. मात्र मला जे आढळले ते मी लिहितो आहे.
सोमवारचा भाग पाहिल्यानंतर असे लक्षात येते की त्यातल्यात्यात गाणार्‍यांचा संच होता आणि मंगळवारी चांगले गाणार्‍यांचा. म्हणजेच सोमवारचे बेताचे ५ राहिले आणि मंगळवारचे २ चांगले गेले. त्यातही मंगळवारच्या भागात ज्या मुलाला 'ध' पर्यंत गूण मिळाले तो बाहेर गेला आणि 'प' पर्यंत गूण मिळूनही दुसरा स्पर्धक आत राहिला. म्हणजेच कोण आत कोण बाहेर हे आधीच ठरलेले असते काय?
दुसरे म्हणजे जसे टीव्हीवर दिसते तसे प्रत्यक्षात नसते. गुणतक्ता घेऊन ५ मिनिटे परिक्षक बाहेर असतात. पुन्हा मूळच्या जागी येऊन बसतात आणि शॉट सुरू होतो. टीव्ही बघणार्‍यांना वाटते की तिथुनच येतात की काय!
एखाद्याला नेमके का काढले याचे कोणतेही उत्तर मिळत नाही. एका परिक्षकाचे गूण दिसतात तर दुसर्‍याचे दिसत नाहीत. ते न दिसणारे गूण नेमके किती हे सांगितले जात नाही. फक्त कोण आत, कोण बाहेर इतकेच सांगितले जाते.
एकूणच पद्धत आणि सादरीकरण पूर्णपणे सच्चे वाटत नाही.
तसेही संगीतक्षेत्रातील अनेक मान्यवर सध्याच्या लिटिल चँप्स कार्यपद्धतीवर नाराज आहेतच.

माझी आपणा सर्वांना विनंती आहे की, बाहेर काढलेल्या बालगायकांचे गाणे ऐकून त्यावर प्रतिक्रिया द्याव्यात.

यातील विशेषकरून अनेक मान्यवरांना धक्कादायक वाटलेला निकाल म्हणजे अभिषेक सराफला काढून टाकण्याचा.
ही लिंक पहा...
http://www.youtube.com/watch?v=tMqnOA37w-8

Drinks ...मुली आणि मद्यपान!

उंचावल्या ना भुवया..! काही खास गोष्ट नाही सहजच ....मनात आलं ते छापते आहे..!
काल दोनचार मित्र-मैत्रिणी रात्री जेवायला आले होते. छोले+पुरी+श्रीखंड असा साधा बेत होता. मस्त जेवण झाले.आवराआवरी झाल्यावर सहज गप्पा टप्पा सुरु झाल्या. नेहमीचे विषय चघळता चघळता काही तरी फाटा फुटला आणि गाडी 'स्त्रिया आणि drinks' स्टेशनावर येउन पोचली......Belive me....त्यावर इतकी चावा चावी झाली ना कि बस्स....
सकाळी ५.३० वाजेपर्यंत दळण चालु होते..
मुलींनी drinks घेणे योग्य कि अयोग्य्...संस्कृती,समाज्,नीतीमत्ता,संस्कार इ.इ.
मग पुरुष पितात ते योग्य की अयोग्य...हे सगळं चावलं गेलं.
पाश्चात्य संस्कृतीचा पगडा...बदलती स्त्री ची मानसिकता..एक ना दोन..!
हे लिहिण्यामागचा उद्देश इतकाच आहे कि आपल्या मि.पा. करांची मते जाणुन घ्यायची आहेत.
आपल्या विभिन्न मते,वेगवेगळ्या मानसिकता,प्रगल्भ and truely practical वाचक यांचा अक्षरशः खजिना आहे.
मला खरंच जाणुन घ्यायला आवडेल कि हे योग्य कि अयोग्य.
मग यामध्ये पुरुषांना मुभा आहे असे का मानले जाते?
यामध्ये संस्कारांचा सहभाग कितपत आहे?
आपल्या मर्यादेत राहुन drinks घेतले तर योग्य आहे कि नाही? आणि असेल तर मग ही मर्यादा काय असेल आणि ती कोण ठरवणार? केवळ change म्हणुन किंवा विरंगुळा म्हणुन drinks घ्यावी कि नाही?
अजुनही अनेक पैलू असु शकतात..कि जे आत्ता सुचत नाहियेत पण चर्चेतुन समोर येत जातील!
so friends.... what all you've got to say about it??

आंतरराष्ट्रिय बातम्या आणि भारतिय वृत्तपत्रे

पाकिस्तानात सध्या पुरानं थैमान घातलंय. पंधरा दशलक्ष म्हण्जे जवळ जवळ नऊ टक्के लोक विस्थापित झालेत. आणि हे घडतंय ते आपल्या शेजरी राष्ट्रात, ज्याच्या आर्थिक आणि राजकीय अस्थिरतेचा आपल्या देशावर थेट परिणाम होतो. या अशा आपत्तीतही भारताने देऊकेलेली पाच्दशलक्ष डॉलर्रची मदत स्विकारावी का नाही यावर त्या देशात खल चल्लय. स्वाभाविकच ही एक प्रचंड महत्वाची बातमी आहे पण दुर्दैवाने टाइम्स सारख्या प्रमुख वृत्तपत्र समुदायाने याची तितकिशी दखल घेतलेली दिसत नाही. याला अपवाद मात्र मद्रासच्या हिंदूचा. या पार्श्वभुमीवर बी बी सी आणि सी एन एन सारख्या कंपन्यांचं कव्हरेज मात्र उठून दिसतं.

टाइम्स बाबत तर हल्ली काही नं बोललेलंच बरं. पेज ३ न्यूज पेक्षा इथे इतर बातम्यांना काही महत्व दिसत नाही. आणि हे असं नेहमीच जाणवत राहतं.

भारतीय मिडीया या कोषातून केंव्हा बाहेर पडणार देवजाणे. तुम्ह्हाला याबाबत काय वाटतं?

नागपंचमीच्या निमित्ताने

नागपंचमी:-

प्रतीवर्षी श्रावण शुक्ल ५ ला ही पूजा करायची पध्द्त आहे. नागाची मातीची मूर्ति किंवा घरातील देवपूजेच्या खोलीतील बाहेरच्या भिंतीवर काही भाग गोमयाने-शेणाने सारवून त्यावर पिवळ्या मातीने किंवा चंदनाने नागाची आकॄती काढून ही पुजा करतात. त्याचप्रमाणे एखाद्या पाटावर पाच किंवा नऊ फ़ण्यांच्या नागांची आकॄती काढून पुजा करण्याचीही पुष्कळ घराण्यात पद्धत आहे. नवनाग देवता किंवा अनंतादिनागदेवता असे या देवतेचे नाव आहे.

नवनागांची नावे पुढीलप्रमाणे:-

अनंतं वासुकिं शेषं पद्मनाभं च कंबलम !
ध्रुतराष्ट्रं शंखपालं तक्षकं कालियं तथा !!

म्हणजे १) अनंत २) वासुकि ३) शेष ४) पद्मनाभ ५) कंबल ६) ध्रुतराष्ट्र
७) शंखपालं ८) तक्षक आणि ९) कालिया

श्रीमहादेवाच्या अंगावरील अलंकारात नाग असायचेच आणि श्रीविष्णू तर शेषावर म्हणजे नागावरच शयन करीत असतात हे प्रसिध्दच आहे. नागाची देवालयेही कित्येक ठिकाणी आहेतच. ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याचे तर नाग हे कुलदैवत किंवा प्रतीक आहे.

या दिवशी दोन प्रहरी घरात नागांची पूजा झाल्यावर ज्या ठिकाणी सर्प रहाण्याचा संभव असतो अशा जवळच्या वारुळाला गंध-फ़ूल वाहुन तिथे दुधाचा नैवेद्य ठेवण्याची चालही पुष्कळ ठिकाणी आहे.

१) श्रीकृष्ण कालिया नावाच्या नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पाण्यातून वर आला तो याच दिवशी.

२) मणिपूर येथे पूर्वकाली एक खेडवळ होता. त्याने या दिवशी आपली जमीन नांगरली. तेव्हा तिथल्या एका कोप-यातल्या नागिणीच्या पिलास इजा पोहोचून ती मरण पावली. तेव्हा त्या नागिणीस राग येऊन तिने त्या माणसाच्या कुटूंबातील सर्व माणसांस रात्री निजल्यावेळी दंश केला, ती तशीच पुढे त्या खेडवळाची एक लग्न झालेली मुलगी होती, तिला दंश करण्यासाठी तिच्या नव-याच्या घरी गेली पण त्या मुलीने नागिणीची पूजा करून तिच्यापुढे दूध वगॆरे ठेवले. त्यामुळे ती नागिण संतुष्ट झाली आणि त्या मुलीच्या प्रार्थनेवरून पुढे तिने अम्रूत शिंपडून तिच्या माहेरच्या माणसांनाही जिवंत केले. तेव्हापासून नागपंचमीच्या दिवशी जमीन नांगरू नये असे म्हणतात. आजही कित्येक ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी तवा चुलीवर ठेवू नये, विळीने चिरु नये, जमीन खणू नये, तळण करू नये असे कटाक्षाने पाळ्णारे लोक आहेत.

३) आणखी एक गोष्ट अशी की सगळेच साप किंवा नाग काही विषारी नसतात. काही ठिकाणी तर नाग हा क्षेत्राच रक्षण करित असतो, म्हणून त्याला क्षेत्रपालही म्हणतात. एखादा कंजुष किंवा द्रव्य हेच सर्वस्व मानणारा माणुस जेव्हा आपले द्रव्य पुरून ठेवतो तेव्हा तो मेल्यावरही नागरुपाने द्रव्याची राखण करीत असतो अशीही कित्येकांची समजुत आहे.

४) नाग हा ब्राम्हण असल्यामुळे त्याची हत्या करणे म्हणजे ब्रम्हहत्या होते त्यामुळे नागाला मारु नये असे म्हणतात.

५) नाग किंवा साप शेतातल्या ऊंदरापासुन पिकाचे रक्षण करतो म्हणुनही या दिवशी नागाची पुजा केली जाते.

दोन दिवसापूर्वीच आमच्या सोसायटीत मागे असलेल्या झाडीतून नागोबा व्हिजीट देऊन गेल्याचे कळले. साप पकडणारे लोक्स सुध्दा त्यांच्या लाठ्या काठ्या (स्टीक्स) घेऊन आले होते. अर्थात नाग महाराजांनी तोपर्यंत कलटी मारली होती ते सोडा. या लोक्सनी दोन चार बीळ सद्रूश भोकांशी झटापट केली आणि आले तसे काठ्या हलवत निघुन गेले. पुढच्या कॉलच्या वेळेला बघू बोलले. मनात म्ह्ट्ल आयला मिळाला असता नाग तर बर झाल असतं तेवढच एक टेंशन कमी (आख्खा श्रावण आणि भाद्रपद बाकी आहे हो अजून). असो.

बज्जु गुरुजी

Syndicate content
Scroll to Top